आपण बऱ्याच वेळा आनंदी , दु:खी असताना काही गाणी गुणगुणत असतो. बरीच गाणी नुसती ऐकूनच मन प्रसन्न होते. मनात घर केलेली गाणी वारंवार गुणगुणायला आवडतात. असेच माझ्या आवडत्या गाण्यापैकी एक गाणे आहे “ तेजाब “ सिनेमा मधील “ सो गया ये जहा ‘’ साध्या सोप्या पण आशयघन शब्दांनी गीते फुलविणारे गीतकार जावेद अख्तर , तर हजारो गीतांना आपल्या मंत्रमुग्ध संगीताने भूरळ पाडणारे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल , तर काही मोजकीच पण लक्षात राहणारी गीते गाजवणारे गायक नितीन मुकेश , सोबत गायक शब्बीर कुमार व अलका याग्निक आणि हो यातील कोरसची साथ ही महत्वपूर्ण आहे.
सैन्य दलात जावून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणारा तरूण , पण एका कटू प्रसंगानंतर तडीपार गुंड झालेला मुन्ना ( अनिल कपूर ) दुसरा गुंड लोट्या पठाण ( किरण कुमार ) च्या ताब्यातून त्याची पूर्वीची प्रेयसी मोहिनी ( माधुरी दीक्षित ) ची सुटका करून एका वॅगन गाडीतून मित्राबरोबर निघालाय .
गाडीचे छतावर मुन्नाचे मित्र मस्ती करतायेत तर इकडे मोहिनी केवळ नजरेने मुन्नाला जुन्या प्रेमाची आठवण करून देतेय तर मुन्ना मी आता टपोरी तडीपार गुंड आहे म्हणून मोहिनीला टाळायचा प्रयत्न करतोय पण मोहिनीच्या प्रेमाची घालमेल मुन्नाला जाणवतेय.(इथे ती काळजाला हात घालणारी धून वाजते - बहुतेक सॅक्शाफोन )
बाहेर पाऊस पडून गेलाय जुन्या रोड लाईटच्या प्रकाशाने वातावरण कुंद झालेय आणि मुंबई कधी झोपत नाही याची साक्ष अधूनमधून येणाऱ्या जाणार्या गाड्या देतायत. ( इथे तो कोरस )
सो गया ये जहां सो गया आसमान
सो गयी है सारी मन्ज़िलें
ओ सारी मन्ज़िलें सो गया है रस्ता
सो गया ये जहां सो गया आसमान
रात आई तो वो जिनके घर थे
वो घर को गये सो गये
रात आई तो हम जैसे आवारा
फिर निकले राहों में आ खो गये
इस गली उस गली इस नगर उस नगर
जायें भी तो कहाँ जाना चाहें अगर
ओ सो गयी है सारी मन्ज़िलें
ओ सारी मन्ज़िलें सो गया है रस्ता
सो गया ये जहां सो गया आसमान
कुछ मेरी सुनो कुछ अपनी कहो
हो पास तो ऐसी चुप ना रहो
हम पास भी हैं और दूर भी हैं
आज़ाद भी हैं मजबूर भी हैं
क्यूँ प्यार का मौसम बीत गया
क्यूँ हमसे ज़माना जीत गया
हर घड़ी मेरा दिल गम के घेरे में है
ज़िंदगी दूर तक अब अन्धेरे में है
अन्धेरे में है, अन्धेरे में है
ओ सो गयी है सारी मन्ज़िलें
ओ सारी मन्ज़िलें सो गया है रस्ता
सो गया ये जहां सो गया आसमान
प्रतिक्रिया
30 Oct 2015 - 7:33 pm | पद्मावति
मस्तं लेख.
गाण्याचं चित्रीकरण अप्रतिम होतं. माधुरी दिक्षित तर केवळ लाजवाब.
30 Oct 2015 - 10:41 pm | अजया
छान आहे लेखाची कल्पना.
30 Oct 2015 - 11:27 pm | एस
आवडतं गाणं! पुनर्प्रत्ययाबाबत धन्यवाद!
31 Oct 2015 - 12:12 am | शिव कन्या
क्वचित इतके अर्थपूर्ण गाणे अलिकडे असते!
31 Oct 2015 - 3:45 am | अभिदेश
तो शब्बीर कुमार डोक्यात जातो... रफिचि एवढि वाईट नक्कल कोणी नाही केली...
31 Oct 2015 - 11:17 am | मीउमेश
पर्वतो से आज मै टकरा गया , तुमने दि आवाज लो मी आ गया
31 Oct 2015 - 6:39 pm | सुबोध खरे
रात आई तो वो जिनके घर थे
वो घर को गये सो गये
रात आई तो हम जैसे आवारा
फिर निकले राहों में आ खो गये
लखनौ येथे लष्करी डॉक्टरांच्या मुलभूत अभ्यासक्रमासाठी गेलो होतो तेथे तेजाब हा चित्रपट पाहून आम्ही रात्री साडे बारा वाजता बारा चौदा जण आपल्या मोटर सायकलींवर निर्जन रस्त्यावर जानेवारीच्या गोठवणाऱ्या थंडीत हे गाणे गात परत येत होतो त्याची आठवण झाली. सर्वजण २३ वर्षाचे जवान आणि उत्साहाने भरलेले होते आणि भारतभर वेगवेगळ्या पोस्टिंग वरून या अभ्यासक्रमासाठी परत भेटलो होतो.
आजही हे गाणे लखनौच्या त्या रस्त्यांची आणि त्या दिवसांची आठवणीला परत उजाळा मिळाला.
धन्यवाद
1 Nov 2015 - 2:32 pm | अभ्या..
ज्याच्यावर ह्या गाण्याची सुरुवात होते त्या चंकी पांड्याला इसरल्याबद्दल निषेध.
नितीन मुकेशच्या आवाजाला गोविंदा चंकीपांडेसारखे चेहरे पडद्यावर मिळाले की वेगळीच खुमारी येते.
वाटल्यास पहा. वो कहते है हमसे अभी उमर नही है प्यार की.
गोविंदा ह्या गाण्यावर पण नाचलाय.
1 Nov 2015 - 7:01 pm | सत्याचे प्रयोग
निषेध स्विकार्य आहे. यामुळे ९० च्या दशकातील गाण्यांचा उजाळाही व्हावा.
1 Nov 2015 - 8:59 pm | चांदणे संदीप
हा..हा.. हे भारीय! हे गाण फुल्ल नितीन मुकेश श्टाइल म्हणायला आणि गोविंदाछाप एक्श्प्रेश्शन द्यायला जाम मजा येते आजपण!