खफवरची गाणी
मिपाचे एक सदस्य नाव आडनाव यांनी विनंती केल्यावरुन खरडफळ्यावर मी अपलोड केलेल्या काही गाण्यांच्या लिंक्स येथे एकत्रित स्वरुपात देत आहे. खरडफळ्यावर डस्टर फिरवल्यावर अर्थातच ते सर्व उडल्या गेले आहे. गाणी मुख्यतः वेस्टर्नच आहेत. हिंदी गाणी आपल्या सर्वांना माहीतच असतात, म्हणून नमूद करत नाही.
गाणी मुद्दाम embed न करता केवळ टेक्स्च्युल यूट्यूब लिंक्स देत आहे. त्यामुळे धागा उघडल्यानेच डाटा खर्च झाला असं नको व्हायला. ज्यांना या धाग्यात रस नाही, अशा व्यक्तिंचे त्यामुळे नुकसान होणार नाही.