२००६ साली मी पुण्यात होतो . आमच्या भावकीतील एक मुलगा लातुरात राहता असे .घर ची हालत
चांगली नव्हती . हा मुलगा लहान सहान कामे करत असे
पण संगती मुळे, बिघडण्यास सुरवात झालती .
त्याच्या आईने मला विनंती केली कि मी त्यास पुण्यात बोलवून घ्यावे आणि कुठे तरी कामाला लावावे .
मी नकार देऊ शकलो नाही .
मी त्याला पुण्यात बोलावून घेतले आणि त्याच्या नोकरी साठी प्रयत्न करू लागलो . मला यश आले नाही
पण त्याने स्वतः एक वेल्डिंग हेल्पर ची नोकरी मिळवली . पगार जेमतेम होता पण त्याला पुरेस होता .
कंपनीने पुण्यातील रहिवाशी असल्याचा पुरावा मागितला . माझ्या ताई ने त्याचे नाव स्वतः च्या रेशन कार्ड वर घेतले . त्याला नोकरी मिळाली .३ वर्ष्यात हेल्पर पासून सुपर वायझर झाला . २००८ मध्ये त्याची आई आजारी पडली .२०१० मध्ये मृत पावल्या . त्या माउलीला शब्द दिलता कि मुलाला साभाळून घेईन.
हा शब्द पाळणे मला आज जड जात आहे .
कारण ,
२०११ साली त्या मुलाच्या आयुष्यात एक मुलगी आली . मुलगी हि जास्त शिकलेली नव्हती . मध्यम वर्गीय
पर जातीय ,मुलीच्या घरी एक लहान बहिण , वडील नाही , आई नोकरी करून घर चालवते ,
तिचा मामा पुण्यात बिल्डर आहे अस ऎकुन आहे .
दोघांनी प्रेमाच्या आणि लग्नाच्या शपथ घेतल्या
मुलाला कुणीच नसल्या आणि स्वतः च्या नोकरी मुळे माझा विरोध नव्हता .मुलाला आणखीन २-३ वर्ष लग्न करयचे नव्हते .ती मुलगी माझ्या ताई ला हि एकदा भेटून गेली.
मला पहिला त्रास १ वर्षा पूर्वी झाला .
त्या मुलीच्या पायी त्या मुलाने गेल्या जानेवारीत एक मुलाला मारहाण केली . प्रकरण पोलिस पर्यंत
गेल नाही ,थोडक्यात मिटल .
जून मध्ये त्या मुलीचा मला फोन आला कि , माझे दुसरी कडे लग्न ठरल आहे आणि तो मुलगा मला त्रास देत आहे . हा तिचा मला आलेला पहिला फोन, कारण तो पर्यंत मला तो मुलगाच माहिती देत असे. या वेळी तिने जे सांगितले ते माझ्या साठी धकादायक होते .
हि मुलगी फेब्रुवारीत गरोदर होती ,तिने त्या मुलाला लग्न ची गळ घातली पण मुलाचे स्वतचे घर नाही ,त्यामुळे त्याने काही काळ थांबयाला सागितले . आणि तिचा गर्भपात केला गेला .
आता त्या मुलीला याच्याशी लग्न करायचा नाही .
मी त्या मुलाला भेटून त्या मुली पासून लांब राहण्याचा सल्ला दिला . त्या मुलाने हि मला ठीक आहे म्हणून सांगितले .
काल पुन्हा त्या मुलीने माझ्या ताई ला फोन करून सांगितले कि तो मुलगा मला त्रास देत आहे. (कारण माझा फोन सकाळी बंद होता ) ताई ने गोष्ट मला सांगितली .
तेव्हा पासून माझ्या डोक्यान काम कारण बंद केलय. हे प्रकरण कसे सोडवावे .
*काही सल्ले जे मला काल पासून मिळालेले *
१) त्या मुलाशी संबंध तोडून टाक .(पण त्याच्या आई ला मी शब्द दिलता . त्यचे वडील फार पूर्वीच वारलेत)
२) त्या मुलीला पोलिसात जायचा सल्ला दे . ( पण या मुळे त्या मुलाचे भविष्य संपेल,त्यचे नाव आज हि माझ्या ताईच्या रेशन कार्ड वर आहे , याचा त्रास माज्या ताई ला होऊ शकतो )
३) त्या मुलाला पुन्हा समजावणे ( याचा विपरीत परिणाम होऊ शकतो )
* मी २००७ साली लातूर ला वापस आलो पण तो मुलगा पुण्यातच रुळला .*
*त्या मुलाचे वय आज २५ आहे .*
( सर्वाना विनंती आहे कि भाष्या आणि शुद्धलेखन पाहू नका , आणि या गुंता कसा सोडवावा ,
हे सांगा .)
प्रतिक्रिया
6 Jan 2014 - 3:28 pm | कपिलमुनी
त्याची वय वर्षे २५ झाली आहेत..
तुमची "संभाळायची" जबाबदारी संपली आहे ..
उगा आलोकनाथ होउ नका ..
त्या पोरीला आणि पोराला सांगा , मला त्रास दिलात तर मी तुमची पोलिसात तक्रार करेन.
6 Jan 2014 - 3:37 pm | नित्य नुतन
रेशनकार्डावरून आधी त्या मुलाचं नाव कमी करा ...
मुलाचे हे दिवे पाहून त्याच्या सख्या भावंडानी पण त्याला साथ दिली नसती ...
तुम्ही केलेत ते भरपूर केलेत ..
अब बस ....
6 Jan 2014 - 3:52 pm | परिंदा
तुमच्या ताईला त्यामुलाचे नाव रेशन कार्ड वरुन काढायला सांगा. त्याची प्रोसेस नक्की माहिती नाही, पण जर तो मुलगा ताईच्या घरी राहत नसेल, तर रेशन कार्ड वर नाव ठेवण्यात काहीच अर्थ नाही.
ती मुलगी त्या मुलापासून गरोदर राहिली म्हणजे प्रेमप्रकरण खुपच पुढे गेले होते. पण ही बाब खरी आहे याची तुम्ही मुलाकडून खात्री केलीत का?
त्यामुलीच्या पालकांना याविषयी माहिती होती का?
जमल्यास मुलाला (आणि मुलीला सुद्धा) त्यांच्या इतर नातेवाईकांसमोर समजवा. त्या आधी मुलाच्या आईच्या फोटोजवळ जाऊन तिच्याशी बोलतो आहे असे मानून तिला हा प्रकार सांगा आणि या प्रकरणात मुलाला समजावण्या पलीकडे मी काहीच करु शकत नाही असेही सांगा. जरा वेडगळपणाचे वाटेल, पण यामुळे तुमच्या मनावरील दडपण, वचनभंग करण्याचे पाप करतोय ही भावना कमी होईल.
मुलाला त्याचे वागणे असेच चालू राहिल्यास काय दुष्परिणाम होतील ते ही सांगा.
6 Jan 2014 - 3:54 pm | खादाड
मुलगा २५ चा झाला आता कही तो तुमच्या सल्ल्यानुसार चालेलच हे आपण म्ह्णु शकत नाही !! तुम्हाला जर त्याच्याविषयी खूप जिव्हाळा नसेल तर त्याला त्याचे आयुष्य जगु द्द्या आणि तुम्ही आपले जगा माझ्या सख्या मामेभावाचा आम्हाला खूप छान अनुभव आहे !! रेशनकार्ड वरुन मात्र नाव लागलीच कमी करुन घ्या !!
6 Jan 2014 - 4:10 pm | प्रभाकर पेठकर
वयवर्षे २५, नोकरी आहे तेंव्हा आता तुमची नैतिक जबाबदारी संपली आहे. आता तुम्ही सल्लागाराच्या भूमिकेत शिरा. त्याच्याशी संवाद साधा. दुसरे असे, त्याच्या आईला दिलेल्या वचनाला जागून तुम्ही तुमची जबाबदारी पार पाळली आहे. आईच्या इच्छांना 'मान देण्याची' त्याची जबाबदारी तुमच्या पेक्षा कितीतरी मोठी आहे हे त्याला समजवून सांगा.
ह्या उपर त्याचे नशिब. तुम्ही जन्मभर त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही. घेऊ नये.
6 Jan 2014 - 4:11 pm | प्रभाकर पेठकर
वयवर्षे २५, नोकरी आहे तेंव्हा आता तुमची नैतिक जबाबदारी संपली आहे. आता तुम्ही सल्लागाराच्या भूमिकेत शिरा. त्याच्याशी संवाद साधा. दुसरे असे, त्याच्या आईला दिलेल्या वचनाला जागून तुम्ही तुमची जबाबदारी पार पाळली आहे. आईच्या इच्छांना 'मान देण्याची' त्याची जबाबदारी तुमच्या पेक्षा कितीतरी मोठी आहे हे त्याला समजवून सांगा.
ह्या उपर त्याचे नशिब. तुम्ही जन्मभर त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही. घेऊ नये.
6 Jan 2014 - 4:55 pm | पैसा
२५ वर्षे म्हणजे अज्ञान मुलगा नव्हे. त्याला स्वतःची जबाबदारी घेऊ दे. असे वागण्याचे परिणाम काय होतील, (पोलीस केस, तुरुंगवास आणि नोकरी गमावणे इ.) एवढेच त्याला शेवटचे सांगून बघा. याउप्पर तो आणि त्याचे नशीब. त्या मुलीचीही चूक आहेच. प्रकरण एवढे पुढे जाईपर्यंत ती आणि तिच्या घरचे काय करत होते? तेव्हा तिचे तिने पाहून घ्यावे. अपात्री दान कधी करू नये.
6 Jan 2014 - 8:04 pm | प्रसाद१९७१
संबंध तोडुन टाका. ती मुलगी आणि तो मुलगा त्यांचे बघुन घेतील.
मुलीला सल्ला देऊ नका, तुमच्याच अंगाशी येण्याचा धोका आहे. पोलिसात जाण्याचा सल्ला तर अजिबात नको. तो मुलगा तुमच्या वर डुख धरण्याची शक्यता आहे. त्या मुलीला सांगा "पुन्हा फोन करू नकोस, आमचा त्या मुलाशी काहीही संबंध नाही.
रेशनकार्ड वर त्याचे नाव असल्यानी तुम्हाला फार काही त्रास होणार नाही. त्याची काळजी करु नका. जमेल तितक्या लगेच नाव काढुन टाका.
6 Jan 2014 - 8:08 pm | जेपी
त्या मुलीच्या गर्भपाताची कागदपत्रे मी त्या मुलाशी बोलुन मागुन घेतली . त्यावर मुलीच्या नावासमोर त्या मुलाचे नाव आडनव लावणे आहे .
6 Jan 2014 - 8:10 pm | वेताळ
उगाच नको त्या गोष्टीसाठी कशाला डोक्याला ताप करुन घेत आहात.जे करतात तेच निस्तरतात.
6 Jan 2014 - 8:19 pm | जेपी
@वेताळ जे करतात ते निस्तारत नाहियेत म्हणुन येथे सल्ला मागतोय . ती मुलगी माझे डोके खातीय आणी मी काय कराव या काळजीत आहे .
6 Jan 2014 - 8:15 pm | जेपी
ताईला रेशनकार्ड वरुन नाव काढण्यास सांगितले आहे.पण
त्यापुर्वी काही झेरॉक्स काढुन attestad करण्यासा सांगितले.कारण त्या मुलाचे एकटे असल्यामुळे रेशनकार्ड निघणार नाही. कदाचित वर्तन सुधारल्यास मदत
6 Jan 2014 - 8:27 pm | सुहास..
अवघड आहे !!
खर तर या प्रकरणात काय सल्ला देवु ?
माझे सध्या इतकेच डोके चालले . सध्या तरी कुणाच्या ही कुठल्याही गोष्टीवर (भावनातिरेक आवरून )रिअॅक्ट होवु नकोस असे मी म्हणेन ..अजिबात म्हणजे अजिबात रिअॅक्ट होवु नकोस ...बहीणीला देखील हेच सांग ..तु त्याला संभाळायच वचन दिल होतस , त्याची टोकाला गेलेली प्रेम-प्रकरण संभाळयचे वचन नव्हते दिलेस. आणि ज्यावेळी त्याच्यासाठी काही करायचे होते ते तु नक्की केलेले आहेस, त्यामुळे त्याला आधी फुल-स्टॉप दे !! तो काही लहान बाळ नाही की मुलीला त्रास दिला तर काय होवु शकते याची त्याला कल्पना नसेल . मुलीला त्याच्यामध्ये रस राहिलेला नाही, पण हे त्याच त्याला कळले पाहिजे , तु सांगुन फायदा नाही , आणि मुलीला , अर्थात तिचा मुड बघुन सक्त ताकीद/ वा कळवळुन विनंती ( पोरीचं प्रकरण लय अवघड, स्साल पोलीसांना माहीत असुन काही करु शकत नाही आपल्या विरोधात गेली तर) कर की तुला वा बहीणीला या सर्व प्रकारात गुंतवु नकोस ते !!
शिवाय भावकी मध्ये जे कोणी सिनियर असेल त्यांच्या ही कानावर घालुन ठेव ही गोष्ट !!
6 Jan 2014 - 9:09 pm | जेपी
@सुहास भावकीत सांगुन बघीतले , सगळेच संबध तोडुन टाक असे म्हणतात . कारण त्याची कुठलिही संपत्ति नाही. बस्स फक्त मी चा आडकलोय भावनेपोटी .
6 Jan 2014 - 10:18 pm | बर्फाळलांडगा
केवळ शाब्दिक मिटावामिट्वी इथे पुरेसी नाही. विशेषत: स्त्रियांचा भरोसा नसतो कधी अन कशा पलटतील! यांच्या बाबत कायदेशीर सावधानीच जिंदगीभर आसानी!
7 Jan 2014 - 12:17 am | कपिलमुनी
7 Jan 2014 - 9:57 am | संजय क्षीरसागर
विषयाची गुंतागुंत वाढत चालली!
7 Jan 2014 - 8:48 pm | बर्फाळलांडगा
कळत नसेल तर पुन्हा पुन्हा वाचा.
10 Jan 2014 - 12:48 pm | संजय क्षीरसागर
कळत नसेल तर पुन्हा पुन्हा वाचा.
10 Jan 2014 - 2:43 pm | कपिलमुनी
संक्षी ..
त्याच्या दृष्टीने 'स्त्रियांचा भरोसा ' हा सोपा विषय आहे .. त्यांच्या वाटेला जाउ नका .. डेंजर हयेत
7 Jan 2014 - 2:26 am | खटपट्या
अहो चिंतेत आहात ना. मग नाचणाऱ्या स्मायल्या तरी टाकू नका ! दुसरी एखादी चिंतातूर स्मायली टाका !!
7 Jan 2014 - 10:05 am | संजय क्षीरसागर
होंठ घूमा, सिटी बजा, और सिटी बजा के बोल.... भैया ऑल इज वेल.
7 Jan 2014 - 2:19 am | अर्धवटराव
त्या मुलाला घेऊन एखादा ओळखीचा पोलीस फौजदार किंवा कडक वकील गाठा. तशी आयडीया देऊन ठेवा पोलीसाला. पोलीस काका "त्यांच्या" भाषेत एकदा दुष्परीणाम समजुन सांगतील व सुधरण्याची शक्यता असल्यास हे रावसाहेब एका दणक्यात सुधारतील. नाहि तर तुम्ही तरी नक्की सुधरा... आपल्या हाताबाहेरची केस आहे त्यामुळे भरीस पडु नका. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्याला जामिन राहणार नाहि याची त्याला जाणीव करुन द्या.
बाकी आपल्यातर्फे शक्य तेव्हढं सेफ बाजु करुन घेणे, म्हणजे रेशन कार्ड वरुन नाव काढणे वगैरे, ते तर करावच. त्या मुलाच्या संदर्भात कुठल्या कागदपत्रांवर सही करताना नीट तपासुन घ्या.
हे झालं प्रॅक्टीकल वागणं. पण तुमची भावनीक गुंतवणुक देखील आहे म्हणता. तुम्ही जर अशा भानगडी केल्या असत्या तर तुमच्या वडिलांनी/थोरल्या भावाने तुमच्या कल्याणाकरता काय करायला हवं होतं याचा शांत डोक्याने विचार करा व तेच आचरण त्या मुलाबाबत ठेवा.
7 Jan 2014 - 11:05 am | वेल्लाभट
नंबर १: वर अनेकांनी लिहिल्याप्रमाणे, तो मुलगा आता सज्ञान आहे.
नंबर २: आईला दिलेलं वचन ठीक आहे; पण म्हणून तुम्ही उगाच लचांडात अडकावं, असं मला वाटत नाही.
नंबर ३: इथे तुम्हीच नाही, तुमची ताईही इन्व्हॉल्व्ह्ड आहे जी पुण्यात आहे; बरोबर? आणि तुम्ही लातूर ला. रेशन कार्डावरून नाव काढणं मला योग्य वाटतं. कारण जास्त संबंध ताईचा येईल या गोष्टीशी; जो त्रासदायक ठरेल.
अगदी संबंध तोडले नाहीत तरी इतकं स्पष्टपणे सांगून की बाबा, तु आत नोकरी करतोस, मोठा आहेस तेंव्हा आता तुखं नीट घर बसवण्याचं बघ. रेशन कार्ड तुझंही घे आता स्वतःचं. परका नाही पण स्वतंत्र हो; आम्हाला बरं तुलाही बरं.
7 Jan 2014 - 11:10 am | प्रभाकर पेठकर
>>>>परका नाही पण स्वतंत्र हो;
ह्या वाक्याला टाळ्या.
7 Jan 2014 - 11:33 am | कपिलमुनी
लै भारी !!
7 Jan 2014 - 12:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
परका नाही पण स्वतंत्र हो
चपखल ! पाच शब्दात या प्रसंगातले सर्व शहाणपण मावलेले आहे !7 Jan 2014 - 11:56 am | प्रसाद१९७१
@ तथास्तु - जरा स्पष्ट च बोलतो. तुमच्या प्रतिक्रीयांवरुन असे वाटते आहे की तुम्हाला सल्ला वगैरे काही नकोय. तुम्ही ह्या प्रकरणात गुंतुन पडायचे मनाशी नक्कीच केलेले दिसतय.
तुम्हाला तुमच्या भावकीतल्या, ओळखीच्या लोकांनी आणि मिपाकरांनी एक च सल्ला दिलेला आहे की "तुम्ही त्या मुलाशी संबंध तोडुन टाका". तरी पण प्रत्येक वेळी, तुम्ही तुमची भावनिक गुंतवणुक आहे हेच पालुपद आळवता आहात.
त्यावरुन असे दिसते की तुम्हाला ह्या प्रकरणातुन बाहेर पडायचे नाहीये.
तुम्ही ऐकणार नाही हे दिसतेच आहे, तरी पण
मुला कडुन गर्भपाताची कागदपत्रे मागुन घेणे वगैरे फार होते. ते आधी बंद करा.
त्या मुलाला काही समजवायच्या फंदात पडु नका. त्या मुलाला ओब्सेशन चा विकार आहे. त्याच्या नादी लागू नका. तो मुलगा तुम्हालाच त्रास देण्याची शक्यता आहे.
ती मुलगी तुमची कोणी नाही. ती आणि तिचे पालक काय ते बघुन घेतील.
तुम्ही स्वता सुद्धा एखाद्या Psychiatric doctor ला भेटा. काही औषधांनी निर्णय क्षमता वाढते.
7 Jan 2014 - 6:14 pm | म्हैस
अर्धवटरावांचा सल्ला योग्य वाटतो. पण केवळ मुलीला कटवायच म्हणून 'माझा मुलाशी संबंध नाही' असं सांगू नका तर खरोखर मुलाशी संबंध तोडा. कारण मुलगी जर खरच पोलिसात गेली तर मुलाला मदत केल्याबद्दल तुम्ही पण अडकाल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भावनिक गुंतवणुक वगेरे सगळं सोडून द्या .
8 Jan 2014 - 12:49 pm | एम.जी.
मला मुळात या धाग्यामधेच लोचा दिसतोय..
मिपावर इतकं भावनाप्रधान असलेलं कुणी असेल असं वाटत नाही.
10 Jan 2014 - 12:53 pm | संजय क्षीरसागर
नाही तर त्यावर मारण्यात सगळे तरबेज आहेत!
10 Jan 2014 - 4:20 pm | कर्ण
दस्तक आहे ...
4 Sep 2014 - 4:53 pm | जेपी
या गुंत्यावर मिळालेले बरेच सल्ले पाळले.त्यामुलाशी संबध तोडले.काल ती मुलगी आणी हा मुलगा जोडीने ताईच्या
पाया पाडुन आले आणी झाल्या बाबतीत माफी मागीतली.धन्यवाद मिपाकार एक चांगला शेवट झाला.