समईतलं तेल संपूनही उरणारं तेज

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
10 May 2025 - 3:10 pm

स्नेहप्रभा! प्रभा म्हणजे तेज. नुसतं तेज असेल तर त्या तेजोवलयाचा कधी कधी त्राससुद्धा होऊ शकतो. तेजामुळे दाहकता निर्माण होऊ शकते. पण तेजासोबत स्नेह असेल आणि ओलावा असेल तर ते तेज घातक ठरत नाही. स्नेह म्हणजेच तेल. जेव्हा तेजासोबत अशी आर्द्रता असेल तर ते तेज शीतल होतं. कदाचित तेजासोबत असलेल्या शीतलतेमुळे आयुष्यातल्या इतक्या दु:खाच्या आघातांनंतरही अशी व्यक्ती खंबीर राहू शकते आणि समईसारखी मंद तेवत राहू शकते!

समाजजीवनमानलेखअनुभव

माध्यमांची आरडाओरड

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
9 May 2025 - 3:38 pm

नुकताच काही आठवड्यापूर्वीचा (पहलगाम घटनेच्या अगोदरचा) एक प्रसंग...

एका कंपनीत फायर ड्रील चालू होते. त्यात त्यांना आकस्मिक परिस्थितीमध्ये काय करायचे (उदा० हातातले काम टाकून संकटकालीन मार्गिकेकडे जाण्याच्या) याच्या सूचना दिल्या होत्या. नंतर काही दिवसांनी लोकांची तयारी बघण्यासाठी एक दिवस अचानक सायरन वाजवण्यात आला. त्यावर लोकांनी काय करावे?

त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना फोन करून "आता काय करायचे" असा प्रश्न विचारला, तेव्हा संबंधितानी कपाळाला हात मारला.

समाजविचार

अलविदा हिट्मॅन

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in जनातलं, मनातलं
8 May 2025 - 6:00 pm

सकाळी, हातात चहाचा कप आणि समोर मोबाईल. नेहमीसारखं क्रिकबझ उघडलं आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना — “रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त.”
hitman
थांबा जरा. रोहित शर्मा? हिटमॅन? ज्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडायचा, तो आता कसोटीच्या पांढऱ्या जर्सीला रामराम करतोय?

व्यक्तिचित्रप्रकटन

हा सूर्य आणि......

लाल गेंडा's picture
लाल गेंडा in जनातलं, मनातलं
8 May 2025 - 1:03 pm

जेव्हा अर्जुनाने जयद्रथाला मारायची प्रतिज्ञा केली तेव्हा कृष्णाला काय वाटले असेल??
---

कथा

जाता पंढरीसी....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
5 May 2025 - 7:29 pm

"जाता पंढरीसी सुख वाटे जीवा....."

आजी आजोबांची पंढंरी म्हणजे नातवंड. पोटासाठी दाहीदिशा अशा परिस्थितीत बरेच आजीआजोबा या सुखापासून वंचितअसतात. कवीवर्य बाकीबाब म्हणतात तसेच,

"पिलास फुटूनी पंख तयांचे घरटी झाली कुठे कुठे.....",

पट्टदकल १: काडसिद्धेश्वर, जांबुलिंग, चंद्रशेखर, गळगनाथ आणि संगमेश्वर मंदिरे

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
5 May 2025 - 6:19 pm

कृष्णविवर

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 May 2025 - 3:17 pm

शतसूर्यांची जळती बिंबे
गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे
स्थळकाळाची अदय शृंखला
तटतट तोडून हिंडत आहे

क्षुधा अपरिमित अंतर्यामी
धगधग पेटून उठली आहे
आदिम स्वाहाकार सूक्त का
पुनश्च अविरत गुंजत आहे?

विज्ञानाचे नियम तोकडे-
विपरित त्यांच्या घडते आहे
भवताला घोटात गिळुनिया
कृष्णविवर हे हिंडत आहे

"विझत्या सूर्यावरती लट्टू
नार नवेली पृथ्वी आहे"
कृष्णविवर संतप्त होऊनी
अथक स्वतःला कोसत आहे

मुक्तकमौजमजा

राजा माझा

लाल गेंडा's picture
लाल गेंडा in जे न देखे रवी...
5 May 2025 - 12:47 pm

तोरणा, राजगड, रायगड, प्रतापगड
सहयाद्री असो वा सागरी
राज्य करतो, राजा माझा ||

शाहिस्ते खान, अफजल खान, मानसिंग, इंग्रज
देशी असो वा विदेशी
जिंकतो सगळ्यांना, राजा माझा ॥

दुर्जनांचा विनाशी, सज्जनांचा कैवारी
रयतेला न्याय देतो
सर्वांसाठी समान, राजा माझा ||

हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई
सर्व धर्म समान मानतो
सगळ्यांना समान लेखतो, राजा माझा ।।

निश्चयाचा महामेरु, सामान्यजनांचा आधारु
मनातला तिमीर दूर करतो
ध्येयाचा सूर्य तळपता, राजा माझा ||

मुक्तक

एआय, एआय, तू आहेस तरी काय?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
5 May 2025 - 7:02 am

ए.आय. म्हणजे काय, हे खुद्द त्यालाच विचारावे असा विचार मनात आला, मग त्यासाठी चत्ग्प्त मरत्झि (chatGPT marathi) ला आवाहन केल्यावर खालील उत्तरे आली:
-------------------------------------------------------
आवाहन : एक मराठी कविता लिहा, ज्यात Artificial Intelligence बद्दल सोप्या भाषेत सांगोपांग माहिती असेल. title : एआय, एआय, तू आहे तरी काय ?

संस्कृतीकविताभाषाजीवनमानतंत्रप्रकटनविचारमाध्यमवेधअनुभवमाहितीविरंगुळा