तसा मी... असा मी, आता मी - १
(प्रास्ताविक: काही काळापूर्वी एक जुना मित्र भेटला. तो नि मी पूर्वी बरोबर असताना जसा 'मी' होतो तोच त्याच्या डोळ्यासमोर होता हे उघड होते. त्यावेळी माझी शारीरिक, मानसिक स्थिती, माझी रहाणी, माझ्या आवडीनिवडी, माझी राजकीय सामाजिक मते इ. बाबत आता मी बराच बदलून गेलो आहे याची जाणीव करून देणारी ती भेट होती. मग सहज विचार करू लागलो की हे जे बदल एका व्यक्तीमधे होतात, 'असा मी' चा 'तसा मी' होतो तो नक्की कसा? काय काय घटक यावर परिणाम करतात. यावर आमचे ज्येष्ठ मित्रांशी थोडे बोलणे झाले. त्यांनी याबाबत सरळ धागाच टाकावा असे सुचवले.