इंग्रजी गाण्यांचे हिंदी संस्करण

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
26 Dec 2014 - 6:40 am
गाभा: 

डिस्क्लेमर : हा धागा प्रास ह्यांना समर्पित.

काल खूप दिवसांनी हिंदी गाणी ऐकत होतो.गाणी ऐकता-ऐकता तलत मेहमूदचे "इतना ना मुझसे तू प्यार जता" हे गाणे सुरु झाले.

आणि लक्षांत आले की हीच सुरावट आपण ऐकली आहे.आज मुद्दाम शोध घ्यायचा ठरवला आणि समजले की, सुरावट तीच आहे.

बघा पटत असेल तर...

मोझार्टची सिंफनी : http://www.youtube.com/watch?v=-hJf4ZffkoI

सिनेमातील गाणे : http://www.youtube.com/watch?v=yydQcwOmGck
मग अजून काही गाणी आठवत गेली...

सिनेमा : कबूतर का बदला उर्फ मैने प्यार किया....

मूळ गाणे : http://www.youtube.com/watch?v=TcJ-wNmazHQ&ytsession=_eW2qIcqmhLGmbnqXEe...

सिनेमातील गाणे : http://www.youtube.com/watch?v=-hJf4ZffkoI

सिनेमा : घायल

मूळ गाणे : http://www.youtube.com/watch?v=iyLdoQGBchQ&ytsession=68Zt10aApoP5RRtA_wL...

सिनेमातील गाणे : http://www.youtube.com/watch?v=3ttlkdoFFEU&ytsession=4aUtfTG0moi_Yt0fi12...

आणि आता सर्वात शेवटी आमचे आवडते...कारण ह्या मुळ गाण्यावर बप्पीदांनी मस्त हिंदी संस्करण केले.आणि बॉनी-एम सारख्या प्रथितयश ग्रूपला पण हे गाणे गायचा मोह आवरता आला नाही.

सिनेमा : बहुदा "प्यारा दुश्मन"

मूळ गाणे : http://www.youtube.com/watch?v=g_jUtiKSf1Y

हिंदी सिमातील गाणे : http://www.youtube.com/watch?v=wdmVO_Maujo

बॉनी एम : http://www.youtube.com/watch?v=RW65T5SjFeA

आता निदान ह्यानिमीत्ताने तरी "प्रास" भाऊ त्यांच्याकडच्या पोतडीतून काहीतरी खास चीज़ काढतील अशी आशा...

प्रतिक्रिया

hitesh's picture

26 Dec 2014 - 6:55 am | hitesh
मुक्त विहारि's picture

26 Dec 2014 - 7:02 am | मुक्त विहारि

पण कधी कधी कुणाचेही बोट न पकडता, अचानक लागलेला शोध जास्त महत्वाचा वाटतो.

कारण वरील सगळी गाणी मला कुणाचीही मदत न घेता मिळाली.

फारच अडल्याशिवाय किंवा अज्ञान असेल तरच मिपाकरांची मदत घ्यायचे ठरवले आहे.

परत एकदा...

लिंक बद्दल मनापासून धन्यवाद...

वेल्लाभट's picture

26 Dec 2014 - 8:26 am | वेल्लाभट

असंख्य उदाहरणं मिळतील बघा आता प्रतिसादांत !
प्रेरणा म्हणा किंवा चोरी..... अशी हुबेहूब गाणी आरडींच्या काळापासून अवतरत आली आहेत हिंदी चित्रपटांत. (यावर काथ्याकूटही झाला होता माझ्या आठवणीप्रमाणे मिपा वर.... कुणी वाचनखूण असेल तर द्यावी)

मी एक छोटीशी लिस्ट देतो इथे चित्ररूपात.... बाकी जाणकार मिपाकर योगदान देतीलच.... खात्री बाळगू शकता.

Bollywood-Chor-Giri

वेल्लाभट's picture

26 Dec 2014 - 8:29 am | वेल्लाभट

Peter Pan - Tak Bisakah.mp3
हे गाणं ऐकून बघा...... 'क्या मुझे प्यार है....' चं पूर्वज गाणं. क्लास.

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 8:35 am | टवाळ कार्टा

https://www.youtube.com/watch?v=t4H_Zoh7G5A

हे पण बघा ;)
भारी भारी मोठे लोकसुध्धा चोप्य-पस्ते करतात

मदनबाण's picture

26 Dec 2014 - 9:04 am | मदनबाण

हे वरिजनल...

===
==
=
हे चोप्य पेस्त

आजची स्वाक्षरी :- नायक नही, खलनायक हुं मै :- खलनायक

मुक्त विहारि's picture

28 Dec 2014 - 6:09 am | मुक्त विहारि

धन्यवाद

पिंपातला उंदीर's picture

26 Dec 2014 - 9:49 am | पिंपातला उंदीर

आमच्या धाग्याचि जाहिरात

http://www.misalpav.com/node/26715

मुक्त विहारि's picture

26 Dec 2014 - 11:51 am | मुक्त विहारि

हो की...

(मोमेंटो) मुवि

बोका-ए-आझम's picture

26 Dec 2014 - 11:00 am | बोका-ए-आझम

माझ्याकडे लिंक्स नाहीत पण या गाण्यांच्या चालींमध्ये आश्चर्यकारक साम्य आहे -
१.मूर्तिमंत भीती उभी (नाटक: संगीत शारदा) आणि ये जिंदगी उसीकी है (चित्रपट: अनारकली)
२.ठंडी हवाएँ लहराके आए (चित्रपट: नौजवान)
सागर किनारे दिल ये पुकारे (चित्रपट: सागर)
३.मै जिंदगी मे हरदम रोता ही रहा हूँ (चित्रपट: बरसात)
बरसात मे जब आयेगा सावन का महीना (चित्रपट: माँ )
४.ये मेरा दीवानापन है (चित्रपट: यहुदी)
देख हमें आवाज ना देना (चित्रपट:अमरदीप )
५. खूबसूरत हसीना जानेजाँ जानेमन (चित्रपट: मि.एक्स इन बाँबे)
ऐ मेरे हमसफर ऐ मेरी जानेजाँ (चित्रपट: बाजीगर)

अशी अजून बरीच आहेत पण ही पटकन आठवणारी!

विजुभाऊ's picture

26 Dec 2014 - 11:47 am | विजुभाऊ

सागर किनारे दिल ये पुकारे (चित्रपट: सागर)
हे गाणे यमन मधील आहे. याच्याशी साधर्म्य असणारी बरीचशी गाणी आहेत.
पण थेट चाल आहे ती नरमगरम चित्रपटातील " हमे रासतों की जरुरत नही है..." या गाण्याशी आहे आर डी बर्मन ने याबद्दल बोलताना साम्गितले की त्याने एखादा चित्रपट फारसा गाजला नाही तर त्यातली चांगल्या चालींची गाणीही मागे पडतात त्यामुळे त्याने ती चाल दुसर्‍या चित्रपटात वापरली..
असाच किस्सा आहे तो अभिमान चित्रपटातील " तेरे मेरे मिलन की ये रैना." या गाण्याची चाल झुटी चित्रपटात वापरली.]
मात्र सागर किनारे दिल ये पुकारे या गाण्याची चाल मराठीतील "पुण्यवम्त दाता.धरी मनी खंत." या वरून घेण्यात आलेली आहे.
अजून एक
"तू कल चला जायेगा तो मै क्या करुंगा.तू याद बहुत आयेगा तो मै क्या करुंगा" चित्रपट जनम. या गाण्याची चाल मराठीतील "हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा " या गीतावरून घेतलेली आहे

तुषार काळभोर's picture

26 Dec 2014 - 11:54 am | तुषार काळभोर

"तू कल चला जायेगा तो मै क्या करुंगा.तू याद बहुत आयेगा तो मै क्या करुंगा" चित्रपट जनम. या गाण्याची चाल मराठीतील "हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा " या गीतावरून घेतलेली आहे

आरारारा!!!

hitesh's picture

26 Dec 2014 - 4:08 pm | hitesh

हमे रास्तों की जरुरत नहीं है .... राजेश रोशनचे आहे.

हितेश मी गाणे म्हणतोय ते "नरम गरम" चित्रपटातले.. हे आर डी बर्मनचेच आहे.

hitesh's picture

26 Dec 2014 - 8:03 pm | hitesh

मला वाटत होते हे राजेश रोशनचे गाणे आहे. पण हे आरडीचेच आहे

तुषार काळभोर's picture

26 Dec 2014 - 11:53 am | तुषार काळभोर

खरं तर यात लहान मोठा असा कोणी नाहीये. तरीपण सगळ्यात मोठे चोर <इन्स्पायर्ड> आहेत राजेश रोशन आणि अन्नु मलिक.
राजेश रोशनने तर अमेरिकन नागरी युद्ध (सिविल वॉर्)चे गाणे सुद्धा सोडले नाही.
वर्जिनल = ना बोले तुम ना मैने कुछ सुना... (अमोल पालेकरचा बातों-बातोंमें)

ढुप्लिकेट= व्हेन जॉनी कम्स मार्चिंग होम

योगी९००'s picture

26 Dec 2014 - 12:23 pm | योगी९००

सागर किनारे, दील ये पुकारे याची चाल (म्हणजे सुरूवातीच्या ओळीची) मला पुढील तीन गाण्यांसारखी वाटते..

थंडी हवाए लहराके आये....
रहेना रहे हम, महका करेंगे..
हमे और जीने की, चाहत ना होती (अगर तुम ना होते..)

बाकी एक गाणे दुसर्‍या गाण्याच्या चालीवर म्हणले तर खूप गंमत येते...

"गोरी गोरी पान फुला सारखी छान " हे गाणे "इंद्रायणी काठी " या अभंगाच्या चालीवर छान म्हणता येते

योगी९००'s picture

26 Dec 2014 - 12:28 pm | योगी९००

last christmas, I gave you my heart - दील मेरा चुराया क्यु? (अकेले ह्म अकेले तूम..)
mama mia - मिल गया..हमको साथी मिल गया...

आता पुढील गाण्याचे वरीजीनल गाणे ओळखा पाहू...(हिंट : आपली सगळ्यांची लाडकी हिरॉईन आहे वरीजीनल मध्ये...)

https://www.youtube.com/watch?v=gxN9p5xA8cM

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 12:43 pm | टवाळ कार्टा

=))

मुक्त विहारि's picture

26 Dec 2014 - 12:49 pm | मुक्त विहारि

ह्या गाण्याची एक गंमत आहे...

आर.डी. ने त्याच गाण्यात ४ गाणी गुंफली आहेत...http://www.youtube.com/watch?v=P8DChUlivQ0

१. चांद म्रेरा दिल

२. कदमो में आ दिल क्या मयफिल है तेरे

३. तुम क्या जानो

४. मिल गया

आणि असाच प्रयोग त्याने अज्जुन एकदा केला..."यादों की बारात"...http://www.youtube.com/watch?v=fmnmiuSboJs

१. आप के कमरे में कोई रहता है

२. दिल मिल गये

३. दम मारो दम (ऑल टाइम फेवरीट)

मला वाटते असाच एक प्रयोग त्याने "१९४२ अ लव स्टोरी"त पण केला होता.

हॅटस ऑफ फॉर आर.डी.

ह्या आर.डी. वर कुणीतरी जोरदार लिहायला पाहिजे...आमचा अभ्यास कमी पडतो.

अनन्त अवधुत's picture

26 Dec 2014 - 2:09 pm | अनन्त अवधुत

एक गाणे काय म्हणता अख्खा अकेले हम अकेले तुम Kramer vs. Kramer, वर बेतला आहे.हा विकीचा दुवा

तुषार काळभोर's picture

26 Dec 2014 - 1:09 pm | तुषार काळभोर

ह्म्म्म

"चेहरा है या चांद खिला है " (सागर) हे रुशी पकूरचं गाणं पोवाड्यासारखं म्हणून पाहा बरं!

अरे चेहरा है या चांद खिला है~~~~~~~~~~~~~~
जुल्फ घनेरी श्याम है क्या... ओ ओ ओ ओ ....
अन सागर जैसि आंखोवाली ये तो बता तेरा नाम है क्या.. जी जी रं जी!!

वेल्लाभट's picture

26 Dec 2014 - 3:03 pm | वेल्लाभट

धागा मार्गी लागल्यासारखं वाटतंय आता

वेल्लाभट's picture

26 Dec 2014 - 3:05 pm | वेल्लाभट

एनिग्माचं वे टू एटर्निटी... आणि त्याच्यावरून ढापलेलं भरो... मांग मेरी भरो.... स्टारिंग अक्शय आणि ममता....

मार्मिक गोडसे's picture

26 Dec 2014 - 4:07 pm | मार्मिक गोडसे

घरकुल ह्या मराठी चित्रपटातील 'पप्पा सांगा कुणाचे' हे जॉन रेगनच्या 'पपा हि लव्हज ममा' व 'नं.५४' हे अँडी विल्यम्सच्या 'हाउस ऑफ बांबू'वरुन जसेच्या तसे उचलले आहे.

धर्मराजमुटके's picture

26 Dec 2014 - 4:54 pm | धर्मराजमुटके

च्यायला ! किती वेळा सांगू तुम्हाला. अगदी ० पासून विमानापर्यंत सगळे शोध भारतातच लागलेले आहेत. बाहेरच्या लोकांनी ते सर्व इथूनच ढापले आहे. हा आता ते त्यांनी आपल्या वेळेपेक्षा अगोदर प्रकाशित केले एवढ्यावरुन तुम्ही आम्हाला ढापूचंद / चोर म्हणता ? आपणच आपल्या माणसांना नावे ठेवली तर कसे होणार ? "आपला तो बाब्या, दुसर्‍याचं ते कार्ट" असे वागायला कधी शि़कणार रे तुम्ही सर्वजण ?

इथलाच ५ वर्षांपूर्वीचा 'गाडी रुळांवरून सांधे बदलून जाते तेंव्हा' हा धागा आठवला.

चिरतरूण विषय आहे, आणखी मजेशीर माहिती वाचायला मिळेल.

बोका-ए-आझम's picture

26 Dec 2014 - 11:51 pm | बोका-ए-आझम

आपल्या वडिलांच्या - सचिनदांच्या ' देवदास ' मधील ' आन मिलो शाम सावरे ' वरुन आर.डी.ने ' कुछ ना कहो ' (१९४२: अ लव्ह स्टोरी)बेतलं. सचिनदांच्या ब-याच गाण्यांच्या अप्रतिम आॅर्केस्ट्रेशनमागे आर.डी.चा सहभाग आहे - उदाहरणार्थ ऐ मेरी टोपी पलटके आ (फंटूश), बैठे है क्या उसके पास (ज्वेल थीफ), मीत ना मिला रे मन का (अभिमान). अशी बरीच आहेत.

मनिम्याऊ's picture

26 Dec 2014 - 11:52 pm | मनिम्याऊ
बहुगुणी's picture

27 Dec 2014 - 3:32 am | बहुगुणी

आर डी चं महेबूबा महेबूबा

खरं तर या दोन्ही गाण्यांआधीचं एक यिडिश गाणं हे म्हणे मूळ गाणं आहे असं मला माझ्या मुलाने सांगितलं होतं, कोणतं ते आता आठवत नाही.

याच गाण्यावर आधारित इंग्लिश गाणं

hitesh's picture

27 Dec 2014 - 3:51 am | hitesh

याना

फांद्यावर बान्धिले गं मुलीनी हिंदोळे , पंचमीचा सण आला डोळे माझे ओले , याला चाल सुचत नव्हती.

अचानक त्यानी एक हिंदी गाणे ऐकले व चाल सुचली.

पंछी बनु उडती फिरु मस्त गगन मे

प्रदीप's picture

27 Dec 2014 - 12:06 pm | प्रदीप

'फांद्यावर बांधिले ग'वाटव्यांनी चाळीशीच्या दशकात प्रस्तुत केले होते. 'पंछी बनू' पन्नाशीच्या दशकातील गीत आहे.

वास्तविक 'फांद्यावर' वरून एन. दत्तांनी 'झुकती घटा, गाती हवा' चा अंतरा बेतला आहे, हे त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले आहे.

hitesh's picture

27 Dec 2014 - 3:25 pm | hitesh

मलाही हीच शंका होती. क्रोनोलॉजीबद्दल शंका होती.

हुप्प्या's picture

27 Dec 2014 - 4:03 am | हुप्प्या

हे मराठी गाणे मूळ
http://www.aathavanitli-gani.com/Song/Phandyavari_Bandhile_Ga
हे गाणे कॉपी आहे
https://www.youtube.com/watch?v=RJ8YV7jHgv4

हे मूळ गाणे
https://www.youtube.com/watch?v=im_0uzsQH_w
आणि
घर आया मेरा परदेसी
https://www.youtube.com/watch?v=ujW8N9bvvCI

आण्णु मलीकच्या गान्यांबद्दल ल्ह्या ना.
अगदी मेरा पिया घर आया , दम मस्त कलम्दर मस्त मस्त ( तु चीझ बडी है मस्त मस्त...)

बोका-ए-आझम's picture

27 Dec 2014 - 5:30 pm | बोका-ए-आझम

तू चीज बडी है मस्त तुमचा नेमसेक विजू शाहचं आहे.

विजुभाऊ's picture

28 Dec 2014 - 9:59 pm | विजुभाऊ

हा हा हा. तो मी नव्हे

मितान's picture

29 Dec 2014 - 10:48 am | मितान

काय मज्जा धागा आहे हा !
ही सगळी गाणी ऐकतेय आणि थक्क होतेय.
याला प्रेरणा चोरी ढापूगिरी काहीही म्हणा, सगळी गाणी मस्त आहेत. मजा आली.

hitesh's picture

30 Dec 2014 - 10:08 am | hitesh

पाकी गाण्यांचे बॉलिवुडी संस्करण हा विषय येउ दे

hitesh's picture

30 Dec 2014 - 10:11 am | hitesh
मुक्त विहारि's picture

5 May 2021 - 5:13 am | मुक्त विहारि

https://www.youtube.com/watch?v=k93UbIkB2Q0

सौजन्य: गापै