मत

भावनिक गुंता (सल्ला हवाय )

जेपी's picture
जेपी in काथ्याकूट
6 Jan 2014 - 3:16 pm

२००६ साली मी पुण्यात होतो . आमच्या भावकीतील एक मुलगा लातुरात राहता असे .घर ची हालत
चांगली नव्हती . हा मुलगा लहान सहान कामे करत असे
पण संगती मुळे, बिघडण्यास सुरवात झालती .
त्याच्या आईने मला विनंती केली कि मी त्यास पुण्यात बोलवून घ्यावे आणि कुठे तरी कामाला लावावे .
मी नकार देऊ शकलो नाही .
मी त्याला पुण्यात बोलावून घेतले आणि त्याच्या नोकरी साठी प्रयत्न करू लागलो . मला यश आले नाही
पण त्याने स्वतः एक वेल्डिंग हेल्पर ची नोकरी मिळवली . पगार जेमतेम होता पण त्याला पुरेस होता .

मास्तर, जरा नैतिकतेने र्‍हावा....!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
5 Jan 2014 - 11:17 am

रामराम मंडळी. मंडळी काल रात्री ठरवलं होतं की रविवारच्या सकाळ पर्यंत विनाअडथळा मस्त ताणून द्यायची.. पण हाय रे दुर्दैव. पहाटे चारलाच डोळे उघडले. अर्थात तसं व्हायला दोन कारणं होती पैकी एक खासगी होतं आणि दुसरं खासगी आठवणीला जोडून पतंगाच्या शेपटीसारखं दुसरं एक सरकारी कारण चिकटलं होतं. आता मनात आलेल्या विचारांचं शेअरींग केलं की मनावरचं ओझं कमी होतं, काही एक उत्तम विचार आपल्या देता घेता येतो, असे म्हणतात म्हणून मास्तर, जरा नैतिकतेने राव्हाची ही एक गोष्ट.

कान गुंतले बोंड्यांमध्ये!!

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
2 Jan 2014 - 8:13 pm

लहानपणी आजोबांसाठी बाबांनी एकदा वॉकमन आणून दिला होता. आजोबा रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी त्यातून गाणी ऐकत बसायचे. तो वॉकमन आणून आता दहा-बारा वर्षं झाली असावीत. किंवा जास्तच... आज तो घरातल्या कपाटात इतर अडगळीच्या गोष्टींसमवेत पडलेला आहे. त्याच्यावर असं धूळ खात पडण्याची वेळ आणली मोबाईलच्या क्षेत्रात झालेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीने!! नवनवीन मोबाईल्स, आणि त्यांच्याबरोबर येणारे विविध रंगांचे, आकारमानांचे, कमी-जास्त ताकदीचे(ऐकवण्याची आणि टिकण्याची ताकद) हेडसेट्स. त्यांना कोणी हेडफोन्स म्हणतं, कोणी कॉड्स म्हणतं. आमच्या घरी, त्यांना 'बोंडं' म्हणतात.

जीवनमानराहणीमौजमजाविचारअनुभवमत

छायागीत १ - तु मेरे सामने है, तेरी जुल्फें है खुली, तेरा आंचल है ढला…

Atul Thakur's picture
Atul Thakur in जनातलं, मनातलं
30 Dec 2013 - 9:15 pm

रफी आणि मदनमोहनने हिन्दी चित्रपट संगीतात जी क्लासिक गाणी दिली त्यापैकी एक महत्वाचे गाणे म्हणजे “तु मेरे सामने है”. गुरुदत्त म्हटलं की “प्यासा”, “चौदहवी का चांद”, “साहब बीवी और गुलाम” किंवा “कागज के फूल” आठवणार्‍यांना “सुहागन” आठवणार नाही कदाचित. मात्र अस्सल संगीतप्रेमीच्या नजरेतुन (कानातुन?) हे गाणे सुटणे अशक्य. मदनमोहन मुळातच गायकाची प्रकृती, गाण्याची पार्श्वभुमी या सार्‍या गोष्टी पाहुन गाणे देणारा संगीतकार. “हर तरफ अब यही अफसाने है” या “हिन्दुस्तान कि कसम” मधल्या गाण्यासाठी मन्नाडे ची निवड मदनमोहनने अतिशय विचारपूर्वक केली होती.

चित्रपटमत

रेजोल्यूशन

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
27 Dec 2013 - 10:57 pm

२०१३ आता संपेल. आपण हॅप्पी न्यू इयर म्हणत सगळ्यांना शुभेच्छा देऊ, पार्ट्या होतील, दारूचे पाट वाहतील, टीव्ही वर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित होतील, त्याच धुंदीत जमल्यास गेल्या वर्षीचा जमाखर्च मांडत आपण पुढच्या वर्षाला आलिंगन देऊ. व्हॉट्सॅप्प, फ़ेसबुक, इत्यादी माध्यमातून जगाला विश केलं जाईल, विविध ‘रेजोल्यूशन्स’ केली जातील, जगाशी शेअर केली जातील. सगळं काही दरवर्षी सारखंच.

संस्कृतीसमाजजीवनमानविचारलेखमतसल्ला

शतशब्द कथा: म्हादा

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
26 Dec 2013 - 10:14 pm

सक्काळच्यान दादू कावलावता. तंबाकू नाय का च्या नाय.
कळकाच्या पाटया वळू वळून बोटं पाक सोलवटली व्हती.
पाटलाच्या वाड्यावनं सांगावा आलावता. उद्याच्याला येरवाळी वाजान्त्री पायजेल.
आता मानसं हाताशी नायती तर कोन वाजीवनार? गाडवं?

मायला . . गाडाव म्हनल्यावर ध्येनात आलं. . हौसा कुटाय?
मास्तरच्या घरला इटा लगीच पायजील हाईत. गाडवं मोकळी हुबी र्हाऊन जमंल व्हय ?

संस्कृतीकथाप्रकटनअनुभवमत

हे आणि ते - १: पाहुणचार

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जनातलं, मनातलं
26 Dec 2013 - 12:50 pm

गेल्या आठवड्यात एक गंमतीदार अनुभव आला. माझी एक आजी तिच्या भाचीच्या मुलाच्या लग्नानिमित्त तिच्याकडे उतरली होती. लग्नघर असल्याने आणि अर्थातच वार्धक्यामुळे आजीला माझ्या घरी येणं शक्य नसल्याने तिनेच सुचवल्याप्रमाणे तिला भेटायला मी तिथे गेलो. तिच्या माहेरच्या मंडळींशी ख्यालीखुशाली विचारणार्‍या गप्पा झाल्या. त्यांचा आधीपासून परिचय होताच, त्यामुळे गप्पांना वैयक्तिक संदर्भही लाभला. पण त्या बोलण्याला गप्पा असं म्हणणं म्हणजे विंदू दारा सिंगला अभिनेता म्हणण्यासारखं आहे.

संस्कृतीप्रकटनविचारमत

मुलुंड कट्टा… केल्याने पंडितमैत्री !!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture
विश्वनाथ मेहेंदळे in जनातलं, मनातलं
25 Dec 2013 - 1:10 am

अनेक महिने झाले मुंबईत कट्टा असा झाला नव्हता. काही वेळा ठरतो आहे असे वाटेपर्यंत रद्द झाला होता आणि सलग २-३ डोंबिवली कट्टे झाल्याने पुढील कट्टा खुद्द मुंबईत व्हावा अशी मंडळाच्या काही कार्यकर्त्यांची इच्छा होती. ही इच्छा मंडळाचे तरुण सळसळते रक्त मुवि काकांच्या कानावर घातली होती आणि तसे करण्याचे आश्वासन पण मिळवले होते. वाट बघत होतो ती संधीची. काही दिवसांपूर्वी अशी संधी चालून आली. एके दिवशी सकाळी सकाळी मिपावर आल्यावर डॉक्टर खरे यांचा धागा दिसला, कट्ट्याच्या आमंत्रणाचा.

हे ठिकाणवावरसंस्कृतीजीवनमानप्रवासदेशांतरअर्थकारणमौजमजाप्रकटनविचारसद्भावनाअभिनंदनआस्वादअनुभवमतविरंगुळा

ऑनलाईन मराठी टायपींग स्पर्धे करता कोणते निकष असावेत ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
24 Dec 2013 - 1:31 pm

नमस्कार,

आपण मागच्या एका धाग्यात अजूनही मराठी लेखन अवघड आहे ? या विषयावर चर्चा केली. मराठी विकिपीडियाचा बंधू प्रकल्प विकिस्रोतवर येत्या काळात ऑनलाईन मराठी टंकन (टायपींग) स्पर्धा आयोजीत करण्याचा मानस आहे.