महराष्ट्र मंडळ (सिंगापूर) मध्ये कवी, गायक आणि संगीत तयार करू शकणारे असे बरेच उत्साही कलाकार आहेत. ह्या वर्षी सगळ्यांनी एक नवीन प्रयोग केला. आपल्या कवितांना आपण संगीतात रचून त्याची गाणी तयार करायची. "काव्यास्वरांजली २०१५" ह्या नावाने हा कार्यक्रम गणपती उत्सवात दणक्यात पार पडला. सगळ्या प्रेक्षकांना खूप आवडला.
त्यात माझी "प्राजक्ताच्या बुंध्यापाशी " ही कविता होती. तिचा MP ३ ऑडियो इथे देत आहे.
ऐकायला आवडेल अशी अशा आहे.