ओले काजु आणि मॅन्गो मार्गारीटा
एकदा सहजच पराण्णांना भेटायला सौंदर्य फुफाट्यात गेलो होतो. बाहेरच्या खोलीत पराण्णा निवांतपणे बसले होते. पुढ्यात नेहमीप्रमाणे कि बोर्ड दाबत मिपावर कुणाची तरी खेचत होते ..
"काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाकुर्लीहून.." असे जुजबी प्रश्न पराण्णा विचारत होते.
जरा वेळाने तेथे सोत्री आले. सोकाजीराव त्रिलोकेकर. पूर्वीचे मुंबईकर . पुण्यातल्या मिपा कट्ट्या मध्ये पराण्णा आणि त्यांची ओळख झाली स्वतः सोत्री मद्याचे भोक्ते. अनेक उत्तमोत्तम कॉकटेल , किंवा मोक्टेलस त्यांनीच पराण्णांना दिल्या होत्या असं पराण्णा सांगत असत..
