इंद्रायणीकाठी

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
16 Jun 2025 - 7:59 am

इंद्रायणी काठी
सुंदर कुंडमळा
वैष्णवांचा मेळा
दाटतो इथे....

पावसाची झडी
इंद्रायणी दुथडी
वैष्णवांची दाटी
इंद्रायणीकाठी......

एकच तो सांधा
वैष्णवांचा वांधा
आड्याल पड्याल
कसे जावे....

विकांती आकांत
एक्याजागी दाटला
सहावेना भार
वैष्णवांचा....

शेल्फ्या,तूनळ्यांची
उडाली एकच घाई
पायपोस कुणाचा
कुणाच्या पायी?....

थरारला सांधा
पेकाट मोडले
वैष्णव अवघे
सांडले,इंद्रायणी

भितोत्सवे आता
उठला कल्लोळ
उडाला गोंधळ
भावीकांचा...

इथे दोषी कोण
सांधा बंद होता
वैष्णव दाटले
प्रशासन म्हणे...

धावले नामवंत
प्रशासन कृपावंत
देणगी पाच लाख
वारसांना....

कुणी सामावले जळी
कुणी तरले,वाहीले
पुन्हा तीच खेळी
म्होरल्या पावसाळी.

पांडुरंग हरी,वासुदेव हरी.

कालगंगामुक्तक

प्रतिक्रिया

कंजूस's picture

16 Jun 2025 - 8:35 am | कंजूस

पुन्हा तीच खेळी
म्होरल्या पावसाळी.

नैतर काय.