स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
31 Jan 2016 - 7:53 pm

पे रणा

अबाबा!!!:

नवर्‍यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !

यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल(च्च!) तर(च्च!) क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे...(एतदर्थ:- स्पष्ट व्हावे.)

स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना जाण्याची गरज नेमकी का भासली ?
त्याज्ज्य्य नवर्‍याने यावर काय भुमीका घ्यावी ?
आपल्याला याबद्दल काय वाटते ?
मला असे वाटते की - मी जर गृहस्थ असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर गृहस्थ नसलो तर घरच्याच काय तर कुठल्याच स्वयंपाकचौथर्‍यावर जाण्याचे कारणंच काय ?????????????????????????????

(असतील तर..) सुज्ञ नवर्‍यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....
====================================================
स्वयंपाकघरात मदतीसाठी घुसणार्‍या..परंतू ("तुम्हाला या विषयातले काय कळते???" "व्हा तिकडे!!! ..चा प्या आनी गप पडा!" .. "मेलं मटार नै सोलता येत ..आणे चाल्ले पावभाजी करायला!" )
इत्यादी (दुत्त दुत्त !)बायकूचे तेव्हढेच दू दू दू बोल ऐकून वतागलेला :- ताजा नवरा:- आत्मू स्वयंबंद!

संस्कृतीपाकक्रियाइतिहासबालकथाबालगीतविडंबनशुद्धलेखनराहणीऔषधोपचारभूगोलदेशांतरराहती जागामौजमजास्थिरचित्रविचारसद्भावनाशुभेच्छाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

अजया's picture

31 Jan 2016 - 8:01 pm | अजया

जिथे जिथे बायको जात असेल तिथे तिथे नव-यांना येऊ द्या.
आमचा पुरुषांना फुल सपोर्ट आहे.
आपलं एक निवेदन देऊन टाकू मिपाकरांच्या वतीने. हाय काय अन नाय काय ?

-खाऊ(नव-याच्या हातचे)चिरोटे

झाड पकडून बसले आहे पॉपकॉर्न बरोबर कुरकुरे प्लिज ;)

सरकून घे जरा तिकडे. मीपण आलेय!

पियुशा's picture

31 Jan 2016 - 8:24 pm | पियुशा

यावे यावे झाड आपलंच आसा :)

मी पण आले गं मिपाबायकांनो. हे बघ मी एक कॅरॅमल पॉकॉ, एक चीझी पॉकॉ असं काय काय आणलंय.

आणि बुवा, येऊ द्या की स्वैपाक चौथर्‍यावर पुरुषांना.. तिथेच राहिलेत तरी चालतील ;)

नुसतेच पाॅकाॅ आणलेस का गं? बाकी काय आणि किती आणायचं ते पण ज्ञान देणारा धागा आहे ना मिपावर ;)

लोल.. पण मिपाबायकांनी फक्त पॉकॉ आणायचे ना? संस्कृती बुडली बिडली म्हणजे मंग?

यशोधरा's picture

31 Jan 2016 - 8:40 pm | यशोधरा

संस्कृती हुशार आहे! लाईफ जॅकेट घालेल ती! ;)

नवर्याने स्वैपाक केला तरी बुडतेच ती मेली.मग एकदाच काय ते तिला उरकून टाकू.

इशा१२३'s picture

31 Jan 2016 - 9:12 pm | इशा१२३

पण मग ती बुडली याचा ठपका पुरषांवर येइल बरका!

उगा काहितरीच's picture

31 Jan 2016 - 8:03 pm | उगा काहितरीच

मस्त! आणारे पॉपकॉर्न ...

पे रणा 'डब्बल' का झाली या प्रश्नाच्या शोधात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2016 - 8:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

छ्या. पुर्वीचं मिपा आणि पुर्वीचे मिपा राहिले नाही.

प्रचेतस's picture

31 Jan 2016 - 8:32 pm | प्रचेतस

जळजळीत आहे पण सत्य आहे. नवऱ्याच्या हाती फ़क्त पिशव्या उचलून कांदे बटाटे आणण्याचे काम उरले आहे असे वाटते.

आमच्या एका मित्रांचा मला परवा फोन आला होता. आमच्याशी बोलता बोलता ते भाजीवाल्याशी बटाट्यांबद्दल काहीतरी घासाघीस करत होते.

बाकी आज पावभाजी दिसत्ये. :(

तुमाला पावभाजी खायला बोलावले नाई का? मग तुम्ही मयूरची पावभाजी खाऊन या :D

आम्ही नेमके हापिसात अडकलोय ना.
नायतर पावभाजी काय सोडतो की काय.

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 10:51 pm | सतिश गावडे

पावभाजी जबरा होती.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jan 2016 - 11:09 pm | अत्रुप्त आत्मा

ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे सर..
आपण आलात पण ते तुमच्या वरचे सर नै आले. :-/ ते कंदी येनार??? :-/ दुत्त दुत्त!

सतिश गावडे's picture

31 Jan 2016 - 11:17 pm | सतिश गावडे

आज गंगा उलटी वाहीली. आपल्या पोथ्या-पुराणांमध्ये "घरी अमुक तमुक पुजा घालून त्या पुजा सांगणार्‍या पुरोहीतास साबुदाणा खिचडी खाऊ घालून तृप्त करावे" अशा टाईपचे उल्लेख असतात.

आमच्या भाळी आज अलभ्य लाभ होता. चक्क एका पुरोहीताच्या घरी माझ्यासारखा देव-धर्माचं काही करत नसलेला माणूस स्वादिष्ट पाव-भाजी खाऊन तृप्त झाला.

सामाजिक अभिसरण का काय म्हणतात ते हेच असावे काय? :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2016 - 8:00 am | अत्रुप्त आत्मा

व्वाह व्वा!!! काय त्ये अभि-सरण! http://freesmileyface.net/smiley/tongue/making-fun-053.gif

अरे वाह !! पोथ्यापुराणात कथेचा शेवट गोड असतो तसं झालं म्हणायचं!! =))

सतिश गावडे's picture

1 Feb 2016 - 3:17 pm | सतिश गावडे

तुम्हास काय म्हणावयाचे आहे ते अस्मादिकांस नेमके कळले आहे =))

नाखु's picture

2 Feb 2016 - 8:31 am | नाखु

भाग्यवान आहेत असे सांगुन मी माझे दोन शब्द संपवतो.

नाखु

सतिश गावडे's picture

2 Feb 2016 - 8:46 am | सतिश गावडे

होय. सूडच्या बोलण्याचा नेमका मतितार्थ कळण्याईतपत मला आकलनक्षमता आहे. ;)

नाखुकाका, सगळंच सगळ्यांना कळलं पाह्यजे असंच थोडं आहे?

च्यामारी! आज माजघरात बळेच घुसून कोशिंबिर बनवली तर कोणालाच आवडली नाही...! परत बनवू नका अशी ताकीद घेऊन दिवाणखान्यात माघार घ्यावी लागली!

त्रिवेणी's picture

31 Jan 2016 - 8:44 pm | त्रिवेणी

हो द्यावा प्रवेश. नाहीतर ती असहिस्नुटा मानली जाते. मी तर अगदी भाजी aananya पासून चे swatrant दिलाय नावर्याला. भाजी आणणे,ऑफिस मधून येताना दलणाचा डा daba आणणे ही सर्व काम सोपवलीत त्याच्याकड़े म्हणजे उगा तो स्वयंपाक करतो तेव्हा तू भाजी खराबच आणलिस,पीठ जाड़च daley असे काही ऐकावे लागत नाही मला.

अजया's picture

31 Jan 2016 - 8:46 pm | अजया

त्रिवेणीने त्रिवार सत्य सांगितले आहे.

'नवरी' चं अनेक् वचनही नवर्‍यां होत असल्यानं गुर्जींना नक्की काय म्हणायचंय या विचारात पडलो पण वाचल्यावर खुलासा झाला!
(म्हणजे प्रथम्दर्शनी शीर्षकात ''बायकांना प्रवेश द्यावा काय?'' असाही अर्थ निघाला)

विजय पुरोहित's picture

31 Jan 2016 - 8:55 pm | विजय पुरोहित

झक्कास खुसखुशीत प्रतिसाद...

गुर्जी, तुम्हांला साधं मटार पण नै सोलता येत?

साती's picture

31 Jan 2016 - 8:56 pm | साती

काही पाककृती या अनुभवावर तयार झालेल्या असतात...
त्यात बदल करणे पोटाला घातकच ठरते...
मुळात अनेक पाककृती या अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत व त्यांना चुकीच्या पद्धतीने अॅप्रोच झाल्यास हटकून पित्त, अपचनाचा त्रास होतोच...
आपल्या धर्मात पुरुषांसाठी शय्यागृह, न्हाणीघर, दिवाणखान्यात टिव्हीसमोर कोचावर, मिनीबारसमोर वगैरे अनेक सौम्य हक्काची स्थाने आहेत. त्यांना सोडून या कडक स्थानाचा हट्ट धरणे अनावश्यक आहे...

-- साती विवाहीत!

विजय पुरोहित's picture

31 Jan 2016 - 8:57 pm | विजय पुरोहित

ऑ पेरणा आमचीच दिसते?
;)

आपल्या घरातील प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळ्या चवी, गुणधर्म, वैशिष्ट्ये, प्रादेशिकता यांचे प्रतिनिधित्व करतो आणि जर तुम्हाला ते सूट होत नसेल तर पार्सल ऑर्डर करणेच शहाणपणाचे आहेत.
मी स्वतः याबाबत अनेक अनुभवांतून गेले आहे (सेकंडहँड -म्हणजे नवरा स्वयंपाकघरात शिरल्याने) आणि त्यातूनच सांगते की वर उल्लेख केलेली सौम्य स्थाने या सर्वांसाठी अतिशय स्यूटेबल आहेत.
कारण नसताना अवघड वाटेवर जाऊ नये हा कळकळीचा सल्ला...

विजय पुरोहित's picture

31 Jan 2016 - 9:02 pm | विजय पुरोहित

अगागागा...
आम्ही ऑफलाईन होऊ का आता?

साती's picture

31 Jan 2016 - 9:03 pm | साती

:)

मुळात इथले पाकशास्त्र हे मिपाशेफ लोकांच्या पाकसूत्रावर आधारीत आहे की ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे:
"तुम्ही ज्या पदार्थाचे ध्यान करता तसे तुम्ही बनवत जाता."

मग आता सांगा की एखाद्या संसारी पुरुषाने असा हट्ट धरण्याचे कारण काय?
मुळात अनेक पुरुष स्वयंपाकघराच्या चौथर्यावर जातात ते पण चुकीच्या समजुती ठेवून जातात.
स्वयंपाकाचा पाॅझिटिव्ह इफेक्ट मिळवायचा तर तो मनापासून आपल्या चुका मान्य करून पुढे स्वयंपाक करणे सुधारणे यातूनच होतो...

विजय पुरोहित's picture

31 Jan 2016 - 9:12 pm | विजय पुरोहित

आज काय मीच बिचारा सापडलो का तुम्हाला? द्या द्या द्या नवलेखकूचा बळी...
:)

साती's picture

31 Jan 2016 - 9:14 pm | साती

मस्तं!

संदीप डांगे's picture

31 Jan 2016 - 8:58 pm | संदीप डांगे

कुणीतरी ते ढकलपत्र टाका वॉट्सप वालं टणाटणी थेअरीत बुचकाळलेलं....

त्रिवेणी's picture

31 Jan 2016 - 9:00 pm | त्रिवेणी

वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा?
मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

त्रिवेणी's picture

31 Jan 2016 - 9:00 pm | त्रिवेणी

वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा?
मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आंदोलन!
काय मिळणार हे करुन?
असो.मी पाॅपकाॅर्न घेऊन वरच्या फांदीवर जाऊन बसते कशी!

-- सातया!

अजया's picture

31 Jan 2016 - 9:30 pm | अजया

नियम आणि discrimination यात फरक आहे..

चप्पल न घालता जाणे ह नियम असु शकतो, ज्यात स्वच्छता राखणे हा हेतु दिसतो.
पण नव-यांनी स्वयंपाकघराच्या चौथर्यावर येऊ नये हे discrimination आहे..

परंपरा एका गटासाठी अन्यायकारक असतील तरीही मोडण्याचे कारण दिसत नाही ??
-माळ जपरे

संदीप डांगे's picture

31 Jan 2016 - 10:51 pm | संदीप डांगे

सध्या वादातीत असलेल्या, पुरुषाने केलेल्या स्वयंपाकघर पदार्पणाच्या घटनेवर नीट दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की पूर्वजांनी किती विचार करून ह्या गोष्टि अवलंबल्या होत्या, आणि आज आपण त्यांनाच मूर्ख ठरवतोय, आणि नाहक स्त्री-पुरूष समानतेच्या नको त्या ठिकाणी वाद घालतोय....

सविस्तर माहिती अशी----

स्वयंपाकघर हे घर नसून प्रयोगशाळा आहे त्याला पाकगृह असे म्हणतात. पाकगृहातून बाहेर पडणारे व्यंजनं पुरुषांसाठी घातक असतात, कारण पाकविज्ञाना मध्ये काही सुगरणी विशिष्ट प्रकारची व्यंजने करपावर्तीत करत असतात, मुळात पुरुषांची शारीरिक ठेवण व्यंजने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो, हॉटेलच्या भटारखान्या मध्ये स्त्रियांना ही प्रवेश नाही,

अगदी साधं उदाहरण, गणपती ड्याण्स पुरुष करतात, कधी स्त्रीला गणपती ड्याण्स करतांना पाहिलंय कां? नाही नां? मग ह्याचा अर्थ तिथे स्त्रियांना कमी प्रतीची वागणुक मिळते कां? नाही, तसं नाही, ती एक परंपरा आहे व त्या मागे साधं कारण आहे. स्त्रियांच्या मनात गणपती ड्याण्सचा जन्म होत नाही,
बेफिकिर नाचण्याचा अधिकार पुरुषांनाच आहे, म्हणून ते ड्याण्स करतात. आणि ह्या नृत्य शक्तिवरच पाकगृहच्या व्यंजनांचा प्रभाव पडतो.

जसं गाईचं दुध चांगलच, पण दारूच्या नशेत ते माणसाला विषाप्रमाणेच असतं. ह्यात ना दुधाचा दोष, ना त्या व्यक्तीचा दोष, तर त्या काळी असलेल्या शरिरातल्या दारूचा होय.

दारू-मटन खाल्यावर आपण देवळात जात नाही, कारण आपले शरिर त्या वेळी तो आरती करायला अयोग्य असते. आता जर एखादा म्हणाला की मला आरती घेऊ देत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे. आतां सांगा, मुर्ख कोण? मला आरती द्या म्हणणारा की त्याला विरोध करणारा ?)

रच्याकने अजयातै, तुम्ही सुगरण की करपण? नाही काय आहे ना पुढील चर्चा त्याच अनुषंगाने पुढे नेता येईल. (अर्थात तुमची इच्छा असेल तरच!)

अजया's picture

1 Feb 2016 - 8:26 am | अजया

=))))
उगा काहीतरीच!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2016 - 9:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आन्दोलन

काय हे डॉक्टर ! अजूनही ज्यांना अभिव्यक्त होण्यासाठी कोनाड्याची गरज भासते तेव्हा समानतेच्या गोष्टी अश्यक्य वाटतात.

-दिलीप बिरुटे

साती's picture

31 Jan 2016 - 9:44 pm | साती

स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश करण्यास आंदोलन करणार्‍या पुरूषांना अभिव्यव्यक्त व्हायला 'आटापिटा' नावाचा कोनाडा आला का शेवटी?
दिसलाच नाही!
:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2016 - 9:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आन्दोलन कोनाला करावं लागतं जे डॉमिनेट आहे ते आणि त्यांना ? आम्हीही आमचा कोनाडा करूच ;)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2016 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटलं काही हटके अनुभव सांगता की काय ? ;)

-दिलीप बिरुटे

अन्नू's picture

31 Jan 2016 - 9:25 pm | अन्नू

गुर्जी यीज ब्याक!! ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2016 - 9:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

झाडावर सुमारे ३०० एक अनाहितांनी पोती भरभरुन पॉपकॉर्न नेल्याने झाड मोडल्याच्या बातम्या येत आहेत.

वृक्षवल्ली अम्हा सोयरी वनचरे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2016 - 9:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाजूने पुरुशान्च्याही बातम्या सांगत राहा....;)

-दिलीप बिरुटे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2016 - 9:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हे काय सर. झाडासमोरच्या कट्ट्यावर आपलीचं गाडी आहे पॉपकॉर्नांची.

कपिलमुनी's picture

1 Feb 2016 - 1:09 am | कपिलमुनी

दंबूकी शिवाय चिमणी उडवलीत !

त्रिवेणी's picture

31 Jan 2016 - 9:45 pm | त्रिवेणी

सर का बर नाराज आहात आमच्यावर?

हे मलाच दिसतंय का खरंच हा प्रतिसाद चार वेळा टंकलाय??

अवांतर- छॅ!! आजपासून जरा कमीच घेतली पाहिजे! ;)

विजय पुरोहित's picture

31 Jan 2016 - 9:57 pm | विजय पुरोहित

मला पण ४ वेळा दिसतंय. नो वरीज... प्रतिसादकर्त्री जाम चिडली आहे पुरुष नामक दुष्ट प्रजातीवर! :(

त्रिवेणी's picture

31 Jan 2016 - 10:05 pm | त्रिवेणी

नाही हो मी खरच खुप कमी वेला चिड़ते.मोबाइल ची कृपा आहे ती इतक्या वेला प्रतिसाद येतो त्याची.

बॅटमॅन's picture

31 Jan 2016 - 9:45 pm | बॅटमॅन

नवरा असो किंवा बायको,

स्वयं"पाक" चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

भारतासारख्या देशात असे स्वयं"पाक" प्रेम पाहून भडभडून आले.

यशोधरा's picture

31 Jan 2016 - 9:51 pm | यशोधरा

अगदी 'पाकात' मुरल्यासारखी कोटी हो!

नाखु's picture

1 Feb 2016 - 8:34 am | नाखु

मिपावरील(काही काथ्याकुटाचादेखील;) काही मिठाया "पाक"उल्लेखाखेरीज गोड होत नाहीत याचा हा सज्जड पुरावा आहे.

संदर्भ बुवांची सोत्ताबद्दलची व्य्वसाय माहीती हवी असलेली मिठाई.

त्यामुळे स्वयं "पाका"चा उल्लेख अनिवार्य आहे.

दुरून वाटपहाणे

फास्टेस्ट फिफ्टीबद्दल गुर्जींचा लाटण्याने सत्कार करण्यात येत आहे.

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2016 - 10:03 pm | टवाळ कार्टा

"लाटण्याने सत्कार" यात श्लेष आहे? ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2016 - 10:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वयंपाक चौथर्‍याच्या चौकटीतल्या गुप्त गोष्टी अश्या चारचौघांत सांगायच्या नसतात. ;) :)

पियुशा's picture

31 Jan 2016 - 10:07 pm | पियुशा

बस करो गुर्जी अब रु ला ओ गे क्या ? पॉपकॉर्न खत्म प्याक अप !

भुमी's picture

31 Jan 2016 - 10:09 pm | भुमी

तळायला आणि माश्या मारायला उपयोगी पडेल:)

कुठल्याही नवर्‍यावर अशी वेळ येवू देवू नये....

पण समजा आलीच तर.... खालील गोष्टी कराव्यात.

१. बर्‍यापैकी दिसणारी स्वैपाकिण शोधावी.

२. सुंदर दिसणार्‍या भाजी-पोळी वालीकडून रोज भाजी-पोळी आणावी.

हे २ जालीम उपाय आहेत. (आमचे तरी ह्या उपायांनी काम भागते.)

इति बाबा महाराजांचा "गृहस्थाश्रमी पुरुषांच्या समस्या" हा ग्रंथ, खंड ३रा, अध्याय १३, ओवी १७. पान ६०....

साती's picture

31 Jan 2016 - 10:24 pm | साती

दोन्ही गोष्टी एकदाच करायच्यात की आळीपाळीने?

मुक्त विहारि's picture

1 Feb 2016 - 9:41 am | मुक्त विहारि

दोन्ही गोष्टी एकाच वेळी केल्यास, घरधनीण घर सोडून जायची शक्यता जास्त.

आणि तसेही सुंदर दिसणारी स्वैपाकिण आली की, पुरुषांना स्वैपाकिण असे पर्यंत, स्वैपाकघरातच काय पण घरात पाऊल ठेवायला पण बंदी घातली जाते.

"स्वानुभवाचे बोल" ह्या बाबा महाराजांच्या छोटेखानी १०,००० पानी पुस्तकातून साभार.

अन्नू's picture

1 Feb 2016 - 5:29 pm | अन्नू

अशी स्वयंपाकीण भेटली तर आंम्ही घराच्या बाहेर (खिडकीजवळ) पण उभं राहू.. ;)

संदीप डांगे's picture

1 Feb 2016 - 5:38 pm | संदीप डांगे

सांभाळून.... अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचे रुपक वापरले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. "फोटोतली व्यक्ती जीवंत वा मृत असो, तीचा माझ्या प्रतिसादाशी काल्पनिक संबंध आहे" असे डिस्क्लेमर टाका.

स्वयं'पाकीण' (जलेबी बाई!! ;) ) बद्दल मी बोलतोय, तुंम्ही कुठल्या रुपकाचं सांगताय?

इरसाल's picture

31 Jan 2016 - 10:20 pm | इरसाल

मी सिरीयस्ली गंभीरपणॅ संस्कृतीला पोहायला शिकवायचा विचार करतोय.
ज्याला बघावं तो संस्कृतीला बुडवायला निघालाय !

संस्कृतिको तो अपनोने लूटा, गैरोमे कहा दम था.
अपनी संस्कृति डुबी वहापे, जहापे पानी कम था.
.
दिलवाले (जुना)फ्यान

मुक्त विहारि's picture

31 Jan 2016 - 10:26 pm | मुक्त विहारि

संस्कृती पोहायला कधीच शिकली आहे.

आधी ती नऊवारीत पोहायची मग ती पाचवारीत पोहायला लागली.

सध्या तरी बिकिनीत पोहत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2016 - 10:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणि काही दिवसांनी ती "उडत जाईल". ;)

अन्नू's picture

31 Jan 2016 - 11:32 pm | अन्नू

कोण ही संस्कृती?

नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची युती झाली अन तो एकदा एखादा पदार्थ बनवत बसला की अरारा मग लै त्रास. दिवसातून दोनदा स्वैपाकघर फडक्याने पुसावं लागतं.

हा त्रास टाळायचं असेल तर स्नान झाल्याबरोबर एक हाटेल चा फोन नंबर ३ वेळा (सकाळ, दुपार, संध्याकाळ) फिरवावा लागतो. (नंबर सांगायची फ़ीस घेते मी) आपल्या आयुष्यात एका दिवसात बाहेरुन नाश्ता, लंच डिनर नै लाभलं तर फ़ीस परत. घरात निरनिराळे सुवास राहतात. ज्यांना मुलबाळ नसेल त्यांना ( स्वैपाकातून वेळ मिळाल्यामुळे आणि तो सत्कारणी लागल्यामुळे) मुलं होतात. नौकरीत प्याकेज चांगलं मिळुन पण ते हाटेलच्या जेवणात खर्च होतं. नवरा बायकोचे सबंध मधुर होतात ( वर सांगितलेल्या कारणामुळे). सतत बाहेरुन जेवण मागवल्याने महिलांना सासू सास-यांचा त्रास कमी होतो कारण ते वरचेवर येणं टाळतात . मुला-मुलींसाठी चांगली स्थळे येतात.

प्रा. डॉ. स्रुजा "बाहेरुन जेवण हादडे"
(अंदाजपंचे पुरोहीत) :)

विजय पुरोहित's picture

31 Jan 2016 - 10:31 pm | विजय पुरोहित

घ्या! आता तुम्हीच राहिलेलात! अरे देवा! धागा कुठला आणि पिसे कुणाची निघताहेत? चलु द्या निरर्थक अत्मरंजन! :)

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2016 - 10:31 pm | टवाळ कार्टा

आग्ग्गाअग्गाआ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2016 - 10:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चरणकमलांचा फोटु टाक. =)) _/\_

यशोधरा's picture

31 Jan 2016 - 10:54 pm | यशोधरा

अगाग्गा!! =))

स्वयंपाक चौथर्‍यावर पुरुषांना प्रवेश न देणे हे चुकीचे आहे. जिथे महिलांना मुक्त प्रवेश आहे तिथे पुरुषांना का प्रवेश नसावा?

परंतु याबाबतीत पुरुषांचे आंदोलन सिलेक्टिव्ह वाटते. अनेक ठिकाणी पुरुषांना महिलांपेक्षा जास्त झुकते माप दिलेले आहे. टीव्हीसमोर कोचावर मुलग्यांना ३०% वेळा लाथांचा सुकाळ बघण्यासाठी राखीव (उर्वरीत ७०% वेळ टीव्ही बघण्यास पुरुषांना प्रतिबंध नाही), बेडरूमात सुटीच्या दिवशी लोळण्यास ५०% जागा राखीव (तिथे गिळायला तयार होईपर्यंत महिलांना प्रवेश नाही, परंतु पुरुष उर्वरीत वेळातसुद्धा येऊ शकतात), कारमध्ये पुरुषांसाठी राखीव ड्रायव्हरची जागा, उंच फळीवरचे डबे काढण्यासाठी खास सवलत अशा अनेक ठिकाणी पुरुषांना केवळ पुरुष आहेत म्हणून फायदा दिलेला आहे. स्त्री-पुरूष समानतेचा विचार करताना या विशेष हक्काचाही विचार व्हायला हवा.

-पावभुर्जी-

खटासि खट's picture

31 Jan 2016 - 10:35 pm | खटासि खट

और ये लगा सिक्सर !!

खटासि खट's picture

31 Jan 2016 - 10:34 pm | खटासि खट

गुर्जी स्वतः हिट विकेट झाले आणि तमाम नव-यांना पण ऑट केलं बघा.

या बायका आता किचनचा चौथराच काय , ओटा, तांबं, भांडं, पिंप, गॅस, स्टोव्ह , चूल सगळंच नव-याच्या (आणि सासूच्याही) हवाली करतील आनंदाने आणि टीव्हीपुढं बसतील बघा. त्यांचे आशिर्वाद मिळतील तुम्हाला पण.... कळ्ळं ना ??

विजय पुरोहित's picture

31 Jan 2016 - 10:39 pm | विजय पुरोहित

अत्मू गुर्जी, पाकदेवतेचाचा त्रास स्त्रियांनाच जादा होतो ही फार फार फार चुकीची इन्फो आहे...

कुठल्याच हिंदु पाकशास्त्रात असा रेफरन्स मला तर मिळाला नाहिये...

पाकदेवता फक्त पाककर्त्याने केलेल्या चुकीच्या कर्माबद्दल त्याला पोटात इक्व्हीव्हॅलंट पीडा निर्माण करून ते पाककर्म नलीफाय करतात...

पाकदेवता कुणालाच मुद्दामहून त्रास देत नाहीत. त्यांचा हेतु फक्त आपली वाईट रेसिपी पोटातून बाहेर काडणे हाच्च असतो आणि जेव्हां तसं होतं तेव्हा त्यांच्यासारखा बाहेर काढणारा तोच...

अगदी छप्पर फाडके बाहेर काढतात...

नीलमोहर's picture

31 Jan 2016 - 11:17 pm | नीलमोहर

असल्या भंगार उपायांनी प्रसन्न होणारी ती देवता अन्नपूर्णा नव्हे. तिला फक्त तुमचे उत्तम 'पाक'कौशल्य आणि
इतरांना तुम्ही कसे स्वादिष्ट चमचमीत अन्न खाऊ घालून तृप्त करता हेच पहायचे असते...
आणि त्यात तुम्ही चुकला तर be ready to taste the bitter fruits .... (literally ;)

Then you have no option...

You have to go through it...

No other options are available...

विजय पुरोहित's picture

1 Feb 2016 - 6:14 am | विजय पुरोहित

:)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Feb 2016 - 6:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मोरल ऑफ द ष्टुरी काल बुवांनी पाव भाजी केलेली. गावडे सर सोडुन दुसर्‍या कोणालाही बोलवलं नव्हतं. =))