......गेल्या वर्षी मी शिवाजी ट्रेल या संघटने बद्दल माहितीवजा लेखन इथे केलं होतं... http://misalpav.com/node/20831 ...
तसा दरवर्षी नवा गड असतो..पण गेल्याच वर्षी क्षिरसागर सर(शिवाजी ट्रेलचे प्रमुख आणी सर्व काही...) म्हणाले होते,की हा गड अतिशय दुर्लक्षित आणी विषेश निधि न मिळालेला असल्यानी याचं काम २/३ वर्ष चालेल...त्यामुळे गेल्या वर्षीच्या धाग्याची लिंक मुद्दामच डकवली आहे...कारण या वर्षीही तोच किल्ला आहे...
घनंगड
(कार्यक्रम वेळ-सकाळी ८ ते दुपारी-२/दिनांक-२४/२/१३ रोजी)
शिवाय काहि जणांनी धाग्यावर तसेच संदेशातून या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा गेल्या वर्षीच दाखवली होती .... त्यांच्या सह सगळ्यांनाच या दुर्गपुजेला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण.... :-)
@कसे याल??? ----
मुंबईहुन येणार्यांना लोणावळ्यातून सहारा सिटि/अँबीव्हॅलीकडून येता येते,पुण्यातून येणार्यांना चांदणीचौक-पौड-ताम्हिणी घाटातून-लोणावळा फाट्यावरून आत १७ कि.मि.... असेही येता येते...
http://maps.google.co.in/maps?hl=hi&q=घनगड&psj=1&bav=on.2,
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%98%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1
@दिनांक-२४/२/२०१३ ...
शिवाजी ट्रेल ही दुर्ग संवर्धन संघटना नक्की काय करते???
>>>--- तर...,या विषयावर माझ्या गेल्या वर्षी लिहिलेल्या याच विषयांतर्गत धाग्यावरील काहि तपशिल इथे पुन्हा 'उचलून-लावतो' ---
गेली तीन वर्ष मी या शिवाजी ट्रेलच्या दुर्गपुजा अभियानाचा एक भाग झालेलो आहे.गेली पंधरा वर्ष ही संस्था हा दुर्गविकसनाचा एक अतिशय उपयुक्त कार्यक्रम यशस्वीपणे राबवत आहे.ही संस्था दरवर्षी एक गड दत्तक...होय दत्तकच घेते..आणी मग वर्षभर गडावरची सगळी डागडुजी,रोपिंग,पाण्याच्या टाक्या साफ करणे/सु-रक्षित करणे,पायर्या दुरुस्त करणे/आवश्यक आणी शक्य तिथे नव्या बनवणे...अशी अनेक कामं,अचाट परिश्रम,आणी अभंग निष्ठेनी करत असते.आणी हे सगळ काम चालतं ते कुठेही जाहिरातबाजी न करता,लोकांनी काम आणी ही गडकोटांप्रती असलेली ममता/निष्ठा पाहुन आपणहुन दिलेल्या वर्गणीतुन..या शिवाय जो उरलेला खर्चाचा मोठ्ठा भाग असतो,तो शिवाजी ट्रेलचे सभासद स्वतःच्या खिशातुन पूर्ण करतात...या कामातला ''आर्थिक'' भाग मी मुद्दाम आधी सांगितला,कारण शिवाजीचं नाव घेऊन राजकारण करणार्या/सत्तेवर येणार्यांना ही कामं करणं(आर्थिक दृष्ट्या) खरतर कित्ती सोप्पं,पण जिथे राजकीय मलिदा मिळत नाही,तिथे ही लोकं कधी ढुंकुनही बघत नाहीत... अश्या परिस्थितित या संस्थेनी येणारा पैसा आणी क्षीरसागर सरांच्या अफाट मॅनेजमेंट मधुन दरवर्षी वाढत्या संख्येनी जमणारी कार्यकुशल लोकं,,,एवढ्या बळावर शिवबाच्या या महाराष्ट्रातले पंधरा गड आज येण्यालायक/रहाण्याजोगे केलेले आहेत...वर्षभर खपुन डागडुजी केलेल्या अश्या प्रत्येक गडावर फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी सत्यनारायण असतो... आणी क्षीरसागर सरांच्या एका शब्दावर वय वर्ष ७ ते वय वर्ष ७० ची अनेक मंडळी हजेरी लावत असतात... हा एक रविवार म्हणजे वर्षभर केलेल्या मेहेनतीचा खराखुरा लोकार्पण सोहळाच असतो.
अश्या या खर्याखुर्या सामाजिक उपक्रमातल्या,या सोहळ्याला सर्व दुर्गप्रेमींन्नी सस्नेह यावे... हे आग्रहाचे निमंत्रण.
खाली शिवाजीट्रेलचा हॉटलाइन नं टाकत आहे... तसेच येऊ इच्छिणार्यांनी याच आवाहन धाग्यावर कळवावे... काहि शंका असल्यास विचारावे ही विनंती. ...(कार्यक्रम वेळ-सकाळी ८ ते दुपारी-२/दिनांक-२४/२/१३ रोजी)
शिवाजीट्रेलचा हॉटलाइन नं- ८८८८५०००५५ (कार्यक्रम वेळ-सकाळी ८ ते दुपारी-२/दिनांक-२४/२/१३ रोजी)
================================================================
या खाली दिलेल्या फेसबुक लिंकवर-घनगड पायथ्याथी आणी इतरत्र केलेल्या-(करत असतानाच्या) कामाचे फोटो आहेत.
http://www.facebook.com/media/set/?set=a.555848947773463.126052.10000045...
====================================================================
प्रतिक्रिया
22 Feb 2013 - 6:17 am | मोदक
उपक्रमास शुभेच्छा..
22 Feb 2013 - 8:59 am | तर्री
माझ्याही शुभेच्छा !
22 Feb 2013 - 9:01 am | प्रचेतस
शिवाजी ट्रेक आणि क्षीरसागर सर यांच्या कार्याविषयी माहिती होतीच. दुर्गसंवर्धनाचे कार्य ते मोठ्या तळमळीने करत आहेत.
उप्रकमास शुभेच्छा.
22 Feb 2013 - 9:17 am | नानबा
येण्यात रस आहे. थेट तिकडेच यावे की आधी कोणाला कळवावे लागेल?
22 Feb 2013 - 10:05 am | अत्रुप्त आत्मा
कळविण्याचि आवश्यकता नाहि. डायरेक्ट या. :-) काहि अडचण असल्यास मला व्यक्तिगत निरोप पाठवा.
22 Feb 2013 - 1:00 pm | मितभाषी
शुभेच्छा
22 Feb 2013 - 1:08 pm | बॅटमॅन
उपक्रमास प्रचंड शुभेच्छा!!!!!
22 Feb 2013 - 11:44 pm | अविनाशकुलकर्णी
उपक्रमास शुभेच्छा!!!!!
20 Feb 2015 - 7:50 pm | अत्रुप्त आत्मा
राम राम मिपाकर हो!
दिनांक २२ रोजी (पर्वा)
किल्ले चावंड (जुन्नर) येथे शिवाजी ट्रेल संघटनेची प्रतिवार्षिक दुर्ग पूजा आहे. आपणा सर्वांना सस्नेह निमंत्रण आहे.
Shivaji trail Chavand fort restoration
youtube.com
या वर्षी(२०१४/१५) ट्रेल ने चावंड किल्ला तेथील सर्व डागडुजि चे काम करण्यास्त्व घेतला होता.
तो पूर्ण झाला. त्या निमित्त हा गडाचा लोकार्पण सोहळा आहे/असतो.
मी उद्या संध्याकाळी ६ किंवा पर्वा पहाटे ५ वाजता जाणार आहे. मला तेथे २२रोजी सकाळी ८वाजता दुर्गपूजे निमित्तानि होणारी सत्यनारायण पूजा सांगण्याचे काम असते आपण कोणी माझ्या बरोबर येऊ इच्छित असाल तर तसे व्य नि त कळवा. अथवा स्वतंत्र येऊ इच्छित असाल, तर २२ ला सकाळी तिकडे येण्याचे करा. :)
======================
20 Feb 2015 - 8:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जॅक समन्वय समिती =))
21 Feb 2015 - 10:46 am | अत्रुप्त आत्मा
दू... दू... दू... ! =))
21 Feb 2015 - 11:02 am | डॉ सुहास म्हात्रे
प्रशंसनिय उपक्रमास अनेकानेक शुभेच्छा !
21 Feb 2015 - 7:54 pm | कंजूस
दोन चार फोटो टाका इकडे नंतर. चावंडला वरती पूवी राहिलो आहे. आता उद्या येत नाही पण उत्सुकता आहे काय केलं आहे याची.
22 Feb 2015 - 8:02 pm | अत्रुप्त आत्मा
२ दिवसानी १ छोटे खानी वृत्तांतच टाकणार आहे. फोटोज ,व्हिडिओ सह. :)