५ जुन २०१० शनिवार १६:३०
माझ्या केबीनमधे बसुन सोमवारच्या प्रेझेन्टेशनची तयारी करत होतो . नकळत समोरच्या काचेतुन बाहेर पाहिल तर नेहमी बर्यापैकी वर्दळ असणारार्या त्या ऑफीसच्या मध्यभागी असलेली ती शांतता , सुनसानपणा उगाचच मनाला टोचत होता . बाहेरच्या क्युबीकल वर रीमा ह्याच प्रे़झेन्टेशनची इतर तयारी करत होती . (तिला बघुन मला उगाचच माझ्या करीयरचे पहिले काही दिवस आठवतात ...तेच डेडीकेशन ... तशीच मोठ्ठी स्वप्ने .. त्यासाठी सतत प्रयत्न ....वगैरे वगैरे )
माझ्या कीबोर्ड ची खट्खट अन एसीची इतर वेळी कधीही न जाणवणारी घरघर सोडली तर बाकी सारी शुन्य शांतता होती .
अचानक काहीतरी लाईटनिंग झाल्यासारखे वाटले... मागे वळुन पाहीले तर पाउस सुरु झाला होता .......
समोरच्या बोरीवलीच्या जंगलातल्या त्या दोन चार टेकड्या उन्हाळ्यानंतरही हिरव्यागार राहीलेल्या... बर्यापैकी सुकुन गेलेले पवई लेक .... लिन्क रोड वरची ती नेहमी ची वर्दळ ...अन मी इथे...G & D IT Consultancy Services हिरानंदानी ७ वा मजलावरच्या काचेच्या भिंती मागील संपुर्ण अलिप्त जगातुन हे सारं पहात उभा ... रिमझिम पाउस सुरु झाला अन नकळत अलगदपणे भुतकाळात घेवुन गेला ......
दहा वर्ष ... तब्बल दहा वर्ष झाली या गोष्टीला .... मी दिल्लीहुन कोलेज पुर्ण करुन एकदचा मुंबईला आलो अन महिन्याभरातच " का आलो ? " या प्रश्नाची उत्तरे शोधायला सुरवात केली , एकच आधार होता ऑफीस पवईला म्हणजे लोकलचा छळ नाही , अन ऑफीसचा एसी ... त्यामुळे मुंबईच्या " थंडगार हवेत " फिरण्यापेक्षा ऑफीसमध्येच बसायची सवय लागली ..... अशाच एका शनिवारी घरी जायचा कंटाळा म्हणुन ऑफीसात बसुन होतो तेव्हा असाच अचानक पाउस सुरु झाला , तेव्हा, निशा , माझी २ वर्षे सीनीयर , म्हणाली
" प्रसाद कॉफी ? "
" व्हाय नॉट ! चलो "
" चल सीसीडीला जाउ इथे नको बोअर झालंय फार "
मग एक सीसीडीमधे मी एक एक कॉफी पिउन आम्ही दोघ लेक वर गेलो होते ... अंधारपडे पर्यंत ....रिमझीम पावसात भिजत होतो .....
पुढे पुढे पाउस वाढत गेला....भेटीगाठी वाढत गेल्या .... ... सीसीडी च्या व्हीझीट वाढत गेल्या अन ...कॉफीही ...
" सर कॉफी ?? "
खरं सांगायच तर मी थोडा दचकलोच , मागे वळुन पाहीलं तर रीमा !
" सर , आय एम डन विथ माय टास्क , मेल्ड इट टू यु ! इफ यु आर डन , लेट्स हॅव अ कोफी "
" ओके . चलो कॅटीन ! "
" सर , इफ यु डोन्ट माइड , इतका मस्त पाउस पडतोय , .... सीसीडी ...क्यॅपेचिनो ?? "
------------------------------------------------------------------------------------------------------------------
७ जुन २०१० सोमवार
सीनीयर मॅनेज्मेंट बरोबरची मीटींग , प्रेझेन्टेशन्स संपवुन ऑफीसातुन बाहेर पडलो तेव्हा जवळपास साडेसहा सात वाजले होते . ऑफीस अवर्सच्या गर्दीत चर्चगेट ते अंधेरी प्रवास म्हंणजे परत छळ ! चर्चगेटच्या मेन ऑफीसला मीटींग असली की मी गाडी अन्धेरीला पार्क करतो का तर ट्रॅफीक मधे अडकुन उशीर व्हायला नको म्हणुन !
पण प्रत्येक वेळी मीटींग संपवुन घरी जाताना पहिल्यांदा पश्चाताप होतो आणि नंतर सवय होते ...पश्चातापाची !
पण आज रीमा माझ्या बरोबर होती त्यामुळे लोकलचा प्रयोग करण्यात शहाणपणा नव्हता .
( अशा वेळी कधी कधी वाटतं की मॅनेज्मेंट्ने हे लोढणं का अडकवलयं माझा गळ्यात ? चांगली प्रेझेन्टेशन्स करतायेत नाहीत , अॅनालीसीस लेम्यॅन्स ना समजावतायेत नाही , याची येवढी मोठी शिक्षा ?? छ्या:
असा विचार डोक्यात चाललेला असतो , मी असा वैतागलेला पाहुन रीमा का हसते देव जाणे अन ती अशी हसली की हे सगळे विचार झटकन मनातुन बाजुला होतात .)
रीमा सहाय . ४-५ महीन्यांपुर्वी जॉइन झालेली .कंप्लीट कॉर्पोरेट प्रॉडक्ट . बी.ई. एम.बी.ए मार्केटींग ... ज्यॅक ऑफ ऑल ...ती अस्खलील इंग्रजीत, त त प प न करता , जराही न घाबरता, सीनीयर लोकांपुढे प्रेझेन्टेशन द्यायला लागली की न्युनगंड की काय तो येतो थोडासा अजुनही.
"प्रसाद सर ,व्हॉटस द प्लॅन नेक्स्ट ? "
रीमाच्या प्रश्नाने मी विचार शृंखलेतुन बाहेर पडलो . ' जन्मापासुन मुम्बैत राहीली असल्याने अस्खलीत मराठी येत असताना ही मुलगी माझ्याशी बर्याचदा इंग्रजीत का बोलते हाही मला न सुटलेला एक प्रश्न आहे . माझी इंग्रजीची परिक्षा घेत असते की काय देव जाणे !
" प्रसाद सर ??? "
" हो हो , हां बोल . आणि मला नुसत प्रसाद म्हण सर नको "
" लोकल वुड बी क्राउडेड , अन्ड ह्यु़ज ट्रेफीक ओन हाय वे ... व्हॉट्स द प्लॅन ? एक तास बोअर होणार "
" माझ्या कडे प्लॅन नाही , व्हॉटएव्हर यु से ."
"मरीन ड्राइव ?? "
नॅचरल्स मधुन आईसक्रीम घेवुन जेव्हा नरीमन पॉईंटच्या दिशेने चालायला लागलो, ..... आभाळ ढगाळुन आले होते , पाउस आत्ता पडेल की नंतर अशी अवस्था होती , शेजारची ती गगनचुंबी होटेल बघुन माझं मलाच हसु आलं . अन मी पुन्हा १० वर्षां मागे जावुन पोहोचलो ....
" असंच ...इथेच कुठेतरी ....५०-१०० व्या मजल्यावर माझे घर असेल " मी आपलं सहज निरागस पणे बोलुन गेलो होतो अन निशा १५- २० मिनीट मनसोक्त हसली होती माझ्यावर !
" वेडा रे वेडा ... कसली अशक्य स्वप्न बघतोस रे ... " निशा हसत हसत म्हणाली होती ... आम्ही हातात हात घेवुन , नरीमन पॉईंट वर जाउन बसलो होतो ...
" निशा , स्वप्न बघताना मोठ्ठीच बघावीत , नाही पुर्ण झालीतर काही खास दु:ख होत नाही , छोट्याश्या घरात , बायको मुलांबरोबर साधी भाजी भाकरी मिळाली तरी चालेल असं छोट्ट्स स्वप्न बघीतल अन पुर्ण नाही झाल तर मी मोडुन जाईन "
निशा अचानक स्तब्ध होवुन माझ्या जवळ सरकली माझ्या डोळ्यात डोळे घालुन म्हणाली - " असा अचानक सीरीयस का रे होतोस तू ? मी तुला कधी ही सोडुन नाही जाणार , छोट्टीशी पण जमतील अशी स्वप्न बघु , एकत्र जमुन पुर्ण करु !"
" आता फिलॉसोफीकल बोलायला सुरुवात केलीच आहे म्हणुन बोलतो - निशा , हे सगळं आयुष्य या पावसासारखं आहे अगदी अनिश्चीत . येवढी स्वप्नं बघतो आपण पण सगळं अनिश्चीत , पुर्ण होईल न होईल देव जाणे , त्या तिथे दुर अमेरीकेत जायच हे स्वप्न घेउन शिकत होतो , SPM schlorship ही मिळवली होती , प्रिन्स्टन मधे अॅडमिशन ही मिळाली होती पण ........"
"अरे कदाचित आपल्याला भेटवायच होतं देवाला ! "
मी खिन्नसा हसलो " हे सगळं या पावसासारख आहे.... अगदी अनिश्चित ... बघ ना आत्ता इतकी ढगांची दाटी झालीये पण पाउस पडेल की नाही .....अनिश्चीत ...आज आपण प्रेमाच्या इतक्या आणा भाका घेतोय पण ..."
निशा एकदम दचकली माझ्या डोळ्यात डोळे घालुन बघायला लागली ....
" हो निशा , काय सांगता , तु सीनीयर आहेस तुला कदाचित एखादी खूप छान संधी मिळेल अन तु पुढे निघुन जाशील ... मला सोडुन .... अगदी जसे हे ढग निघुन जातील पाउस न पाडता "
मी येवढं का बोलुन गेलो देव जाणे . निशाचे डोळे पाणावले होते ... मी तिला नकळत दुखवुन गेलो होतो कदाचित .....मी तिच्या नजरेतुन नजर काढुन घेतली ....मला स्वतःचाच राग यायला लागला ....
तितक्यात अचानकपणे एक पावसाची सर आली मी चमकुन निशा कडे पाहीले .....तिने निमिषार्धात मला घट्ट मिठी मारली.... रडवेल्या सुरात म्हणाली
" प्रसाद , मी तुला कधी ही सोडुन जाणार नाही ...कधीही नाही " .....अन तिने माझ्या ओठात ओठ गुंतवले .........
पाउस अगदी संथपणे पडत होता .... आणि मी चिंब चिंब भिजुन गेलो होतो .....
" प्रसाद सर "
रीमाच्या हाकेने मला परत भुतकाळातुन बाहेर काढले . मी तिचाकडे पाहिले . अन पटकन नजर काढुन घेतली , माझे पाणावलेले रीमाच्या पटकन लक्षात आले असते ... व मला परत त्या सगळ्या जुन्या वेदनांची मैफील मांडायला लागली असती .....
" ओके ओके ...प्रसाद , इट्स रेनींग !! वॉव !!! "
" रीमा , लेट्स फाईड सम शेल्टर , माझा ब्लेझर खराब होतोय "
" सर ....??? प्रसाद , ???
.
.
मी ब्लेझर काढुन डाव्या खांद्यावर टाकला, पुन्हा एकदा चिंब भिजुन ....निमुटपणाने...... नरीमन पॉईटच्या दिशेने चालायला लागलो , अचानक माझ्या लक्षात आले ....
रीमाने माझा हात हातात घेतला होता !!
---------------------------------------------------------------------------------------------------------------
८ जुन २०१० मंगळवार
आज सकाळी थोडा उशीराच आलो ऑफीसमध्ये . कालच प्रे़झेंटेशन झाल्याने आज काही विशेष काम ही नव्हते .
मेल्बॉक्स चेक केला , सीनीयर मॅनेज्मेंट्चे काही प्रश्न होते कालच्या प्रेझेंटेशन वर ते क्लीअर केले , त्यांच्याशी २-४ कॉन्कॉल झाले . नेहमीच्या रुटीन नुसार रामुने आमच्यया प्युनने कॉफी आणुन दिली ....
माझी नजर वारंवार काचेच्या बाहेर जात होती अन त्या क्युबीकलच्या पोकळीला धडकुन परत येत होती , रीमा तशी उशीरा येत नाही कधी मग आज इतका उशीर ?
मी परत कॉम्प्युटर मधे डोकं घातलं ....
मींट पेपर वाचुन झाला, गूगल न्युज पाहुन झाले , मार्केट उपडेट्स झाले , लीमीट ऑर्डर बूक केल्या .....तरी रीमा अजुन दिसत नव्हती ...... माझी नजर न राहुन तिच्या क्युबीकलपाशी जात होती ......, काल ती आपल्या बरोबर हातात हात घेवुन मरीन ड्राईववर भिजत होती .. या आठवणीने माझे मलाच हसु येत होते .
अचानक गूगल वर सर्फींग करता करता लक्षात आलं ' अरे बरेच दिवस जीमेल चेक केला नाही ' . मी प्रॉक्झीतुन जी-मेल ओपन केलं, त्यात तब्बल ११७ अनरीड मॅसेजेस ... ते बघुन च मला डीलीट करायचाही कंटाळा आला होता , विंडो क्लोज करणार तितक्यात एक मेल चटकन माझ्या नजरेत आला ..........निशाचा मेल !इतक्या वर्षांनंतर !!
" हे प्रसाद ,
कसा आहेस ? काही कॉन्टॅक्टच नाही रे गेली कित्येक वर्षे ! GM झालास असं कळंलं तेही फक्त १० वर्षात!!,
अभिनंदन !
मी इकडं US ला आल्यानंतर पुढं काही जमलंच नाही बघ , नंतर लगेच विक्रमशी भेट झाली , तो आमच्याच कंपनीत होता मला ३ वर्षे सीनीयर ... ... त्यानंतर भारतात आले तेव्हा आई बाबांनी हट्ट धरला लग्नाचा ..... नाही म्हणताच आलं नाही रे ....तु म्हणशील आज इतक्या दिवसांनी मेल करुन ही माझ्या जुन्या जखमा का जाग्या करत आहे ? पण प्रसाद खर सांगते मला तुला फसवायच नव्हतं रे , बाबांची स्थितीच अशी होती की मला थांबण शक्यच नव्हतं . लग्नानंतर महिन्याने बाबा गेले मग आई ला इकडे घेउन येण , घर संसार बसवणं , मग प्रणव झाला ....या सगळ्यात कुठे हरवुन गेले कळालच नाही बघ .
सोड , तु कसा आहेस ? लग्न केलसं ना रे ? आणि घर घेतलस कारे नरीमन पॉईट वर घेणार होतास ना तु ?
हा हा हा ...
रेप्लाय कर ... मी वाट पहात आहे ...
बाकी परवा आम्ही मायामी बीच वर गेलो होतो त्याचेच फोटो जोडत आहे जरुर बघ प्रणवचे ही फोटो आहेत त्यात !"
, असाच अॅबरप्टली संपवला होता मेल , पुढे " तुझीच निशा " असे काही लिहिले नव्हते , अशा प्रसंगी आता डोळ्यात पाणी यायच्या ऐवजी चेहर्यावर खिन्न हसु का येते हे मला आजही उमगत नाही .
तिचे बीचवरचे फोटो पहात बसलो होतो , ती , प्रणव , विक्रम आन त्यांनी बनवलेला तो रेतीचा किल्ला .....माझ्याचेहर्या वरचे खिन्न हसु जरासे अजुन गडद झाले .... परत काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ....
आम्ही दोघे अक्सा बीच्वर गेलो होतो एकदा ऑफीस ला खोटी सीकलीव्ह टाकुन ! वीक डे असल्याने गर्दी नव्हतीच ......जवळपास तासभर राबुन मी मस्त रेतीचा किल्ला बनवला होता ,
" हा माझा किल्ला समुद्र किनार्यावरचा ! मी राजा तु राणी अन आपलं पिल्लु ! बस्स , आता हे एक छोट्ट्स स्वप्न आहे !
मी एका कागदाची छोटीशी होडी केली " हां , ही आपली होडी ! मस्त यात बसुन आपण जाउ फिरायला "
ती हसायला लागली होती " प्रसाद , तु वेडा आहेस "
मी " आणि हो हा आपल्या किल्ल्याचा झेंडा ! " असं म्हणुन मी एक साधा कागदी झेंडा तयार करुन किल्ल्यावर खोचला , " अन याच्या अगदी खाली राजा राणी ची बेडरुम अन तिथे ...." मी आवाजात जमेल तितका चावटपणा आणुन म्हणालो होतो ......
ती जोरात हसायला लागली " प्रसाद तु खरच वेडा आहेस ठार वेडा आहेस !! किती स्वप्नात हरवुन जातोस रे ... हे बघ तुझा किल्ला अन ही तुझी बोट ..." तीने ती कागदाची बोट चुरगाळुन टाकली , माझा किल्ला पाडला .
मला ' हे काय चालु आहे' हे कळायच्या आत ती उठुन पळायला लागली !
मी तिचा पाठलाग करायला लागलो , बर्यापैकी दुर गेल्यावर , मी तीला पकडले , तोल जाउन नकळत मी रेतीत पडलो , ती ही पडली माझ्या छातीवर ...
आम्हा दोघांना ही दम लागला होता ...दोघांनाही एकामेकाच्या श्वासाची लय जाणवत होती ... तीचे लांबसडक केस माझ्या चेहर्यावर विस्कटले होते .... त्यातुन दिसणारी मावळतीच्या सुर्याची किरणे मला अनामिक गुदगुल्या करत होती .... मी तिच्या नजरेत नजर मिळवुन हरवुन गेलो होतो ..
" वेड्या , किती स्वप्नाळु आहेस रे ... हे सगळं घर... बंगला ...गाडी ...ऐषोआराम नसलं तरी चालेल रे ...मी फक्त तुझीच आहे ..
अन आपल्याला एक व्हायला ती तुझ्या किल्ल्यातली बेडरूमच असली पाहीजे का ??? ......."
अचानक मोबाईल वाजला ..एसेमेस एसेमेस ..मी त्या आठवणीतुन बाहेर पडलो , रीमा चा एसेमेस होता ,या मुलीने मला भुतकाळातुन बाहेर ओढायची प्रतिज्ञाच केली आहे की काय ' असे मला एक क्षण वाटुन गेले
" Prasad / Sir , I have got cold so i will not be able to come to Office today . Sorry ~ Rima"
.
.
.
.
बरेच झाले म्हणा , त्याआठवणीतुन बाहेर पडलो , कॉफी मशीन मधुन अजुन एक कॅपेचीनो घेवुन आलो , काचेचा पडदा बाजुला केला ...टेबल वर बसुन कॉफी प्यायला लागलो .. बाहेर पुन्हा रिमझिम पाउस सुरु झाला होता अन उन-पावसाच्या खेळात एक छानसं इन्द्रधनुष्य दिसत होतं..
परत फोन वाजला
" अहो , लक्षात आहे ना , आज तीन वाजता आमची ट्रेन आहे , पाउस पडायला लागला , आता तुम्ही ऑफीस मधुन निघा अन येता येता चिंटुला शाळेतुन घेवुन या ..... ,,,,,,,......." पुढे मी ऐकलं नाही
लॅपटॉप बॅग पॅक केली , गाडीची चावी घेतली , निशाचा मेल क्लोज करतान तो रेतीचा किल्ला बघुन पुन्हा एक खिन्न हसु माझ्या चेहर्यावर पसरलं .
मी कॉम्पुटर बंद करुन बाहेर पडलो .
------------------------------------------------------------------------------------------
११ जुन २०१० शुक्रवार २१:३०
आज ऑफीस मधे आलो , सकाळ पासुन काम काम काम ...वेळच मिळाला नाही काही लिहायला , आता कुठे वेळ मिळालाय थोडासा . जेव्हा सगळे घरी गेल्यावर माझी एकट्याची केबीन जागी असते तेव्हा फार फार एकटं वाटतं पण .... आज घरी जाउन तरी काय उपयोग ! आज चिंटु मामा कडे जाउन ३ दिवस झाले .
तो( आणि ती ) नसला की कसं घर ओकं ओकं वाटतं ... घरी जाववत नाही
१० वर्षापुर्वीचा मी अन आत्ताच मी ....माझं मलाच हसु आलं ...गोष्टी कशा पट्पट नकळत बदलतात नाई !
मी परत उरलेलं काम संपवायला घेतलं .
********************************************************************************
२२:००
बाकी आज सुध्दा रीमा आली नव्हती , सलग ४ दिवस लीव्ह वर तेही फक्त सर्दीच्या निमित्ताने ...
छ्या: आजकालच्या पोरांना excuse ही देतायेत नाहीत नीट !...
शिवाय तिचा फोनही लागत नव्हता दिवसभर .. तीला इतक्या उशीरा फोन करावा की नको याचा विचार करुन मी शेवटी फोन केला
"रीमा ....हॅलो ...रीमा...."
पलीकडुन काहीच रीप्लाय येत नव्हता ...
" ओह्ह रीमा यु ओके ?? तुला खरच बरं नाहीये का ??? बरं एका नवीन प्रोजेक्टच काम सुरु झालयं ..तु सोमवारी येवु शक.................."
फोन कट !!!
हे अनपेक्षीत होतं !!!
तेचढ्यात एसेमेस आला " SIR , i'll be in office 2moro @ 8:30 . i wanna talk 2 u ~ रीमा "
हे सगळंच अनपेक्षित होतं ,
एकतर दिवसभर काम करुन माझं डोकं फुटायला आलं होतं त्यात हे नवीन पझल ...छ्या: उगाचच फोन केला ...
मी वैतागुन सगळ्या फायली आवरल्या ...लॅपटॉप पॅक केला ... जाता जाता सहज सुचलं म्हणुन जी मेल ओपन केला तर ..........
" I am coming to India ....see you soon ~ निशा "
अजुन एक पझल !!
छ्या: मी कशाला जी मेल ओपन केला ? असा विचार करत मी बाहेर पडलो .
आता पाउस जोरात पडत होता ...शोफरने गाडी बाहेर काढली होती व तो छत्री घेवुन गाडीपाशी उभा होता .... बाकी कुठल्याच गाड्या नव्हत्या ... वॉचमन शोफर आणि मी असे तिघेच त्या ऑफीसच्या आवारात होतो. , थोडेसे पावसाच्या सरींचे संगीत अन बाकी सारी शुन्य शांतता................
मी सहज वळुन ऑफीसच्या कडे पाहीले ....पावसाच्या सरींवर ....७ व्या मजल्या वरच्या एका केबीनचा मंद प्रकाश दिसत होता ... बाकी सारे ऑफीस शांत झोपले होते !
---------------------------------------------------------------------------------------
१२ जुन २०१० शनिवार
आज लवकरच ऑफीसमध्ये आलो , काल रात्री जाताना जी शांतता भरुन राहिली होती ते जशीच्या तशीच होती . शनिवार असल्याने काही विशेष काम नव्हतेच ,मी माझा ब्लेझर नेहमीच्या सवयीं नुसार बसायच्या खुर्चीला अडकवला , नेहमी सारखा खिडकीचा पडदा बाजुला केला , समोरचे बोरीवलीच्या जंगलातले हिरवेगार डोंगर कालच्या पावसाने चिंब न्हावुन निघाले होते , निळेशार पवईलेक , ते हिरवेगार डोंगर ,वर निळंशार आकाश ....नजर ठरत नव्हती इतका मस्त नजारा होता, मी माझ्या टेबल वर बसुन मस्त वाफाळलेली कॉफी पित होतो .
" सर "
रीमा ची हाक ऐकु आली , मी मात्र त्या नजार्यात पार हरवुन गेलो होतो , तसाच मागे न वळता बोललो
"हां रीमा , बोल , तुझीच वाट पहात होतो , बर पहिल्यांदा सांग तुझी तब्येत तर ठीक आहे ना ? "
" सर ...मी ..."
"रीमा , एक मिनीट , परत एकदा सांगतो , मला माझे सगळे ज्युनियर आणि सिनियर ही प्रसाद म्हणतात , तु ही तसंच म्हणलस तर मला आवडेल ."
" प्रसाद , मी रेझीगनेशन देत आहे ."
खरंतर हा फारच अनपेक्षित धक्का होता मला ...पण तंस दाखवायला नको असं मनातल्या मनात ठरवलं ..
" ह्म्म .मला वाटलंच होतं ... काय कारण ? असं अचानक काय झालं ? एनी प्रॉब्लेम्स विथ जॉब ? असलं काही मी विचारणार नाही . फक्त एवढच सांगतो 'मला वाटतं असा तडकाफडकी निर्णय घेण्या आधी आपण बोललं तर बरं होईल ."
" प्रसाद , तु हे बोलतोस त्या अर्थी तुला कारण कळंत असावं.. ... मला असं वाटतं की ...आपण इथं नको बोलायला जर तु फ्री असशील तर ..."
मी तिची वाक्य अर्ध्यातच तोडुन बोललो " रीमा , तुझीच अॅक्टीव्हा घेवु , फोर व्हीलर ट्रॅफीक मधे अडकेल उगाच वेळ जाईल "
*********************************************************************************
मी अॅक्टीव्हा आर. ए . कॉलनीतलीतल्या एका रस्त्यापासुन बाजुला पार्क केली . समोर गवताची हिरवी गार कुरणं , त्यामागची ती दाट हिरवी गर्द झाडी ...अधुन मधुन पावसाची एखादी रिमझिम सर येत होती गजबजलेल्या मुम्बैच्या गर्दीतुन बाहेर इथे आल्या वर अगदी गावी आल्या सारखं वाटतं .
" हां रीमा , बोल आता "
" प्रसाद , आय एम सॉरी "
" सॉरी फोर व्हॉट ?"
" प्रसाद व्ह्याय यु नेव्हर टोल्ड मी अबाउट युअर मॅरेज "
" व्हॉट ??? " ( इथे मला हसुच आलं होतं खरतर , पण मी ते लपवलं)
" एक एक मिनिट रीमा , काही तरी गडबड होतेय , विषय भरकट आहे असं नाही का वाटत तुला ? स्पष्ट बोल ना , असं अचानक काय झालं रेझीगनेशन द्यायला ??? आणि हो मराठीत बोललीस तर मला कदाचित लवकर कळेल तुला काय म्हणायचय ते "
" प्रसाद , हा माझा पहिला जॉब . सगळं नवीन होतं . नवीन कंपनी ..नवीन कलीग्ज ..नवीन बॉस ... सगळे कलीग्ज निघुन गेल्यानंतरही तु रात्र रात्र ऑफीसात बसुन करत रहायचा ...नेहमी कुतुहल वाटायचं ... सगळे कलीग्जही बोलताना नेहमी तुझ्या हार्ड वर्क बद्दल , डेडीकेशन बद्दल बोलत रहायचे ...मी ही मग तेच डेडीकेशन हार्ड्वर्क माझ्या कामात आणायचा प्रयत्न करायला लागले , खरतर तुलाच कॉपी करायला लागले ... पूढे तुझ्याच बरोबर काम करायचा योग आला मग सतत मीटींग्ज ..प्रेझेंटेशन्स भेटीगाठी .. आणि आपली ती भेट मरीन ड्राईव वरची ....अन कळालंच नाही की ते कुतुहल प्रेमात कधी बदलंल ते ...."
" ह्म्म . "
" हम्म काय प्रसाद ? तुझं सं नुसतंच ह्म्म करणं किती गुढ अर्थाचं असतं तुला तरी माहीत आहे का ? पण प्रसाद , हे योग्य नाही यु आर मॅरीड ..... मी जॉब सोडत आहे कारण तु सतत समोर असताना मला माझेच विचार छळत रहातात ...मला नाही जमणार आता तिथे काम करायला " " तिच्या डोळ्यात अश्रु तराळले होते , अन ति आटोकाट प्रयत्न करत होती ते आडवण्याचा .
" ह्म्म... रीमा ... मला वाटलंच होतं , पण तुला असं वाटत का की मला हे कळ्त नव्हतं ? तुला असं वाटत का की मला तुझ्या डोळ्यातले भाव कधी वाचताच आले नाहीत ? तुला असं वाटत का की तिथे मरीन ड्राईव वर भर पावसात चिंब भिजुन चालताना जेव्हा तु माझा हात हातात घेतलास तेव्हा मी अगदीच 'कोरडा' होतो ? तसं तुला वाटतं असेल तर तुला मी कळालोच नाही असं मला खिन्नतेने म्हणावं लागेल" मी स्वतःशीच खिन्न हसलो .
" ...म्हणजे ...प्रसाद ...यू टू... "
" हम्म...हो .. रीमा , फरक फक्त इतकाच आहे की लहान पणापासुन भावना व्यक्त करायच्या नाहीत असं मला शिकवलं गेलय ना ....म्हणुन व्यक्त करु शकत नाही इतकच ."
" पण प्रसाद हे चुक आहे ...चुक आहे ..." तिच्या डोळ्यात अश्रु तराळले होते. " तु मला आधी का भेटला नाहीस प्रसाद?"
"ह्म्म"
परत एक तेच खिन्न स्मित ...काय बोलु काहीच सुचत नव्हतं ...सरळ मनात येत होतं ते बोलु लागलो मग ...
" चुक ... रीमा चुक बरोबर कोण ठरवतं गं ? थोडसं फिलोसॉफिकल वाटेल बघ तुला पटंतय का ते ?
चुक बरोबर ठरवणारे कोण गं ? समाज समाज आपण म्हणतो पण तो आपल्या सारख्या माणसांनीच बनलाय ना , मग दोन प्रेमी जीवांना तोडण्याचा काय गं अधिकार ? लोकांना प्रेम कळ्त नाही कळतात ते फक्त नियम . प्रेम लग्न सारख्या सुंदर गोष्टींना पेटंट सारखा रुप देवुन टाकलय . एकदा एकाचं झालं की आता प्रेम फक्त त्याचच , दुसर्या कोणावर प्रेम करायचं नाही , फक्त त्याचच अगदी पेटंट असल्या सारख .
आज अगदी राधा कृष्ण त्यांच्या प्रेमालाही हा समाज व्यभिचाराचं नाव देईल ....प्रेमाचा खरा अर्थ कधी उमगणारच नाही ह्यांना ...
प्रेम म्हणजे आनंद ...केवळ आनंद .... आनंदाव्यतिरिक्त तिथे दुसरं काही असेल तर तर ती केवळ आसक्ती आहे ... किळसवाणी आसक्ती ....
रीमा प्रेम अनंत आहे ह्या आनंदासारखच , अन आपलं आयुष्य मात्र क्षणभंगुर ... किती जमेल तितकं हे प्रेम हा आनंद समेटुन घ्यायचं सोडुन लोकं ह्या पेटंटच्या विचारात अडकतात अन मग प्रेम प्रेम म्हणुन भलत्याच कशाला तरी कवटाळुन बसतात .
रीमा फार फार पुर्वी माझी एक मैत्रीण होती , तीला मी म्हणालो होतो " आयुष्य ह्या पावसासारखं आहे , अगदी अनिश्चीत ... कधी काय होईल कोणास ठावुक नाही .....मग आहे हा क्षण पुढे काय होईल कोण जाणे . हा क्षण आपला समजुन त्याचा आनंद घ्यायचा की योग्य अयोग्य नीती अनिती चुक बरोबर ह्याची काथ्याकुट करत तो क्षण व्यर्थ घालवायचा ज्याचं त्यानं ठरवावं ".
रीमा , तुला सांगतो , बोलु नकोस कोणाला , माझ्या ह्या मैत्रीणीने जेव्हा सगळ्या आणाभाका विसरुन , मला सांगितले होते ना की - प्रसाद , गणितं कोठे तरी चुकलं ....आपले रस्ते एकत्र येण्या साठी नाहीत .....मी पार तुटुन गेलो होतो ... तेव्हा ....रात्र भर दारु पित होतो ..एकटाच ...भुता सारखा बसुन होतो ...बीचवर ... माझं काय चुकलं याचा विचार करत ...पण एक थेंब अश्रु गाळला नाही ... त्या रात्री ठरवलं ... की बस्स भरभरुन प्रेम करायचं फक्त ! कोणत्याही प्रतिसादाची , प्रतिप्रेमाची अपेक्षा न बाळगता ! त्या रात्री हे सगलं तत्वज्ञान सुचलं .
.
.
.
अन दुसरे दिवशी मी तिला , तिच्या घरच्यांना लग्नाच्या तयारीत मदत करत होतो !
बाकी तु मला आधी का भेटला नाहीस ? खरं सांगु का रीमा , या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये , मला फक्त इतकं माहीत आहे की इतक्या उशीरा भेटल्याने आयुष्यातले जे आनंदाचे क्षण निसटुन गेले ते परत आणणे माझ्या हातात नाहिये पण जे क्षण आत्ता मिळालेत ते मनसोक्त जगणं , तेवढ्या क्षणात अगदी निरपेक्ष प्रेम करणं ... येवढच माझ्या हातात आहे . ..
ह्याउपर मी काही बोलणार नाही ... अजुनही तुला रेझीगनेशन द्यायचं असेल तर तु मोकळी आहेस तुझा निर्णय घायला ....फक्त एक सांगतो - व्यक्ती डोळ्यासमोरुन दुर केली की खरं प्रेम इरेझ करता येतं असं तुला वाटत असेल तर तर तु चुकत आहेस .... मी माझ्या स्वानुभवावरुन सांगतोय ! "
मी एवढं सारं बोलुन गेलो , अन तिच्या नजरेतुन नजर काढुन घेतली ,
आता थोडासा वारा सुटला होता , समोरच्या हिरव्यागार गवतावर उनपावसाचा खेळ चालु होता , एक छानसं इंद्रधनुष्य त्या हिरव्यागार झाडी मागुन डोकावत होतं ....कुठुन तरी कोकिळेची शीळ ऐकु येत होती ...अधुन मधुन पावसाची हलकीशी सर चेहर्यावर पाणी शिंपडुन जात होती .........अन
अन
इथे आमच्या दोघात सुन्न शांतता .
मी नेहमी च्या सवयीने पाकिटातुन एक मार्लबोरो काढुन शिलगावली .
.
.
.
" प्रसाद , शो सम डीसेन्सी . आय हॅव ऑल्रेरेडी टोल्ड यु नो स्मोकिंग इन फ्रन्ट ऑफ मी " रीमा माझी मार्लबोरो फेकुन देत ती म्हणाली " आणि आता तर मुळीच नाही ."
अन येवढं बोलुन तिने मला घट्ट मिठी मारली
" सॉरी प्रसाद , मला आज पर्यंत तु पुर्ण कळालाच नव्हतास रे ..."
पाउस अगदी संथ पणे पडत होता अन मी 'परत एकदा' चिंब भिजुन गेलो होतो .....
-----------------------------------------------------------------------------------------------
१३ जुन २०१० २३:४५
आजचा दिवस ! आठवुन माझं मलाच खोटं वाटतंय की असं काही घडु शकतं ... अन थोडंसं हसुही येतय स्वतःचच ...
आज निशा येणार होती अमेरिकेहुन ! मी दुपारी जेव्हा गाडी काढुन सहार एयर्पोर्ट कडे निघालो तेव्हा आठवलं
' निशा बरोबरची ती भेट मरीन ड्राईव्ह वरची .... तिने मारलेली ती घट्ट मिठी ...अनपेक्षित पणे पडलेला तो पाउस ...अन चिंब भिजुन गेलेला मी !! ' दहा वर्षां पुर्वीच्या त्या घटना अगदी काल घडल्यासारख्या वाट्त होत्या ...
"काल ...." माझं मलाच हसु आलं .
"बरोबर .... कालची रीमा बरोबरची ती भेट ! तासभर रीमा बिलगुन होती ... नक्की काय रीअॅक्शन द्यायची बहुतेक तिचं तिलाच कळत नव्हतं . राहुन राहुन ' तु मला आधी का भेटला नाहीस प्रसाद ? ' हाप्रश्न तिच्या मनात येत असावा , अन मी जे उत्तर बोललो ते आठवुन हे ह्या प्रश्नाचं खरंच योग्य उत्तर आहे का ह्या विचारात ती अडकली असावी ." तिचे चिंब भेजलेले केस माझ्या मानेवर रेंगाळताना जशा गुदगुल्या करत होते , जणु तशाच कोणी तरी आत्ता करीत आहे असे वाटुन माझे मलाच हसु येत होते . पण काल मी बोलता बोलता चुकुन निशाचा उल्लेख करुन गेलो होतो अन रीमा मागेच लागली की मला भेटायचयं तिला आणि तुझ्या बायकोलाही . !
इथे " मी अजिबात घाबरलो नाही ". असं जर म्हणलो तर मी खोटं बोलतोय हे कोणाला ही कळालं असतं . पण नुसत्या भेटीला काहीच हरकत नव्हती , मी रीमाला एयर्पोर्ट वर घेवुन जायचं प्रॉमीस केलं .
मी गाडी रीमाच्या घराकडे वळवली . आज निशा येत होती अमेरिकेहुन अन .......'ही अन चिंटु ' माहेरहुन !
*************************************************************************************
"हे प्रसाद हाउ आर यु यार ? कुठे आहेस ? तु विसरलास राव आम्हाला "
विक्रम म्हणाला .
" काय यार मोठ्ठी माणसं आता तुम्ही तुझ्या लग्नाची पत्रिका दिलीस अन त्यानंतर साधा फोनही नाही ? मेलला कधी रीप्लाय पण नाहीस केलास .? "
विक्रमची माझी ओळख निशाच्या लग्नातच झाली होती नंतर अगदी चांगले मित्र असल्या सारखे आमचे मेल्स फोन्स वगैरे चालु होते ...नंतर नेहमी प्रमाणेच सगळ्या गोष्टी विस्मरणात गेल्या ... आज १० वर्षांनी भेटलो . एक नुसतं स्मित हास्य देवुन मी त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली , त्याला जेवायला बोलावले पण
"घरचे वाट बघत असतील, मी पुढे होतो , निशा तु प्रणवला घेवुन ये " असे म्हणुन तो निघुन गेला .
निशा ....अजुनही तशीच ...तितकीच मोहक .......माझ्या कडे बघुन हसली तेव्हा तिचे ते स्मित बघुन मधे १० वर्षे गेलीच नाहीत असे वाटले .
" प्रसाद " तिला शब्द सुचत नव्हते
" प्रसाद किति दिवसांनी भेटतो आहेस रे ! कसा आहेस ? "
" निशा ,मी मस्त . तु कशी आहेस ? अजिबात बदलली नाहीस , बायदवे इथे उभे राहुन गप्पा मारण्या पेक्षा आपण त्या शेजारच्या सीसीडी त बसुन एक एक कॉफी घेत गप्पा मारुयात का ? आज ' चिंटु अन ही ' सुध्दा येत आहे , तासाभरात त्यांची फ्लाईट येइल तोवर ..."
" हो चालेलना ... मला ही बरंच बोलायच आहे तुझ्याशी "
" बायदवे रीमा , ही निशा , निशा ही रीमा , माय कलीग "
" हाय रीमा . ओह्ह प्रसाद , तु ही अजुनही तसाच ...अगदी तसाच.. आहेस ... अजिबात बदलला नाहीस ...स्मित "
**********************************************************************************
" कसा आहेस प्रसाद ? "
" मी मस्त आहे निशा ,लग्न करुन तु निघुन गेलीस .... त्यानंतर महिन्याभरात माझे ही लग्न झालं इतक्या गडबडीत की काय सांगु ....तुला बोलावलं होतं पण ...असो , त्यानंतर कामात सीरीयस झालो नंतर जीएम झालो ... जबाबदार्या वाढल्यात ...काम वाढलंय ...ही रीमा माझ्याबरोबरच आहे बाकी इतर ...."
" प्रसाद , मला पुर्ण विसरलास कारे ?"
मी नेहमी सारखा खिन्नसा हसत म्हणालो
"उत्तरे देता येणार नाहीत असे अवघड प्रश्न विचारलेच पाहिजेत का ? निशा तु असे अवघड प्रश्न विचारु नकोस गं ... मला खोटं बोलतायेत नाही तुला माहीत आहे ."
"ओके ओके प्रसाद , आणि ही रीमा ...यु अॅन्ड हर...
" निशा ,I said , dont ask difficult questions ... प्लीझ अवघड प्रश्न विचारु नकोस "
रीमा काही बोलत नव्हती ..पण तिचे डोळे पाणावले होते ...मला बघवत नव्हतं ते .
" प्रसाद तु असा कसा रे ? यु आर मॅरीड नाउ ! हाउ कॅन यु ? तुला कधी एकनिष्ठ प्रेम करताच येणार नाही का रे ?
बाय द वे , तुला आठवते कारे माझी ती कलीग , सई ...काय नाव होतं तिचं ते ...??"
इथे मला हसु आलं ..मी म्हणालो
" सई ... सई गोखले .. . का गं अचानक तिची का आठवण आली ? बायदवे तुझ्यानंतर महिन्या भराने तिचेही लग्न झालं ... आता ती पण जी एम आहे ...नरीमन पॉईटला घर घेतलय तिनं अन तिच्या नवर्याने . ...."
इथे रीमा चकीत होवुन माझ्याकडे पहात होती " म्हणजे प्रसाद ... सई मॅम अॅड यु? सई मॅम टू? "
" येस रीमा , हा असाच आहे ...पहिल्या पासुन .... "
निशा बोलत होती
" प्रसाद तुला कधी खरं प्रेम करताच आलं नाही . आणि म्हणुनच तु असा आहेस अनेक प्रेमभंगाची दु:ख घेवुन ... इतका मोठा झालातरी एकाकी ...बायकोवर तरी खरं प्रेम करतोस कि नाही देव जाणे ?"
" निशा , तुला कळालं नाही म्हणजे मला प्रेम करता आलं नाही असं आहे का ? रीमा , तुला ही असंच वाटतय ???"
" अन्फोर्च्युनेटली , प्रसाद , मला तरी निशा म्हणत आहे तेच दिसतयं "
रीमा चे डोळे पाणावले होते अन माझ्या चेहर्यावर ते नेहमी चे खिन्न हसु पसरलं होतं .
" निशा, रीमा , तुम्हाला कधी मी कळालोच नाही .... पण निशा , मला एक सांग सई विषयी तुला कसे ठावुक ?
निशाच्या चेहर्यावर एक हास्य पसरलं . त्याचा अर्थ मला लागत नव्हता
" प्रसाद , आय ऑलवेज क्न्यु दॅट ...., वेडी होती रे ती . तुझ्यावर खरं खरं प्रेम करीत होती . बट आय ऑलवेज हेटेड हर , प्रसाद तुला काय वाटतं , मला ठावुक नव्हतं तुमच्या भेटींबाबत ? आपण पवई लेकवर भेटलो त्याचा आधी तु तिला भेटला तिथेच हे काय मला ठावुक नाही ? केवळ तिला छळायचं म्हणुन मी तुझ्या प्रेमात पडले ...अन कधी "खरी " प्रेमात पडले माझं मलाच कळालं नाही ... प्रसाद , तु अनिर्लिप्त सन्याश्या सारखा माझ्या लग्नात अक्षता घेवुन उभा होतास तेव्हा तिथे माझ्या मनात काय चाललं होतं तुला नाही कळणार रे ... त्या साठी खरं प्रेम कराव लागतं "
" हेच निशा , हेच ... मी ज्याला प्रेम म्हणतोय ते तुम्हाला कळालंच नाही , सईला कळालं ,मी सईच्या लग्नातही होतो , पण तिच्या मनात अशी काही खळबळ मला नाही दिसली , नंतर मी बोललो ही तिच्याशी , पण ती मात्र खुश होती , तीला एकटीलाच कळालं मला काय म्हणायचं होतं ... हे जे तु एकनिष्ठ प्रेम वगैरे म्हणतेस ना ते मला फक्त तिच्या बोलण्या वागण्यातुन जाणावलं , "
" पण प्रसाद , मी हरले असेनही पण तिचं ही लग्न झालं , ती हरली आहे , अन तु ... "
" हा हा हा निशा , तु माझ्याविषयी हे बोलु शकत नाहीस कारण मी प्रेमाच्या ज्या विश्वात जगतोय ना तिथे हार जीत नसते ...असतो तो फक्त आनंद !!"
रीमा , चकीत होवुन शांतपणे ऐकत होती , प्रणव निशाच्या खांद्यावर झोपला होता निरागसपणे ...ह्या सार्या पासुन पार अलिप्त
" पण प्रसाद , बास , धीस इस टू मच , आता हे थांबलं पाहिजे , प्रसाद यु आर मॅरीड नाउ ! "
"बघ निशा , तु अजुनही लग्नाला पेटंट समजत आहेस "
"प्रसाद इनफ . फॉर गॉड्स सेक प्रसाद , रीमाचा विचार कर , तिच्या आयुष्याशी का खेळतो आहेस ? तुझ्या बायकोचा विचार कर , तीला तरी पटेल का हे तुझं तत्वज्ञान ?. बास प्रसाद , टु डे इट एन्ड्स , आज मी हे सारं क्लीयर करणार आहे "
त्या नंतर २ मीनीट सुन्न शांतता होती . कोणी काहीच बोलत नव्हतं .
" रीमा, निशा , मला तिथे चिंटु अन ही दिसत आहे मी आलोच चिंटुला घेवुन . "
तितक्यात .....
" सई मॅम !!! "
रीमा अचानक धक्का बसल्या सारखे ओरडली .
" वा प्रसाद , काय योग आहे , मी ,सई ,रीमा , अन आता तुझी बायको ही आली आहे ... टु डे इट एन्ड्स , आज तुझं हे प्रेमाचं तत्वज्ञान संपणार आहे "
निशा म्हणाली .
मी शांत पणे उठुन बाहेर गेलो चिंटुला कडेवर घेतले , अन आत यायला लागलो ...सीसीडीच्या त्या काचेच्या दरवाज्या मागुन माझे लक्ष आमच्या टेबल वर गेले
" रीमा , निशा , सई .... "
" रीमा डोळे पुसत होती , निशा बोलत होती , अन सई .... सई गोखले ...जी एम ... १० वर्षांपुर्वीची माझी प्रेयसी ... आताची माझी बॉस ....ते सारं शांतपणे ऐकत होती !!!
---------------------------------------------------------------------------------------------
मी चिंटुला घेवुन आत टेबलपाशी आलो , सईने माझ्या कडे वळुन पाहिले , रीमा निशा दोघींचेही डोळे पाणावले होते ... सई उठुन उभी राहीली अन अचानक तिने मला घट्ट मिठी मारली .....
" ओह्ह प्रसाद , आय ऑलवेज लव्ह यु ...ऑलवेज ...तु कसा ही असलास तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे ...निरपेक्ष ...निर्व्याज्य ...अगदी तु म्हणतोस तसच ....आनंद ....केवळ आनंद !!"
रीमा ,निशा , 'येवढं सगळं कळुनही ही कशी काय प्रेम करते याच्यावर' ह्या विचारत गुंगुन गेल्या होत्या ... हेच का ते खरं प्रेम ...प्रसाद म्हणतो ते .... आनंद... केवळ आनंद... हाच का तो ? निशाच्या चेहर्यावर अनेक प्रश्नांची दाटी झाली होती .....रीमा तर जणु पुर्ण हरवुनच गेली होती कदाचित काल मी जे काही सांगितलं ते प्रेम हेच की काय याचा विचार करत होती .
त्या सार्या शांततेचा भंग करुन मी म्हणालो ...
" रीमा , निशा , ओळख करुन देतो ... ही माझी "ही" ................. Mrs. प्रसाद !!!
***********************************************************************************
२३:५५
डायरी लिहुन झाली तेव्हा बराच उशीर झाला होता , ही अन चिंटु प्रवासाने थकल्याने कधीच झोपले होते ...
मी बाहेर ग्यॅलरीत आलो...पाउस नुकताच थांबला होता ...मंद वारा वाहत होता ... नेहमी प्रमाणे एक मार्लबोरो शिलगावली अन माझ्या आय पॉड वरची जुनी क्लासिकल मराठी अगदी मंद आवाजात लावुन ऐकत शांत उभा होतो ........
" सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ?
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ?
.
.
रासक्रिडा करीता वनमाळी हो...
रासक्रिडा करीता वनमाळी हो.SSSSSSSS
.
सखे होतो आम्ही विषय विकारी ...होतो आम्ही विषय विकारी .
टाकुन गेला तो गिरिधारी ...टाकुन गेला तो गिरीधारी
.
.
कुठे गुंतुन बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ?
---संपुर्ण--
********************************!!इतिश्रीकृष्णार्पणमस्तु !!******************************
प्रतिक्रिया
17 Feb 2013 - 12:41 pm | प्रसाद गोडबोले
१) इतरत्र पुर्वप्रकाशित .
17 Feb 2013 - 12:44 pm | मोदक
सुंदर.
पुन्हा नक्की वाचले जाईल.
17 Feb 2013 - 1:40 pm | अधिराज
गिरीजा ताई, तुम्ही प्रसाद गोडबोले आहत का? हे लेखन पूर्वप्रकाशित असल्याची महिती तुम्ही दिलीत, पण त्या लेखकाचे नाव प्रसाद गोडबोले होते, आणि ह्या लेखकाचे/लेखिकेचे नाव गिरीजा आहे.
17 Feb 2013 - 2:13 pm | प्रसाद गोडबोले
होय , अधिराज , मीच तो .
आयडी बदलत असतो सतत ...त्याला काही खास असं कारण नाही... पारिजातक मोहिनी विनम्र टग्या भूत पंत गिरीजा प्रसादराव ही सारी माझीच रुपे आहेत
गै.न.रा.न.लो.अ.
17 Feb 2013 - 1:42 pm | अधिराज
गिरीजा ताई, तुम्ही प्रसाद गोडबोले आहात का? हे लेखन पूर्वप्रकाशित असल्याची महिती तुम्ही दिलीत, पण त्या लेखकाचे नाव प्रसाद गोडबोले होते, आणि ह्या लेखकाचे/लेखिकेचे नाव गिरीजा आहे.
पूर्वप्रकाशित लेख:
17 Feb 2013 - 2:15 pm | संजय क्षीरसागर
पब्लिक हल्ली फार चौकस झालंय
17 Feb 2013 - 3:58 pm | अधिराज
खरंय संजय सर, अनन्न्या बाईंचा "सावध रहा!!" हा लेख वाचल्यापासून सावध झालोय , कदाचित त्यामुळे चौकसपणा आला असेल. तुम्ही वाचला कि नाही?
17 Feb 2013 - 1:58 pm | आदूबाळ
मला एक बारीकसा प्रश्न आहे: सई आणि प्रसाद हे पति-पत्नी एकाच ऑफिसात काम करतात ना? मग रीमाला सई आणि प्रसाद पति-पत्नी असल्याचं ऑफिसातल्या ग्रेपवाईनमधून कसं कळलं नाही?
अवांतरः
असलं तत्त्वज्ञान असणारा एक इसम परिचयाचा आहे. त्याला आम्ही "प्रेमभंगी" म्हणतो.
17 Feb 2013 - 2:54 pm | सस्नेह
कुणी म्हणो मला कथा कळली नाही म्हणून. पण काही प्रामाणिक शंका आहेत. ज्यांना 'कळली' त्यांनी दुर कराव्यात.
१) प्रसाद याने द्विभार्या-प्रतिबंधक कायदा मोडला का ?
२) सईविषयी रिमाला एकाच ऑफिसात काम करूनही समजले नाही ? ('बातमीदार' विरहित एकमेव ऑफिस ?)
३) प्रसाद्चं नक्की कुणावर प्रेम आहे ?
४) प्रसाद स्वतःला सोळा हजार..वाला श्रीकृष्ण समजतो का ?
५) लग्नाळू मुली रिमा, निशा यांच्याइतक्या भाबड्या असतात का ?
आणखीही बर्याच ! ..पण आता टंकाळा आला !
17 Feb 2013 - 3:17 pm | आदूबाळ
अजून एकः निशा/विक्रमला प्रसादने लग्नाची पत्रिका पाठवली होती ना? मग त्याच्यात चि. सौ. कां. सईचं नाव असणार. तरीही तिला प्रसाद-सईचं लग्न झालंय हे माहीत कसं नाही?
गिरिजाताई/दादा: रागावू नका बर्का. तुमचे वाचक किती बारकाईने वाचतात याचा नमुना आहे हा.
17 Feb 2013 - 4:11 pm | प्रसाद गोडबोले
धन्यवाद स्नेहांकिता !
आपल्या प्रतिसादाचा फायदा झाला .. मला लेखनात अजुन क्ल्यॅरीटी आणली पाहिजे !!
पुनश्च आभार !!
17 Feb 2013 - 7:44 pm | टवाळ कार्टा
=))
17 Feb 2013 - 8:28 pm | सस्नेह
लैच हसताय टवाळराव ?
एखादी लग्नाळू 'भाबडी' सापडलीय की काय ?
17 Feb 2013 - 2:04 pm | इनिगोय
ही खरी 'प्रेमाची गोष्ट..'!
शेवट येता येता अचानकच एखाद्या रुबिक क्यूबचे सगळे रंग आपापल्या जागी जावेत तसं झालं. चित्र पूर्ण!
17 Feb 2013 - 2:06 pm | मनीषा
ओघवते लेखन, सुरेख कथा ..
ही ऑफीस डायरी .. म्हणजे ऑफीस व्यतीरिक्त जे काही असेल त्याची स्वतंत्र डायरी लिहिणार का ?
17 Feb 2013 - 2:16 pm | भटक्य आणि उनाड
interesting !!! मजा आलि वाचुन !!
17 Feb 2013 - 3:08 pm | अत्रुप्त आत्मा
अनेक आय डी पण एकच डायरी ;-)
भरपूर मजले तरी फिरुन/फिरुन तीच पायरी :-b
17 Feb 2013 - 3:33 pm | अभ्या..
गुर्जी खास तुमच्यासाठी. :)
.
नको तो रोहीडा, नको ती रायरी.
आपली पायरी, फक्त वडगाव धायरी.
17 Feb 2013 - 5:06 pm | अत्रुप्त आत्मा
@फक्त वडगाव धायरी.>>> =))
अभ्या जी राव,करा नीट इनक्वायरी
मी वडगाव बुद्रुक,मोदू वडगाव धायरी =))
17 Feb 2013 - 3:43 pm | संजय क्षीरसागर
मला तर पीचवर नक्की काय आहे ते कळत नाहीये, बॉलींग, बॅटींग का नुसती फिल्डींग?
17 Feb 2013 - 4:09 pm | अधिराज
धक्क्यातून सावरतोय, "स्पूकी" वाटलं मला हे.
17 Feb 2013 - 4:14 pm | कपिलमुनी
कुणा कुणाची पाचही बोट तुपात !! आणि आम्ही उपाशी..
एवढच कल्ल बघा
17 Feb 2013 - 4:55 pm | संपादक मंडळ
कृपया लिखाणाच्या गुणवत्तेबद्दल किंवा लिखाणाबद्दल चर्चा व्हावी. लेखकाचे आयडी कोणते किंवा किती याबद्दल चर्चा गैरलागू आहे. त्यासंबंधी योग्य तो निर्णय अॅडमिन्स घेतील.
17 Feb 2013 - 5:04 pm | संजय क्षीरसागर
सदरहू व्यक्ती लेखक आहे की लेखिका हे कळावे. कारण स्त्री सदस्यांना इथे विषेश आदबीची वागणूक आहे. एखादा पुरूष जर स्त्री आयडी घेऊन लिहीत असेल तर ती व्यवस्थापन आणि सदस्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे.
17 Feb 2013 - 5:07 pm | अत्रुप्त आत्मा
@एखादा पुरूष जर स्त्री आयडी घेऊन लिहीत असेल तर ती व्यवस्थापन आणि सदस्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे.>>> ++++++++++++++++++१११११११११११११११११११११११११११११११११११११
17 Feb 2013 - 5:08 pm | संजय क्षीरसागर
(पुरूषानं स्री भूमिकेतून लिहीणं वेगळं आणि स्त्री म्हणून वावरणं वेगळं)
17 Feb 2013 - 7:27 pm | प्रसाद गोडबोले
धन्यवाद संपादक मंडळ !!
मित्रानो कोणी लिहिलय ह्या पेक्षा काय
लिहिलय ह्यावर कॉमेन्ट केली तर मला बरें वाटेल !!
धन्यवाद !
17 Feb 2013 - 6:15 pm | संजय क्षीरसागर
कारण सदस्यांच्या दृष्टीनं प्रश्न महत्त्वाचा आहे असं मला तरी वाटतं
17 Feb 2013 - 6:31 pm | शुचि
नक्की बोट ठेवता येत नाही पण "अविश्वासार्ह" वातावरणनिर्मीती तयार होते. स्वतःला काकू वगैरे म्हणवून घेणारा आय डी पुरुष निघाल्याने विचीत्र वाटते. असो एकेकाचे फेटीश !!!
17 Feb 2013 - 8:24 pm | अधिराज
शुचि मॅम , नुसती साधीसुधी काकू नाही तर राष्ट्रकाकू म्हणे!
17 Feb 2013 - 7:46 pm | इनिगोय
या आयडीने काही खवंमध्ये स्त्री म्हणून प्रतिसाद दिले आहेत. आणि इथे पुरुष म्हणून.
संमं, याची कल्पना तुम्हाला आहे, असं यांचं म्हणणं अाहे, म्हणून हे लिहित आहे.
मिपावर अविश्वासाचं वातावरण निर्माण करणं हाच हेतू असेल.. तर तो साध्य झाला आहे, शुचिशी सहमत!
17 Feb 2013 - 9:43 pm | प्यारे१
मुळात हा लेख वाचतानाच गोंधळ झाला होता!
एखादे स्त्री अशा मानसिकतेनं लिहू शकते या बद्दल थोडंसं आश्चर्य वाटत होतंच.
त्यामुळं प्रतिसाद द्यायचं टाळलेलंच.
पुरुषानं हे लिहीलंय असं स्पष्ट झाल्यावर ते निवळलं. असो.
संपादक मंडळाला जरी कल्पना असेल तरी बेनेफिट ऑफ डाऊट देऊ (संस्थळाचा टी आरपी वाढवणं हाच उद्देश आहे असं मानून तो कितीही चांगला वाईट असला तरी) मात्र ह्या आयडी बाबत निर्णय घेणं आवश्यक आहे असं माझं स्पष्ट मत आहे.
आयडीच्या अशा वर्तनानं संपादक मंडळाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. धन्यवाद.
17 Feb 2013 - 9:56 pm | अग्निकोल्हा
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ...?
17 Feb 2013 - 9:45 pm | जेनी...
डोकं बधिर झालं यार ...
हा प्रसाद स्वताहाला समजतो काय ?? ..
अर्ध्यातनच सोडुन दिलं वाचायचं ..
गिरिजा काका लिहिलय छान .. म्हणजे एखाद्याच्या मनावर परिणाम
करण्याइतकी हातोटी लिखानात जाणवली .. पण मला पचलं नाहि ..
माफि असावी ..
17 Feb 2013 - 10:48 pm | आनन्दिता
+१ अगदी अगदी..
लिखाण चांगलं असलं तरी मला गोष्टीचा पायाच बकवास वाटला...
17 Feb 2013 - 10:29 pm | संपादक मंडळ
१) आपण सर्वचजण इथे लिहावाचायला येतो. लिहिणारा आयडी स्त्री आहे की पुरुष याने काही फरक पडू नये.
२) मिपावर सदर सदस्याचा आमच्या माहितीप्रमाणे एकच आयडी आहे. डुप्लिकेट आयडीना प्रोत्साहन देण्याचे मिपाचे धोरण नाही.
३) सदर आयडीने अॅडमिन्सबद्दल केलेला उल्लेख हा मिपाच्या अॅडमिन्सबद्दल नाही. लिहिताना आधीच्या संस्थळाचा उल्लेख जाणून बुजून टाळला आहे काय ते कृपया स्पष्ट करावे. तसे असेल तर ती अन्य सदस्यांची दिशाभूल ठरेल.
४) कोणाही सदस्याने अन्य सदस्यांशी व्यक्तीगत संपर्क व्यक्तीगत जबाबदारीवर करावा. मिपाबाह्य आंतरजालीय संपर्क मिपाच्या कक्षेत येत नाहीत.
५) सदर सदस्याने आपण स्त्री/पुरुष असल्याचे भासवून मिपावर कोणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे आमच्या पर्यंत आलेले नाही. आयडी बदलण्यासाठी एका संपादकाकडे विनंती केल्याचे सदर सदस्याचे म्हणणे आहे, परंतु ते सगळ्या संपादक मंडळापर्यंत आलेले नाही. अन्यथा लगेच सगळ्या प्रकरणाचा खुलासा झाला असता. कोणत्याही प्रकारे अन्य सदस्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.
६) सदर सदस्याने यापुढे इतरांना गोंधळात टाकणारी विधाने करू नयेत. अन्यथा विनासुचना आयडी कधीही ब्लॉक केला जाईल.
या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.
17 Feb 2013 - 10:36 pm | जेनी...
४) कोणाही सदस्याने अन्य सदस्यांशी व्यक्तीगत संपर्क व्यक्तीगत जबाबदारीवर करावा. मिपाबाह्य आंतरजालीय संपर्क मिपाच्या कक्षेत येत नाहीत.
एकदम सॉल्लिड ...
नै त काय :-/
उगा मिपाच्या नावाने खडी फोडतात :-/
संपाकाका मस्त निवेदन .. :)
आता कसं गारगार वाटतय :)
18 Feb 2013 - 1:13 am | कवितानागेश
संपाकाका मस्त निवेदन ..>
संपादकांमध्ये काकूज पण आहेत.
आधीच सांगून ठेवतेय. उगा नंतर गोंधळ नको. ;)
17 Feb 2013 - 11:04 pm | उपास
http://www.misalpav.com/comment/461793#comment-461793
ह्या प्रतिसादात गिरिजाक्का नवर्याबद्दलचा अनुभव शेअर करतात.. आणि इथे हे वाचून अर चक चक झाले.. माणसे अशी का वागतात? विकृती म्हणावे का याला, फक्त टाईमपास म्हणून वेगवेगळ्या आयडीतून वावरायचं, इतका बरा वेळ अस्तो लोकांना..
लिखाणाची शैली आवडली पण कथेचा बेस गंडलेला वाटला, दरम्यान इत्क्या बायका मागे लागलेल्या लखोब लोखंडेची आठवण झाली, तो निदान काहीतरी लपवू पाहात होता, हा त्याचं समर्थन करतोय :) मुली इतक्या बावळट्ट नसतातच ;)
17 Feb 2013 - 11:23 pm | संजय क्षीरसागर
मुद्दा तो नाही. पुरूषानं स्त्री आयडी घेणं आणि स्त्री म्हणून संकेतस्थळावर वावरणं ही इथल्या स्त्री आणि पुरूष दोन्ही सदस्यांची दिशाभूल आहे. कारण :
पुरूष स्त्री आयडींशी अत्यंत विनयशीलतेनं वागतात त्याचा गैरफायदा अश्या आयडीला निष्कारण मिळतो. थोडक्यात एका खोट्या आयडीमुळे पुरूष असून देखील त्याला स्त्री असण्याचे फायदे मिळतात.
इथल्या स्त्री आयडी या प्रकारच्या पुरूषाशी मनमोकळेपणानं वागतात ज्याचा त्यांना केंव्हाही मनस्ताप होऊ शकतो. (हे आताच काही प्रमाणात झालंय, वरचे काही प्रतिसाद पाहावे).
माझ्या मते सदस्यांपेक्षाही ही सं. मं. ची फसवणूक आहे.
वरचा सदर सदस्याचा प्रतिसाद आता मॉडिफाय केलाय (हे अगम्य आहे) पण त्यात अॅडमिनला कल्पना आहे असा उल्लेख होता. त्याला अनुसरूनच मी वर प्रतिसाद दिला होता (तो मात्र शाबूत आहे):
यापेक्षा अक्षम्य `गोंधळात टाकणारी विधाने' काय असू शकतात?
आणि शुचिच्या या प्रतिसादाची विषेश दखल घ्यावी :
17 Feb 2013 - 11:35 pm | अभ्या..
संजयजींच्या आक्षेपांशी सहमत पण आंतरजालावरचे वातावरण पाहता या समस्येच्या निराकरणाबद्दल अनभिज्ञ.
(कारण स्त्री आयडी घेऊन लेखन करणे हा मराठी सहित्यातला सुध्दा परिचित जुना प्रकार आहे पण ती तशीच एखादी सेकंड लाइफ इमेज उभी करणे आणि लिखाणाप्रमाणेच इतर सामाजिक (खव, व्यनि तून संवाद वगैरे) वर्तन करणे हे चूक असे मला वाटते)
17 Feb 2013 - 11:47 pm | संजय क्षीरसागर
अंतरजालावर इंटरॅक्शन आहे, इट इज अ लाइव मिडीयम आणि माझ्या दृष्टीनं हा फरक कमालीच्या महत्त्वाचाय.
17 Feb 2013 - 11:50 pm | संजय क्षीरसागर
पुरूषांच्या डब्यात बिनधास्तपणे वावरण्यासारखं आहे!
18 Feb 2013 - 1:14 am | कवितानागेश
शीर्षकातच डायरी हा शब्द वाचून भाम्बावून गेले होते!
...पण... हुश्श.....
18 Feb 2013 - 4:49 am | रेवती
लेखन पटले नाही.
18 Feb 2013 - 8:46 am | श्री गावसेना प्रमुख
मीकाकुंवर टीका केल्याने काका खवळले होते, काही असे बोलले की लोक आधी लिहीतात मग विचार करीत बसतात्,तो पण करतात की नाही असे म्हणाले.बाकी त्यांनी शुची मॅडमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले की धाडसच झाले नाही.
आपला राष्ट्रप्रेमी काकुंचा पुतण्या खराखरा पुरुष आयडी गावसेना प्रमुख.