सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
* आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो. खरडफळ्यावर चर्चा लांबल्या तर इथे टाकता येतील.
_______________________________________________
* कालपासून एक पुस्तक वाचत आहे. # शेक्सपीअरची शोकनाट्ये - लेखक परशुराम देशपांडे. काॅन्टिनेण्टल प्रकाशन. आतापर्यंत शेक्सपिअरचे सुबोध केलेले लेखन असलेली इंग्रजी पुस्तके वाचली पण काही कळले नव्हते ते आता यातून कळायला लागले. पहिल्या चाळीस पानांच्या प्रकरणात शोकांतिका लेखनाचे विश्लेषण आहे. ते समजलं. एकूण चांगलं पुस्तक आहे.
कढीतली भजी :- या प्रकारातली पाककृती https://youtu.be/FU2JCUT-7bw?si=IkPFb2ZC9RXKU0eM
या विडिओतल्या कृतीप्रमाणे करून पाहिली. बरोबर झाली. ही भजी कढीतही टाकता येतील.( मेथीना गोटानी कढी - मेथीच्या भाजीची कढी.)आता थंडीत बाजारात मेथी येत आहे. खरं म्हणजे मेथा. खरी कसुरी मेथी क्वचितच येते. ती पराठ्यातही घालता येते. कमी कडू असते आणि हलका पोपटी रंग असतो.
प्रतिक्रिया
10 May 2025 - 9:22 am | वामन देशमुख
तुमच्याकडून दुसरी अपेक्षा काय असणार?
इथे सगळी मिपाखरे गुरुजींचा आयडी बॅन केल्याबद्दल नापसंती व्यक्त करत आहेत, त्यांचे ससंदर्भ लेखन, विस्तृत माहिती, ऐतिहासिक दाखले हे सर्व acknowledge करत आहेत आणि तुम्ही मात्र...
असो, मिपावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.
9 May 2025 - 2:43 pm | कंजूस
हल्ली गवि यांनी मिपासन्यास घेतलेला दिसतोय. गोव्याचे लेख लिहिले की ते हटकून हजेरी लावतात. पण ते कुणी लिहित नाही.
9 May 2025 - 3:25 pm | गवि
बोला कंकाका. माझ्यालायक काय सेवा?
9 May 2025 - 8:00 pm | कंजूस
नमस्कार गवि, बरेच दिवसांत दिसला नाहीत म्हणून आठवण काढली.