करंट मस्त...दत्त दत्त...!!!
शीर्षकातल्या ओळी ओळखिच्या वाटताहेत का हो??? पण नसली लागली ओळख तरी लागेल अजून काहि वेळानी... आंम्हाला या दोन ओळींची खात्री पटली त्याला कारण,आमचा काहि रोजांपूर्वीचा कोल्हापूर दौरा. काय आहे ना,कोल्हापूर म्हटलं की दोन गोष्टी स्वाभाविकपणे येतात.पहिलं अंबाबाईचं दर्शन...आणी दुसरी कोल्हापुरी मिसळ.शिवाय याची संगती पुढे तांबड्या/पांढर्या रश्यानी,शाहू पॅलेस पाहाण्यानी,पन्हाळ्यावर हिंडण्यानी...आणी दारात म्हस पिळून मिळते त्या धारोष्ण दुधानी पण लावता येइल. पण कोल्हापूरात..पहिल्या दोन नंबरात आमच्या लेखी येणारी हीच दोन स्थळ आहेत. पुढचिही आहेत पण ती अनुषंगिक. आणी ज्याच्या त्याच्या अवडीनुसार.
