प्रेम या थिम वर एक गद्य-पद्य लिहायचे होते त्यात मी ' पुढाऱ्याचे प्रेम ' वर लिहायचे ठरवले. एक पुढारी आपल्या नाराज झालेल्या बायकोला कसे मनवेल ते बघूया:
अशी का ग प्रिये
तू गरम तव्यावर राहतेस
तुझी माझी कायमची युती
मग कशाला उगाच झेंडे फडकवतेस
जरा मूड मध्ये आलीस
कि जशी पक्षाला मिळतेस
आनि थोडी येउन बिलगलीस
कि मला खुर्चीवानी वाटतेस.....
माझ्याशिवाय तू
जशी अपक्ष उमेदवार
नाही विरोधी पक्षात मान तुला
तू तर फुटलेला आमदार…..
शिक्शान मंत्री करू
कि वट लाऊ direct Home-Minister पदासाठी
तू फाकिस्त बोल
आहे हे सरकार कायमच आपल्या पाठी
सारे मिळून खाऊ गुमान
पुरवीन तुझ्या साऱ्या demand
जरी मी सामान्य कार्यकर्ता
असशीलच कि तू Hi-Command…..
प्रचंड मतांनी निवडून
केलेस मला 'खास'दार
आणीबाणी जाहीर करून
का चालणार आहे हा आपला संसार....
वेळ नाही आपल्याला
तुला मनवायला फार
पार्टी चा विचार-विन्मय करायचा
आहे आमच्य्वारच तर भार......
टिकून असलो आम्ही जरी
power नाही बक्कळ
मला काय....सरकारला पण तर लागते कायम
बाईचीच शक्कल
जरी करशील बंडखोरी
तरी एकवार घेईन मी पक्षात
मात्र आलीस जर आपले
सरकार कोसळायच्या आत !
प्रतिक्रिया
5 Jan 2016 - 3:47 pm | एस
:-) छान आहे.
5 Jan 2016 - 6:19 pm | सप्तरंगी
एस, प्रतिसादाबद्दल आभार :)