दिल्ली विधानसभा निवडणूक

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
22 Jan 2025 - 12:04 pm

दिल्लीत येत्या पाच फेब्रुवारीला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार. दिल्लीत भाजप आप आणि कांग्रेस मध्ये तिरंगी लढत आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे ठरविण्यासाठी तिन्ही पक्षांची निवडानूकीसाठी किती तैयारी आहे हे पाहण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

समाजविचार

चूक-२

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
20 Jan 2025 - 11:08 pm

मी त्याला नेहमी पाहायचे, पण लक्ष द्यायचं नाही ठरवलं होतं. माझं आयुष्य वेगळं होतं, माझे स्वप्न वेगळे होते. साधीशी मी, काळीसावळी, पण स्वाभिमान माझ्या मनात होता. घरची परिस्थिती हलाखीची होती, बाप दारू पिऊन मरून पडलेला, आई आणि लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर होती. कॉलेजला सायकलने जाणं, वर्गात शिकणं, आणि घरी आल्यावर आईला मदत करणं – हेच माझं रोजचं जगणं.
पण त्या वर्गात तो होता. त्याचं आणि माझं काहीच कधी जुळलं नव्हतं. वर्गातल्या इतर मुलांसारखा तोही माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा. सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण मग त्याच्या बोलण्याची मर्यादा ओलांडली जाऊ लागली.

कथाप्रकटन

सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
20 Jan 2025 - 12:47 am

प्रस्तावना :
१. सर्वच लोकांची बुध्दीमत्ता समान नसते. हे अगदी वैश्विक सत्य आहे. आणि आपल्याला हे अगदी लहानपणापासुन माहीती आहे. त्यामुळे सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे , अनुभवाला आलेच पाहिजे असा आपला हट्ट किंवा दुराग्रह नाही.
२. मुळात कोणाला काही तरी कळावं ह्यासाठी काहीही खटाटोप करणे ह्यात आपला काय फायदा ? आपण आपल्या स्वानंदासाठी लिहावं . आपलं आपल्याला कळाल्याशी मतलब. आपल्याला जे कळलं अनुभवाला आलं त्याचेच निरनिराळे पैलु आपणच उपभोगावेत ह्यासाठी लिहावे हे उत्तम !
३. स्वान्तःसुखाय म्हणतात ते हेच !
___

सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स

भाषाव्याकरणअनुभव

चूक

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
20 Jan 2025 - 12:44 am

तिची ती संतापी नजर मला सतत विचारत असते, “माझी काय चूक होती? माझ्या येण्याने तिच्या आयुष्यात एवढा मोठा बदल होईल, याचा मला कधीच अंदाज नव्हता.
आम्ही दोघे एकाच कॉलेजात होतो. कॉलेजातील ती रग माझ्या अंगातही होती. ती आणि मी एकाच वर्गात होतो. साधी काळीसावळी, पण नीटनेटकी ती. रोज सायकलवरून कॉलेजला यायची, एक दिवसही गैरहजर राहायची नाही. कँटीनचा नाश्ता परवडणार नाही, म्हणून तिच्यासारख्याच चार मुलींसोबत घरून आणलेला डबा खायची.

कथाविचार

कराडची मुलगी

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
18 Jan 2025 - 12:37 pm

नावात काय आहे ? असं कुणीतरी म्हटलंय ! आपण नवीन व्यक्तीला भेटलो किंवा नवीन व्यक्ती आपल्याला भेटली की आपोपाप पहिला प्रश्न हाच विचारला जातो " नाव काय तुझं ? आणि याचं उत्तर देताना चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहत असेल तर ?

कलासमीक्षा

गोत्र, जनुकीय दोष इ० इ०

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
18 Jan 2025 - 11:18 am

सध्या माझ्या युट्यूब फीडमध्ये अचानक "गोत्र" या निरर्थक कल्पनेवर काही व्हिडीओ दिसू लागले आहेत. सर्व व्हिडीओंमध्ये वैज्ञानिक सत्याचे शक्य तेव्हढे विकृतीकरण करून या गोत्र कल्पनेचे पुनरुज्जीवन करायचा हास्यास्पद खटाटोप केलेला दिसतो.

समाजाची रचना झाली तेव्हा तेव्हा जीवशास्त्र विकसित झाले नव्हते. त्यामुळे केवळ काही सोईस्कर कल्पनांच्या उथळ साधर्म्यामुळे गोत्र संकल्पनेला शास्त्रीय बैठक आहे असे दाखविण्याचा आटापीटा करणे हे अतिशय हास्यास्पद आहे. त्याच बरोबर वैज्ञानिक सत्याची लहरीनुसार किंवा सोईस्करपणे केलेली मोडतोड पण मला मान्य नाही!

समाजविचार

"मी, मी आणि माझं राजकारण: दुर्बोध तऱ्यांच्या विचारांचा सागर"

महिरावण's picture
महिरावण in जनातलं, मनातलं
18 Jan 2025 - 10:32 am

बोटीवरच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटा आनंददायी संगीत देत होत्या, आकाश निरभ्र होतं, आणि आम्ही सारे प्रवासी या अनुभवाचा आनंद घेत होतो. पण त्याच वेळी, एका कोपऱ्यातून एक कर्कश गाज ऐकू येत होती. हा आवाज होता दुर्बोध तऱ्यांचा, ज्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे "मी" आणि त्यांची सगळीकडून असलेली असहिष्णुता.

आईस्क्रीमओली चटणीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपारंपरिक पाककृतीसद्भावनाशुभेच्छाअभिनंदन

निवडणूक: एका मतदान केंद्र व्यवस्थापनाचा पक्षांचा खर्च किती येतो

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
15 Jan 2025 - 6:31 pm

निवडणूकीच्या दिवशी मतदाता मत देण्यासाठी मतदान केंद्रावर जातो. मतदात्याने मतदान केन्द्रावर जाऊन आपल्या पक्षासाठी मतदान केले पाहिजे यासाठी प्रत्येक राजनीतिक पक्षाला यंत्रणा राबवावी लागते आणि त्यासाठी मनुष्यबळ ही लागतो आणि त्यासाठी पैसा ही खर्च करावा लागतो. लोकसभा निवडणूकीच्या वेळी दोन्ही पक्षांचे बूथ प्रमुख माझ्या समोरच लहानचे मोठे झाले होते. त्यांच्या कडून मिळालेल्या माहिती आधारावर हा लेख. लेखात बूथ व्यवस्थापकाचे नाव मी सचिन ठेवले आहे. सचिनच्या शब्दांत:

राजकारणमत