प्राची ताईंनी केलेले या मोठ्या दुनियेचे वर्णन आपल्या मिपा वर्ल्ड ला पण चपखल बसते.
"गंमत केली" म्हणालास तू
मिपा वर पण सगळे पेटले
तुलाही ठाऊक मलाही ठाऊक
खरे कोण अन् खोटे कुठले.
प्रतिक्रियले असंख्य त्यावर
धागा नवा तू जेव्हा काढला
मते वाचता एकेक खवचट
मनी असंख्य तरंग उठले.
नुसते +१, ठाक कोरडे
पोचते तरी बघ बोच त्यातली.
आभ्यास वाढवा, चपला घाला
डू आयडी ने पिंकून टाकले .
म्हणो कुणी ही मिपा दुनिया
नाही शाश्वत फक्त दिखावा.
तुलाही ठाऊक मलाही ठाऊक
खरे कोण अन् खोटे कुठले.
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
17 Dec 2019 - 1:17 pm | राघव
भारी जमलंय! :-)
17 Dec 2019 - 4:57 pm | प्रचेतस
=))
17 Dec 2019 - 7:09 pm | मुक्त विहारि
जमलं
18 Dec 2019 - 10:11 am | mrcoolguynice
"विडंबन केले" म्हणातोस तू
मधात लाठी घोळू तू अनेका तुडवीयले
"पैजार" म्हणो मिरवीशी स्वतःले
तरी मिपावरील मिनी "ज्ञाना"च तू
तुलाही ठाऊक मलाही ठाऊक
खरे कोण अन् खोटे कुठले.
19 Dec 2019 - 4:23 pm | प्राची अश्विनी
:):)
वाटच पहात होते तुम्ही कविता दखलपात्र करण्याची.
पण जुनं मिपा राहिलं नाही हो.
27 Dec 2019 - 12:34 am | एस
+'पुमिराना'..!
19 Dec 2019 - 6:10 pm | जॉनविक्क
दण्डवत_/\_
19 Dec 2019 - 11:45 pm | गणेशा
भारी
22 Dec 2019 - 12:43 am | चांदणे संदीप
कोडाईकनालला जाऊन गरम पाण्याच्या कुंडात हातपाय तोंड धुतल्याचा फील आला. अर्थातच झकास!
पैजारबुवा कधीबी निराश ना कोरबे! =))
सं - दी - प