(पप्पूबाळा)
स्वतःची अक्कल इवलीशी
दुसऱ्याकडे ही असे थोडीशी
हे मान्यच नाही तयासी
काय म्हणावे या वृत्तीसी
पप्पूबाळा
मम्मा मॅडम मुग गिळीती
बडवून कापाळास घेती
पाहूनी तव मंदमती
जी तुझ्या खानदानाची महती
पप्पूबाळा
कैसी खांग्रेसची प्रगती
कैसा खांग्रेसचा नाश
केवळ असे दैवदूर्विलास
त्याचे दु:ख असे कोणास?
पप्पूबाळा
दुराग्रही,अहंकार ग्रस्त
जनतेस करुनी त्रस्त
ज्ञान स्वतःचे पाजळतोस
का विदुषकासम वागतोस?
पप्पूबाळा