देवी शारदेचे स्वरूप
गणेशोत्सवाची धामधूम संपली. आता नवरात्रीची सुरु झाली. नवरात्रीचा संदर्भ प्रभू रामचंद्राच्या चरित्रातील रावणवध व लंकाविजयाशी जोडला जातो, पण तो प्रामुख्याने जोडला जातो तो देवीमहात्म्याशी. ब्रह्मा-विष्णू-महेश या तीन देवांप्रमाणे दुर्गा-लक्ष्मी-सरस्वती या तीन देवतांकडे आपल्या जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांचे कारकत्व जोडले गेले आहे. देवी दुर्गेची उमा, सती, पार्वती, काली, चंडी अशी अनेक रूपे, त्या त्या वेळी तिने केलेले मोठया, बलाढय राक्षसांचे निर्दालन किंवा घोर कठोर तपश्चर्या यांच्या कित्येक कथा-पुराणांतून वर्णन केल्या आहेत.



