पप्पू माझा लेकुरवाळा
'विठू माझा लेकुरवाळा' या गीताच्या चालीत खालील गीत सावकाश गुणगुणावे.
_____________________________________________________
पप्पू माझा लेकुरवाळा
संगे खांग्रेसींचा मेळा
दिग्गीराजा खांद्यावरी
खुर्शिदाचा हात धरी
पुढे चाले राज बब्बर
मागे नगमा ही सुंदर
कपिल आहे मांडीवरी
अंबिका, गिरीजा बरोबरी
अहमद आहे कडेवरी
शीला करांगुली धरी
रे़णुका म्हणे राहुला
करी खांग्रेसींचा सोहळा