एका महान कवितेवर तितकेच टुकार विडंबन... मंडळी गोड माणुन घ्या.
कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय पुरुषांचा.
जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरखंडाने बांधलंय त्याला.
या दोरखंडातुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी? नाही!
कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे.
एक पुरुष जेव्हा लहान कोंब असतो,
तेव्हा आईच्या पोटातच त्याला इंजिनेर, डॉक्टर होण्याचे फर्मान सोडले जाते.
कसा तरी करत जन्म घेतलाच त्याने, तर
आई-बापाची स्वप्ने पुरी करायच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते.
आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना हवी
असलेली मुलगी पुढ्यात आणून टाकली जाते.
आता काळ बदललांय जरी म्हणत असले तरी
जमाना तोच आहे फक्त पद्धत बदललीय.
स्वतःला सुशिक्षीत म्हणवणारी नवरी मुलगीही
"आईवडिल म्हणतील तसं नाहीच" म्हणुन नवऱ्याचे सँडविच बनवून टाकते.
अशावेळी कोण घेईल पुढाकार पुरुषाला वाचवण्याचा?
लग्नानंतर पुरुषाला पतीचा दर्जा मिळतो,
तरी तो फक्त सतत पैसे देणारं एटीएम बनुन जातो.
त्याचा दर्जा फक्त तो किती पैसे कमावतो यावरच ठरतो.
प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक व्यक्ती
त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करुन देत असतो.
पण स्वतःची कर्तव्ये कधी कुणी समजुन घेतलीयंत?
रांधून वाढून कुटुंब पोसणं हेच फक्त कर्तव्य नसतं
तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान,
त्यांच्या भावना सांभाळनं हेदेखिल स्त्रियांचं एक कर्तव्य असतं.
प्रत्येक वेळी स्त्रीकडुन पुरुषांच्या मनाची घालमेहल केली जाते.
शब्दरुपी तलवारीने त्याचे नाजुक मन घायाळ केले जाते.
पण हेही लक्षात ठेवा की ,पुरुष ही 'सहनशक्ती' आहे.
मनाने घायाळ झालेला पुरुष हा उसळलेल्या समुद्रासारखा असतो .
त्याच्या हातातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही.
कारण तो जरी सहनशक्ती ची मुर्ती असला तरी
क्रोधाच्या बाबतीत जमदग्नी देखिल आहे.
म्हणुन पुरूषांचा सन्मान करा.
व दुसर्यांनाही शिकवा.
तरंच स्त्रीचेही अस्तित्व अबाधित राहीन.
जय (लिंगभेदरहित समान आदर असावा असा) महाराष्ट्र!
प्रतिक्रिया
13 Apr 2015 - 6:11 pm | सूड
ह्या ओळीतल्या गंडलेल्या व्याकरणासकट विडंबन केल्याबद्दल पुढच्या कट्ट्याला तुम्हाला एक मस्तानी!! ;)
13 Apr 2015 - 6:14 pm | बॅटमॅन
या विडंबनाबद्दल, "तू भेट, तुला फुकट देईन" अशी दुरुस्ती पायजे.
(पळा पळा)
13 Apr 2015 - 6:15 pm | जेपी
मस्तानी...
हा प्रतिसाद बदलापुरकर का पुणेकर मनुन..
13 Apr 2015 - 6:16 pm | सूड
मस्तानी दोन्हीकडे मिळते, चिंता नसावी!! ;)
13 Apr 2015 - 6:21 pm | जेपी
फरक हाय ना पण..
(मस्तानी प्रेमी)जेपी
13 Apr 2015 - 6:21 pm | अत्रुप्त आत्मा
है शाब्बास!
13 Apr 2015 - 6:41 pm | अजया
चान्स पे डॅन्स विडंबन!!
13 Apr 2015 - 7:19 pm | पॉइंट ब्लँक
क्या बात है!
13 Apr 2015 - 7:53 pm | तिमा
तुम्ही बाबूजींची गाणी ऐकली नाहेत वाटतं! म्हणून 'पुरुशाचे' असे लिहिताय.
आणि एखादे ठिकाणी 'चा' च्या ऐवजी 'झा' तर लिहिलं नाहीयेना ?
13 Apr 2015 - 8:02 pm | संदीप डांगे
अहो विडंबन आहे हे.
मूळ कवितेत सुद्दलेकनाच्या जितक्या चुका आहेत त्या कायम ठेवन्याचा परयत्न आहे.
बाकी बाबूजींची गाणी न ऐकलेला कुणी मराठी मिपावरच काय धरतीवर तरी असेल काय?
14 Apr 2015 - 9:04 am | आनन्दिता
यावरुन प्रेरणा घेऊन आता कोणी " फुरशांचे अस्तित्व" म्हणुन जिल्भी टाकू नये म्हणजे मिळवलं =))
14 Apr 2015 - 8:19 am | जेम्स बॉन्ड ००७
LOL
14 Apr 2015 - 9:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
जॅक डॅनिअल्स ला बराचं स्कोप आहे विडंबनाचा =))
14 Apr 2015 - 12:05 pm | अत्रुप्त आत्मा
चिमणरावांशी शमत हाय!
दुत्त दुत्त आ..नंन्दिता.. तुच का नै टाकत येकादी जिल्बी - नागिनींचे हस्तित्व म्हनून!
14 Apr 2015 - 8:46 pm | आनन्दिता
कुचुन नागिनींचे हत्तीत्व असं वाचलं. =))
14 Apr 2015 - 8:58 pm | अत्रुप्त आत्मा
@हत्तीत्व >> द्यांबिश ...दुत्त दुत्त!
14 Apr 2015 - 12:51 pm | एस
मी आधी तसेच वाचले होते. धागा उघडल्यानंतर कळाले हे फुरशे पुरुशजातीचे आहे!
13 Apr 2015 - 8:35 pm | तिमा
प्रतिक्रियेचं पण विडंबन आहे.
13 Apr 2015 - 11:38 pm | संदीप डांगे
ओके ओके.
बर्याचदा आमची टुपलाईट पेटतच नाय...
13 Apr 2015 - 11:43 pm | श्रीरंग_जोशी
बल लावाना भाऊ मंग.
आमचीबी टुपलाइट नाही पेटायची म्हनून बल वापरण सुरू केलं.
बाकी इडंबन झक्कास हाये.
14 Apr 2015 - 12:52 am | संदीप डांगे
थांकु बरंका.
13 Apr 2015 - 9:10 pm | पियुशा
किधर वो कोल्हे तै की कविता ओऊर किधर तुम्हारा इडमन्नं :p
13 Apr 2015 - 9:11 pm | पियुशा
किधर वो कोल्हे तै की कविता ओऊर किधर तुम्हारा इडमन्नं :p
14 Apr 2015 - 12:57 am | किसन शिंदे
एकदा टाकलं तरी कळतं की हो नगरकर. =))
14 Apr 2015 - 1:16 am | खटपट्या
पियुशातैंचं आडनाव नगरकर हाये का ?
14 Apr 2015 - 8:33 am | अत्रुप्त आत्मा
@पियुशातैंचं आडनाव नगरकर हाये का ?>>> आंsssssss पियुशा नै! :-/ जिल्बुषाम्हणा!
त्ये पां डुब्बा नी क्येल्येलं बारसं हाय! ;)
13 Apr 2015 - 9:20 pm | वेल्लाभट
बरोब्बर ! वाह.
डांगे साएबांचा ...... विजय असो
13 Apr 2015 - 9:51 pm | खटपट्या
डांगे साहेब आगे बडो. तुम्हारे साथ जम्या तो आयेंगे !!
13 Apr 2015 - 11:15 pm | प्रदीप साळुंखे
एवढच
14 Apr 2015 - 9:32 am | कहर
मस्त … फक्त एक सुधारणा सुचवायची आहे
'कोमेजून टाकले' हे खूप मुळमुळीत वाटते. 'कुचल्ले' हा शब्द फर्मास फाईंड आहे. तो वापरल्यास काहीतरी अजून 'अबाधित' राहील (बादवे तो कोणत्या भाषेतून आला यावर R & D चालू आहे )
14 Apr 2015 - 11:58 am | संदीप डांगे
हा हा हा. लयी भारी.
14 Apr 2015 - 9:50 am | नाखु
मा मो ऑन "छान लिहीलेस हो "संदीपा", यांची दु:खे तरी कुठे मांडायची बिचारे मनातल्या मनात कुढायचे,आज ह्यांनी चांगले दोन वाट्या शिकरण खाल्ले आणि गुमान घास्लेली भंडी जागेवर लावली (आजकाल लाटणे दिसेल असेच जवळ ठेवते मी)
बाकींच्या कुज्कट टोमण्यांकडे लक्ष नको देऊ, तू मटार सोल तोपर्यंत मी हो.मी.सू.या. पहाते" मा मो ऑफ
14 Apr 2015 - 12:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
येवढं सौ--जन्य?
14 Apr 2015 - 12:42 pm | नाखु
तुला मी (माई) माहीत नाही ! फुक्कट्चा मिपाजन्म रे तुझा.मी यांना कुठेच तोंड उघडायची संधीच देत नाही (उगाच चावट विचार नको आणूस मनात) माझ्या भीतीने ते प्रतीसाद पण माझ्याआडून्च देत आलेत हो पाहिजे तर गुर्जी भावजींना विचार! सांगतील सगळं सवीस्तर मामो ऑफ