ओळखा पाहू ?
टक्कल डोक्याला
चष्मा डोळ्यांना
बाळ माझा
होईना मोठा.
जिथे जातो
तिथे पडतो
आधार ताईचा
वाटतो घ्यावा.
मी कोण?
टक्कल डोक्याला
चष्मा डोळ्यांना
बाळ माझा
होईना मोठा.
जिथे जातो
तिथे पडतो
आधार ताईचा
वाटतो घ्यावा.
मी कोण?
आजकाल मिपावर गुर्जींचा (इथे दोन्ही कानांच्या पाळ्यांना हात लावण्यात आलेला आहे याची ज्याची त्याने नोंद घ्यावी) प्रभाव जास्तच झाल्याने ह्या ईडंबणावर त्यांची छाप दिसू शकते (दिसेलच ;) )...हे ईडंबण गुर्जींना अर्पण...जिल्बी मात्र मीच पाडली बर्का ;)
आम्ची पेर्णा http://www.misalpav.com/node/29809
-------------------------------------------------------------------------------
जगने न तुज्य(कृपे)विना ,
का रडवतो तू मला,
गेला कोंडून तू मजला,
जणू श्वास माझा गेला,
(कवी ग्रेस आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची जाहीर माफी मागून.)
थोडासा वेगळा प्रयत्न आहे, मूळ कवितेतील कमीत कमी शब्द बदलून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय. मूळ कवितेत ५४ शब्द होते. एकूण शब्दसंख्या तशीच ५४ ठेवीत त्यातले फक्त १२ शब्द बदलून उर्वरीत ४२ शब्द तसेच ठेवून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय. कितपत जमलेय ते सांगा.
चणे इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते
ते झरे मधुशालेचे, तो टेबल फसवी माया
नाल्याशी निजलो आपण, नाल्यात पुन्हा उगवाया
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/29625
"काण्या तू ? वहिनी कुठाय"
या तुझ्या टोकदार प्रश्नानं
तु माझ्या पोटाचं
मी मोठ्या कष्टाने पट्ट्याने बान्धलेलं गाठोडं
टचकन फुटून गेलं,
आणि मला (त्या ललने समोर) कफल्लक बनवण्यात
तू पुन्हा एकदा यशस्वी झालास..
अभिनंदन!!!
हाति घेतला तांब्या वेळ पहाटेची
रेल्वे ट्र्ॅकही पाहतो वाट आमच्या आगमनाची
सावरुन बैसोनि धोतर होते सोडलेले
अचानक गुडगुड आवाज कानी पडले
कालचे जेवण बहुतेक नव्हते पचलेले
पण पुन्हा ट्र्ॅकही थरथरताना दिसले
रेल्वे मजकडे येताना अखेरीस पाहिले
धोतर जीव तांब्यापैकी काय वाचवावे
गुंडाळुनि धोतर बाजुस उडि ठोकली
त्यांब्याने माझ्या रेल्वेखाली मान दिली
उडुनी त्यांब्याने मस्तकाचे चुंबन घेतले
त्याचक्षणी शौचालय बांधण्याचे मी ठरवले
त्वरेने बाजारात जावोनि नवे तांब्ये आणले
नव तांब्यासमवेत शौचालयात आगमन केले
आज एक ब्रेकिंग न्यूज पाहिली – दिल्लीत एके ठिकाणी आधी कचरा पसरविला आणि नंतर गाजा-बाज्या सहित तो स्वच्छ केला
आधी शुभ्र वस्त्र धारण करावे
एक डिझाईनर झाडू आणावे
मग मिडीयाला बोलवावे
स्मायली फोटो चमकावे.
रस्त्यावरी कचरा पसरविला
तोची झाडून स्वच्छ केला
असा स्वच्छता अभियानाचा
नेत्यांनी बोऱ्या वाजविला.
कवी नारायण सुर्वे यांची क्षमा मागून.....
(मुळ काव्य : दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे)
------------------------------------------------------
दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले
हिशोब करतो आहे आता, किती पैसे भुरर्कन उडाले
शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली
मंत्रीपदाच्या भरोशावर जिंदगी बर्बाद झाली
जे होते माझे चिन्ह , जनतेकडेच गहाण राहिले
कधी झेंडा उंचावलेले हात, कलम झालेले पाहिले
लिहीतानाच हसायला येत आहे, कारण 'मुद्दाम' लिहितोय.
---दबंग---
हुडहुड दबंग
हुडहुड दबंग
ये आरोळी
थेटरात मग
अनेक शिट्ट्या
एका वेळी
पोलिसाच्या
वेशामध्ये
सल्लूभाई
थेटर फुल्ल
प्रेक्षक मुग्ध
त्याच्या पायी
बघतो पिक्चर
बाजूला मी
डोके ठेवुनि
येते गम्मत
मारामारी
ऐसी बघुनि
मनोरंजना
कमी न पडती
सल्लूभाई
अन भार्येचा
हट्टच असता
इलाज नाही
--------------
-----------
आता पुन्हा निवडणुका येणार
तेच उमेदवार हात जोडत येणार
मग आपण खोटं खोटं हसणार
मग मधेच डोक्यात प्रश्न येणार
हे आज इथे कशाला येणार ?
काय रे देवा.…
मग तो पडलेला प्रश्न विचारता नाही येणार
मग आम्ही तो गिळणार
मग गिळूनही तो पुन्हा विचारावासा वाटणार
मग समोरच्या उमेदवाराच्या डोळ्यातही तो दिसणार
तो निर्लज्ज असेल तर त्यावर हसणार
त्याच्याही मनाला टोचत असेल तर नजर चुकवणार
मग नसताच बघितलं तसं तर बरं झालं असतं असं वाटणार
आणि ह्या सगळ्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसणार