✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

धोतर आणी डबा २

श — शब्दानुज, Sun, 04/12/2015 - 23:30
पोटच्या खळगीसाठी मी शहरात उतरलो शहराच्या वैभवात पार हरवुन गेलो मॉल थिएटर हॉटेलमध्ये सकाळ सरली अचानक पोटातुन माझ्या कळ आली भविष्याच्या कियेची जाणीव तिथे झाली 'त्या' जागेची मागणी तत्परतेने केली सुलभ सुविधा फारच असुलभ होती पाय ठेवण्याचिही तिची लायकी नव्हती मनातला आवेग बाहेर पडु लागला उत्कटता जशी प्र्ेयसी शोधे प्र्ीयकराला अंधारमय भविष्य माझे समोर दिसले थकलेले घामेजलेले पाय थरथरु लागले समोरुन एका बसला जाताना पाहिले उरलेले बळ क्षणात गोळा केले पकडताच बस कंडक्टने मला उतरवले भयानक गर्दिचे कारण पुढे केले गेले चालत जावुन शेवटी स्टॅंड गाठले जागेसमोरील गर्दि पाहुन मन हबकले कुलुपाची चावी त्यांच्याकडुन होती हरवलेली माझ्यासोबत कैकांची ब्रह्मानंदी टाळी लागली शेवटी मी कसाबसा आत 'उतरलो' शिव्यांच्या लाखोलीसह पुन्हा बाहेर आलो आतले जल आता अटले होते सकाळपासुन मुहुर्तच मिळत नव्हते अखेरीस सर्व कार्यक्रम उरकला गेला जीव माझा समोरच्या बादलीत पडला परतताना धोतराची पोरांनी टर उडवली त्यांच्या हातातील 'डब्याने' खोपडीच सटकवली प्र्ाण्यांपेक्ष्ा वाईट ही मानवाची अवस्था मनास घाव देई ही शहरव्यवस्था

प्रतिक्रिया द्या
1229 वाचन

💬 प्रतिसाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा