विसरलेल्या सामानाला

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
10 Feb 2013 - 6:25 pm

विसरलेल्या सामानाला
माझ्या ब्यागेत जागा नव्हती.

उण्यापुर्‍या आठवणीनी
ब्याग भरलेली होती.

अथांग ओझी वाहून
ती थकली होती.
प्रत्येक प्रवासात
नव्याने थकली होती
जो भार होता
मूक बिचारी सोसत होती.

कोंबून; कधी मुस्काट दाबून
भार मुक्याने पेलत होती.

कुरकुरण्यार्‍या बिजागिर्‍या, तुटके ह्यांडल.
घसटलेले कव्हर....
गर्दीतही ओळखता येत होते.
सॅमसोनाईटच्या चमको गर्दीत
ती एकटीच बापुडवाणी होती

जुनी म्हणेल कोणी तरी ना फेकून देईल
माळ्यावर आधार होईल.
कोणीतरी एक दिवस अंतरंग पाहील
जुन्या रद्दीला उजाळा देईल.

कष्टाचे दिवस आठवून
या सुखाच्या दिवसांचे समाधान अनुभवेल.
तसे काही झाले नाही. माळ्यावरही जागा नव्हती
भरल्या सामानासह ब्याग भंगारात गेली
कागद रद्दीत गेले , कव्हरचे तुकडे झाले.
ह्यांडल चिरडले ,सगळ्यांचे तुकडे झाले.

एक इतिहास पुसला ;नॉस्टॅल्जिया संपला.
काय फरक पडला जगाला?...... सामानाला
नव्या जगाची रीत हीच. उपयोग थांबला तो संपला
आई ती ब्याग होती अन रद्दी ठरले बालपण.
.............. विजुभाऊ
( कुण्या अशाच रद्दीत गेलेल्या आई वडीलांसाठी ...........)

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2013 - 6:29 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त लिवलय हो...!

गवि's picture

10 Feb 2013 - 6:35 pm | गवि

:-(

शुचि's picture

10 Feb 2013 - 6:36 pm | शुचि

रड्वलत.

यशोधरा's picture

10 Feb 2013 - 6:37 pm | यशोधरा

सुरेख.

पैसा's picture

10 Feb 2013 - 6:57 pm | पैसा

लिहिलंत छान.

वेताळ's picture

10 Feb 2013 - 7:00 pm | वेताळ

...

मन१'s picture

10 Feb 2013 - 7:02 pm | मन१

भावलं अगदि मनास.
थोडा त्रासही झाला.

अभ्या..'s picture

10 Feb 2013 - 9:36 pm | अभ्या..

विजुभाऊ कसं लिहिता हो असलं
मनात कसंतरी होतं वाचून. :(

अधिराज's picture

11 Feb 2013 - 9:17 am | अधिराज

+१
गहिवरुन आलं. माफ करा, पण कविता वाचायच्या आधी "सामानाचा" वेगळाच अर्थ काढला होता आम्ही.

मालोजीराव's picture

11 Feb 2013 - 12:11 pm | मालोजीराव

कविता वाचायच्या आधी "सामानाचा" वेगळाच अर्थ काढला होता आम्ही

+१

नव्या जगाची रीत हीच. उपयोग थांबला तो संपला
आई ती ब्याग होती अन रद्दी ठरले बालपण.

( कुण्या अशाच रद्दीत गेलेल्या आई वडीलांसाठी ...........)

:(