हम्मामा म्हणे किंवा हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...

लेखनविषय:
पेरणा वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा... निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा.. टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा.. दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा... मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे... हम्माऽऽऽ ...

दमामि म्हणे किंवा विडंबनकाराची व्यथा किंवा चोराच्या उलट्या बोंबा

लेखनविषय:
बहिर्वक्र म्हणा हवे तर , विडंबन हा आरसा देखणे वा कुरुप तुम्ही, फरक नाही फारसा... पाडती जिलब्या इथे , वर वापरुनी डालडा रंग नाही स्वाद नाही , जाहला अतिसारसा.. ट्रोलभैरवांचे जथे मुक्त फिरती हिंस्रसे हरून पडला नवमिपाकर त्यापुढे गपगारसा.. आक्रंदती मिपात आता राम नाही राहिला जाहले संस्थळ जणू कट्टा पडिक बेकारसा... सकस लिहिणारे मिपाकर आजला गेले कुठे "मापं" ओलांडुन जाती भरला इथे बाजारसा...

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

पेरणा आणि प्रेरणा जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही ....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही ....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही ....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई .......

तीर्थ

लेखनविषय:
तीर्थ कुठले ? इथे कसे? कुणी आणले? काय तो आस्तिक! कोण त्याचा देव? काssssही विचारु नका. तीर्थ घ्या. ठरले एकदा तीर्थ आहे! तर आहे. वाद नको. विचार नको. गंगा काय न् नर्मदा काय.... याच समुद्रात मिसळतात! बसा निवांत. तीर्थ घ्या. बाहेर दंगा आहे फार. जरा मनातच लोळा. आकांत नका मांडू एकांताचा. तीर्थच ठेवा ना उशाला! रात्र टाका पायथ्याला. तीर्थ घ्या. तीर् घ्या.....

एक काली-पिली कविता

लेखनविषय:
सकाळ-संध्याकाळ फेसबुकवर किंवा इतरत्र स्वतःच्या कित्येक कविता, चित्र, लेख प्रसवणार्‍या आणि स्वतः अनन्यसाधारण कलाकार असल्याचा साक्षात्कार झालेल्या फेसबुकी प्रतिभावंतांना सविनय अर्पण! आपल्या दिव्य प्रतिभेची गिरणी अशीच अविरत, अहोरात्र चालू द्या! काल्या-पिल्या जनतेला गिरणीच्या धुराने खोकला आला तरी बेहत्तर, माघार घेऊ नका.... अजून एक - take it with a pinch of salt, don't read too much into it!

( दीडशे रे.....)

लेखनविषय:
दीडशे रे.......... एक शाळा होती सुंदर तीत मुले होती शंभर मग आणखी आले पन्नास किती किती झाले रे? दीडशे रे दीडशेला भागू मी की, दीडशेने गुणू मी भागू गुणू, भागू की गुणू गुणू भागू, गुणू की भागू दीडशे रे तो सट्टे कसकसले लावे अन्‌ हरतो हो लावे अन्‌ हरतो हो मग किती सेशन गेले, अन्‌ पैसे पण गेले रे पण आशेवर लढला, अन्‌ खेळतच राही रे तो डाव खेळ-खेळला, हरला हरला आणि हरला बिल थकले उधार झाली, उधारीत हाय ती खाल्ली जहरासाठी पैसे नव्हते रे दीडशे दीडशे दीडशे दीडशे रे दीडशे रे बांधून ये रिक्षाला काटेरी तारांना पंचर कर रिक्षाची चाके रे छोले तर ती खाते ना आणि कुलचे पण खाते ती आणि चावून ती अनरसे सांबार पण गिळते

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखनविषय:
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

सोडल्य दह्यात मिश्या ( करून दाखवले )

लेखनविषय:
prequel 1 मुल प्रेना मोकलाया दाहि दिश्या तसेच हे आव्हान ============================================== prequel 2 पण ह्या लेखाचा जबाबदार आहे समाज ,तो समाज जो कंपू बाजी करतो तो समाज जबाबदार .एक माणूस मिपाबालक म्हणून परवेश करतो एका नवीन घरात ,पण मिळते काय तर धिक्कार तिरस्कार वाटले होते लहान मुलाला समजून घेतील वडीलधारे पण इथे मिळाले पार बायको सारखे उणे दुने काढणारे असो ====================================== निस्त्ले केसं ते मला खून वीत आहे स्वह

आमचाही पाउस.....

मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच. काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले. फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...

शीर्षक सुचले नाही

लेखनविषय:
कधी कधी निरर्थका लिहा बघू ज़रा उगा असाच मी लिहूनिया प्रसिद्ध जाहलो जगा असाच खेळ खेळलो पिळून शब्द काढले अजून केस ओढतो कशास काव्य वाचले इथून चार चोरले तिथून चार ढापले करून भेळ चट्पटी विका म्हणून आपले म्हणेल तो बळेबळे, "कळेल त्यांस चांगले" छळेल प्रश्न हो मला, "कशास लोक पांगले?" तुम्ही मला बघूनिया कशास दूर भागता तुम्हास सोडणार का न काव्य हे सुनाविता? पळा पळा छळेन मी विडंबने करेन मी उदार काव्यप्रेमिका कशास लाइका कमी? -- स्वामी संकेतानंद आता मी पळतो..........
Subscribe to काहीच्या काही कविता