National Counter Terrorism Centre (NCTC)...राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंधक केंद्र..
दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी १ मार्च २०१२ पासून राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंध केंद्र सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न होता.परंतु दहा राज्याच्या(गुजरात,बिहार ,तामिळनाडू, प. बंगाल .मध्यप्रदेश,पंजाब ,छत्तीसगड,ओरिसा,त्रिपुरा,हिमाचल प्रदेश) मुख्यमंत्र्यांनी तीव्र विरोध दर्शविल्यामुळे या प्रस्तावावर चालू अधिवेशनात चर्चा अपेक्षित आहे.
NCTC हि दहशतवाद विरोधी यंत्रणा असून याचा मुख्य उद्देश भारत सरकारच्या विविध गुप्तहेर विभागांमध्ये माहितीची आदान-प्रदान करणे व त्यांना एकत्र आणणे हा आहे.