चल परत नव्याने सुरू करू सारे
चल परत नव्याने सुरू करू सारे
ओळख नव्हती कधीच आपली असे पुन्हा भेटू
डोळ्यात येईलच पाणी माझ्या
त्या अश्रुं समेच आपले अहं पण विरघळून टाकू
खूप पहिले आपण हिशोबचे जगणे
त्या पल्ल्याड जाऊन फक्त आपल्यासाठी जगू
असेल अजूनही अल्लड बालपण आपल्यातही
त्या निरागस पणाची थोडी चव चाखून पाहू
चल बरोबर मिळून चालू जरासे
हृदयातील स्वप्नापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू
आयुष्यात असणारच वळणे थोडीशी गहिरी
त्यातूनच आपल्या प्रेमाचा अर्थही नव्याने उमजू