कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..
ओळखीचं हसून बोलायला हवं..
किती ती धूळ गैरसमजांची,
मनाला स्वच्छ झाडायला हवं..
कुठंतरी आत सलतंय का काही?
समजूतीचं मलम तिथं लावायला हवं..
जे झालं ते झालं, ते होणारच होतं
अपराधीपणाचं ओझं फेकायला हवं..
पूलाखालून खूप पाणी वाहून गेलंय
आनंदानं जीवन आता जगायला हवं..
अर्ध्यावर सोडू नये, गोष्ट किंवा नातं
एकदा वेळ काढून ते संपवायला हवं..
प्रतिक्रिया
22 Sep 2016 - 6:17 pm | अंतरा आनंद
साधी पण छान आहे
22 Sep 2016 - 6:31 pm | अजया
बर्याच खपल्या काढणारी कविता. आवडलीच.चुकलामाकला बर्याच दिवसांनी येऊन नाव सार्थ केलेत अगदी!
22 Sep 2016 - 7:35 pm | रातराणी
आवडली!
22 Sep 2016 - 7:40 pm | निओ१
This is like day dreaming. Sorry.
22 Sep 2016 - 8:46 pm | नीलमोहर
'अर्ध्यावर सोडू नये, गोष्ट किंवा नातं
एकदा वेळ काढून ते संपवायला हवं..'
22 Sep 2016 - 10:38 pm | इनिगोय
सोप्या ओळी, सुंदर अर्थ.
22 Sep 2016 - 10:40 pm | पैसा
"चलो एक बार फिरसे अजनबी बन जाए हम दोनो" आठवलं!
23 Sep 2016 - 8:50 am | शिव कन्या
हेच म्हणायला आले होते पै तै!
साधी पण सोपी नसलेली कविता!
आवडली.
23 Sep 2016 - 12:53 pm | नाखु
वो अफसाना जिसे अंजाम ....
सोपी रचना आवडली..
थेट भेट नाखु
23 Sep 2016 - 9:49 am | Jabberwocky
खुपच छान झालीय कविता.....
23 Sep 2016 - 9:58 am | यशोधरा
कविता आवडली.
23 Sep 2016 - 11:40 am | सस्नेह
साधी पण अर्थपूर्ण !
23 Sep 2016 - 12:30 pm | नावातकायआहे
बाडिस!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
23 Sep 2016 - 12:26 pm | पथिक
छान आहे.
24 Sep 2016 - 8:25 am | राजेंद्र देवी
आवडली... छान...
26 Sep 2016 - 4:54 am | अभिजीत अवलिया
जुन्या जखमा वर आणणारी कविता. मस्त ...
1 Oct 2016 - 1:17 pm | चुकलामाकला
सर्वाना धन्यवाद.