समाधी
वेगळी धुंदी इथे अन्
वेगळा हा बाज आहे.
वेगळे हे विश्व आणी
वेगळा हा साज आहे.
शांत सारे हे स्वयंभू
शांत इथला नाद आहे.
शांतिचे संगीत म्हणूनी
कोकिळाही शांत आहे.
बंद होती येथ वाटा
बंदिचे संगीत आहे.
आज बंदी पाहिली मी
मुक्त येथे गात आहे.
बंदिचेही शब्द ऐसे
मानसीचा साज आहे.
सुप्तता अन् शांततेचा
मूळचा आवाज आहे.
बोलण्यासी आतुरे तो
खोल आतलाच आहे.
आज या ही..कारणाने
मुक्त तो ही होत आहे.