जयकिशन यांचा पुण्यस्मरण दिवस !
आज हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेचे बेताज बादशाह शंकर जयकिशन या जोडगोळी पैकी जयकिशन यांचा पुण्यस्मरण दिवस ! आजच्याच तारखेला (१२ सप्टेंबर १९७१) वयाच्या केवळ ३९ व्या वर्षी "जिना यहां मरणा यहां, इसके सिवा जाना कहां" म्हणणारा हा अवलिया यकृताच्या आजाराने हे जग सोडून निघून गेला. त्यांची आठवण येत असताना त्यांनी शैलेन्द्र, हसरत जयपुरी, वर्मा मलिक, नीरज, इंदीवर इत्यादी गीतकारांबरोबर संगीतबद्ध केलेल्या कर्णमधुर आणि आशयपूर्ण गाण्यांचा उल्लेख इथे मुद्दाम करावा वाटतो.