हाँटींग : मी रात टाकली....
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट....
नेहमीप्रमाणे हातातल्या रिमोटशी खेळत असताना झी मराठी चॅनेलवर क्षणभर थबकलो. प्रत्येक ब्रेकच्या आधी कार्य्क्रमाच्या ब्रेकनंतर येणार्या भागाची थोडीशी झलक दाखवायचे आजकाल फॅड आहे. तर मी झी मराठीपाशी थबकलो कारण सारेगमच्या सेलिब्रिटी पर्वाचे जुने भाग दाखवत होते. आणि गुप्त्यांच्या 'वंदनाताई' अमृता सुभाषला सांगत होत्या....
"तू गाणं छानच गायलंस. मुळातच हे गाणं अतिशय गोड आहे. खरेतर 'हाँटींग' आहे, त्यांनी अजुन एक दोन उदाहरणे दिली त्यात 'या डोळ्याची दोन पाखरे..." ही होतं. पण ज्या गाण्याबद्दल त्या बोलत होत्या ते गाणं होतं "जैत रे जैत" मधलं...