पुणेरी कथा - पाळावयाचे नियम
गजाननच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने आम्ही 'तुळशीबागेत भेटेल तुला मी' या कथामालेचा शुभारंभ करत आहोत!
प्रस्तुत कथा ही ५१ भागात प्रकाशित होणार आहे.तरीही ही कथा वाचताना पाळावयाची काही पथ्ये!
१. ही कथा ५१ भागात असल्याने कोणीही 'लवकर भाग टाका' अशी प्रतिक्रिया देऊन आपल्या अधाशिपणाचा प्रत्यय देऊ नये. (त्यांना १ ते४ या वेळेत 'चितळे' नामक वाट कशी पहावी या शाळेत पाठवले जाईल.)
२. 'पुभाप्र' नामक पळवाट वापरल्यास त्याला पुण्यात लुंगी घेण्यासाठी पाठवण्यात येईल.
३. १ ते ४ या वेळेत कथेवर प्रतिसाद टाकल्यावर आपण रिकामटेकडे आहात असा अर्थ काढण्यात येईल.