मिसळपावचे मारेकरी - ... ... ...
अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले.
अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले.
अबाबा!!!:
नवर्यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
पॉपकॉर्न ची गरज आहे का?
पॉपकॉर्न म्हणजे 'मक्याच्या लाह्या' असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. लाह्या म्हणजे यात वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे असे सगळेच खमंग दाणे अध्याहृत आहेत. सोबतीला कोक, पेप्सी, वेफर्स असे वेस्टर्न प्रोडक्ट अॉप्शनल आहेत .
पॉपकॉर्न गरज पडते(च) का? आणी का पडते? -
पहिली गोष्ट म्हणजे खवैय्यांच्या तोंडाला आलेली सपक चव. कित्येक दिवसांत वशाड खायला न मिळाल्याने आलेली हतबलता. रोजचे वरणभात खाऊन चालू झालेले अपचन. यावर ऊतारा म्हणून हे लोक पॉपकॉर्नच्या 'आहारी' जातात.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत. गुरुवर्यांची ओळख करायची योग्यता मी सोडुन दुसर्या कोणातचं नसल्याने आज ही "गोsssSSssड कामगिरी" मी माझ्या अंगावर घेतो आहे.
(५ सेकंद कॅमेर्याकडे निर्विकारपणे पाहुन झाल्यावर)
क्रेकन
द मॉन्स्तर!
क्रेकनने त्याला गिळले.
आणि तो एका अंधार पोकळीत घुसला!
अंधार आणि फक्त अंधार!
डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही.
"आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला.
"हो" अरब म्हणाला.
"शैतानाची कलमे लक्षात आहेत?"
"हो"
"वागशील त्यानुसार?"
"हो"
"चांगलं की वाईट?"
"वाईट"
"नाग की गरुड़?"
"नाग"
"बकरा की गाय?"
"बकरा"
"स्वर्ग की नरक?"
"नरक"
"प्रेम की द्वेष?"
"द्वेष"
तो हसला!
"शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?"
"जमीन!"
घोस्टहंटर-१
www.misalpav.com/node/34123
घोस्टहंटर-२
www.misalpav.com/node/34140
घोस्टहंटर-३
www.misalpav.com/node/34145
घोस्टहंटर-४
www.misalpav.com/node/34161
घोस्टहंटर-५
www.misalpav.com/node/34185
घोस्टहंटरच्या निमित्ताने!
पेरणेमधल्या हळूवार भावना या कवितेतही जपायचा प्रयत्न केला गेल्या आहे. तरी सुध्दा अतिसंवेदनाशील वाचकांनी कृपया खालील काव्य वाचू नये. होणार्या परीणामास मंडळ जबाबदार रहाणार नाही.
घरात् सोय नव्हती, म्हणुन माळरानात गेला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,
मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत!
प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये!
कामाचे स्वरुप : जगातील सात अब्ज लोकांची भाषा प्रमाण इंग्रजीत बदलून देऊ शकणारे खालील तंत्रज्ञ हवेत!
* भाषातज्ञ हवेत : कामाचे स्वरुप : जगातील सात अब्ज लोकांची भाषा प्रमाण इंग्रजीत बदलणे, आणि असे संपादीत केलेले यश सातत्याने भविष्यात पुढील पिढ्यांसहीत कायमस्वरुपी टिकवणे.
* अर्थतज्ञ : कामाचे स्वरुप : संपूर्ण मनुष्यजात जरी इंग्रजाळली तरीही मागणी-पुरवठा नियमांचा कोणताही प्रभाव न पडता, प्रत्येक व्यक्तीसाठी केवळ इंग्रजी कौशल्याच्या उपलब्धतेच्या बळावर संपूर्ण मानवजातीतील प्रत्येक व्यक्तीची आर्थीक संपन्नता वाढवत नेणे.
आला आला जिलबीवाला आला आला
जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला
साधी जिलबी मावा जिलबी पण आहे
पंजाबी की राजस्थानी देऊ बोला
चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू
पण भेसळमालाची देऊ खाण्याला
आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी
नाहीतर करता तुम्ही झिंगालाला
जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी
स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला
- स्वामी संकेतानंद जलेबीवाले