दहा बोटं आणि आपले आशीर्वाद - उस्ताद झाकिर हुसेन (२/२)
प्रश्नः तुमच्या अफाट लोकप्रियतेमुळे मुख्य कलाकारांना तुमचा (साथीदाराचा) हेवा तर वाटत नाही?
उ. झाकिर हुसेनः (स्मितहास्य करत) तसं असतं, तर मला इतकं वाजवताच आलं नसतं!
प्रश्नः आपल्या वादनावर बंधन पडू नये यासाठी तुम्ही गायकांची साथ करणं थांबवलं आहे का?