राजा माझा

लाल गेंडा's picture
लाल गेंडा in जे न देखे रवी...
5 May 2025 - 12:47 pm

तोरणा, राजगड, रायगड, प्रतापगड
सहयाद्री असो वा सागरी
राज्य करतो, राजा माझा ||

शाहिस्ते खान, अफजल खान, मानसिंग, इंग्रज
देशी असो वा विदेशी
जिंकतो सगळ्यांना, राजा माझा ॥

दुर्जनांचा विनाशी, सज्जनांचा कैवारी
रयतेला न्याय देतो
सर्वांसाठी समान, राजा माझा ||

हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई
सर्व धर्म समान मानतो
सगळ्यांना समान लेखतो, राजा माझा ।।

निश्चयाचा महामेरु, सामान्यजनांचा आधारु
मनातला तिमीर दूर करतो
ध्येयाचा सूर्य तळपता, राजा माझा ||

निश्वयी, पराक्रमी, धोरणी, दूरदर्शी
रजोगुणांनी संपन्न असा
शतकानंतर सुद्धा आदर्श असा, राजा माझा ||

मुजरा, मान, देह, मन
सर्वे त्याला अर्पावे
त्याच्याच प्रेरणेने पुढे जावे, असा, राजा माझा ।।

मुक्तक

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

6 May 2025 - 3:44 am | कर्नलतपस्वी

निश्वयी, पराक्रमी, धोरणी, दूरदर्शी
रजोगुणांनी संपन्न असा
शतकानंतर सुद्धा आदर्श असा, राजा माझा ||

मुजरा, मान, देह, मन
सर्वे त्याला अर्पावे
त्याच्याच प्रेरणेने पुढे जावे.... ।।

आठवावे रूप,प्रताप आठवावा
वंदनीय राजा माझा.....
राजकारणात त्याचा वापर नसावा

लाल गेंडा's picture

6 May 2025 - 9:43 am | लाल गेंडा

आठवावे रूप,प्रताप आठवावा
वंदनीय राजा माझा.....
राजकारणात त्याचा वापर नसावा !!

हे खरे आहे आणि असेच व्हावे हि प्रार्थना ....