ब्रेकिंग बॅड

उन्मेष दिक्षीत's picture
उन्मेष दिक्षीत in जनातलं, मनातलं
12 Apr 2025 - 1:28 am

कॅरॅक्टर ओळख

वॉल्टर व्हाइट : केमिस्ट्री टीचर , अ सायको अँड अ जिनिअस. जो स्व्तःच्या फॅमिलीसाठी काहीही करेल !
जेस्सी : अ‍ॅन ईमोशनल फूल, जो वॉल्ट साठी काहीही करेल !
स्कायलर व्हाइट : हाउसवाईफ, वॉल्टची बायको, जी स्व्तःच्या फॅमिलीसाठी काहीही करेल !
हँन्क : डि ई ए एजंट , वॉल्ट चा साडू !
मरि : हँक ची बायको !

जर तुम्ही ही सिरिज पाहीली नसेल, तर अवश्य पाहा ! नेट्फ्लिक्स वर अजुनही आहे !

प्रिमाइस : अ केमिस्ट्र्रि टिचर टर्न्स माफिआ !

वॉल्टला कॅन्सर आहे, स्टेज ४ ज्यातून तो जगू शकत नाही.

जेस्सी त्याचा केमिस्ट्रीचा विद्यार्थी, जो सध्या Methamphetamine बनवतो आणि विकतो.

पुढचं काहीही मी सांगत नाही ! ही सिरिज फक्त बघण्यासाठी आहे ! आणि बघण्यासाठी आहे ! त्यासाठी हा एवढासा प्रपंच

जरुर बघा आणि कळवा !

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

14 Apr 2025 - 8:55 am | चांदणे संदीप

उन्मेशराव, या धाग्याबद्दल खूप खूप धन्यवाद! ___/\___

दोन दिवसांपूर्वीच एका जेष्ठ आणि श्रेष्ठ मिपाकरास मी याबद्दल सांगत होतो.

आता पर्यंत चार वेळा बघून झाली आहे आणि ही सिरीज पाहिल्यानंतर कुठल्याही क्राईम ड्रामा मध्ये तो थ्रिल येत नाही. डोक्याला मुंग्या येतात तसा. अलिकडेच महाराजा (विजय सेतुपतिचा) बघितल्यावर तसे झाले होते एकदाच!

मी या सिरीजचा जबरदस्त फॅन आहे. याच्याबरोबरच बेटर कॉल सॉल हा ब्रेकिंग बॅडचा प्रिक्वेल (पण एका खास पात्रासाठी) आणि अल कमिनो (अ ब्रेकिंग बॅड मूव्ही) हा चित्रपटही जरूर बघावा. ब्रेकिंग बॅडबद्दल बोलावं/लिहावं तितकं कमीच आहे. २०१४ च्या अखेरीस ही पहिल्यांदा ही सिरीज बघून पूर्ण केली होती आणि त्यानंतर एके दिवशी पिंपरीच्या रस्त्यावर एका बुलेटच्या पाठीमागे हाईजनबर्गला रेडियम मध्ये पाहिलं. कसले रोमांच उठले होते तेव्हा, शब्दांत सांगू शकत नाही.

एखादा ब्रेकिंग बॅड फॅन क्लब सुरू करावा काय?

सं - दी - प

जरुर ! ब्रेकिंग बॅड ट्रिविया ही स्टार्ट करायला हरकत नाही :)

प्रसाद गोडबोले's picture

16 Apr 2025 - 9:08 pm | प्रसाद गोडबोले

उन्मेष ,
मिपावर परत लिहिते झालात हे पाहुन छान वाटलं !

ब्रेकिंग बॅड ही माझीही खुप आवडती सीरीयल आहे , पण मला एल कॅमिनो हा चित्रपट जास्त आवडाला .
एकुणच उत्कृष्ठ पटकथा, दिग्दर्शन आणि अभिनय ह्या सर्वच बाबतीत यशस्वी असलेली काही मोजकी उदाहरणे आहेत त्यात ब्रेकिंग बॅड चे स्थान खुप उच्च आहे !

बाकी बेटर कॉल सॉल हे देखील तसेच अफलातुन आहे !

उन्मेष दिक्षीत's picture

16 Apr 2025 - 9:51 pm | उन्मेष दिक्षीत

मधे ब्रेक घेतला होता ज्यामधे मी एका कारणामुळे चांगलाच ब्रेक झालो होतो ईमोशनली !

एल कॅमिनो बघतो. मला जेसी ची हालत बघवत नाही :)

उन्मेष दिक्षीत's picture

16 Apr 2025 - 9:57 pm | उन्मेष दिक्षीत

बेटर कॉल सॉल पाहीले आहे ! परत बघणार आहे.

आता ब्रेकिंग बॅड ४थ्यांदा पाहणे आले :) ! स्कायलर चा इतका राग का येतो मला कळत नाही :)

सगळ्यात महत्वाची आणखी एक कॅरॅक्टर ओळख मुद्दामुन लिहिली नाही :) उगाचच स्पॉइलर नकोत म्हणुन.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2025 - 3:29 am | अमरेंद्र बाहुबली

पहिला सिझन आता रात्री ३:३० वाजता पाहून संपवला, दुपारी पहिला भाग पाहिला नी थांबल्याच गेले नाही, केव्हा सुरू व्हायचा एपिसोड नी केव्हा संपयचा हेही कळले नाही, अतिशय गुंगवून ठेवनारे कथानक! जास्त किचकटपणा नाही, अतिसोपे. खूपच मस्त बनवली आहे सिरीज. पुढचे एपिसोड बघतो. कळवत राहतो.

गणेशा's picture

24 Aug 2025 - 9:44 am | गणेशा

घरात केबल tv आणि शक्यतो कुठलाही OTT platform एखादा सिनेमा किंवा series पाहण्यासाठीच फक्त तेंव्हा घेतो..

Netflix गणपती मध्ये घेतो आहे, नक्कीच पाहतो..
पण हिंदी मध्ये आहे काय बघावा लागेल.. इंग्रजी पार डोक्यावरून jaate:)

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Sep 2025 - 8:45 pm | अमरेंद्र बाहुबली

हुश्श! ही सिरीज संपली, काय सांगू? अक्षरशः फॅन झालो आहे मी हायसनबर्ग आणी वाल्टर व्हाईटचा! दिवस रात्र तेच दिस्ताहेत मला, ह्या सिरीज बद्दल फार आधी पासून ऐकत आलेलो होतो, पण इतक्या लांब लांब रेल्वे गाड्यांसारख्या डब्ब्याच्या व्व्हब सिरीज पहायला मला कंटाळवाणे वाटायचे. पण वेब सिरीज फक्त सुरू करायची असते पुढे ती आपोपाप पाहिली जाते, कधीतरी कुठेतरी ह्या सिरीजचा उल्लेख मी वाचत आलेलो होतो, ब्रेकिंग बैड पहायला सुरुवात केली तेव्हा माझ्या अनेक मित्रांना सांगितले, सगळ्यांनी मला “गुड मॉर्निंग” केले! सुरुवातीचे भाग पाहिल्या नंतर एकामागोमाग एक एपिसोड्स नी सीझन संपवत गेलो, पाचवा सीझन तर रात्रि साडेतीन पर्यंत जागून पूर्ण केला, सकाळी सहाला उठायचे होते तरीही!
वॉल्टर व्हाईट टू हिंडनबर्ग हा प्रवास अतिशय भावला,
“ i am not in danger, i am the danger”, “say माय name” सारखे डायलॉग्स तर निव्वळ अप्रतिम, वॉल्टर व्हाईट केलेल्या प्रमुख अभिनेत्याचा अभिनयाला २१ तोफांची सलामी.I’m

ब्रेकींग बॅड मध्ये जीवनाविषयी चे फार वेगवेगळे दृष्टीकोण दाखवलेले आहेत. त्यातला फिलॉसॉफीकल टच आवडतो.
सीझन च्या शेवटाला जेव्हा वॉल्टर स्वतःविषयीच्या सर्वात मोठ्या सत्याला सामोरा जातो. सर्व प्रकारची आत्मवंचना थांववुन जेव्हा प्रांजळपणे स्वीकार करतो
"Everything I did, I did for me. I liked it. I was good at it. And I was really — I was alive." ते ऐकतांना फार खोलवर ते पात्रं मनात रुजतं.
वॉल्टर चे आयुष्य पुर्वायुष्य हे कमालीचं एकसुरी कंटाळवाणं असचं आहे. एक प्रकारची तीव्र पोकळी त्याला सतत जाणवते जी आपल्या सर्वांनाही नेहमी जाणवते. पण त्या निरर्थकतेला आपण भिऊन स्वतःला कुठे ना कुठे सतत गुंतवत असतो. थ्रिल सीकींग हे यातुनचं येतं.
या सीरीजवर अस्तित्ववादी शैलीचा प्रभाव जाणवतो. वॉल्टर ह चारी बाजुने पिचलेला आहे. सर्व प्रकारच्या गुन्हेगारी मध्ये खुनामध्ये सहभागी होऊनही तो त्याचा टीपीकल मध्यमवर्गीय दांभिकपणा जपत असतो पण शेवटी त्याचा फुगा फुटतो.
जेसी सारखा आपल्या इम्पल्सेस च्या मागे फरफटत जाणारा तर अगदी आपल्यातलाच वाटतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Sep 2025 - 5:30 am | अमरेंद्र बाहुबली

+१