Skip to main content

दुपार

लेखक शैलेन्द्र यांनी बुधवार, 18/09/2019 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या पैंजनाची गाज, त्यात रेंगाळे दुपार, विसावल्या सतारीची जणू छेडियली तार, तिच्या कपाळी जी बट त्याला कुंकवाची तीट, लाल रेशमी लडीची, तिच्या गालाशी लगट तिच्या पाठीची पन्हाळ त्यात घामाचा पाझर, तिच्या नाजूक कटीला, शोभे नाजूकसा भार.. तिच्या बाहूंचा मांडव, लावी मदनाला वेड, तिची महकती काया तिचे ओझे अवघड.. सुस्त दुपारच्या वेळी, ती येते का सामोरी, मन हलते हलते, त्याला सांभाळावे कोणी? - शैलेंद्र.
काव्यरस

वाचने 16887
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

सुरेख!! (तीट तो आणि बट ती असते ना? तिच्या कपाळी जी बट "तिला कुंकवाचा तीट" अशी हवीय का ती ओळ?..)

In reply to by यशोधरा

अर्रर्रर्रर्र, परत शाळेत जायला पाहिजे मी (अजून दिवे लावायला ) :)

मस्त! बऱ्याच दिवसांनी चांगली कविता वाचायला मिळाली. Sandy