जुनेरलं नातं...निरोपाची वेळं-दुसरी बाजू

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
7 Mar 2024 - 4:31 pm

तुझ्या कप्पाळीचे बिंब
भासे मध्यान्हीचा भानू
लल्लाटीच्या लाटा बघुनी
'उन्हाळी', लागते गं जानू

नाही गंधार कोमलं,
करपले मन नुस्ताच विषाद
नाच नाचता नाचता
आता धपापतो ऊर

जुनेरले नाते आपुले
आता कुठवरं पाळू
वयमान पाऊणशे अवघे,
आता तरी नको छळू

प्रारब्धाचा खेळं
विळ्या भोपळ्याचे नाते
दिनरात अशी साथ
कधी सरेल जन्मठेपेचा काळं?

आयुष्यआयुष्याच्या वाटेवरकविताविडंबन

जुनेरलं नातं...निरोपाची वेळं

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
7 Mar 2024 - 8:16 am

प्राची ताईच्या कवीता नेहमीच काहीतरी नवीन देऊन जातात. प्रतिपदेची चंद्रकोर बघून काही ओळी सुचल्या होत्या पण पुर्ण नव्हत्या झाल्या त्या आज पुर्ण झाल्यासारख्या वाटतात.
जुनेरलं नातं...

आभाळीची चंद्रकोर
शोभते तुझ्या भाळी
तुझ्या पैंजण नादाने
आनंदाची मांदियाळी

चंद्रकोरीचा गारवा
सुखावतो डोळा
विचार चांदण्याचा
मनी घुमतो पारवा

चंद्रकोर झाली बिंब
उजळल्या दाही दिशा
चंचल मन शिंजीर
पालवल्या नव्या आशा

जसे नभी सुर्य चंद्र
दिनरात अशी साथ
कधी तार कधी मंद्र
ताल,सुरांचे आर्त

आयुष्यप्रवास

या देवी सर्वभूतेषु...

समर्पक's picture
समर्पक in जनातलं, मनातलं
7 Mar 2024 - 12:19 am

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।

शाक्त तीर्थ-क्षेत्र, "शक्तीपीठ"

धर्मप्रकटन

मोगरा, पॉपकॉर्न आणि एआय

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
6 Mar 2024 - 10:19 pm

अगदी काही क्षणापुर्वीचे घरातील संभाषण

* मोगर्‍याचा वास भारी येतोय
* मला तर मोगर्‍याची उमललेली फुलं पॉपकॉर्नसारखी वाटली

हे संभाषण ऐकत असताना माझ्या समोर गूगल जेमिनी ओपनच होते. अस्मादिकांनी गूगल जेमिनीस खालील प्रश्न टाकला

प्रॉम्प्ट :

Show me picture of 'Mogra flowered plant' by replacing flowers with popcorn

जेमिनी :

कलामाध्यमवेध

सक्षम स्त्रियांसाठी आधारप्रणाली - सपोर्ट सिस्टीम

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
6 Mar 2024 - 8:40 pm

सक्षम स्त्रियांसाठी आधारप्रणाली - सपोर्ट सिस्टीम
८ मार्चला सारीकडे महिला दिनाचे वातावरण असते.प्रत्येकजण आपापला दृष्टिकोन मांडत ससतो. बहुतेकांचे दृष्टीकोन आपापल्या परीने बरोबर असतातही. या दिनाच्या निमित्ताने मी सहज मागे वळून पाहिले की मी स्वतः प्रागतिक चिचारांचा आहे म्हणून मोठ्या गमजा मारतो पण आपण खरेच कसे काय वागलों? अनेक आठवणी जाग्या केल्या, काही आपोआप जाग्या झाल्या, यात एक सुरेख आठवण आली. अबला नसलेल्या कार्यक्षम महिलांपुढे नोकरी करतांना कशी आव्हाने पेलावी लागतात ते आठवले.

समाजप्रकटन

जुनेरलं नातं...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
5 Mar 2024 - 4:56 pm

जुनेरल्या नात्यामध्ये
ऊब गोधडीची;
विरलेले धागे तरी
जर ओळखीची..
जुनेरल्या नात्यामध्ये
अबोल पाऊस;
भिजलेले मन तरी
डोळा ना टिप्पूस..
जुनेरल्या नात्यामध्ये
सल ही जुनीच;
गळाभेट नाही परी
सय नेहमीच..
जुनेरल्या नात्यामध्ये
शब्द हरवले..
जुनेरले नाते आता
मुके मुके झाले..
जुनेरले नाते सख्या
नशिबाचा खेळ..
पाय निघता निघेना
आली निरोपाची वेळ
....
आली निरोपाची वेळ.

कविता

गूगल ट्रेन्ड्स २०२४

माहितगार's picture
माहितगार in राजकारण
4 Mar 2024 - 4:45 pm

मागच्या आठवड्यात दक्षिणेतील मुख्यमंत्री आणि एक राज्यस्तरीय मुख्य विरोधक असा गूगल ट्रेंड शोध घेऊन लेख लिहिला पण अनवधानाने तो माझ्याकडून डिलीट झाला होता. दक्षिणेतील राजकीय नेत्यामध्ये जगन मोहन रेड्डी आंध्रातच नव्हे तर भारतातही अधिक शोधले जात असलेले नेते असावेत असे गूगल ट्रेंड्स दाखवत होते.

माझी नर्मदा परिक्रमा

Narmade Har's picture
Narmade Har in जनातलं, मनातलं
1 Mar 2024 - 10:58 pm

नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो .
९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !

संस्कृतीकलाधर्मइतिहासवाङ्मयभाषासमाजप्रवासभूगोलदेशांतरशेतीछायाचित्रणलेखअनुभवमाहिती