तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
15 Jan 2015 - 1:45 pm

नमस्कार,

आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.

आराखडा असाच असावा असे नाही पण सुचण्यास अथवा माहिती घेण्यास सोपे जावे म्हणून काही मुद्दे येथे देऊन ठेवतो.

* व्यक्तीचे पूर्ण नाव
* ओळख (संबंधीत व्यक्ती आपणास दखल घेण्याजोगी विशेष का वाटली/वाटते) आणि कार्यक्षेत्र
* जन्म तारीख (आणि हयात नसल्यास मृत्यू दिनांक)
* व्यक्तीगत जीवन : जन्म-जन्मगाव, आई-वडील-इतर नोंदवण्या जोगे नातेवाईक, बालपण, शिक्षण, विवाह, व्यावसायिक कारकीर्द कुठे आणि कालावधी
* उल्लेखनीय कार्य / कतृत्व / कारकीर्द / कार्यक्षेत्र
* लेखन प्रकाशित झाले असल्यास, काही यश अथवा पुरस्कार प्राप्त झाले असल्यास त्या बद्दल माहिती
* आपल्या व्यक्तीगत परिचयाचे स्वरूप आणि आपण दिलेल्या माहितीस दुजोरा देणे शक्य असल्यास त्या संबंधाने माहिती/संदर्भ इत्यादी.
* संबंधीत व्यक्ती बद्दल इतर माहितीही चालेल, लिहिताना उद्देश नेमकी माहिती देण्याचा, दखल घेण्याचा ठेवावा (जाहिरातीचा उद्देश ठेऊ नये).
* हि अशी यादी वाचून प्रतिसाद देणे रुक्ष वाटल्यास वेगळा धागा बनवून, या धाग्याच्या प्रतिसादातून दुवा दिल्यासही चालू शकेल. कुणीतरी एकाने प्रतिसादातून माहिती देण्यास सुरवात केल्यास धागा रुक्ष होणार नाही असे वाटते.

* कृपया काल्पनिक माहिती टाकण्याचे टाळावे.
* अवांतर (विषयांतर) टाळण्यासाठी आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद.

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मसाहित्यिकसमाजनोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणराजकारणशिक्षणचित्रपटप्रतिभा