दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय? हेच बहुतेकांना माहिती नसते. ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय? चला तर आज तेच बघूयात...
कोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि झिंग आणणारे मादक पेय म्हणजे दारू अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची. त्यासाठी अतिरिक्त किंवा विपुल प्रमाणात शर्करा असलेले धान्य, फळ अथवा फूल हे महत्त्वाचे असते. अगदी साध्या आंबवणे ह्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करून शर्करेचे रूपांतर अल्कोहोल मध्ये केले जाते. ह्या तयार झालेल्या अल्कोहोलयुक्त द्रवामध्ये मध्ये मूळ कच्च्या मालाचे वास, चव हे गुणधर्म आलेले असतात. त्यावर प्रकिया करून ते आणखीनं खुलवले जातात किंवा पूर्णपणे घालवून टाकले जातात. त्या त्या दारू प्रकारावर ते अवलंबून असते. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये खनिजयुक्त पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असते. (आता ह्या सर्वावरून दारू ही शुद्ध शाकाहारी असते असे म्हणता येऊ शकेल :) )
दारूच्या व्याख्येनंतर येतात दारू प्रकार. दारूचे ढोबळ मानाने, ती कशापासून बनली आहे आणि त्यातले अल्कोहोलचे प्रमाण किती ह्यावरून, दोन प्रकार पडतात. लिकर आणि लिक्युअर. लिकर म्हणजे धान्यापासून बनलेली आणि लिक्युअर म्हणजे फुला-फळांपासून बनलेली. लिकर म्हणजे जनरली जेवणापूर्वी घेण्याचा पेय प्रकार तर लिक्युअर म्हणजे जेवेणानंतर घेण्याचा प्रकार. लिकर हा जनरली पुरुषवर्गात लोकप्रिय असलेला प्रकार तर लिक्युअर म्हणजे महिलावर्गात लोकप्रिय असलेला प्रकार. (इथे कोणत्याही प्रकारचा वाद अपेक्षित नाही, स्त्री मुक्ती मोर्च्याने इथे दुर्लक्ष करावे). लिकर आणि लिक्युअरचे वेगवेगळे उपप्रकार पडतात ती कशापासून बनली आहे त्यावरून.
व्हिस्की प्रामुख्याने बार्ली (सातू) ह्या धान्यापासून बनली जाणारी लिकर. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. कॅरेबियन बेटांवर प्रामुख्याने बनणारी रम ही उसापासून बनते. जापनीज साके आणि शोचू तांदळापासून बनते. मेक्सिकन टकिला अगावे ह्या कंदापासून बनते. व्होडका बार्ली तसेच बटाटा यांपासून बनते. जीन ही शेतीजन्य पदार्थांपासून मिळवलेल्या अल्कोहोल मध्ये ज्युनिपर बेरी ह्या फळांचा स्वाद मुरवून बनवली जाते.
लिक्युअर्स ह्या संत्री, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, सफरचंद, केळी अशा असंख्य फळापासून बनवल्या जातात. तसेच काही वनस्पती, कंदमुळे, झाडांच्या साली, गवत अश्या वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणातून बनवल्या जातात. त्या चवीला त्यामुळे गोड असतात.
भारतात बनणारी दारू ही अस्सल दारू नसते. साखरेच्या मळीपासून मिळणार्या अल्कोहोल मध्ये वेगेवेगळे स्वाद आणि कृत्रिम रंग मिसळवून भारतीय बनावटीची, पण विदेशी फॉर्म्युल्याची दारू तयार होते. ह्यात कास्क (लाकडी ड्रम्स) मध्ये अमुक एक वर्ष मुरवणे वगैरे असला शास्त्रोक्तपणा नसतो. इंडीअन मेड फॉरिन लिकर (IMFL) हा एक उच्चभ्रू आणि महागडा दारू प्रकार भारतात मोठ्या हॉटेलांमध्ये सर्व्ह केला जातो. प्रख्यात विदेशी ब्रॅन्ड्सच्या दारवांचे (प्रामुख्याने व्हिस्की आणि रम) भारतात उत्पादन केले जाते. बॉटल्ड दारू आयात केली की ती उत्पादित वस्तू असल्याने तिच्यावर साधारण १००-१५०% आयात कर भरावा लागतो. त्यामुळे जर बॉटल्ड न केलेली दारू आयात केली तर तो कच्चा माल बनून त्यावरील ड्यूटी कमी होते. मग ह्या आयात केलेल्या दारूला साखरेच्या मळीपासून मिळणार्या अल्कोहोलपासून बनलेल्या दारूमध्ये ब्लेंड करून त्या दारूची चव वाढवली जाते आणि मूळ विदेशी चवीशी मिळतीजुळती चव आणली जाते.
ह्याउलट हातभट्टीची दारू असते. मूलभूत शास्त्रीय प्रकिया एकच पण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय. अस्वच्छ पाणी, नवसागर आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठी त्यात मिसळलेली वेगवेगळी घाणेरडी रासायनिक द्रव्ये ह्यांमुळे ती दारू, एक मादक पेय न राहता विषारी द्रव्य बनते माणूस तिच्या आहारी जाऊन ती त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते. ही असली दारू भयंकर स्वस्त असते कारण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय असल्याने उत्पादन खर्च कमी असतो. ह्या दारूचे मुख्य उद्दिष्ट झटकन ‘जोरदार किक’ देणे एवढाच असतो त्यामुळे कच्चा माल दर्जाहीन असला तरीही काहीही फरक पडत नाही; कारण इथे चवीचे कुणाला पडलेलेच नसते. डोळे मिटून ‘भर गिलास कर खलास’ असे करून असलेल्या विवंचना घटकाभर विसरून जाणे हाच मुख्य उद्देश असल्याने ‘स्वस्तात मस्त’ असलेला हा माल फार खपतो. ह्या प्रकारच्या दारूमुळेच, दारू वाईट असा सरसकट समज झाला आहे.
ह्या हातभट्टीच्या दारूपेक्षा अजून एक जरा बरा प्रकार म्हणजे देशी दारू किंवा सरकार मान्य दारू. हातभट्टीच्या दारूमध्ये वापरल्या जाणार्या घातक पदार्थांवर आळा बसावा म्हणून सरकारने दारू बनविण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरल्या जाणार्या कच्च्या मालाची मानके ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार बनणारी ही देशी दारू, सरकारमान्य, हा जरी थोडाबहुत चांगला प्रकार असला तरीही स्वस्त असणे ही तिचीही महत्त्वाची गरज असल्याने ती ही दर्जाहीनच असतो.
आता दारू म्हणजे काय ते कळले पण दारू प्यायल्यावर नेमके होते काय? खरं म्हणाल तर खूपच गंमत होते, दोन्ही अर्थाने. जेवढी दारू प्यायली जाते त्यातली २०% पोटात शोषली जाते आणि ८०% लहान आतड्यांमध्ये शोषली जाते आणि त्यातले अल्कोहोल रक्तात मिसळून रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरले जाते. हे प्रमाण वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. जेवल्यानंतर दारू प्यायली असता शरीरात दारूतले अल्कोहोल शोषले जाण्याचा वेग कमी असतो कारण पोट भरलेले असल्याने आतडी त्यांच्या कामाला लागलेली असतात. त्यामुळे अल्कोहोल रक्तात मिसळून शरीरभर पसरायला वेळ लागतो. एकदा का ते रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरायला लागले की ते मेंदूपर्यंत पोहोचते आणि गंमत व्हायला सुरुवात होते. ते मेंदूतल्या विविध भागांवर अंमल बजावायला सुरुवात करते. सेंट्रल नर्व्हस सिस्टिम हळूहळू अल्कोहोल च्या ताब्यात जाऊन मेंदूचे काम करणे मंदावते आणि मेंदूचे संदेश शरीरभर पोहोचवण्याचे काम करणार्या न्युरोट्रान्समीटर्सवर परिणाम होऊन प्रतिक्षिप्त क्रिया मंदावतात आणि शरीराच्या हालचाली मंदावतात. त्याने एक सहजावस्था प्राप्त होते. मेंदूच्या विविध भागांचे काम करणे मंदावले गेल्याने आणि आलेल्या सहजावस्थेमुळे एक वेगळ्याच कैफाची अनुभूती येते. अर्थात हे सर्व दारू किती प्यायले गेली आहे त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. अती तिथे माती ह्या उक्तीने खूपच जास्त प्रमाणात जर दारू प्यायली गेली तर सहजावस्था ही सहजावस्था न राहता पूर्ण ‘ब्लॅक आऊट’ अशी अवस्था होऊ शकते.
ही दारू पचविण्याची शक्ती माणसामाणसावर अवलंबून असते. ३० मिली दारू शरीरात शोषली जाण्यास साधारणपणे एक तास लागतो. शरीरात पसरत जाणारे हे अल्कोहोल हे शरीरासाठी एक अॅन्टीबॉडीच असते त्यामुळे यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे ते अल्कोहोल शरीराबाहेर टाकण्याचे काम चालू करतात. आता म्हणाल, फुप्फुसे तर श्वसनाच्या कामात असतात आणि दारू तर तोंडावाटे प्यायली जाते, मग इथे फुप्फुसांचा काय उपयोग? तर त्या अल्कोहोलचे विघटन शरीरात वेगेवेगळ्या प्रकाराने केले जाते त्यात त्याचे वाफ ह्या प्रकारातही विघटन होते आणि ती वाफ फुप्फुसांच्या मार्फत बाहेर टाकली जाते. त्यामुळेच पोलीस Breath Analyzer वापरून टेस्ट घेताना त्या गनमध्ये श्वास सोडायला सांगतात आणि त्या श्वासातल्या अल्कोहोलच्या प्रमाणावरून दारू प्यायली आहे की नाही ते कळते.
तर दारूमार्गे अल्कोहोल शरीरात सारण्याचा वेग हा जर शरीराच्या विघटन करण्याच्या वेगापेक्षा जास्त झाला तर माणसाची अवस्था बिकट होते. आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे यांची काम करण्याची एक क्षमता असते. त्या क्षमतेपेक्षा जास्त काम त्यांना दिले तर काय होईल? तुम्हाला तुमच्या बॉसने प्रमाणापेक्षा जास्त काम दिले तर काय होते? तुमच्या रागाचा पारा चढून तो कुठल्यातरी मार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न होतो की नाही? तसेच नेमके ही यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे करतात आणि उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल शरीराबाहेर टाकले जाते आणि दारू पिणार्याचा ‘वकार युनुस’ होतो.
त्यामुळे दारू पिताना तारतम्य बाळगून प्यायल्यास त्यातली मजा अनुभवता येते, नापेक्षा दारू म्हणजे वाईट असा मतप्रवाह बळावण्यास मदत होते. तर आता दारू म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?
प्रतिक्रिया
5 Mar 2013 - 10:49 pm | मन१
माहिती म्हणून ठीक आहे.(अचूक असणारच असा विश्वास आहे.)
शंका :-
बैठे काम सतत करणार्यांना साधारणतः किती अल्कोहोल recommanded मात्रेत असते?
काही लोक "नियमित घेतो पण थोडीशीच घेतो" असे म्हणतात. नियमित घ्यायचीच झाल्यास ह्या थोडीशीच शब्दाची लिमिट आम आदमीसाठी किती आहे?
6 Mar 2013 - 12:05 am | सोत्रि
ते व्यक्तिसापेक्ष आहे. नेमके सांगता येणे कठिण आहे.
-(साकिया) सोकाजी
6 Mar 2013 - 12:19 pm | मन१
ते बरोबर आहेच. पण जरासं डिप्लोमॅटिक नाहिये का?
कोण किती धावू शकतो; किंवा सर्वसाधारण बैठे काम करणर्यास रोज सरासरी किती क्यालरिज लगतात्/पुरेशा असतात हे सरासरी प्रमाण सहसा उपलब्ध असतं; त्यांचं काहिसं standardization(स्पेलिंग मिष्टेक चु भू द्या घ्या ) झालेलय. तसं मद्यसेवनाचंही झालेलं असणारच की. त्यातही "व्यक्तीपरत्वे उन्नीस्-बीस..." हे ठीकच.
तर असा स्टँडारडाझ्ड आकडा कुणाच्या पाहण्यात आहे का?
7 Mar 2013 - 1:00 am | सुबोध खरे
zero ml
नियमित घेतो याला काही अर्थ नाही. पण २ पेग आठवड्यात दोन वेळा याने आपल्या शरीरावर फार जास्त परिणाम होणार नाही.नौदलाच्या व्यसन मुक्तीकेंद्रात काम करीत असताना मी एक सैनिक दोन पेग पिउन अल्कोहोलिक झालेला पाहिला आहे फक्त तो हे दोन पेग रिकाम्या पोटी एका घोटात घेत असे त्यामुळे तो कामावर जरा टाइट असे. अशा माणसाला सशस्त्र(गोळ्या भरलेली रायफल)गस्तीवर पाठवणे अशक्य होते.
5 Mar 2013 - 10:54 pm | श्रीरंग_जोशी
एकाच वेळी सहजपण मांडलेली शास्त्रोक्त माहिती व त्यावर खुसखुशीत लेखनशैलीचा तडका याचे समर्पक उदाहरण म्हणजे वरील लेख.
लहान असताना मला प्रश्न पडला होता की मोसंबीचा रस व मोसंबीची दारू यात नेमका फरक तो काय? मग या क्षेत्रात जाणकार असलेल्या शेजारच्या काकांकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी दारू बनते कशी हे सोप्या भाषेत समजावून सांगितले होते.
अवांतर - दारुपासून काही पोषण मिळते का यावर जाणकारांनी प्रकाश टाकल्यास आनंद होईल. काही प्रकारचे मद्य पिल्याने हॄदयरोगाची शक्यता कमी होते, वार्धक्याच्या त्वचेवरील खुणा येणे लांबते वगैरे नेमके कसे होते हे कोणी सोप्या भाषेत सांगेल का? (जीवशास्त्र हा विषय खूप लौकर सोडल्याने जालावरील क्लिष्ट माहिती नेमकेपणाने कळत नाही म्हणून येथे विचारतोय).
5 Mar 2013 - 11:27 pm | मन१
http://www.misalpav.com/node/16202 आणि http://www.misalpav.com/node/16102
5 Mar 2013 - 11:33 pm | श्रीरंग_जोशी
# मनोबा - या दुव्यांबद्दल तुम्हाला अनेक दुआँ...
7 Mar 2013 - 1:19 am | सुबोध खरे
देशी दारू हि हातभट्टी मुळे होणार्या विषबाधा अंधत्व इ टाळण्यासाठी सरकारने स्वतात दिलेला पर्याय आहे. यात उसाच्या मळीपासून तयार होणारे अल्कोहोल(मद्यार्क) ४०% पर्यंत विरळ करून त्यात मोसंबी किंवा संत्र्याचा अर्क ( स्वादासाठी) टाकला जातो. त्याला मोसंबी किंवा नारंगी देशी दारू म्हणतात. त्यात कोणताही फळाचा रस नसतो.
दारूपासून मिळणारे पोषण हे अत्यल्प असून त्याचा फारसा फायदा होत नाही कारण दारूमध्ये कोणतेही इतर अन्न घटक नसतात ( नुसती साखर खाल्ल्यासारखे) दोन पेग व्हिस्की मध्ये ७ किलोकैलरी/ ग्राम किंवा ५.३किलोकैलरी/ मिली प्रमाणे ११०-१२० किलोकैलरी मिळतात.२७-३० ग्रॅम साखरे इतके( एका खडीसाखरेच्या खड्या इतके) मद्य प्यायल्याने हृदयरोगाची शक्यता कमी होते कारण माणूस यकृताच्या आजाराने दगावतो आणि म्हणूनच वार्धक्य सुद्धा येत नाही.
7 Mar 2013 - 1:29 am | श्रीरंग_जोशी
खालच्या प्रतिसादाप्रमाणेच हा प्रतिसाद देखील मदतपूर्ण.
5 Mar 2013 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा
@ त्याने एक सहजावस्था प्राप्त होते. >>> =))
.......................................................................................................................
@उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल शरीराबाहेर टाकले जाते आणि दारू पिणार्याचा ‘वकार युनुस’ होतो.>>> =))
मद्यसंभव शरिर चयापचय शास्त्र विशारद... सोकू नाना की जय हो !!!
5 Mar 2013 - 11:53 pm | उपास
मस्त लिहिलेय सोकू नाना!
6 Mar 2013 - 12:03 am | प्रसाद गोडबोले
हा धागा "मिसळपाव सरकार तर्फे जनहितार्थ जारी " असा घोषित करावा अशी जोरदार मागणी करीत आहे !
भारतात बनणारी दारू ही अस्सल दारू नसते. >>> ह्या वाक्यावर माईल्ड निषेध !
बीयर विषयी काही बोलला नाहीत तें का बरे ? ( बीयर दारु मानत नाही काय तुम्ही ? तो इस बात पे होजाये चीयर्स !!)
बाकी सोमरस विषयावर काथ्याकुट झाला असेलच... मधु उर्फ महुवा उर्फ आपल्या मोहाच्या फुलांची दारु ह्यावर कोणीतरी बोला राव ...
असो
|| एवं मद्यस्य दोषेण कुलं वीराणामैक्यशालिनाम |
काहीतरी काहीतरी काहीतरी मद्यम् कुलविनाशकं ||
6 Mar 2013 - 12:21 am | सोत्रि
बीयरला दारू म्हणणे हे म्हणजे ताकाला मठ्ठा म्हणण्यासारखेच आहे :)
-(साकिया) सोकाजी
7 Mar 2013 - 1:05 am | सुबोध खरे
बियर मध्ये ५-१०% अल्कोहोल असते. आणि (रम किंवा व्हिस्की मध्ये ४०-५०%) पण बियर हि पेग(३०-६० मिली) मध्ये न घेता बाटलीने प्यायली जाते (६५० मिली )त्यामुळे साप म्हणू नये धाकला या उक्तीनुसार ती पण तितकीच वाईट आहे
6 Mar 2013 - 12:27 am | सूड
छान माहिती. पण या सहजावस्थेत गेलेल्या लोकांमुळे सजगावस्थेत असलेल्यांची जी काही करमणूक होते त्याला तोड नाही.
6 Mar 2013 - 12:27 am | सूड
छान माहिती. पण या सहजावस्थेत गेलेल्या लोकांमुळे सजगावस्थेत असलेल्यांची जी काही करमणूक होते त्याला तोड नाही.
6 Mar 2013 - 1:22 am | बॅटमॅन
दारूचे जाणकार सोत्रिअण्णा लिहिताहेत म्हंजे योग्यच अष्णार-प्रष्णच नै.
पण काही खुस्पटवजा शंका: भारताच्या जण्रल हवामानाकडे पाहिल्यास दारू पिणे ही गरज वाटत नाही. तुमचे मत काय?
आणि पिऊन झिंगणार्यांचा उपद्रव सहन करणे ही लै तिडीक आण्णारी गोष्ट असते. असो. भोगल्यामुळे मते टोकदार होणारच.
(दारू न पिणारा पण सोमरस कधीकाळी प्यायची इच्छा बाळगून असलेला) बॅटमॅन.
6 Mar 2013 - 10:09 am | पिंपातला उंदीर
उप्द्रव देण्यासाठी दारू पिऊन झींगण्ाची गरज आहेच असे काही नाही. उप्द्रव मूल्य असणारे लोक तो देतात्च. मग पिलेले असोत वा नसोत : )
6 Mar 2013 - 11:09 am | अग्निकोल्हा
न पिता उपद्रव देणार्याला तिथच ठोकुन काढता येते. पिउन उपद्रव देणार्याचे भान जागेवर असेलच याची शाश्वती नसल्याने ठोकुन काढुन (त्या वेळि तर) फरक फारसा पडत नाही. उलट ऐन कामाच्या वेळेत आपल्यालाही थोडी घ्याविशी वाटु शकते. ज्याचे नियत्रण होइलच असे नसल्याने आपलाही वेळ वाया जातो.
6 Mar 2013 - 11:56 am | बॅटमॅन
+१११११११११.
मद्याला शिव्या उगीच घातल्या जात नाहीत. बाकी कोणी काही म्हणो.
31 Mar 2013 - 8:50 pm | आनंदी गोपाळ
काका,
अहो हवामाण पाहून दारू प्याया लगल्यास कसे व्हावे? आपल्या 'आदिवासी' संस्क्रूतीत (म्हंजी कसं, की मूळ रहिवासी इत्यादी. आजकाल त्यास्नी वनवासी म्हनायची फ्याशन हाये) बारसं करतानी बाळाच्या व्हटाला दारू लावत्यात. लै वंगाळ बगा! हितलं हवामान वाईट म्हनाय्चं का?
2 Apr 2013 - 2:08 pm | बॅटमॅन
आजोबा,
हवामाणाचा अण दारूचा काही घट्ट संबंध आहे असे माझे ठाम मत नसूण ती एक शंका आहे. बाकी दारुड्यांचा तिटकारा आणि तिरस्कार तर मला आहेच आणि याबद्दल मी फुकाचा वाद घालू इच्छित नाही.
31 Mar 2013 - 8:48 pm | आनंदी गोपाळ
अमक्या तमक्यांच्या नंदनवनात रहाता का हो तुम्ही?
तुमच्या गल्लीतले ४ टुक्कार. वार्डाचा महा/नगरसेवक, मोहोल्ल्याचा आमदार, हापिसातला बॉस, बायको.. एण्डलेस यादी आहे. या सगळ्यांना उपद्रव दिला म्हणून ठोकून काढता का तुम्ही? वॉव!!
6 Mar 2013 - 9:18 am | श्री गावसेना प्रमुख
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती,दारुच्या उदात्तीकरणाच्या प्रयत्नांचा निषेध.
दारु पिणारी व्यक्ती ही अगोदर स्माल पॅक म्हणुन पिते,व ति पिउन झिंगल्यावर गटारीत पडेस्तोवर पिते व वर जाते.
एक जोकः:बायको : काय हो, तुम्ही म्हणाला होता न कि उगाच दारू पिणार नाही म्हणून, मग …
नवरा : अग दिवाळी नाही का …..
बायको : हो का? दिवाळीचा अन् दारू प्यायचा काय संबध?
.नवरा : रॉकेट उडवायला बाटली नको का?
31 Mar 2013 - 8:54 pm | आनंदी गोपाळ
"स्मॉल पेग."
बाकी चालू द्या.
***
धर्म ही अफूची गोळी आहे म्हणे. स्वाक्षरीत धर्म लिहिलेला दिसला. अफू चांगली की दारू? झोडग्यात काय पितात?
1 Apr 2013 - 9:23 am | श्री गावसेना प्रमुख
ठन ठन पाळ
6 Mar 2013 - 10:06 am | पिंपातला उंदीर
असले जबरी लेख वाचायला पूर्व जन्माची पुण्याई लागते. दारू पिण्याबद्दल अपराध गंड नसणार्या लोकांबद्दल मला खतरनाक आदर आहे. सोत्रि हे अशा मोजक्या लोकांपैकी एक. Respects : )
1 Apr 2013 - 1:04 pm | अभ्या..
रोज कमीतकमी असे ५० नग दाखवेन. मोजके बिजके काही नाही. मलाच अपराध गंड वाटतो त्यांना बघून. :(
आणि हे सोत्रीनानाबद्दल पूर्ण आदर बाळगून सांगतो. नानांचे पिणे हा अल्लग विषय आहे. त्यांची या विशयाची माहीती आणि ज्ञान जबरा आहे. मला पण त्यांनी मेन्शन केलेले बरेचसे ब्रॅन्ड आणि कॉकटेल्स माहीत नसतात.
6 Mar 2013 - 10:22 am | ऋषिकेश
चला! एक महत्त्वाचा दस्तैवज हाती लागला आहे. आता या विषयात (स्वानुभवशुन्य) शायनिंग मारता येईल ;)
8 Mar 2013 - 11:10 pm | दादा कोंडके
'मी दारू पितो' असं म्हणून शायनिंग मारणार्यांपेक्षा 'मी दारू पित नाही' असं म्हणून शायनिंग मारणारेच दिसतात. ;)
6 Mar 2013 - 10:33 am | अग्निकोल्हा
चिज सोबत घेतल्याने लिव्हर वाचते (व कमी चढते), रममधे थोडसं पाणी मिसळुन पिल्यास शरीराला कमी बादते हे खरं आहे काय ?
7 Mar 2013 - 10:28 am | सुबोध खरे
चीज सोबत घेतल्याने लिव्हर वाचत नाही पण चीज मध्ये प्रथिने आणि चरबी असल्याने दारू चे शरीरात शोषण हळू होते आणि दारू कमी चढते.तसेच रम मध्ये पाणी मिसळल्याने होते. शिवाय रम( किंवा व्हिस्की) मधील अल्कोहोल चे प्रमाण जास्त असल्याने ती तोंडाला घशाला आणि अन्ननलिकेला जाळत जाते ती आग कमी करण्यासाठी त्यात पाणी मिसळले जाते.
6 Mar 2013 - 11:00 am | भीडस्त
ऐसा दाखिला देतो की मिपास्थित अद्वितीय आद्य धुरीण सकल जाणकार मद्याचार्य सोत्रिश्वर स्वामी विरचित मद्यमहतीपुराण
याचा नवीन अध्याय मनास उन्मनी अवस्थेत नेण्यात यशस्वी झाला असे
अवांतर
कोणत्याही शर्कराजन्य धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे
शर्कराजन्य-इथे शर्करायुक्त
आणि
अल्कोहोल- इथे ईथाईल अल्कोहोल
हे अजून उचित वाटावे.
लिखाण विज्ञानाधिष्टीत असल्याने हे धार्ष्ट्य करतो आहे.
(सोकांजीसमवेत मद्य नव्हे हे मंतरलेले पाणी पिण्याची आस असणारा)रिंद
6 Mar 2013 - 1:15 pm | सोत्रि
धन्यवाद! योग्य ते बदल करतो लवकरच.दुरूस्तीबद्दल आभार.
-(आभारी) सोकाजी
6 Mar 2013 - 12:48 pm | चिगो
दारुपुराण आवडले, सोत्रिनाना..
(दारु आवडणारा) चिगो
6 Mar 2013 - 1:20 pm | शिद
१००% सहमत.
अवांतरः मागच्या रविवारीच सुहास शिरवळ्करांचे "झिंग" हे अप्रतिम पुस्तक वाचुन संपवले. दारु पिणार्याने व न पिणार्याने एकदातरी वाचण्याजोगे असे पुस्तक आहे.
15 Mar 2013 - 11:21 pm | चिगो
माफ करा, पण तुम्हाला 'झूम' म्हणायचं आहे का? बाकी पुढच्या वाक्याशी पुर्णपणे सहमत आहे.. अर्पणपत्रिकाही मस्त आहे ह्या पुस्तकाची..
18 Mar 2013 - 4:04 pm | शिद
बरोबर...'झूम' असेच लिहायचे होते पण पुस्तकाच्या नशेपायी बहुतेक 'झिंग' असे लिहीले गेले असावे. :)
21 Mar 2013 - 10:05 am | धमाल मुलगा
झूमची झिंग आहेच तशी! :)
-(दादा करमरकरांच्या तावडीतून सुटलेला) धमाल शेरिफ.
6 Mar 2013 - 4:29 pm | प्रकाश घाटपांडे
निसरडी वाट आहे म्हणुन त्याच्या वाटेला न गेलेलेच बरे असा विचार लोक करतात. उगाच रिस्क नको!
7 Mar 2013 - 12:50 am | सुबोध खरे
दारू पितो तर ती मजेसाठी हे सांगण्याचा प्रामाणिकपणा असावा. पार्टी मध्ये घ्यावी लागते, कंपनी म्हणून घेतो असा दांभिकपणा असू नये.
मोलकरणीच्या नवर्याने प्यायली तर दारू आणि आपल्या जावयाने घेतली तर ती ड्रिंक्स असा दांभिकपणा(hippocracy) नसावा.
दारू पिण्यापेक्षा त्याच्याबद्दलचा दांभिकपणा हा वाईट आहे.
दारू हि दारूच असते. विषारी साप हा नाग असो मण्यार असो कि फुरसे अथवा घोणस असो चावल्यावर विषबाधा होणारच तद्वतच दारू हि कोणत्याही स्वरुपात प्या अपाय होणारच.
या बदलाचा एक किस्सा मला आठवतो. १९८८ साली अश्विनी या नौदलाच्या रुग्णालयाच्या समारंभात एक कमांडर बढाई मारत होता कि ५ पेग पिउन सुद्धा मला दारू चढत नाही. त्यावर आमचे एक वरिष्ठ डॉक्टर त्य्याला म्हणाले कि चढत नाही तर दारू पितोस कशाला ?पैसे कशाला फुकट घालवतोस?. मी दारू नाश येण्यासाठी पितो. नशा येत नसेल तर दारू पिउ नये. कोणत्याही हवामानात दारू पिणे मुळीच आवश्यक नाही.
थोडी दारू प्यायली तर ती तुमच्या यकृतात जाळली जाते आणि त्याचे रुपांतर असेटिक आम्लात होते जे पुढे परत जाळून कैलरीमध्ये रुपांतर होते आणि त्यातील इथेनॉल रक्तापर्यंत पोचत नाही म्हणून त्याची नशा येत नाही.तुमच्या यकृतात अल्कोहोल डीहायड्रोजनेज म्हणून विकर(एन्झाईम) असते ते हि अल्कोहोल जाळण्याची प्रक्रिया करते. हि प्रक्रिया एका विशिष्ट वेगाने होते आपणा कितीही दारू प्या त्याचे ज्वलन एकाच वेगाने होते (० ओर्डर कायनेटीक्स) जेंव्हा दारूचे प्राशन या पेक्षा जास्त वेगाने होप्ते तेंव्हा ती यकृत पार करून रक्तात मिसळू लागते आणि त्याचे परिणाम आपल्याला जाणवू लागतात.म्हणून एक पेग पिउन नाश आली म्हणणार्यांना दारूची नव्हे तर त्या वातावरणाची किंवा आपण दारूपितो आहोत या विचाराची नशा येते.आपण जेंव्हा अधिक दारू पिता तेंव्हा याहून जास्त अल्कोहोल रक्तात मिसळते आणि ते आपल्या मेंदूवर प्रभाव दाखवू लागते. सुरुवातीला आपल्याला जास्त आरामदायी आणि हलके हलके वाटू लागते, मेंदूतील चिंतेचे केंद्र कमी काम करू लागते त्यामुळे आपल्याला जास्त आत्मविश्वास वाटू लागतो.(म्हणून दारू पिउन माणसे जोरात वाहन चालवितात). मनाची ताबा ठेवणारी उच्च क्न्द्रे शिथिल होतात म्हणून माणूस ज्या गोष्टी जागेपणी करणे शक्य नाही त्या नशेत करता येतील असा विश्वास बाळगतो.स्त्रीयांबद्दलचे वर्तन आपली चाकोरी सोडून जाऊ लागते (आउट ऑफ कंट्रोल).आणि माणसाची कामेच्छा उद्दीपित होते अजून दारू प्यायली तर मेंदू ची सर्वच केंद्रे शिथिल होऊ लागतात आणि त्याला झोप येऊ लागते. त्याच्या विचारांवरील ताबा सुटतो तारतम्य बाळगणारे केंद्र नीट काम न केल्याने माणूस नको ते आणि नको तिथे बोलू लागतो.अजून दारू रक्तात पोहोचली तर माणूस उभा राहणे कठीण होते कारण त्याचा स्वतःच्या स्नायु वरचा ताबा जातो आणि तो झिंगून पडतो.दारूचे रक्तातील प्रमाण जसे वाढते तसे त्या प्रमाणात ते तुमच्या फुप्फुसातून आणि मूत्रातून ते बाहेर टाकले जाते. म्हणून श्वासाला दारूचा वास येऊ लागतो.हेच प्रमाण मोजून माणूस किती दारू च्या नशेत आहे ते पोलिस ठरवतात.दारू पिण्याचा सर्वात जास्त फायदा ते बनविणाऱ्या कंपनीला आणि त्यानंतर सरकारला(अबकारी कराद्वारे होतो). पिणाऱ्या माणसाला होणार्या शारीरिक फायद्याच्या कितीतरी पटीने तोटाच होतो.वाईन मध्ये हृदयाचे संरक्षण करणारे रिझवाट्रोल नावाचे द्रव्य असत ते मूळ काळ्या(लाल) द्राक्षात असते ते वाईन मध्ये उतरते बनवण्याच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही. तेंव्हा हृदयरोग टाळायचा असेल तर द्राक्षे खा की. उगाच प्रकृतीचे कारण देऊन वाईन पितो हा दांभिकपणा कशासाठी?
मी दारू नशेसाठी पितो हे सांगण्याची हिम्मत असावी.
लष्करात २३ वर्षे काढून दारूच्या थेम्बास स्पर्श न केलेला माणूस माझ्या रोजच्या पाहण्यात आहे.
मी जेंव्हा रोज सकाळी मला स्वतःला आरशात पाहतो तेंव्हा.
अर्थात दारू पिणारी माणसे वाईट असतात असे माझे मुळीच म्हणणे नाही. माणसे मुळात चांगली किंवा वाईट असतात दारूने काही फरक पडत नाही.
बाकी पुढला भाग उद्या.
7 Mar 2013 - 1:17 am | श्रीरंग_जोशी
या सविस्तर प्रतिसादाद्वारे आपण माझ्या मनातील अनेक प्रश्नांची समजतील व पटतील अशी उत्तरे दिली आहेत. त्याबद्दल मनापासून धन्यवाद!!
यापुढे असे प्रश्न इतर कुणी विचारल्यास या प्रतिसादाचा दुवा पाठवून देईन.
10 Mar 2013 - 12:15 pm | अमोल खरे
ह्या वरच्या प्रतिसादाला केवळ एकमेव नाव आहे. "अप्रतिम". दारु कशी वाईट नाही हे सांगायचा अट्टाहास ह्या लेखात वाटला. तो सुबोधदादाच्या प्रतिसादाने कमी होईल असं वाटतं. दारु ही वाईटच असते. माझा दारु पिणा-यांना एक सिंपल प्रश्न असतो. हाच प्रश्न मागे मिपावर एकाने विचारला होता. मी तोच प्रश्न सगळ्यांना विचारतो. उत्तर अर्थातच "नाही" असंच येतं. प्रश्न असतो की "तुम्हाला दारु मध्ये काही प्रॉब्लेम वाटत नाही ना, मग तुमच्या मुलांना द्याल का ?" आधी सांगितल्याप्रमाणे उत्तर हमखास "नाही" हेच येते. दारुने हातात सत्यानाश सोडुन काही येत नाही. त्या वाटेला अजिबात जाऊ नये हेच उत्तम.
10 Mar 2013 - 3:21 pm | सोत्रि
नेमका कुठे आणि कसा वाटला हा अट्टाहास ते सांगाल का? कारण दारू म्हणजे नेमके काय हे सांगून ती चांगली की वाईट हे व्यक्तिसापेक्ष असावे हे सांगायचा अट्टाहास होता ह्या लेखात.
तुमच्या सिंपल प्रश्नाचे उत्तर इथे आहे.
- (कसलाही अट्टाहास न धरणारा) सोकाजी
10 Mar 2013 - 9:24 pm | सुबोध खरे
सोत्री साहेब
दारू प्यावी कि न प्यावी हा पूर्णपणे स्वतः चा प्रश्न आहे. दारू पिण्याचे उदात्तीकरण नको तसेच दारू न पिण्याचा अहंगंड सुद्धा नको. केवळ मी आयुष्यभर दारू नाही प्यायली (२३ वर्षे लष्करात आणि त्यातील ५ वर्षे गोव्यात राहूनही)म्हणून मी स्वतःला श्रेष्ठ मानणे हा सुद्धा दांभिकपणा आहे असे मी मानतो.स्वतः वर ताबा ०,१ २ कि ४ पेग ने ठेवायचा हा वैयक्तिक प्रश्न आहे
डॉक्टर म्हणून दारूचे दुष्परिणाम यथातथ्य पणे लोकांसमोर ठेवणे हे मी माझे कर्तव्य समजतो.
फक्त एक कळकळीचा सल्ला म्हणून मी एवढेच म्हणेन कि ज्या भगिनी आपल्याला मुल होण्याच्या तयारीत(planning for pregnancy) आहेत त्यांनी मुलाला दुध पाजत असे पर्यंत दारूला अजिबात स्पर्श करू नये. कारण आपण केंव्हा गरोदर होणार हे पाळी चुकल्याशिवाय सांगता येत नाही आणि न जन्मलेल्या किंवा नवजात मुलाच्या नाजूक मेंदूवर एका पेगचा सुद्धा अतिशय वाईट परिणाम होतो.
18 Mar 2013 - 1:59 pm | निनाद मुक्काम प...
डॉक्टर साहेब
तुम्ही लग्न प्रसंगी किंवा इतर आनंदाच्या क्षणी लोक गोड पदार्थ जसा जास्तच खातात , तेव्हा भर पंगतीत जिलब्या किंवा लाडवांचं फन्ना उडवणाऱ्या गृहस्थाला तुम्ही तुमच्या व्यवसायाची नैतिक जबाबदारी समजून मधुमेहावर प्रवचन देतात का हो ,
उद्या कोल्हापुरात जाऊन पंधरा व तांबडा रस्सा होर्पनार्या भल्या गृहुस्थाला अल्सर वर प्रवचन देणार का तुमची नैतिक ......
अति तेथे माती हा जगमान्य नियम सर्वांचा माहिती आहे.
गर्भवती महिलांना दारूच नव्हे तर अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवायचे असते व अनेक प्रकारच्या काळज्या घ्याव्या लागतात ,
आता दारूचा मुद्दा आहे म्हणून तुम्ही येथे कळकळ मांडली ,
पण माझ्या माहितीत मी खात्रीने सांगतो , येथील महिला मिपाकर व मुक वाचक ह्या सुविद्य आहेत व त्यांना गर्भारपणात काय घ्यावे व काय घेऊन नये हे सांगणारे नातलग किंवा इंटरनेट आहे, व माझ्या मते त्यांना गर्भवती झाल्यावर डॉक्टरांच्या कडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानुसार वागायचे एवढी समज नक्कीच आहे ,
तुमचे येथे हा कळ कळीचा मुद्दा नेमका कोणासाठी होता व तो येथे मांडण्यासाठी तुम्हाला गरज का वाटले हे समजू शकले नाही ,
किंबहुना आपण दारू पीत नाही व आपल्या व्यवसायाने आपल्याला प्रवचन देण्याचा मक्ता दिला आहे असा तुमचा समज झाला आहे का
लोकांना सिगारेट व दारू ह्यांच्या सेवनाने किंवा अतिसेवनाने काय दुष्परिणाम होतात हे चांगले माहिती आहे, उगाच दारूचे उदात्तीकरण व त्यानंतर सल्ले अशी पुस्तकी व नाटकी भाषा कृपया येथे लिहू नका.
ये पब्लिक हे , ये सब जान ती हे .
18 Mar 2013 - 7:43 pm | सुबोध खरे
जर पब्लिक ला सर्वच माहित असेल तर डॉक्टर काय किंवा वकील काय किंवा कोणताही सल्लागार (उदा.कर सल्लागार)याची गरजच नाही.
दुर्दैवाने सर्वच स्त्रियांची पाळी वेळेवर येतेच असे नाही त्यामुळे आपल्याला असे अनेक वेळा दिसते कि पाळी पुढे मागे झाल्याने स्त्रिया औषधे घेतात किंवा एक्स रे करून घेतात आणि नंतर त्यांना कळते कि आपण गरोदर आहोत. यानंतर ते मुल ठेवावे कि नाही याच्या विचित्र संभ्रमात त्या पडतात. अशी पाली येऊ नये म्हणून आपण जर मुल होण्याचे ठरवत असाल तर दारू पिऊ नका असा सल्ला जर मी दिला तर त्यात फार काही आगाऊ पण केला असे मला वाटत नाही. गेली २२ वर्षे मी सोनोग्राफी करीत आहे आणि अशा अनेक स्त्रिया मी पाहत आलो आहे म्हणून मला असे लिहावे असे वाटले.
जर लोकांना असे वाटत असेल कि हा माणूस आगाऊ पण करीत आहे तर मी येथेच थांबतो.लग्नात कोणी काय खावे किंवा कोल्हापुरात कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते मत मांडण्याचे ठिकाण नाही.
पण मिसळपाव हे सर्वजणांना आपले मत मांडण्याचे एक मुक्त व्यासपीठ आहे असा माझा समज( कदाचित गैरसमज) आहे.
जर आपल्याला माझा सल्ला हा शब्द खटकला असेल तर मी आपली माफी मागतो.
18 Mar 2013 - 8:24 pm | पिलीयन रायडर
का बुवा??
काहीही माहिती नसताना उगाच फुकट सल्ले देत कितीतरी जण फिरतात इथे.. तेव्हा नाही तुम्हाला हे लिहावं वाटलं? त्यांनी विषय निघाला म्हणुन लिहिलं तेही सामाजिक कळकळीतुन.. काय चुकलं बुवा?
असो.. असतो प्रत्येकाचा चष्मा!!
18 Mar 2013 - 8:24 pm | बॅटमॅन
प्रतिसाद आजिबातच पटला नै निनादराव. कोल्लापुरात एकट्या माणसाने तांबडा-पांढरा हादडला म्हणून काही विकार झाला तर त्याला एकट्यालाच होतो. पण गर्भवती बाईने काही अर्बट-चर्बट खाल्ले तर त्याची झळ बाळालासुद्धा लागते. डॉक्टरसाहेबांनी उपयुक्त माहिती सांगितली आहे. कमीत कमी त्यांचा हेतू प्रामाणिक आहे हे लक्षात घ्या. उगीच डिस्करेज का करताय त्यांना? इथे प्रवचन वगैरे कोण देतंय??? मेडिकल शास्त्रानुसार जे आहे ते साध्या, प्रसंगी रोखठोक शब्दांत सांगितलं तर त्याला प्रवचन म्हणणं ही तर तर्कदुष्टतेची परमावधी झाली.
18 Mar 2013 - 8:33 pm | सुबोध खरे
http://www.surgeongeneral.gov/news/2005/02/sg02222005.html
We do not know what, if any, amount of alcohol is safe. But we do know that the risk of a baby being born with any of the fetal alcohol spectrum disorders increases with the amount of alcohol a pregnant woman drinks, as does the likely severity of the condition. And when a pregnant woman drinks alcohol, so does her baby. Therefore, it's in the child's best interest for a pregnant woman to simply not drink alcohol."
In addition, studies indicate that a baby could be affected by alcohol consumption within the earliest weeks after conception, even before a woman knows that she is pregnant. For that reason, the Surgeon General is recommending that women who may become pregnant also abstain from alcohol.
18 Mar 2013 - 8:41 pm | दादा कोंडके
प्रतिसाद आवडला नाही निनादपंत.
19 Mar 2013 - 12:56 am | निनाद मुक्काम प...
डॉक्टर साहेब
मिसळपाव वर सगळेच आपले मत व्यक्त करू शकतात म्हणूनच मी माझे मत व्यक्त केले , तुम्ही माझी माफी मागण्याचे काहीच कारण नाही , आता पहा तुम्ही प्रतिसादांतून काही शास्त्रीय माहिती दिली त्याच सोबत तुमच्या खाजगी मतांची पिंक सुद्धा जागोजागी खुबीने पेरली ,
दारू पितो तर ती मजेसाठी हे सांगण्याचा प्रामाणिकपणा असावा. पार्टी मध्ये घ्यावी लागते, कंपनी म्हणून घेतो असा दांभिकपणा असू नये.
आता कंपनी देण्यासाठी साठी दारू पितो असे म्हणणे म्हणजे दांभिकपणा असा तुमच्या म्हणण्याला कोणता शास्त्रीय आधार आहे ,
पण काय बरे कोणतीतरी लिहिले होते , ते ज्याचा त्याचा चष्मा..
तुम्ही स्वतः दारू पीत नाही मग एखादा कंपनी देण्यासाठी दारू पितो हे खोटे आहे असे ठाम मत कोणत्या निष्कर्षावर तुम्ही मांडतात.
तेव्हा ह्याच न्यायाने मला तुमचे सर्व प्रतिसाद प्रवचन वाटले.
लोकांनी आपल्या हृदयाचे रक्षण वाईन पियुन करू नये त्यापेक्षा द्राक्ष खावी हा एक सल्ला म्हणून ठीक आहे ,पण त्यांचा दांभिकतेशी संबंध जोडण्याचे काय कारण असावे. परत तुमचा चष्मा .
द्राक्ष व वाईन ह्यापैकी कोणता पर्याय निवडावा हे लोकांचे लोकांना ठरवू द्या की , तुमची मते त्यांच्यावर का लादता ,
मी असे वाचले होते साखरे पेक्षा गुळ शरीराला चांगला आहे ,पण तरीही बहुसंख्य ठिकाणी चहात साखर पडते गुळ पडत नाही.
प्रभाकर काकांनी म्हटले तसे मी पण म्हणतो ,माझ्या पाहण्यात असंख्य लोक आहेत जे जिंगुन पडत नाहीत किंवा स्त्रियांशी गैर वर्तन सुद्धा करत नाहीत , माझ्या व्यवसायामुळे जगभरातील व्यक्तींना मधुशालेत तीर्थ प्राशनाचा सोहळा अनेक वर्ष पार पाडत आलो आहे ,
अनेक व्यक्ती नियमित प्रमाणात ठराविक द्रव्य पियुन मग जेवण करून शांतपणे घरी जातात , म्हणून खात्रीने म्हणतो की तुम्ही जे भडक वर्णन केले आहे ते अति दारू पियुन धिंगाणा घालणारे अपवादात्मक असतात ,
माझे स्पष्ट मत आहे की मिपावर ज्या महिला दारू पीत असतील त्यांना बाळाचे प्लानिंग करण्याच्या वेळी काय काय करावे व काय करू नये ह्याची माहिती असते ,
ह्या देशात वाढत्या मधुमेही व हार्ट ट्रबल च्या वाढत्या रोग्यांची संख्या पाहता
मिसळपाव मधील पाककृती सदरात जर एखादी गोड पाककृती किंवा झणझणीत तिखट ,तेलकट पाककृती आली तर डॉक्टर म्हणून तुम्ही एवढे गोड व झणझणीत खाऊ नका ते खाल्याने ,,,,,, असे प्रवचन सुरु केल्याचे मी पहिले नाही ,
मग दारूच्या बाबतीत हा दुजाभाव का
तुमच्या शब्दात हा दांभिकपणा नाही का
मिपावर दारू पितो असे सांगणारे अनेक मान्यवर सभासद आहे ते दारू पियुन झिंगून पडून बहुदा मिपावर लेख व प्रतिसाद देत असावेत.
व महिलांशी वाईट वर्तन सुद्धा बहुदा करत असावेत, असे तुमचा प्रतिसाद वाचून माझे मत बनायला लागले आहे.
अति दारू सेवनाने कामेच्छा निर्माण होते पण त्यांच्या पुढचे शास्त्रीय सत्य तुम्ही सोयीस्कररीत्या टाळले.
गोड व तिखट मर्यादेत खाल्ले तर तब्येत राखता येते व हाच निकष दारूला लागू पडतो हे सर्वांना माहिती आहे. मग तरीही सोत्री ह्यांच्या धुंद करणाऱ्या मोहक लेखनावर उगाच दारूचे दुष्परिणाम ह्यावर खरडण्यास काय हशील आहे ,
असे माझे मत आहे ,
डॉक्टर साहेब माझ्या आधीचा प्रतिसाद ज्यांना आवडला नाही त्यांना आधी माझे अनेक प्रतिसाद वेगळ्या विषयांवर आवडले आहेत ,
हीच मिसळपाव ची गंमत आहे.
दोन आयडी म्हणजे दोन स्वतंत्र प्रवृत्ती , विचार
ह्यात त्यांच्यात मतांतर असणार व वेगळ्या विषयावर एकमत सुद्धा
ह्यालाच जागरूक लोकशाही म्हणतात
माझे मत मी कंपू किंवा व्यक्ती पाहून मांडत नाहीत. व वैयक्तिक आकस वगैरे तर अजिबात ठेवत नाही.
.
ता क
दादा व बेटमन
असे जाहीरपणे लिहायचे असते का तुझा प्रतिसाद मला आवडला नाही ,
आता सगळ्यांना जाहीरपणे कळले इतके वर्ष येथे राहून मला एक कंपू सुद्धा करता आला नाही.
19 Mar 2013 - 1:17 am | सोत्रि
निनाद आधिच्या प्रतिसादात तू ह्या मुद्याला धरुन राहिला असतास तर सहमत झालो असतो. त्या प्रतिसादात तुझा रोख गरोदर स्त्रीने काय करू नये ह्या डॉक्टरांच्या मुद्यावर होता. जो मला अजुनही पटत नाही. कारण ते सांगणे गरजचे आहेच, जसे की सोनारानेच कान टोचणे कधी कधी गरजेचे असते.
पण तुझ्या ह्या प्रतिसादातल्या सुरुवातीच्या भागाशी सहमत आहे. 'दांभिकपणा', 'आरशात रोज सकाळी दिसणारा माणूस' इ. हे प्रतिसादांमधून नसते आले तर प्रतिसाद खर्या अर्थाने समर्पक झाले असते.
- (कंपू कसा करतात हे समजावून घेण्याची इच्छा असलेला) सोकाजी
19 Mar 2013 - 1:38 am | विश्वनाथ मेहेंदळे
तुला काय रे झाले एकदम ???
19 Mar 2013 - 2:18 am | दादा कोंडके
सरळ सरळ प्रतिसाद आवडला नाही म्हणून सांगितलेलं का रुचलं नाही बुवा? तूझे अगदी वैयक्तीक अनुभव ते आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण आणि मतं मला पटतात आणि आवडतात. ते मी वेळोवेळी लिहलंही असेल, आहेच. पण सगळ्यांच सगळंच पटायला पाहिजे असं थोडच आहे? आणि कंपू-बिंपू को मार गोली यार. :)
19 Mar 2013 - 3:08 am | निनाद मुक्काम प...
अहो दादा मी गमतीने लिहिले आहे ते ,
स्मायली टाकायची राहिली.
अहो मला खूप आनंद झाला ह्या पुढे जेव्हा तुम्ही माझ्या एका प्रतिसादावर सकारात्मक उत्तर द्याल ते मनापासून असेल ,उगाच हो ला हो करणे नसेल.
आणि
सोत्री मला तुमचा मुद्दा पटला
माझ्या कडून प्रतिसादाची मांडणी नीट झाली नाही , मुद्दा हाच होता
दारूपान ह्या विषयावर फारच टोकाची व एकांगी मते डॉक्टरांच्या प्रतिसादांतून
देण्यात आली,
पण कळकळीच्या सल्ला ह्या मुद्द्यावर अनावश्यक भर दिला गेला त्याबद्दल दिलसे दिलगिरी
राजकुमार असते तर त्यांनी मुद्देसूद ह्या विषयावर मत मांडले असते असे मला वाटते.
19 Mar 2013 - 2:02 pm | पिलीयन रायडर
आधीच सांगते...
१. मला "लेकी बोले सुने लागे" टाईप प्रतिसाद कळत नाहीत.. त्यामुळे कोणितरी कशाला .. मीच वर लिहिलय ना "चष्म्या" बद्दल..
२. तुमचे इतर अनेक प्रतिसाद मला आवडतात, म्हणुन हा प्रतिसाद वाचल्यावर जरा आश्चर्य वाटले..
खरें नी जे लिहीलं त्यात माझ्या मते तरी कळकळ होती.. त्या ओघात जर त्यांनी सांगीतले की "मी दारु पित नाही" तर तेवढं आपण सोडुन देऊ शकतो. त्या साठी असा प्रतिसाद देण्याची गरज होती का? त्यांची वैयक्तीक मते म्हणजे "पिंक" असं का? डॉक्टर म्हणुन त्यांनी काही शास्त्रीय माहीती दिली आणि स्वतःच मत मांडलं.. आता ह्याच धाग्यावर का? तर मलाही असं वाटलं की सोत्रींचा थोडासा रोख हा "दारु जितकी बदनाम केली जाते तेवढी वाईट नाही" असा वाटला..(माझा चष्मा!!) त्यात कॅलरीची वगैरे चर्चा झाली म्हणुन विषय वाढत गेला असावा. बर पिली दारु की झिंगला माणुस आणि पडला गटारात असं कुठे म्हणत आहेत ते? उलट एक एक पेग वाढत गेल्याने हळुहळु शरीरावर कसे परिणाम होतात ते लिहिलं आहे..
आणि सर्वात महत्वाचं "दांभिकपणा बद्दल" - मला तरी वाचताना असं वाटलं की सोत्रिं सारखे लोक कमी असतात जे दारु "विदाउट गिल्ट" घेतात. त्यांच्या एक रसिकता आहे. पण बर्याचदा लोक घेतातही आणि परत वर गिल्ट लपवण्या साठी " घ्यावी लागते पार्टी मध्ये.." असा "दांभिकपणा" करतात. घ्यायची तर घ्या ना..सरळ सांगा "मला आवडते.. मी घेतो.." त्यात "कंपनी देतो " चा उपकार केल्याचा भाव कशाला. आणि तुमचं तुम्हाला प्रमाण आणि परिणामाचं गणित माहिती असेल तर लोंकाना जस्टीफाय करायची गरज काय? हे त्यांना अभिप्रेत असाव..
आणि गर्भवती स्त्रियंबद्दल..त्यांनी जास्त केस पाहिल्यात की तुम्ही? आता तुम्हाला बाहेर पडताना बायको "नीट गाडी चालवा" म्हणत असेल तर तीला " गधड्या तुला धड चालवायची अक्कल नाही म्हणुन सांगते.." असं म्हणायचं असतं का? ती एक जनरल नोट असते.. तशीच त्यांनी दिली.. ह्यात "मि.पा वरच्या बायकांना अक्कल नाही.. बेवड्या पिउनच बसतात " ह्या टाईप सूर मला तरी दिसला नाही..(परत माझा चष्मा...)
आता त्यांचे प्रतिसाद वाचुन तुमचं असं मत बनयला लागलं असेल तर तो तुमच्या डोक्यातला घोळ आहे त्याला ते काय करणार?
असो..
जाला वर कंपु आणि वैयक्तीक आकस हे जाला सारखेच virtual असतात.. त्यांना किती मनावर घ्यायचे हे आपल्या दोघांनाही कळत अस्ल्याने माझ्या प्रमाणे तुम्ही पण हे सगळं वैयक्तीक घेणार नाही असा माझा विश्वास आहे..!
19 Mar 2013 - 11:39 pm | निनाद मुक्काम प...
पिलीयन रायडर
गिल्ट लपवणे हा शब्द प्रयोग मला खटकला.
प्रत्येक माणसांचे आयुष्यात एक लॉजिक असते. आपण एखादे कृत्य ,कृती करतो ,
त्याला सपोर्टिंग असे लॉजिक ,स्पष्टीकरण त्यांच्याकडे तयार असते , व आपण केलेले कृत्य किंवा आपण मांडलेले मत कसे बरोबर आहे हे जगाला दाखविण्यासाठी त्याची हि धडपड असते , आणि हि धडपड तो का करतो तर आपण मांडलेले मत हे बरोबर आहे म्हणूनच मी त्याला पाठिंबा दिला हे त्याला जगाला सांगायचे असते.
हा मनुष्य स्वभाव आहे ह्यात आपण मांडलेले मत लोकांना पटो अथवा न पटो त्यावर प्रत्येक जण ठाम असतो , म्हणूनच किंबहुना रुद्य परिवर्तन करणे महाकठीण कर्म आहे ,
तेव्हा लोक वजन वाढले असेल तरी दाबून तेलकट ,तुपकट खातात तेव्हा ह्याबद्दल त्यांना काही विचारले तर त्यांच्याकडे काहीतरी स्पष्टीकरण असते , थोडक्यात माणसाकडे त्याच्या प्रत्येक कृत्यावर त्यांचे स्वतःचे स्पष्टीकरण असते ,
,
दारू त्याला अपवाद नाही ,उगाच दारू चा विषय आला कि दांभिक किंवा गिल्ट हा मुद्दा मध्ये आणणे बरोबर नाही ,
हे माझे मत आहे , मी माझे मत स्पष्ट मांडले , तुम्ही तुमचे मांडले ,
लोकशाहीत मतांतरे होणारच.
त्याला इलाज नाही , असो
आणि डॉक्टर साहेब
तुमचे शास्त्रीय नॉलेज नक्कीच माझ्या पेक्षा जास्त असणार आणि आहे,
तेव्हा तुम्ही डाय बेटीज बद्दल विधान मला पटले ,
पण माझ्या माहितीप्रमाणे निरोगी माणसाने खूप गोड खाणे , व अती तेलकट हे त्यांच्या आरोग्याला हानिकारक असते, तेव्हा डॉक्टर ह्या नात्याने हे दुष्परिणाम गोड व झणझणीत व तेलकट पाककृती देणाऱ्या धाग्यावर धाग्यावर मांडणे तुमचे कर्तव्य नाही का
येथे वादविवादाचा प्रश्नच येत नाही ,
एक साधी गोष्ट आहे , जिभेवर ताबा ठेवला नाही तर आरोग्याच्या समस्या उद्भवतात हे अनेकांना माहिती असून तेलकट ,तिखट , व अतिगोड खाण्याचा मोह लोकांना टाळता येत नाही , पण माझ्या पाहण्यात असे आढळले आहे की दारू म्हटली की तिचे दुष्परिणाम सांगण्यात अनेक जण लेखण्या सरसावून तयार असतात ,मात्र खाण्याच्या अयोग्य सवयीमुळे सुद्धा आरोग्य बिघडते हे त्यामानाने सांगितले जात नाही.
हा माझा मुद्दा होता, जर खाण्याच्या धाग्यावर त्यांचे अती सेवनामुळे होणारे दुष्परिणाम सांगितले जात नाही, व संतुलित आहारावर उपदेश केला जात नाही, मग पिण्याच्या धाग्यावर तो सांगण्याचा अट्टाहास का
हा माझा मुद्दा होता. मला देखील विषय वाढविण्याची आवश्यकता वाटत नाही ,
19 Mar 2013 - 8:59 pm | सुबोध खरे
साहेब दारू पिउन माणसे झिंगून पडतात वगैरे मी काहीच म्हटले नाही. मी फक्त रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण आणि त्याचा होणारा परिणाम याबद्दल लिहिले आहे आणि तुम्ही दारू आणि गोड किंवा तिखट याची सरमिसळ का करीत आहात ते समजले नाही. मधुमेही नसणार्या माणसाने कितीही गोड खाल्ले तरी त्याला काहीही होणार नाही आणि मी स्वतः इतकी वर्षे ठाण्याची मामलेदाराची तिखट मिसळ खात आलो तरी मला कोणताही त्रास झाला नाही परंतु सर्व सामान्य माणूस किंवा धट्टा कट्टा तरुण सुद्धा जर ४ पेग एकदम घेईल तर तो नक्कीच झिंगून पडेल म्हणजेच दारू हि केवळ आजारी नव्हे तर ठणठणीत माणसाला सुद्धा आडवे करील त्यामुळे आपली हि तुलना एकदम गैरलागू आहे.
आपण आपले बरेच आयुष्य पाश्चिमात्य देशात काढले तसेच मी २३ वर्षे लष्करात काढली. तेथे कोणीही सायंकाळी घरी आला तेंव्हा त्याला मद्य देऊ केले जाते तेथे वरील प्रमाणे मला कंपनी साठी प्यावी लागते अशा तर्हेचे समर्थन द्यावे लागत नाही परंतु जेंव्हा मी सिव्हिल आयुष्यात आलो तेंव्हा मी दारू पीत नाही हे ऐकल्यावर बर्याच लोकांकडून आम्ही कंपनीसाठी पितो हे खाली नजर करून ऐकले आहे. यासाठी मी वरील विधान केले. दारू प्यायची तर प्या समर्थन का करावे लागते? हे मला कळेना. कदाचित बापूंच्या भारतात दारूबंदी वगैरेचा परिणाम असल्याने लोकांना हा न्यूनगंड असावा.
लोकांनी द्राक्षे खावि की वाईन प्यावी हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण वाईन मध्ये हृदयाच्या रक्षणासाठी रीझव्हात्रोल आहे म्हणून आम्ही पितो हे कशासाठी ?
असो या पुढे वाद घालणे म्हणजे वितंडवाद होईल त्यामुळे मी येथे थांबतो.
तुम्ही वाद विवादात जिंकू शकता पण एखाद्याचा दृष्टीकोन बदलू शकत नाही एवढेच मी म्हणेन. जर आपणाला असे वाटत असेल कि मी चष्मा लावला आहे तर तसे सही.
" मिपावर दारू पितो असे सांगणारे अनेक मान्यवर सभासद आहे ते दारू पियुन झिंगून पडून बहुदा मिपावर लेख व प्रतिसाद देत असावेत.व महिलांशी वाईट वर्तन सुद्धा बहुदा करत असावेत, असे तुमचा प्रतिसाद वाचून माझे मत बनायला लागले आहे".याला काय करावे
“Discussion is an exchange of knowledge; argument is an exchange of ignorance”
20 Mar 2013 - 5:20 am | निनाद मुक्काम प...
डॉक्टर साहेब
आपण बरीच वर्ष लष्करात घालवली आहेत ,
सिविल लाइफ जगतांना ह्या जगात मुखवटे खालून अनेकांना जगावे लागते , ह्यामागे व्यवहार चातुर्य , कधी हतबलता , तर कधी मुत्सद्दीपणा असतो ,
समोरचा काय उत्तर देत आहे त्यापेक्षा तो कोणत्या अर्थाने ,उद्देशाने उत्तर देत आहे , त्या उत्तराच्या मागे काही गर्भित अर्थ असू शकतो ,
आता हेच पहा ह्या आभासी जगतात येथे अनेक जण आयडी घेऊन वावरत हा आयडी अनेक विषयांवर अनेक मत मांडतो आता वैयक्तिक जीवनात त्या व्यक्तीची तीच मते असतील असे ठामपणे आपण सांगू शकत नाही ,
तस्मात ह्यापुढे सिविलीयन लोकांचे बोलणे एवढे मनावर घेऊ नका ,
पाकिस्तानी सैनिक शस्त्राने गळा कापतो तर समाजात अनेक व्यक्ती केसाने सुद्धा गळा कापतात.
आणि विश्वास ठेवा कंपनी साठी दारू पिणार्यांची जमात ह्या जगात आहे
अशी लोक जेव्हा दारू न पिणाऱ्या लोकांच्या सोबत एखादी सहल किंवा कट्टा अटेंड करतात तेव्हा कोणत्यातरी निमित्ताने दारू पीत नाही ,जैसा देस वैसा भेस असा त्यांचा खाक्या असतो ,
20 Mar 2013 - 7:37 am | ५० फक्त
आभासीय आंतरजालावर एका संस्थळावर दारुबद्दलच्या एका धाग्यावर होणारी चर्चा ही प्रत्यक्ष बारमध्ये बसुन दारु पिल्यावर होणा-या चर्चेच्या मार्गावर जात असलेले वाचुन आभासीय बारमध्ये बसल्याची जाणीव होउन दुस-यांनी दारु पिल्यावर होणा-या माझ्या करमणुकीचा पुनःआनंद मिळाला, धन्यवाद.
21 Mar 2013 - 7:14 am | रुस्तम
सहमत...
18 Mar 2013 - 9:32 pm | गणपा
निनाद हा प्रतिसाद तुच लिहिलायस की अन्य कुणी ही शंका आली.
तुझा प्रतिसाद मुळीच रुचला/पटला नाही.
19 Mar 2013 - 12:57 am | सोत्रि
गणपाभौशी बाडिस!
निनाद तुझी तुझ्या व्यवसायानुरुप दिलेली प्रतिक्रिया समजली पण पटली नाही.
डॉक्टरांचा मुद्दा पटण्याजोगा आणि आचरणात आणण्यासारखाच!
- (सामाजिक तारतम्य असलेला) सोकाजी
17 Mar 2013 - 10:59 am | विश्वनाथ मेहेंदळे
एकदम मनातले लिहिलेस. आपण सुबोध काकांचे पंखे झालो आहोत. सगळे प्रतिसाद खूप आवडले.
17 Mar 2013 - 6:08 pm | अप्पा जोगळेकर
अप्रतिम प्रतिसाद.
7 Mar 2013 - 1:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बिअर हे काही माझं आवडतं पेय नाही, पण सोकाजी तू बिअरला असं हीन लेखावंस! उच्चभ्रू कुठचा!!
सोकाजी आणि इतर सर्व बिअरप्रेमींनीतरी 'डिस्कव्हरी'ने बनवलेला How beer changed the world* हा माहितीपट बघितला पाहिजे. (इतर अनेक माहितीपटांप्रमाणे अमेरिका थोर आहे आणि बाकीचं जग आता अस्तित्त्वात नाही असा किंचित आव आहे; शिवाय आपले दर्शक दुसरी ढ मधले आहेत असाही थोडा प्रकार आहे. पण त्याकडे थोडं दुर्लक्ष करा. यातले काही तर्कही किंचित अतिरंजित वाटतात, पण एक शक्यता म्हणून नाकारता येत नाही.)
ग्लिफ, शेळीच्या दुधाचं चीज (chèvre) आणि ठराविक प्रकारच्या फ्रेंच वारूणी म्हणजे स्वर्गच की हो!
(रक्तवारूणीप्रेमी) अदिती
*दुवा देण्याचा प्रयत्न फसतो आहे. यू ट्यूबवर हे नाव शोधलं की ४३ मिनीटांची क्लिप मिळेल.
8 Mar 2013 - 8:35 pm | सोत्रि
हेएएए........
ढिंग चिका... ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...
ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...
आज मै उपर, आसमां नीचं, आजे मै आगे, जमाना हे पीहे,
टेल मी ओ खुदा, अब मै क्या करू, आज मै उच्चभ्रू हो गया sssss
- (उच्चभ्रू) सोकाजी
8 Mar 2013 - 8:35 pm | सोत्रि
हेएएए........
ढिंग चिका... ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...
ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...ढिंग चिका...
आज मै उपर, आसमां नीचं, आजे मै आगे, जमाना हे पीहे,
टेल मी ओ खुदा, अब मै क्या करू, आज मै उच्चभ्रू हो गया sssss
- (उच्चभ्रू) सोकाजी
7 Mar 2013 - 2:30 am | प्रभाकर पेठकर
नशेसाठी नाही तर आवडते म्हणून मी पितो.
एकट्यात दारू पिण्यात मजा येत नाही (निदान मलातरी..) 'चार यार मिल जाए' तो अशा 'माहोल' मध्ये जास्त मजा असते. हलके-फुलके विषय, मनमोकळे विनोद, वेळेचे बंधन नाही आणि चमचमीत पदार्थ ह्या सर्व घटकांशिवाय दारूची मजा नाही.
आपली क्षमता प्रत्येकाने लक्षात ठेवून मोजूनमापून आस्वाद घेतला तर दारू प्रमाणाबाहेर चढत नाही. रंगाचा बेरंग होत नाही.
दारू पिणे ही सुद्धा एक कला आहे. कला सादर करताना कलेचा सन्मान अपेक्षित असतो कलेचा अपमान नाही.
सोत्रींचा अभ्यासपूर्ण लेख वाचनिय तर आहेच पण ज्ञानात भर घालणारा आहे.
वरती एका प्रतिसादात
वगैरे वगैरे सार्वत्रीकरण करणारे विधान वाचण्यात आले. पटले नाही.
असे विधान करण्यामागील उद्देश कळला नाही पण, गेली चाळीस वर्षे प्रसंगोपात्त दोन ते तिन पेग, 'पॅक' नाही, मी घेत आलो आहे. ना कधी गटारात पडलोय, ना कधी कोणी धरून घरी आणून सोडावे लागले आहे. ना अजून प्रमाण वाढले आहे की नाही वारंवारिता. गटारात पडणारे बहुतेक करून 'देशी', 'हातभट्टीची' पिणारे असतात. त्यांना दारू एवढी का चढते ह्याचे उत्तम विवेचन मुळ लेखात आहेच त्यामुळे त्यावर काही वेगळे लिहीण्याची गरज नाही. माझ्या मित्रपरिवारात आणि दूरदूरच्या ओळखितही जे 'घेतात' ते ते 'लिकर' घेणारे आहेत आणि त्यांच्या पैकी कोणीही कधीही गटारात वगैरे पडले नाही. असो.
7 Mar 2013 - 8:51 am | श्री गावसेना प्रमुख
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात अजुन तरी पेग(पेग घेणारे हे हुच्चभ्रु असतात कारण ते बीयर किंवा विदेशी घेतात म्हणुन) घेणार्यांच प्रमाण हे ५ ते १०% असाव्,बहुतेक हे देशी व हात भट्टीची (जी स्वस्त मिळते)पिण्यात धन्याता मानतात,
आजही तुम्ही जे हातमजुरीवर जगणारे असतात ते ,उदा:शेतमजुर्,खाणकामगार्,विटभट्टीवर काम करणारे,हातगाड्या ओढणारे हे तत्सम लोक हे बघा, हे आनंद यावा म्हणुन नाही पित ते त्यांच अंग जे काम केल्याणे ठणकत ते कमी व्हाव म्हणुन पितात्,जास्त काम केल तर जास्त पितात्,अजुन एक प्रकार म्हणजे वेगवेगळ्या मालवाहतुक गाड्यांचे ड्राइव्हर तेही अंग दुखत म्हणुनच दारु पितात स्वस्तातली जि की रस्त्याच्या ढाब्यावर विनासायास उपलब्ध असते.
विषारी दारु चे बळी अश्या बातम्या येतात त्यातले बळी हे मजुर असतात,
त्याच्यावर काही उपाय आता तरी दिसत नाही,
म्हणुन म्हणालो की जास्त पितात व गटारीत पडतात व वर जातात
7 Mar 2013 - 10:44 am | सुबोध खरे
साहेब,
जर श्रमिक लोक अंगदुखी साठी दारू पीत असतील तर त्यांच्या बायकांनी सुद्धा (ज्या स्वतः सुद्धा तितकीच मेहनत करतात) प्यायला हवी.अंग दुखी साठी अस्प्रोची गोळी फक्त २५-५० पैशात मिळेल. पण मजूर जास्त दारू पिता यावी म्हणून आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करताना आढळले आहेत. श्रमिक लोक नशेसाठीच दारू पितात. फक्त त्यांच्या खिशात पैसे नसल्याने ते स्वस्तात स्वस्त मिळेल ती पितात. दुर्दैवाने या हात भट्टी तर्हेच्या दारूच्या दर्जा बद्दल कोणतेही नियमन(मुळात बेकायदेशीर गोष्टीचे नियमन हाच विरोधाभास आहे) नसल्याने दारू मुळे विषबाधा हे प्रकार घडतात. पोलीस आणि हात भट्टीवाले यांचे साटेलोटे असल्याने हात भट्ट्या राजरोस पाने चालू असतात. देशी दारू ची दुकाने हि या प्रकाराला आला घालण्यासाठीच निर्माण केली पण अबकारी कर आणि "वरकड" खर्च यामुळे ती दारू हातभट्टी इतकी स्वस्त नसते.
आणि फक्त मजूर किंवा निम्न उत्पन्न गटातील लोकच दारू पिउन झीन्गतात किंवा गटारात पडतात हि वस्तु स्थिती नाही तर उच्च आणि अति उच्च गटातील लोकांची पण हि अवस्था होते पण त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे कौटुंबिक किंवा नोकर(ड्रायव्हर इ) असल्याने ते आपणास रस्त्यात पडलेले क्वचित दिसतात.
7 Mar 2013 - 9:48 am | सुमीत भातखंडे
लेख
7 Mar 2013 - 11:07 am | सुबोध खरे
सर्व साधारणपणे जगभर कोणत्याही संस्कृतीत स्त्रिया मद्य पान क्वचित/ कमी प्रमाणात करतात. याचे कारण मद्यपानाने स्वतः वरील ताबा जातो हे आहे.शील किंवा यौन शुचिता हा भाग वादासाठी सोडला तरी कोणतीही स्त्री हिआयुष्य भर एका काल्पनिक स्थितीपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाही ती म्हणजे बलात्कार. पहिली बलात्कारित रुग्ण स्त्री पाहताना हे विदारक सत्य मला जाणवले. मी त्या दुर्दैवी स्त्रीशी अत्यंत सहानुभूतीने वागत होतो त्यापेक्षा आमच्याबरोबर असलेल्या इतर स्त्रिया सिस्टर मेट्रन आया वगैरे यांचे वागणे मला जास्त ओलाव्याचे वाटले .
पुरुष असल्याने आपल्यावर बलात्कार होऊ शकतो हि भीती मला कधीच शिवलेली नव्हती. परंतु ६० च्या जवळपास असलेली मेट्रन सुद्धा त्या स्त्री शी जास्त एकरूपतेने इलाज करीत होती त्यावरून आणि तिच्या डोळ्यातून हि वस्तुस्थिती मला प्रकर्षाने जाणवली.
स्त्रियांचे शरीर अल्कोहोलचे विघटन पटकन करू शकत नाही म्हणून तेवढ्याच प्रमाणात प्यायलेली दारू स्त्रियांना पटकन चढते.तसेच स्त्रियांचा मेंदू हा पुरुषांच्या मेंदू पेक्षा रचनेने/ निर्मितीने वेगळा असल्याने त्यावर दारूचा परिणाम पटकन आणि जास्त प्रमाणात असतो.याच कारणासाठी स्त्रियांनी मद्यपान करायचे असेल तर विश्वासू लोकांबरोबर आणि सुरक्षित जागी करावे असा सल्ला आहे.दारूचा परिणाम पोटात असलेल्या बाळावर अतिशय वाईट होत असल्याने गरोदर स्त्रियांनी किंवा गरोदर होण्याची तयारी करणाऱ्या स्त्रियांनी मुलीसुद्धा मद्य पण करू नये. केवळ एक पेग सुद्धा न जन्मलेल्या बाळाच्या मेंदूवर प्रतिकूल परिणाम करू शकतो असे नवीन संशोधनात आढळले आहे.
तसेच अल्कोहोल हे आईच्या दुधात उतरत असल्याने दुध पाजणार्या आईने दारू मुळीच पिऊ नये.कारण बाळाच्या मेंदूची वाढ १ वार्हपर्यंत होत असते आणि या काळात मेंदूचा नाजूक सौन्द्नया केंद्रावर अल्कोहोल चा अतिशय वाईट परिणाम होतो.
8 Mar 2013 - 8:27 pm | सोत्रि
ह्यावर काही माहिती असल्यास वाचायला आवडेल.
- (अभ्यासू)सोकाजी
8 Mar 2013 - 9:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
... कारण प्रत्यक्षात निरीक्षणं थोडी वेगळी आहेत.
धार्मिक नसणार्या पश्चिम युरोपात आणि त्यांच्या तुलनेत फार जास्त धार्मिक असणार्या अमेरिकेत सुशिक्षित स्त्रियाही व्यवस्थित दारू पिताना दिसतात. तिथल्या टीव्ही-चित्रपटांमधेही बायका दारू पिताना दिसतात. (भारतातही प्रसिद्ध झालेल्या 'फ्रेंड्स' या अमेरिकन मालिकेत तिन्ही मुख्य स्त्रिया दारू पिताना दाखवलेल्या आहेत.) योनीशुचितेचं त्यांच्याकडे स्तोम नाही, एका रात्रीपुरते संबंध ठेवण्याबद्दल तिथे टॅबू नाही या गोष्टी इथे महत्त्वाच्या असाव्यात.
यूके, आयर्लंडमधे डॉक्टरच गर्भार स्त्रियांना मर्यादित प्रमाणात गिनेस बिअर घ्यायला सुचवतात (आणि अनेक आयरिश स्त्रिया हा सल्ला मानतात) असं ऐकून आहे. गिनेसमधे लोहाचं प्रमाण बरंच जास्त असतं. इथले काही आकडे चाळले; यूकेत स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी दारू पितात असं दिसलं. पण स्त्रियांचं दारू पिण्याचं प्रमाण दुर्लक्षणीय दिसत नाही.
स्त्रियांना बिअर आवडत नाही या सामान्य समजाच्या उलट, अमेरिकेत होणार्या एका 'ऑक्टोबरफेस्ट'मधे स्त्री-पुरुषांची संख्या (मोजली नाही पण) दिसतानातरी साधारण सारखीच दिसली. (याउलट भारतात, दिवसाउजेडीही काही ठिकाणी, दारूपासून लांब असतानाही रस्त्यावर, ऑफिसांमधे बायका फार कमी आहेत असं जाणवलं आहे.) मुंबईमधे एकेकाळी पब/बारमधे गेले असता मुलींची संख्या अजिबातच कमी नव्हती. कातकरी समाजातल्या स्त्रियाही दारूच्या व्यसनाला बळी पडल्याचं पाहिलेलं आहे. ठाण्यातल्या हातावर पोट असणार्या समाजातलीही अशी उदाहरणं आहेत. काहींना व्यसन, काहींचं अवलंबित्त्व फार नाही.
दारूची नशा वापरून बलात्कार होतात हे जेवढं खरं आहे तेवढंच खरं हे ही आहे की मैत्रिणीला दारू चढली तर दुसर्या दिवशीही तिच्या हँगओव्हरची काळजी घेणारे मित्र असतात. भारतातही असतात.
8 Mar 2013 - 10:06 pm | सोत्रि
सहमत, माझा जपानमधील वास्तव्यातला अनुभव अदितीच्या मतांशी जुळणारा आहे.
- (अधिक माहिती करून घेण्यास उत्सुक) सोकाजी
8 Mar 2013 - 11:16 pm | दादा कोंडके
"When a dog bites a man, that is not news. But if a man bites a dog, that is news."
असो. सुबोध खरेंचे प्रतिसाद वाचनीय.
8 Mar 2013 - 11:56 pm | सुबोध खरे
दादासाहेब
खाली दिलेली अमेरिकेतील सरकारी आकडेवारी भयावह आहे. माझ्या दुसर्या प्रतिसादातील CDC अमेरिका मधील संदर्भातून घेतली आहे
Each year, about 1 in 20 college women are sexually assaulted. Research suggests that there is an increase in the risk of rape or sexual assault when both the attacker and victim have used alcohol prior to the attack.18, 19
असे माझ्या बाबतीत होणार नाही हा फाजील आत्मविश्वास स्त्रियांना घातक ठरतो.अनोळखी जागी जुजबिच्या ओळखीच्या माणसांबरोबर दारू पिणे हे प्रगतीचे लक्षण नाही.ज्या माणसाबरोबर दारू पिता तो माणूस दारू प्यायल्यावर पशु होणार नाही हा फाजील आत्मविश्वासच नव्हे काय?
20 Mar 2013 - 6:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
दारूच्या आणि अन्य अंमली पदार्थांच्या नशेचा वापर करून बलात्कार केले जातात हे मान्य आहे. फक्त त्याचा परिणाम किती असा प्रश्न आहे. म्हणजे नशेत नसणार्या किती स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होतात आणि किती नशेत असणार्या किती स्त्रियांवर अत्याचार होतात. किती दारू प्यायलेली आहे हे ही महत्त्वाचं कारण एक ग्लास वाईन/एक पाईंट बिअर किंवा equivalent (मराठी?) दारू पिऊन गाडी चालवण्याचीही अनुमती अमेरिकेत आहे. (हे शरीराचं वस्तूमान ~६० किलो असल्यास). थोडक्यात हँड-आय कोऑर्डीनेशनही एकाच प्याल्यात जात नाही असा त्यांचा विदा.
असा विश्वास निर्माण होणं हे समाजाच्या प्रगतीचं लक्षण का नाही? पुरुषांना त्यांची लैंगिक भावना ताब्यात ठेवता येणं याला प्रगती का म्हणू नये? आणि मनुष्यांचं वर्तन खरोखरच दारूमुळे बदलतं का फक्त दाबून ठेवलेल्या भावना मेंदूवरचा ताबा सुटल्यामुळे उफाळून येतात?
स्त्रिया असहाय्य परिस्थितीत फक्त दारूमुळेच जातात असं नव्हे. आणि सगळेच पुरुष असहाय्य स्त्रियांचा गैरफायदा घेणारे असतात असंही नाही. (आणि आयुष्याचा बहुतांश काळ स्त्रिया गर्भार होण्यास उत्सुक किंवा गर्भवती किंवा दूध पाजत नसतात. 'हम दो-हमारा एक'च्या जमान्यात तर नाहीच; साधारण ५०-६० वर्षांच्या अडल्ट आयुष्यातली दोन वर्ष फारतर!)
21 Mar 2013 - 4:12 am | निनाद मुक्काम प...
शब्दाशब्दाशी सहमत
21 Mar 2013 - 11:32 am | विश्वनाथ मेहेंदळे
नाही. जुजबी ओळखीच्या माणसावर आंधळा विश्वास ठेवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे, प्रगतीचे नाही. सुबोध काकांनी शब्द मोजून मापून वापरले आहेत. परत एकदा वाचून बघ.
प्रगती नाही, प्रगल्भता म्हणता येईल. पण इतरांच्या प्रगल्भतेवर/अप्रगल्भतेवर आपला ताबा नसतो.
कशामुळेही बदलले वर्तन तरी बलात्काराच्या परिणामात काही फरक पडणार आहे का ?? कॉज आणि इफेक्ट याची गल्लत करू नये.
22 Mar 2013 - 3:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
जुजबी ओळखीच्या व्यक्तीबरोबर आपण बसमधून प्रवास करतो, गप्पागोष्टी करतो, टपरीवर चहा-शिग्रेटही होते. दारू पिणं तेवढं वाईट. (कारण दारू पिणं म्हणजे दारू पिऊन डायरेक्ट झिंगणं असंच असावं. वाईन टेस्टिंग, (ब्रिटीश पद्धतीच्या) पबमधे दारू विकत घेता-घेता वाढणार्या ओळखी, दारू पिऊन तात्पुरत्या वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर नेहेमीचा लाजाळू स्वभाव सोडून लोकांशी दिलखुलास बोलणं वगैरे सेन्सिबल गोष्टी येतच नसाव्यात. बाकी घरच्या आणि घरच्यांसारख्या जवळच्या लोकांबरोबर भरपूर दारू पिण्यातली मजा काय हे तर सांगतच नाही. लगेचच बलात्कार्यांमधे बहुतेक वेळा ओळखीचेच लोक असतात असं सांगितलं जाईल.)
दादा कोंडकेंनी वर लिहीलेलं आहेच, कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही, कुत्र्याला माणूस चावला ही बातमी होते. दारू पाजून मैत्रिणीवर बलात्कार केला ही बातमी असते. दारू चढलेल्या मैत्रिणीची काळजी मित्राने घेतली ही बातमी होत नाही. त्यातून मुळातच बदनाम दारूची अधिक बदनामीही सहजच करता येणार.
दिल्लीच्या प्रकारानंतर 'लोकसत्ता'च्या पुरवणीत मंगला सामंत यांचे दोन लेख आले होते. एक, दोन. हे जरूर वाचावेत. ही जी प्रगती आहे ही संपूर्ण समाजाची आहे, एकदोघांची आर्थिक, शैक्षणिक उन्नती नाही.
ही गल्लत कोण करतंय? बलात्कार होण्यामागची कारणं काय आहेत? बलात्काराचे त्या स्त्रीवर जे परिणाम होतात त्यात चूक तिची असते का पुराण्या, खुळचट कल्पनांना चिकटून रहाणार्या समाजाची? पीडीत व्यक्तीलाच दोषी मानणं तर सगळ्यात सोपं; ती आधीच अपमान झाल्यामुळे हादरलेली असते. मंगला सामंत काय म्हणतात, सामाजिक शास्त्राचे इतर अभ्यासक काहीही का म्हणेनात! दुवा
'निर्भया', सोहेला अब्दुलाली (दुवा एक, दुवा दोन) दारू प्यायलेल्या होत्या, रोज पेपरात "दारूच्या नशेतल्या स्त्रीवर बलात्कार झाला" अशीच बातमी असते. त्यात ती एकटी असते, लाचार असते, चार पुरुषांसमोर तिची शारीरिक शक्ती कमी पडते, तिला फसवून कोणीतरी तिच्या घरात शिरतं, असे काहीही तपशील त्यात नसतातच.
साधा प्रश्न आहे, किती टक्के बलात्कारांमधे 'बाईच्या दारूची नशा' हे मुख्य कारण आहे असं दिसतं?
---
What is this fuss about? योनीशुचिता, बलात्कार म्हणजे त्या स्त्रीचं आयुष्य बरबाद होतं इ. भोंगळ कल्पना असणार्या समाजात दारूचा संबंध बलात्काराशी लावला जातो याचं खरंतर मला पुनःपुन्हा आश्चर्य वाटू नये, पण साली सवयीची गुलामगिरी संपत नाही.
कोणीतरी बलात्कार करेल म्हणून बायांनी दारू प्यायची नाही, स्वतःला आवडतील, आनंद होईल असे कपडे घालायचे नाहीत, बुरखे नाहीतर कथकलीचे बोंगे घालून फिरायचं, सातच्या आत घरात यायचं, एकटीदुकटीने फिरायचं नाही, गुवाहाटीच्या पबमधे जाऊन पुरुषांशी वाद तर अजिबातच घालायचा नाही, व्हॅलेण्टाईन डे साजरा करायचा नाही ... सगळ्या मुक्त स्त्रियांनी मग सौदी अरेबियातच जाऊन का राहू नये? निदान तिथे पेट्रोलतरी स्वस्त आहे.
22 Mar 2013 - 10:00 am | पिंपातला उंदीर
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
22 Mar 2013 - 10:06 am | सुबोध खरे
अदिती ताई ,
माझा स्त्रियांनी दारू पिण्याबद्दल मुळीच आक्षेप नाही.त्यांना आनंदासाठी मद्यप्राशन करावेसे वाटत असेल तर त्यांनी ते जरूर करावे. केवळ एका विशिष्ट छोट्याशा कालावधीसाठी ( गरोदर होण्याच्या अगोदर) त्यांनी आपल्या होणार्या बाळाच्या मेंदू साठी ते करू नये असा मी (फुकटचा/ अनाहूत) सल्ला!! दिला आणि त्या शब्द बद्दल दिलगिरीसुद्धा व्यक्त केली. माझे म्हणणे फक्त एवढेच आहे कि स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्या आधी दोन वेळा विचार करावा.याचे कारण चूक त्यांची नसून समाजाची विकृत दृष्टी आहे. एखादी स्त्री सिगारेट किंवा दारू पीत असेल तर ती उपलब्ध(AVAILABLE) आहे असा विकृत अर्थ भारतातील पुरुष काढतात हि खेदाची गोष्ट आहे.
बलात्कारात स्त्रीची नशा नसून पुरुषांची नशा हि मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. आपण जर मूळ/ नैसर्गिक प्रवृत्ती(instinct) पहिले तर आहार निद्रा भय नि मैथुन या मूळ प्रवृत्ती आहेत या चा विपर्यास झाल्यास माणूस विकृत वर्तन करताना आढळतो. उदा झोप, भूक, भीती किंवा लैंगिक भूक अनावर झाली तर माणसाच्या हातून गैरवर्तन होते.दारू मुळे सद्सदविवेक बुद्धी शिथिल होते आणि मेंदू ची काही केंद्रे उत्तेजित होतात त्यामुळे शेळी असलेला माणूस सुद्धा गैरकृत्ये करण्यास धजावू शकतो. म्हणून सार्वजनिक ठिकाणी जुजबीच्या ओळखीच्या माणसाबरोबर मद्य प्राशन करणे हे प्रगतीचे लक्षण नाही असे मी म्हटले आहे. कारण जुजबिच्या ओळखीचा माणूस आपल्यासाठी इतर नरपशू विरुद्ध किती मदत करील याची शंका वाटते.
उलट्या दिशेने जोरात येणाऱ्या ट्रकशी वाद घालण्यापेक्षा त्याच्या रस्त्यातून बाजूला होणे हे दुचाकी वाहनास जास्त श्रेयस्कर असते.कारण कोण चूक आणि कोण बरोबर याचा निवाडा करण्याची ती वेळ नाही.
पुरुषांच्या लैंगिक प्रवृत्तीवर ताबा ठेवणे हि मंगलताई म्हणतात तितकी सोपी गोष्ट असती तर प्रत्येक डॉक्टर ला किंवा पोलिस ला स्त्रियांची तपासणी करण्यासाठी आणखी एक स्त्री हजर राहणे(LADY ATTENDANT) "जगभरात" बंधनकारक ठेवले नसते
शेवटी हि स्वयंचलित (AUTONOMIC) मज्जासंस्था आहे आणि ती आपल्या मेंदूच्या अखत्यारीत येत नाही. तरुणपणात विरुद्ध लिंगी सुंदर व्यक्तीचा साधा स्पर्श सुद्धा विजेचा झटका देतो.तेंव्हा आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीवर ताबा मिळवणे वाटते इतके सोपे नाही.मर्यादा पुरुषोत्तम फार क्वचित मिळतात.
आपला सात्विक संताप समजू शकतो.पण हे जग आपण म्हणता तितके समतोल आणि न्याय्य नाही हि दुर्दैवी गोष्ट आहे आणि भारतात विशेषतः उत्तर भारतात स्त्री हि उपभोग्य वस्तू मानली गेल्याने चूक कोण आणि बरोबर कोण हे न पाहता स्त्री लाच दोषी ठरवले जाते.
मी हा विषय माझ्यापुरता संपवला होता पण आपला सात्विक संताप पाहून मला उत्तर् द्यावेसे वाटले.
क लो अ.गैर समज नसावा
24 Mar 2013 - 7:51 am | निनाद मुक्काम प...
आमच्या गावात होळी व धुळवड अशी साजरी करतात. जर्मनीच्या अनेक प्रमुख शहरात धुळवड साजरी करतात ,त्यांच्या पद्धतीने
ह्यात
ह्या वर्षी मी पण जाणार आहे ,
पाण्याशिवाय होळी खेळायला
रंगात नाहून निघायला ,
पाण्यापेक्षा बियर समवेत होळी साजरी होणार.
सगळ्यांना खुले आमंत्रण आहे ,
येथे बियर चे प्याले रिचवले जातात
पण डॉक्टर साहेबांनी जे सनातन विचार सोत्री ह्यांच्या धाग्यात मांडले तसे अती दारू महिला व पुरुषांनी एकत्र पियुन सुद्धा येथे गैर प्रकार होत नाहीत ,ऑक्टोबर फेस्ट मध्ये सुद्धा होत नाहीत ,
अनेक बायका तेथे दारवा रिचवतात , त्यांच्या कामेच्छा वाढल्या नाहीत व मी दोन वेळा तेथे होतो , माझ्या बाबतीत काहीही दुखद घटना न घडता घरी परत आलो ,
निदान येथील महिलांनी व पुरुषांनी डॉक्टरांची मते वाचली असती तर माझ्या सारख्या अनोळखी व्यक्ती च्या बाजूला बसून मद्याचे प्याले रिचवले नसते
गैर प्रकाराला दारू पेक्षा समाज व त्याची मानसिकता , महिलांच्या प्रती वागणूक जो आदितीचा मुद्दा होता ,ते जबाबदार असतात , उगाच दारूला बदनाम कशाला करायचे
.
,विषय माझ्या हि दृष्टीने संपला होता ,पण तुम्ही दारू बाबतीत जे अगाध मत मांडले म्हणून परत लिहिले , ज्या समाजात महिला व पुरुषांना समान संधी व महत्व आहे , जेथे महिला व पुरुष पूर्ण शुध्धीत एकाच रेल्वेच्या डब्यातून सुरक्षित रीत्या प्रवास करू शकतात , असा प्रगत समाज माझ्या मते अदितीला अभिप्रेत होता ,
भारताला कमी लेखण्याचा प्रश्न नाही , प्रत्येक समाजाच्या काही समस्या असतात , काही उणीवा असतात पण महिलांचे समाजात स्थान ह्या मुद्यावर येथील समाज नक्कीच प्रगल्भ आहे.
आपल्याकडे उगाच दारूवर नाहक खापर फोडण्यात येते तेव्हा राहवत नाही ,
हरिवंश बच्चन ह्यांच्या मधुशाला मधील रुबाली एकदा वाचाच ,दारू सारखी निर्मळ गोष्ट जगात नाही.
जीचा डबल पेग मारला की विवाहित पुरुषाला क्षणार्धात सिंगल झाल्याचा क्षणिक आनंद मिळतो ,
बालक पालक सारखा सिनेमा पाहून जनता प्रभावित होते ,पण सरकार होत नाही ,
आणि ते चुकून झाले तर विरोधक राजकारणाच्या पायी झालेले निर्णय रद्द करायला लावतात.
24 Mar 2013 - 9:17 am | पिंपातला उंदीर
+११११११११११११११११११
24 Mar 2013 - 10:02 am | अमोल खरे
निनाद- खुप दिवसांपासुन चर्चा वाचतोय. तुमचे आंतरराष्ट्रिय घडामोडींवरचे प्रतिसाद वाचनीय असतात. मी ते आवर्जुन वाचतो. पण इथे तुम्ही काहीच्या काही भरकटला आहात असे माझे स्पष्ट मत आहे. डॉ. खरे ह्यांनी दारु प्यायल्याने काय प्रॉब्लेम होऊ शकतात हे सांगितलं आहे. त्याचा स्वत:ला वाट्टेल तसा अर्थ प्लीज लावुन घेऊ नका. भारतात स्त्री पुरुष समानता नाही हे वास्तव आहे. ती यायला हवी हे १००% मान्य. पण जो पर्यंत ती येत नाही, तो पर्यंत स्त्रीयांनी स्वतःला सांभाळुन राहिलं पाहिजे हे तर तुम्हीही मान्य कराल. बाकी मिपावरील काही स्त्री आयडींबद्दल बोलायला नको. पेठकर काकांनी खुप पुर्वी अशाच काळजीपोटी सल्ला दिला होता तर एक स्त्री आयडी त्यांच्यावर गरज नसताना टीका करत होता. अर्थात मेजॉरिटी लोकांना पेठकर काकांचे बोलणे व्यवस्थित समजले असल्याने त्या आयडीवरच लोकं हसत होते. त्याच आयडीने हा प्रयत्न वर केला आहे. तुम्ही प्लीज वैयक्तिक मतं बाजुला ठेवुन डॉ खरेंचा प्रतिसाद वाचा. अनोळखी लोकांबरोबर दारु पिऊ नये असे सांगण्यात काय चुक आहे ? ते स्वतः डॉक्टर आहेत, दारुचे दुष्परिणाम त्यांना आपल्या सर्वांपेक्षा जास्त माहित आहेत. तुम्ही लगेच श्रीखंड पुरी, मिसळ आणि दारुची तुलना कोणत्या लॉजिकने करताय ? आज तुमचा एक चाहतावर्ग आहे, ज्यात मी पण येतो. उद्या त्यातील एखादा जर मी पण दारु पिऊन बघतो असं म्हणत त्याच्या आहारी गेला तर ? तुम्ही स्वतःला व्य्वस्थित कंट्रोल करत दारु पिताय, काय गॅरेंटी आहे की दुसरा माणुस पण तसंच करेल ? तेव्हा प्लीज गैरसमज करु नका. दारु प्रमाणाबाहेर घेतली की मेंदुवरचा कंट्रोल जातो हे शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या सारखा किंवा पेठकर काकांसारखा कंट्रोल सगळ्यांचा नसतो. तेव्हा दारु प्यायल्याने काहीही होत नाही असं प्लीज बोलु नका. श्रीखंड किंवा मिसळ जास्त खाल्ली तरी माणुस गैरवर्तन करुन चेष्टेचा विषय होत नाही, त्यामुळे प्लीज अशी तुलना करु नका. डॉ खरेंनी ओव्हरऑल काळजीपोटी वरील स्टेटमेंट केली आहेत. त्यांना प्लीज उपदेश वगैरेचे लेबल लावु नका. बाकी आपण सुज्ञ आहातच. आपल्या सद्सदविवेकबुद्धिला जे योग्य वाटेल ते कराल अशी आशा आहे.
24 Mar 2013 - 11:20 am | सोत्रि
नेमका आक्षेप कळला नाही. म्हणजे दारु पिऊन माणूसाने गैरवर्तन केले नाही आणि चेष्टेचा विषय झाला नाही तर दारु आपोआप चांगली मानली जाईल का?
माझेही असेच मत आहे पण ते तुमच्या प्रतिसादांबद्दल आहे.
नाण्याला जशा दोन बाजू असतात तश्याच त्या दारु बद्दलही असणारच ना?
डॉक्टर जशी एक बाजू मांडत आहेत (काळजीपोटी) तशीच निनादही त्याची बाजू मांडत आहे (जो मूळ लेखाचाही उद्देश होता). त्यामुळे फक्त डॉक्टरच बरोबर आणि निनाद भरकटला आहे हे जरा अवास्तव वाटते.
- (सद्सदविवेकबुद्धिला जे योग्य वाटेल तेच करणारा) सोकाजी
अवांतरः प्रतिसादातिल बाकीचे वैयक्तिक उल्लेखही भरकटलेले वाटले.
24 Mar 2013 - 11:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
खरे, तुमची ही वाक्य निवडून पुन्हा चोप्य-पस्ते करण्यामागची तर्कविसंगती आपली आपणच समजेल का तेव्हा तोफ डागल्यानंतर जसा मेलोड्रामा केला गेला होता तसा केल्याशिवाय काहीच समजत नाही?
(तुम्हाला नाही समजलं तर आग्रह नाही; पाशवी शक्ती असला मेलोड्रामा करत नाहीत.)
---
डॉक, दारूचे दुष्परिणाम मला माहित नाहीत असं अजिबात नाही; पुस्तकं वाचून आणि प्रात्यक्षिकातूनही! तसं म्हटलं तर कोणतीही गोष्ट अति करण्याचे दुष्परीणाम असतात आणि दोन-चार क्लिक करून कोणत्याही सुशिक्षित माणसाला ते समजू शकतात.
प्रमाणात घेतलेली व्हिस्की, रम, व्होडकात फार काही पोषण नसतं हे मलाही माहित आहे. (रक्त वारूणी सोडूनच देऊ तिच्यातून शरीराला आवश्यक असे काही पोषक पदार्थ मिळतातच.) पण प्रमाणात आणि/किंवा वर्तन ताब्यात ठेऊन दारू पिऊन लोकांना जो आनंद मिळतो तो ही विटाळलेला आहे अशी भूमिका घेणं कितपत योग्य आहे? अशीच भूमिका ज्या शारीरिक संबंधांतून मूल होणार नाही त्यांच्याबद्दल ख्रिश्चन धर्माने घेतलेली होती/आहे. एकेकाळी विधवेने आनंददायक कोणतीही गोष्ट करू नये, शरीराचे काहीही लाड करू नयेत असं आपल्याच समाजात समजत असत. "शिरापुरी फार चापू नका" असं जे तुम्ही लठ्ठ रुग्णांना सांगत असाल तीच गोष्ट लोकं तरूण विधवांना एक घासही खाण्यापासून थांबवण्यासाठी सांगायचे. दारूड्याला जी गोष्ट सांगता तीच गोष्ट हेल्दी लाईफस्टाईल असणार्यांना सांगता का? ही आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी नाही का?
प्रमाणात दारू पिणारे लोकं तुम्ही फार पाहिले नसतील, मी आत्तापर्यंत एकाही माणसाला दारू पिऊन दुर्वतन करताना पाहिलेलं नाहीये. एखाद्याला दारू जास्त झालीच तर स्त्रियांसमोर बेईज्जती व्हायला नको म्हणून अधिक काळजी घेताना, लाजताना पाहिलेलं आहे. आपल्या व्यवसाय-शिक्षणामुळे आपल्याला समाजाच्या वेगवेगळ्या थरांमधली माणसं दिसणार. म्हणूनच मी आधीच्या प्रतिसादात वाईन-टेस्टींग, पबमधला दिलखुलास व्यवहार यांचा उल्लेख केला. हा लेखही दारूच्या शैक्षणिक बाजूबद्दल आहे, अतिसेवनासंदर्भात नाही. तरीही दारू वाईटच असा सरसकटीकरणाचा धोका विज्ञानाचं शिक्षण घेतलेला माणूस घेतो हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. पेनिसिलीनचाही ओव्हरडोस होऊ नये याची काळजी घेतात ना?
सात्त्विक संताप? माझा रोजच्या रोज सात्त्विकच काय प्रत्यक्ष संताप होतो. रोज कोणीतरी हरामखोर, बाईने अंगभर कपडे घातले असले तरी तिने कपडे घातलेले नाहीच अशा पद्धतीने तिच्याकडे पहाताना भारतात दिसतो तेव्हा संताप होतो. आणि पुन्हा संस्कृतीचा ठेका घेतलेले स्वयंघोषित मुतव्वे त्या हरामखोरांचा फारतर त्यांच्या मागे निषेध करून "तुम्ही अजून थोडे कपडे का घालत नाही? आम्ही तुमच्या काळजीपोटीच बोलतो" असं त्या बायांनाच म्हणताना भयंकर हास्यास्पद वाटतात. सोहेला अब्दुलालीने आपल्या पोलिसांनी, न्यायव्यवस्थेने तिच्याशी काय वर्तन केलं ते लिहीलेलं आहेच; आणि आता ३२ वर्षांनी आपण तिथेच! या असल्या हास्यास्पद मुतव्व्यांना चुपचाप मधलं बोट दाखवणारा जाफर पनाही अजून १८ वर्ष नजरकैदेत अडकून पडलेला असेल या विचाराने थरकाप होतो. बहुदा इराणमधला "मेजॉरिटी" शिक्षित वर्गही या मुतव्व्यांच्या विरोधात बोलायला तयार नाही.