गाभा:
नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे?
गेल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान वयाच्या साठाव्या वर्षी लग्न करण्यास सिद्ध झाली आहे. तिचा नवरा मुंबईतलाच मोठा बिझनेसमन असून त्याचं वय वर्षं ३६ आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या झीनतच्या या बोल्ड निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे.
असेहि मत वाचण्यात आले कि असे म्हणतात की ,एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम ......म्हणजे biologically .
म्हणून तर आपल्याकडे लहान बायको आणि मोठा नवरा .....असे समीकरण असते /होते .
सैफ अली खान आणि अमृता सिंग मध्ये १२ -१३ वर्षांचे अंतर होते . अमृता सिंग मोठी होती .
आता करीना सैफ पेक्षा १० वर्षाने लहान
असो....
बायको नव~यात २४ वर्शाचे अंतर जास्त वाटते का???
प्रतिक्रिया
5 Feb 2013 - 10:56 pm | संजय क्षीरसागर
लग्न झाल्यावर चार इंचापेक्षा जास्त असू नये.
5 Feb 2013 - 10:58 pm | आजानुकर्ण
वयात चार इंचापेक्षा कमी अंतर कसे ठेवता येईल? मला वाटते 'प्रकाशवर्षे' प्रमाणे वय देखील अंतराचे एकक आहे असा तुमचा गैरसमज झाला आहे.
5 Feb 2013 - 11:15 pm | संजय क्षीरसागर
अर्थ कळेल
5 Feb 2013 - 11:18 pm | आजानुकर्ण
प्रतिसाद पुन्हा एकदा शांतपणे वाचला आणि लग्नही झाले आहे मात्र अर्थ काही कळत नाही. 'नवरा बायकोच्या वयात चार इंचापेक्षा कमी अंतर हवे' या वाक्यात काहीतरी फॉलसी आहे. एस-आय मापनांमध्ये इंच हे वय मोजण्याचे नवे एकक म्हणून अंतर्भूत केले आहे काय?
5 Feb 2013 - 11:21 pm | जेनी...
अरे देवा !
कसं होणार यांचं :(
कदाचित तुमच्या बायकोला कळेल ...
असो ..
मी आता कल्टी .
5 Feb 2013 - 11:30 pm | संजय क्षीरसागर
असं वाट्टं
5 Feb 2013 - 11:38 pm | सूड
'नवरा बायकोत किती अंतर असावे?' असा प्रश्न नसून 'नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे' असा प्रश्न आहे. उगाच ओढून ताणून जोक करायचा प्रयत्न का करताय !!
5 Feb 2013 - 11:45 pm | जेनी...
=))
5 Feb 2013 - 11:54 pm | संजय क्षीरसागर
ज्योक थोड्या वेळानं कळेल.
6 Feb 2013 - 10:17 am | प्रसाद गोडबोले
=))
6 Feb 2013 - 10:26 am | संजय क्षीरसागर
शिरेस लोकांना नाय कळणार भवतेक.
6 Feb 2013 - 12:55 pm | श्री गावसेना प्रमुख
ठिक आहे पण जास्ती वाल्यांनी काय करायच?
6 Feb 2013 - 1:01 pm | सूड
जोक कळला तेव्हा हेच विचारावंसं वाटलं !! ;)
6 Feb 2013 - 1:24 pm | संजय क्षीरसागर
बाकी प्रश्न आयत्या वेळचे आहेत
6 Feb 2013 - 1:45 pm | श्री गावसेना प्रमुख
कसे काय आयत्या वेळेचे जास्तीवाल्यांनी काय कराव ह्याच्यावर काही उपाय आहे तुमच्या कडे,
जास्तीवाल्यांना तळाचा ठाक लागतो एव्हढे खरे.
6 Feb 2013 - 1:53 pm | संजय क्षीरसागर
विषय `अंतर किती असावे' आहे, तळ गाठणे नाही.
6 Feb 2013 - 2:00 pm | श्री गावसेना प्रमुख
बर तुम्हाला साडेचार ,पाच वाल्यांबद्दल ही माहीत असेलच की(त्यांनी काय कराव)
6 Feb 2013 - 2:03 pm | बाबा पाटील
बाल मिपाकरांच्या मनावर विपरित परिणाम होतात की हो...
6 Feb 2013 - 2:04 pm | संजय क्षीरसागर
इथे थांबतो.
6 Feb 2013 - 2:14 pm | गवि
हॅ हॅ.. तलवार, बंदूक, पिस्तुल आदि शस्त्रसाठा आठवला का? ;)
6 Feb 2013 - 2:15 pm | बाबा पाटील
पण......मिपाकरांच्यात कोनी बालमनावाले आहेत का हो ?
6 Feb 2013 - 2:38 pm | श्री गावसेना प्रमुख
आताचे वय वर्ष १० वाले सुद्धा बालमनवाले नाहीयेत.
7 Feb 2013 - 11:27 am | भीडस्त
खरं आहे संक्षी.
असे काही प्रश्न झोपण्या पूर्वी पडतात
तर काही उठल्यानंतर उभे रहातात.
(एक तपापासून)अनुभवी.
9 Feb 2013 - 12:35 am | संजय क्षीरसागर
असे काही प्रश्न झोपण्यापूर्वी पडतात
तर काही उठल्यावर
9 Feb 2013 - 9:21 am | श्री गावसेना प्रमुख
झोपेतुन का?
7 Feb 2013 - 5:38 pm | वपाडाव
मला या प्रतिसादावर लय काहीबाही लिहायचे होते पण "आफ्रिकन" लोकांचा मान ठेवुन इथेच थांबतो...
असो, चालु द्या...
5 Feb 2013 - 10:59 pm | पुण्याचे वटवाघूळ
हे ती झीनत अमान जाणे आणि तिचा नवरा जाणे. आपल्याला कोण विचारायला आले आहे आणि त्यांच्यात अगदी १०० वर्षांचे अंतर असले तरी आपल्याला करायचे तरी काय आहे?
ता.क--- अकु नेहमीप्रमाणे धागा टाकून पलायन करणार का?
5 Feb 2013 - 11:08 pm | शुचि
उगाच काहीबाही वदंता पसरवू नयेत असे नम्रपणे सुचवू इच्छिते.
अजून एक मुद्दा- वय ही वृत्ती असते आकडा नाही.
6 Feb 2013 - 11:24 am | कवितानागेश
वय ही वृत्ती असते आकडा नाही.>
शुचिताई रॉक्स! ;)
6 Feb 2013 - 2:02 pm | अनुराधा१९८०
आणि पुरुषाची बुद्धी कधी १२ वर्षा पेक्षा वाढत च नाही.
तुम्हाला काय करायचे आहे हो कोणी कोणाशी लग्न केले आणि नवरा बायको च्या वयात कीती अंतर आहे ते?
तुमचे लग्न करताना तुम्हाला पाहिजे तेव्हडे अंतर ठेवा
6 Feb 2013 - 2:08 pm | श्री गावसेना प्रमुख
छ्या बुवा
6 Feb 2013 - 2:13 pm | अनुराधा१९८०
पुरुषाची बुद्धी कधी १२ वर्षा पेक्षा वाढत च नाही ह्याचा पुरावा पाहिजे असेल तर कुंभमेळ्याचा लेख बघा. कदचित १२ वर्ष सुद्धा जास्त वाटतील तुम्हाला
6 Feb 2013 - 2:39 pm | श्री गावसेना प्रमुख
मले वाटल तुमच्याकडे काही पुरावा आषीन जाउ द्या.
6 Feb 2013 - 2:41 pm | दादा कोंडके
म्हणजे स्त्रियांबद्दल 'शारिरीक' काही कमेंट आली की पुरुषांची 'बुद्धी' काढायची. कुठं गेले स्त्रिमुक्तीवाले आता?
6 Feb 2013 - 2:54 pm | अनुराधा१९८०
तुमच्या अगदी वर्मी बसलेला दिसतोय वार :-)
6 Feb 2013 - 4:31 pm | दादा कोंडके
गप्प बसायचे ठरवले आहे.
6 Feb 2013 - 3:19 pm | बॅटमॅन
पुरुषांच्या बुद्धीचं सोडा, तुमची बुद्धी १९८० नंतर वाढल्याचे दिसत नाही.
6 Feb 2013 - 3:20 pm | गवि
सर्वांनीच वैयक्तिक प्रतिसाद टाळल्यास उत्तम.
5 Feb 2013 - 11:08 pm | रेवती
अरेच्च्या! अहो कालच काथ्या कुटलात ना? आज परत? देवाधिदेवा, वाचव मिपाकरांना!
5 Feb 2013 - 11:10 pm | सुनील
काल काथ्या कुठे कुटला? काल पोळ्या लाटल्या आणि चपात्या भाजल्या नव्हे का?
5 Feb 2013 - 11:11 pm | काळा पहाड
कालचा वेगळा.. आजचा वेगळा.. रोज तेच तेच जेवतो का आपण?
6 Feb 2013 - 12:48 am | सानिकास्वप्निल
रोज रोज काथ्या कुटून त्याचा चोथा झालाय, खरचं देवा वाचव रे
5 Feb 2013 - 11:10 pm | काळा पहाड
माझ्या आईकडच्या आज्जीला ८ मुले. म्हणजे जर लग्नाच्या वेळी तिचं वय जर २० असेल आणि आजोबांचं वय जर ३० असेल, तर शेवटच्या मुला नंतर आजोबांचं वय ४०-४५ असेल तर तिचं वय ३०+(६*८) = ७८ ते ८३ असेल. अवघड आहे.
5 Feb 2013 - 11:16 pm | आजानुकर्ण
माझ्या आजीला ११ मुले. आणि आता वय वर्षे ८०. या न्यायाने तिचे वय १४६ हवे.
5 Feb 2013 - 11:17 pm | जेनी...
ओ काळा काका आज्जीच्या जमान्यात लग्न लवकर व्हायची . २० वर्षापर्यंत कुणी वाट
पाहात असेल असं वाटत नाहि ... १२ /१३ वर्षात लग्न व्यायची तेव्हा .. तरि त्यातल्या त्यात
आज्जी लग्नाच्या वेळी १६ वर्षे पकडुन चालु ...
ह्म्म आता नरा हिशेब .
5 Feb 2013 - 11:26 pm | काळा पहाड
तसं नाही पूजाक्का, मी फक्त उदाहरण घेतलं. आज्जीचं लग्न किती वयात झालं हे मला ठाऊक नाही. आणि बहुधा तिला ही ठाऊक नसावं. सध्या ती हयात नसल्याने तिला विचारायची सोयही नाही. बाकी एवढा मिनतवारीने केलेला हिशेब तू वाया घालवलास. गणितात भोपळा मिळायचा मला.
6 Feb 2013 - 1:30 pm | गवि
जगदंब.. जगदंब..
6 Feb 2013 - 2:36 pm | इरसाल
गविबापु बघताय नं ?
6 Feb 2013 - 2:41 pm | यसवायजी
;)
6 Feb 2013 - 10:42 pm | बाबा पाटील
१२/१३ वर्षात लग्न करुन शाळेत जोडीनेच जायच,ही घटनादुरुस्ती झालीच पाहिजे....
6 Feb 2013 - 11:30 pm | जेनी...
ह्या .. मजा नाय त्यात बाबा काका :-/
शाळेत किवा कालेजात आप्शन भेटतात ते बंद हुनार न मग :-/
6 Feb 2013 - 11:34 pm | बाबा पाटील
पुजा बाळा तुला तसाही फार फरक पडेल अस वाटत नाही.....कारण तु शहाण ,गुणाच बाळ आहे ना.....
6 Feb 2013 - 11:02 pm | आनन्दिता
ठार मेले!!!! :) :)=))
6 Feb 2013 - 3:08 pm | नितिन थत्ते
हॅ हॅ हॅ.... पहिलं मूल होतं तेव्हाच वय वाढतं..... नंतरच्या वेळी नाय काय !!!!!!
6 Feb 2013 - 5:17 pm | प्रसाद गोडबोले
हे जरा जास्त होतयं असे वाटले
5 Feb 2013 - 11:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
दोन काथ्यांत किती दिवसांचे अंतर असावे ?
5 Feb 2013 - 11:13 pm | जेनी...
रोजचा रतिब . आवरा यांना
तसहि स्वताहाचं मत द्यायची त्यांच्याकडे पद्धतच नैये ...
असो ... चालुद्या .
6 Feb 2013 - 10:12 am | कुंदन
ते पण असतील तिच्यासाठी रांगेत.
5 Feb 2013 - 11:16 pm | बॅटमॅन
इंचा-इंचाने अकुंना हाकला बघू मिपावरून.
6 Feb 2013 - 10:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
एका काथ्याकुटात किती इंचांनी वाढ होत असेल रे? काही अंदाज??
6 Feb 2013 - 5:15 pm | चिगो
जगदंब जगदंब..
6 Feb 2013 - 10:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अश्लील काय यात? पुरुषनामधारी आयडीची छाती अभिमानाने किती वाढेल असं विचारण्यात काय अश्लील? मावळ्यांनी छाती पुढे करून चालण्याची वर्णनं इतिहास म्हणून शिकवतात त्यांना अश्लील म्हणा हवंतर.
6 Feb 2013 - 5:17 pm | बॅटमॅन
आमी नाई जा =))
5 Feb 2013 - 11:22 pm | अभ्या..
बॅट्या अस्ले प्रतिसाद देऊनच त्यांचा टीआरपी वाढवायचा तुझा गुप्त बेत कळला आहे. ;)
5 Feb 2013 - 11:25 pm | बॅटमॅन
अब्या तू बाकी कंचीपण शिवी दे पण हा आरोप नको करू माझ्यावर =)) =))
(दीनवाणा) बॅटमॅन.
5 Feb 2013 - 11:31 pm | अभ्या..
आता ह्याच्यापुढं प्रतिसाद देत बसणार्यालाच त्या द्याव्यात असं मला लै वाटून राह्यलय. ;)
मालक पेट्रोल संपलेली गाडी सोडून निघून जातोय, आपण नेतोय ढकलत. :(
5 Feb 2013 - 11:58 pm | संजय क्षीरसागर
त्यांना उत्तर वगैरे नको असतं
6 Feb 2013 - 1:01 am | अत्रुप्त आत्मा
+१ टू अभ्या..
काय महान विषयावरनं धागे काढतो हा माणूस,खरच हद्द झाली.
हे असच ओढत न्या आणी...........
6 Feb 2013 - 7:27 am | ५० फक्त
महान विषयावरनं धागे काढतो- खरोखर, आणखी काही महान विषयावरचे धागे मा.संमंने उडवले म्हणुन नाहीतर.... असो.
6 Feb 2013 - 12:53 am | सुनील
केवळ एक नवरा आणि एक बायको अशी जोडीच अपेक्षित आहे काय? एकापेक्षा अधिक बायका (किंवा नवरे) असतील तर वयाचे अंतर कसे मोजायचे?
उदा. द्रौपदी आणि पांडव यांच्या वयातील अंतर मोजायचे असल्यास पांडवांच्या वयाची सरासरी काढावी लागेल.
ती सरासरी कोणत्या पद्धतीने काढावी, म्हणजे उत्तर अधिक शास्त्रशुद्ध येईल?
मीन, मिडियन की मोड (नकुल आणि सहदेव हे जुळे होते हे ध्यान्यात घ्या!)
अगदी असेच कृष्ण आणि त्याच्या सोळा हजार पत्नींबाबत करावे लागेल.
धागा मोठा विचारप्रवर्तक आहे ;)
6 Feb 2013 - 1:03 am | मोदक
श्या...
तुम्ही तर आणखी चार पाच काथ्याकुटांची माहिती दिलीत राव.
6 Feb 2013 - 8:35 am | ५० फक्त
ते कोण कुणाचा नवरा आणि कोण कुणाची बायको यावर अवलंबुन असावं असं वाटतं.
6 Feb 2013 - 11:33 am | मालोजीराव
हा प्रश्न धागाकर्त्याच्या प्रश्नापेक्षा जास्त महत्वाचा आहे असं वाटतं :P
6 Feb 2013 - 8:51 am | चौकटराजा
हा प्रश्न एकाच घरात रहाणार्या नवरा बायको च्या वयातील अंतरावर आहे असे उदाहरणावरून दिसते . तसे नसेल तर
० ते इनफिनैटी काही अंतर चालेल ब्वॉ !
6 Feb 2013 - 10:36 am | ५० फक्त
० ते इनफिनिटी का, मायनस का नको. ?
6 Feb 2013 - 11:44 am | प्रसाद गोडबोले
पाय च्या पटीत असेल तर चालेल !
6 Feb 2013 - 9:40 am | रमेश आठवले
आजच्या दोन तीन पिढ्या ( साठ-सत्तर वर्षा) आधी मुलगी १३-१४ वर्षाची झाली म्हणजे उपवर झाली असे मानत आणि लग्ना नंतर तिने घर संभाळणे व मुलांना वाढवणे या पलीकडे तिच्याकडून अपेक्षा नसे. या उलट मुलाच्या बाबतीत त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत अथवा तो आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होईपर्यंत साधारणपणे वीस वर्षाचा होत असावा. त्यामुळे दोघातील अंतर सहा वर्षाच्या आसपास असण्याचा प्रघात पडला असावा.
बीजवर प्रथेत तर अंतर कितीही चालत असे.
सध्या झी मराठीवर चालू असलेल्या ' राधा हि बावरी' या मालिकेत नायिका २८ वर्षाची आणि नायक २४ वर्षाचा असे दाखविले आहे.
संजय क्षीरसागर यांना अंतर उंचीतले म्हणायचे आहे कि वयातले ?
6 Feb 2013 - 10:13 am | संजय क्षीरसागर
एकमेकां मधले!
6 Feb 2013 - 9:40 am | शिलेदार
मला वाटत की चेश्टा खुप झाली. आपल्याला या विषया बद्द्ल काही अधिक माहीती असेल तर त्या बद्द्ल लिहिणे अपेक्षित आहे. जस की जर कोणाला माहीती असेल की वयातल्या अन्तराचा काय परिणाम होतो मानसशास्त्र,शरीरशास्त्र,आपण ज्या समाजात राहतो त्याच्या चौकटी,म्हजे सामाजीकशास्त्र द्रुश्टीने सुद्दा काय असायला पाहीजे.
सध्याची मानसिकता व त्याचे भविष्यातील परिणाम,बदलती जीवनपधती त्याचा परिणाम.
अस काही माहित असेल तर क्रुपया लिहा.
ता.क. मला कोणाला दुखवायचे नाहीये फक्त अधिक माहिती येत राहावी हीच अपेक्षा.
(वरील प्रतिक्रिया पण चिन्च घालून होत्या म्हणून मजा आली ;))
6 Feb 2013 - 9:41 am | तर्री
कालचा पोळ्यांचा काकु अगदीच "हा" असला तरी आजचा विषय ( महान धागाकार्त्याचा उद्देश नाही ) थोडा चर्चात्मक दिसतो आहे.
ऑक्सिटोसिन आणि टेस्टेस्टेरॉन हया हॉर्मोन्स चे स्री पुरुषांमधील वायासंदर्भात महत्व लक्षात घेता , सर्वसाधारणपणे विवाहासाठी २-५ वर्षे अंतर योग्य आहे. पण त्या साठी विवाहाचे वय २२ - २९ हे आहे हे गृहीत धरलेले आहे.
सैफ अली खान आणि झीनत अमान यांचा विवाह हा "कंपॅनियनशिप " साठी आहे , (प्रजोत्पादना+कंपॅनियनशिपसाठी नाही) त्यामुळे वयातील अन्तर किती असावे हा काकु सर्वार्थाने गैर लागू आहे.
.
6 Feb 2013 - 10:10 am | रमेश आठवले
सैफाली खान व करीना कपूर आणि झीनत अमान व सर्फराजखान
6 Feb 2013 - 11:11 am | गवि
झालंस्तर सैफअली खान(च) आणि अमृता सिंग..
6 Feb 2013 - 8:13 pm | शैलेन्द्र
"सैफ अली खान आणि झीनत अमान यांचा विवाह हा "कंपॅनियनशिप " साठी आहे , (प्रजोत्पादना+कंपॅनियनशिपसाठी नाही)"
असं म्हणताय.. बरं..
बघायला हवं मग..
6 Feb 2013 - 9:15 pm | सूड
परमेश्वरा !! काय होणार आता त्या बिचार्या करीनाचं !!
6 Feb 2013 - 9:35 pm | दादा कोंडके
सहमत!
अरेरे करीना वाया* गेली की.
*संदर्भासाठी कणेकरांचं माझी फिल्लमबाजी बघावं. :)
6 Feb 2013 - 10:10 pm | शैलेन्द्र
आंघोळ.. आंघोळ..
7 Feb 2013 - 3:29 am | टवाळ कार्टा
वाया नाही...."फुकट"
6 Feb 2013 - 10:01 am | परिकथेतील राजकुमार
१) हे तुम्हाला नक्की कशाला जाणून घ्यायचे आहे ?
२) सध्या तुमचे वय काय अहे ?
३) तुम्ही अभिनेता किंवा गेला बाजार बिझनेसमन आहात काय ?
४) 'एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम' = ओक्के ! आणि नवरा लहान होतो, का मोठा होतो ? साधारण किती वर्षाने ?
6 Feb 2013 - 3:41 pm | काळा पहाड
नवर्याची बुद्धी कणाकणाने लहान होते दर दिवशी. दुसरे मूल झाले की त्याची बुद्धी (आणि उपयुक्तता) संपते.
6 Feb 2013 - 10:09 am | संजय क्षीरसागर
देतात. त्यांना मनात विचार आला की धागा टाकण्यात इंटरेस्ट आहे. चर्चा, प्रश्नोत्तर यात काही स्वारस्य नाही. ते पुन्हा पोस्टवर येत सुद्धा नाहीत. हे एकदा लक्षात आलं की संपलं!
6 Feb 2013 - 10:11 am | संजय क्षीरसागर
ते बायकोचा उत्साह आणि नवर्याची कपॅसिटी यावर अवलंबून आहे!
6 Feb 2013 - 1:05 pm | श्री गावसेना प्रमुख
नवपरीणीत असल की उत्साह आणी कॅपेसीटी गणव असते
बाकी असल्या वाक्याबद्दल जाहीर णीषेध
6 Feb 2013 - 3:39 pm | चौकटराजा
आम्हाला वाटते नवर्याचा उत्साह व बायकोची क्याप्याशिटी कारण .....
6 Feb 2013 - 10:41 am | मृत्युन्जय
एक मूल झाल्यावर बाई ६ वर्षांनी लहान होत असेल तर विवाहोत्सुक तरुण तरुणींना लग्नाआधी एकत्र बसावे (फक्त बसावे म्हणतो आहे मी. आणि ते सुद्धा कॉफी, चहा, नीरा अशी कमी उत्तेजक द्रव्ये पीत) आणि चर्चा सुरु करावी" तुला किती हवीत?" "मला ३ हवीत " " मला ४ हवीत" "मला नकोच वगैरे. ( आकडे लग्नानंतर व्हायच्या मुलांचे आहेत). मग जर समजा १८ हा आकडा फायनल ठरला तर १८ वर्षांचे अंतर असायला हरकत नसावी. प्रत्येकाने आपापल्या आवडीनिवडीनुसार अजुन काही वर्षांचे अंतर ठेवावे.
6 Feb 2013 - 10:42 am | मृत्युन्जय
वरील प्रतिसादात ३ हा आकडा फायनल ठरला तर असे वाचावे.. १८ हा आकडा फायनल ठरला तर पाळण्यातल्या किंवा गर्भातल्या मुलीशी लग्न केले तर चालेल काय हे कायदेतज्ञांना विचारुन घ्यावे. गरज पडल्यास सरकारला कायदा बदलण्यासही सुचवता येइल.
6 Feb 2013 - 11:05 am | योगप्रभू
अकु,
पुढच्या काळात पुरुष आणि स्त्री यांचा नवरा-बायको म्हणून रोल राहील की नाही, याची लोकांना काळजी लागून राहिलीय आणि तुम्ही कुठं वय, उंची, अंतराचा विचार करताय? :)
6 Feb 2013 - 11:07 am | नाना चेंगट
प्रश्नातला व वाचलाच नव्हता आधी
6 Feb 2013 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार
साला आमच्या नान्या महाभिकारचोट मनुष्य आहे !
=)) =))
7 Feb 2013 - 3:31 am | टवाळ कार्टा
=))
6 Feb 2013 - 1:34 pm | गवि
नेमकं किती अंतर असावं हे माहीत नाही पण ते अंतर "हळवे","सुंदर" आणि "शहाणे" अशा प्रकारच्या गुणांनी युक्त असावे असा दृष्टांत खालील रचनेतून मिळतो:
कितीक हळवे कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी माझ्यानंतर.
अर्थात पतीपत्नी, म्हणजे लग्न झालेल्या व्यक्ती असल्याने त्यांच्याबाबत हे तीनही गुण त्या अंतराला एनीमोअर लागू होतात का ते सांगणं कठीण आहे. पण धागाकर्त्याने लग्नाच्या वेळी काय अंतर असावं, म्हणजेच लग्नापूर्वीचा काळ अपेक्षून प्रश्न विचारलेला असल्याने सांगितलेलं आहे.
6 Feb 2013 - 1:43 pm | संजय क्षीरसागर
जिच्याशी लग्न होऊ शकलं नाही तरी अंतरराखून ओळख जपणार्या मैत्रिणीसाठी लिहीलीये.
6 Feb 2013 - 1:52 pm | गवि
ओह... मला ही लग्नापूर्वीच्या "शहाण्या" अंतराविषयी आहे असं वाटलं होतं. अपडेटबद्दल थँक्यू...
6 Feb 2013 - 1:49 pm | निशांत५
लग्न कशासाठी करणार त्यावर अवलंबून आहे
6 Feb 2013 - 2:29 pm | संजय क्षीरसागर
पब्लिकला ज्योक समजायला इतका वेळ लागल्यामुळे त्यांचा अनुभव कमी पडतोय का असा प्रश्न पडला होता.
माणूस स्फोटक वाटत नाही, तस्मात भीती नाही.
6 Feb 2013 - 2:39 pm | गवि
:)
मूळ मालिकेतून हा प्रतिसाद बाहेर घेऊन प्रतिसादांना "नळकांड्या" रोगापासून वाचवल्याबद्दल धन्यवाद..
6 Feb 2013 - 8:25 pm | अग्निकोल्हा
पब्लिकला ज्योक अन तुम्हाला विषय समजायला इतका वेळ लागल्यामुळे त्यांचा अनुभव कमी पडतोय असंच कसं काय म्हणता येइल हो ?
6 Feb 2013 - 10:36 pm | संजय क्षीरसागर
गिल्फू तुम्हाला विनोद कळलेला दिसत नाही!
7 Feb 2013 - 3:38 am | अग्निकोल्हा
मला विनोद कळलेला का दिसत नाही ?
7 Feb 2013 - 3:43 am | आजानुकर्ण
कदाचित तुम्ही प्रतिसाद शांतपणे वाचला नसेल किंवा तुमचे लग्न झाले नसेल. अशी असल्यास काही विनोद कळत नाहीत.
7 Feb 2013 - 3:55 am | अग्निकोल्हा
लग्न झाले नसल्यास संजु भाउंचे "काही" विनोद लोकांना कळत नाहीत असं का असतं ?
7 Feb 2013 - 5:18 pm | अग्निकोल्हा
या धाग्यातिल प्रतिसाद वाचुन इतकच म्हणायचं आहे कि तुमचा विनोद लोकांना कळला नसेल तर फक्त लोक समजुन घ्यायला चुकत आहेत असं न्हवे तर कदाचित तुमचं विनोदाचं टायमिंगही चुकलं असेल हि शक्यता प्रांजळपणे आपण का विचारात घेतली नाहीत ? एखाद्यावर त्याच्या चक्क विनोदावर स्पष्टिकरण द्यायची वेळ यावी म्हणजे जरा... :(
6 Feb 2013 - 11:38 pm | जेनी...
नैयो संजय काका बाबा काका स्फोटक नैचेत ...
फक्त त्यांच्याकडे एक चार वर्षे वयाचं .. जेमतेम अंदाजे अडीच ते तीन फूट
उंचीचं एक क्षेपणास्त्र आहे ... ते सोडतिल तुमच्यावर ;)
" बचके तु रेना रे , बचके तु रेना .. नहि दुजा मौका मिलेगा संभलना " =))
6 Feb 2013 - 11:49 pm | बाबा पाटील
माणस वाचवन्याचा आमचा धंदा,हा काही साइड बिजनेस आहेत पन जीव वाचवन खरा पोटपाण्याचा उद्योग्,सगळी स्पोटके एका इच्छाभेदीने आमच्याकडे रिकामी होतात कारण शेवटी बंदुकीच्या गोळीपेक्षा जुलाबाची गोळी जास्त खतरनाक आणी परिणामकारक असते.
6 Feb 2013 - 11:55 pm | जेनी...
इइइइइइइइइइइ =)) =))
7 Feb 2013 - 12:46 am | प्रसाद गोडबोले
बंदुकीच्या गोळीपेक्षा जुलाबाची गोळी जास्त खतरनाक आणी परिणामकारक असते.- बाबा पाटील
7 Feb 2013 - 1:06 am | बॅटमॅन
अतिशय जुलाबी आपलं प्रवाही विचार!!!! =)) =))
7 Feb 2013 - 9:13 am | आनन्दिता
पिल्लु सरळ कापाकापीची भाषा करतं... आणि पिल्लाचे पप्पा गनिमी काव्याची.... =)) =))
6 Feb 2013 - 2:47 pm | श्री गावसेना प्रमुख
http://online2.esakal.com/esakal/20130206/5661294992875820736.htm
झीनत अमान ह्यांनी मी पुन्हा लग्न करतेय ह्या बातमीत दम नस्ल्याचे सांगीतले आहे.त्या म्हणाल्या मिपा वर माझ्या नावाने लेख लिहीला आहे तो तद्दन खोडसाळ पणा आहे.
बाकी अकु बहुत पहुची हुइ शक्सीयत लगती है.
6 Feb 2013 - 3:28 pm | प्रसाद गोडबोले
आमच्या (वैयक्तिक) मते हा खुपच वैयक्तिक प्रश्न आहे .... ज्याचे त्याने (जिचे तिने ) ठरवावे .
( खूप जास्त ( २०-३० वर्षे वगैरे) असेल तर मज्जा येईल ;) असा एक खट्याळ विचार मनात डोकावुन गेला..."बघुया" )
6 Feb 2013 - 3:32 pm | बॅटमॅन
काय हो राष्ट्रकाकू, या विषयाबद्दल संविधानाचे मत काय आहे? =))
6 Feb 2013 - 3:41 pm | प्रसाद गोडबोले
आमाच्या अल्प ज्ञाना नुसार
लग्नाच्या वेळेला
मुलगी १८+ वर्षाची असावी आणि २१ <= मुलाचे वय <= इन्फिनिटी
किम्वा
मुलगा २१+ वर्षाचा असावा आणि १८ <= मुलीचे वय <= इन्फिनिटी
अर्थात मुलगा मुलगा , मुलगी मुलगी , वगैरे वगैरे बाबतीत संविधानानुसार वयाची अट लादता येणार नाही असे केन्द्रीय गृहमंत्रालयाचे मत आहे ;) =))
6 Feb 2013 - 3:43 pm | प्रसाद गोडबोले
मिपाने , गणितीय चिन्हे डीलीटली ... :(
आमाच्या अल्प ज्ञाना नुसार संविधानाच्यामते
लग्नाच्या वेळेला
मुलगी १८+ वर्षाची असावी आणि मुलगा२१+ असावा , बाकी काही अती नाहीयेत ...किती का फरक असेना वयात
6 Feb 2013 - 4:20 pm | वेताळ
उडवुन द्या बार एकदाचा.
6 Feb 2013 - 6:49 pm | श्रीरंग_जोशी
{स्वशच मोड} अकु यांनी वयाबद्दल प्रश्न विचारला आहे; कोणते वय ते स्पष्ट केलेले नाही (जसे शारिरीक, बौद्धिक इ. इ.){/स्वशच मोड}
6 Feb 2013 - 7:30 pm | तिमा
संपादक मंडळाला विनंती आहे की मिपावर ,म्हातारचळ' नांवाचीही एक कॅटेगरी करावी आणि त्यातील शीर्षके नवीन लेखन या टिचकीवर दिसू नयेत. म्हणजे ज्या बालमनांना परिणाम करुन घ्यायचा आहे तेच फक्त वाचतील.
6 Feb 2013 - 7:48 pm | शुचि
नवरा बायकोच्या व यात किती अंतर असावे?
यात म्हणजे कशात? :P
6 Feb 2013 - 8:17 pm | जेनी...
शी बै !
मी आता हा धागा उघडणार नाहि . माझ्या बालमनावर परिणाम व्हायला लागलाय आता .
आता बास :-/
7 Feb 2013 - 12:49 am | प्रसाद गोडबोले
चोराच्या ह्याच्यात चांदणे =))
6 Feb 2013 - 8:20 pm | आदूबाळ
आज नवीन काथ्या नाही का अकुंचा? कसं सुनं सुनं वाटू राहिलंय...
7 Feb 2013 - 12:29 am | सूड
मिपाचे काथ्थ्यायन आहेत ते, हा सगळा डेटा गोळा करुन कूटसूत्र लिहीत बसले असतील. लिहीता लिहीता शंका आली की मध्येच येईल काथ्याकूट. ;)
7 Feb 2013 - 12:08 pm | सुबोध खरे
स्त्रिया पुरुषानच्यापेक्षा मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या लवकर प्रगल्भ होतात त्यामुळे स्त्रिया साधारण १३ते १४ या वयापासून मुली प्रगल्भ होऊ लागतात हाच काळ त्यांच्या रजोदर्शनाचा असतो.या काळातच त्यांची स्त्री संप्रेरके(होर्मोन्स) वाढू लागलेली असतात त्यामानाने मुलगे मानसिक दृष्ट्या प्रगल्भ होण्यासाठी अजून ३ ते ४ वर्षे म्हणजे १७ ते १८ हे वय लागते.१६ वर्षांची मुलगी हि साधारण १९-२० वर्षाच्या मुलाच्या एवढी मानसिकदृष्ट्या प्रगल्भ आढळते. त्या वयाच्या मुलीना आपल्या वयाचे/वर्गातील मुलगे अपरिपक्व वाटतात आणि थोड्या मोठ्या मुलांबद्दल जास्त आकर्षण वाटते हि वस्तुस्थिती आहे
तसेच स्त्री ची कामवासना रजोनिवृत्ती(मेनोपॉज) नंतर (संप्रेरकांचे प्रमाण कमी झाल्याने) कमी होते. स्त्रियांचे वयात येणे आणि रजोनिवृत्ती होणे या आकस्मिक होणाऱ्या घटना आहेत पण पुरुषांचे बाबतीत हि बर्याच कालावधीत होणारी घटना आहे.
या कारणांमुळे नवरा आणि बायको यांच्या वयात साधारणपणे ३-५ वर्षे (पुरुष ३-५ वर्षांनी मोठा) अंतर असणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे.ज्या काळात रजोनिवृत्ती होते वय ४५ तेंव्हा नवरा ४८-५० असेल तर नवर्याची कामवासना तेवढी कमी झालेली असेल आणि त्यांच्या कामवासनेतील फरकामुळे होणारे तणाव तितके कमी होतील.आमच्या एका मित्राची पत्नी त्याच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठी आहे(प्रेमविवाह) त्यामुळे आत्ता तो ४७ वयाचा आहे आणि त्याची पत्नी ६० वर्षाची.
सुमारे १५ वर्षांपूर्वी तिची रजो निवृत्ती झाली तेंव्हा त्याचे वय फक्त ३२ होते आणि त्यानंतर होणारी बारीक बारीक चिडचिड आणि भांडणे सुरळीत होईपर्यंत बरेच पाणी पुलाखालून जावे लागले.
हे टोकाचे उदाहरण मी मुद्दा लक्षात आणण्यासाठी देत आहे परंतु रजो निवृत्तीच्या आसपास च्या स्त्रिया आणि त्यांच्या नवर्यांची आपसात होणारी तेढ हि डॉक्टरांना नेहमीच आढळणारी बाब आहे.
8 Feb 2013 - 5:24 pm | खटासि खट
ही पोस्ट वाचायला वीसेक वर्षं उशीर झाला
7 Feb 2013 - 4:23 pm | पिंपातला उंदीर
मानसिक वय का शारीरिक वय हे स्पष्ट झालेले नाही. मानसिक वय बद्दल बोलत असाल तर ते जितके कमी तितके चांगले.
7 Feb 2013 - 5:54 pm | अनुराधा१९८०
मला तर आवडला असता २० वर्षानी मोठा ( ४२-४४ शाररिक वर्षाचा ) नवरा, जरा दुनिया बघितल्या मुळे शहाणपणा आणि अनुभव पण असेल. आणि सासरचे लोक खपले असतील किंवा खपायच्या तयारीत असतील त्यामुळे त्यांची कट्कट नाही.
तसेच १० वर्ष नंतर दुसरा करायचा ऑप्शन पण राहिला असता ( पुन्हा ४२-४४ वर्षाचा ).
7 Feb 2013 - 6:59 pm | दादा कोंडके
पण त्या अनुभवाचा वापर करण्याची वेळ निघून गेली असेल. :)
_/\_
7 Feb 2013 - 7:02 pm | अनुराधा१९८०
मनातले बोलले तर असे होते. ९०% बायका कबुल करतील मी काय म्हणते ते
8 Feb 2013 - 11:23 am | बॅटमॅन
विचार कसेही असले तरी ते मांडण्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक वाटले. मनातले विचार असे कळाले तर योग्य ती खबरदारी घेता येईल.
8 Feb 2013 - 11:36 am | अनुराधा१९८०
तुम्ही सून असता तर कळले असते. अश्या बाहेरुन comments मारणे सोप्पे आहे.
8 Feb 2013 - 11:39 am | बॅटमॅन
एक तर तुम्ही किंवा तुमच्या सासरची माणसे चांगली असती तर कळले असते. अशा एकांगी कमेंट्स मारणे अजूनच सोप्पे आहे.
8 Feb 2013 - 1:31 pm | पिलीयन रायडर
पण तुम्हाला मुलगा असेल आणि त्याची बायको पण असाच विचार करु शकते आपल्याबद्दल हे जाणवेल तेव्हा काटा येईल अंगावर.. जे तुमच्यात आणि तुमच्या सासरच्या लोकांमध्ये नातं आहे तेच तुमच्या सुनेत आणि तुमच्यात असु शकतं..
आणि हो ह्या बाहेरुन मारलेल्या कॉमेन्ट्स नाहीयेत.. मी स्वतः एक सुन, एका मुलाची आई (भावी सासु) आहे!! सो हे उशीरा सुचलेलं शहाणपण आहे...
8 Feb 2013 - 2:04 pm | शिद
.
9 Feb 2013 - 12:07 am | विश्वनाथ मेहेंदळे
अभिनंदन !!!
9 Feb 2013 - 2:12 am | तथागत
मनात एखाद्यावेळी विचार येणे यात काही चुक नाही. पण आपला विचार चुकीचा आहे हे न ओळखणे हे नक्कीच चुक आहे.
8 Feb 2013 - 2:25 pm | ग्रेटथिन्कर
प्रश्नच चुकीचा विचारला आहे, मुद्द्याचं काम जमत असेल तर कीतीही अंतर चालावे. अगदी 1200 वर्षांचेसुद्धा. ;-)
8 Feb 2013 - 3:47 pm | अनिल मोरे
सहमत
8 Feb 2013 - 4:41 pm | भुमन्यु
पण असं का मानलं जातं कि मुलीचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी असावं? ..(नविन काथ्या यातंच कुटा)
8 Feb 2013 - 4:44 pm | श्री गावसेना प्रमुख
मुलींची वाढ जास्त असते म्हणुन(शारीरिक ,माणसीक नव्हे ते तेव्हढच राहतय)
8 Feb 2013 - 5:21 pm | सूड
हे वाचा. काही समजलं तर ठीक नाही तर चालू देत.
8 Feb 2013 - 4:51 pm | खटासि खट
बिपाशा बासू सध्या शिंगलच हाये ना ?
8 Feb 2013 - 10:38 pm | अधिराज
आता पुढचा काथ्याकूट येऊ द्या "दोन मुलांमध्ये (अपत्यांमध्ये) किती अंतर असावे?