जय परशुराम...जय वामन!!!
आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची.