माझी ऑफीसची डायरी
५ जुन २०१० शनिवार १६:३०
माझ्या केबीनमधे बसुन सोमवारच्या प्रेझेन्टेशनची तयारी करत होतो . नकळत समोरच्या काचेतुन बाहेर पाहिल तर नेहमी बर्यापैकी वर्दळ असणारार्या त्या ऑफीसच्या मध्यभागी असलेली ती शांतता , सुनसानपणा उगाचच मनाला टोचत होता . बाहेरच्या क्युबीकल वर रीमा ह्याच प्रे़झेन्टेशनची इतर तयारी करत होती . (तिला बघुन मला उगाचच माझ्या करीयरचे पहिले काही दिवस आठवतात ...तेच डेडीकेशन ... तशीच मोठ्ठी स्वप्ने .. त्यासाठी सतत प्रयत्न ....वगैरे वगैरे )
माझ्या कीबोर्ड ची खट्खट अन एसीची इतर वेळी कधीही न जाणवणारी घरघर सोडली तर बाकी सारी शुन्य शांतता होती .
