कला

संवादात्मक कार्यशाळा (फक्त पुणे)

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
15 Dec 2015 - 6:35 pm

खास नवीन आणि उदयोन्मुख लेखकांसाठी , नुक्कड सादर करीत आहे 'संवादात्मक कार्यशाळा !' मराठी साहित्य परिषद , पुणे , यांच्या संयुक्त विद्यमानाने , आपल्यातल्या लेखकासाठी!

नाव नोंदणी - http://goo.gl/forms/sKCHbNZchh

दिनांक - १९ डिसेंबर २०१५, वेळ सायं ६.३० ते ८
महाराष्ट्र साहित्य परिषद हॉल , टिळक रोड , पुणे

(टीप : नाव नोंदणी आवश्यक आहे , हा उपक्रम केवळ पुण्यातील होतकरू लेखकांसाठी मर्यादित आहे. तुमच्या शहरात लवकरच येत आहोत!)

संस्कृतीकलामाध्यमवेधबातमीशिफारसमाहिती

कडेमनी कंपाऊंड

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
11 Dec 2015 - 6:13 pm

जी ए कुलकर्णींच्या स्मृतीस.....

संस्कृतीकलावाङ्मयमुक्तकसाहित्यिकप्रकटनविचारसद्भावनालेखप्रतिभा

'श्रीमानयोगी'

अक्षया's picture
अक्षया in जनातलं, मनातलं
9 Dec 2015 - 12:41 pm

एक अगदी तुमच्या आमच्या सारखी सर्वसाधारण व्यक्ती, जी आयुष्यभर नोकरी करून आपला संसार चालवते, नोकरीमधून निवृत्तीचे वेध लागताच मनामध्ये कुठेतरी प्रचंड मोठा स्वप्नांचा पहाड उभा असतो...पोटा-पाण्याच्या व्यवसाया मुळे फार पूर्वी पाहिलेली काही स्वप्नं प्रत्यक्षात कशी उतारवयाची याचा सतत ध्यास घेतलेली एक व्यक्ती... ते स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत धडपड करणारी व्यक्ती... स्वप्नं होतं आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करायचं,
मनात विचारांचं काहूर माजलेलं, प्रत्येकजणाचा वेगळा सल्ला, प्रत्येकाची वेगळी मतं.

कलानाट्यइतिहासप्रकटनलेख

लहान,लहान स्वप्नं.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
7 Dec 2015 - 8:49 am

“खरंच,तुझा हा अनुभव माझ्या नातीला सांगायला हवा. तिच्या वयावर नृत्य शिकायला तिला हुरूप येईल.”
मी प्रमीलेचा निरोप घेता घेता तिला म्हणालो.

माझी मुलगी आणि माझी नात परदेशातून दोन,तीन महिने सुट्टी घेऊन, माझ्या जवळ रहायला आली होती.माझ्या नातीचा सुरवातीचा वेळ मजेत गेला.नंतर तिला कंटाळा यायला लागला.तिला काही तरी व्याप द्यावा म्हणून माझी मुलगी मला म्हणाली,
“आपल्या शेजारच्या बिल्डींगमधे रोज वाद्यांचा आवाज येत असतो.नृत्य शिकण्याचा क्लास आहे असं वाटतं.कधी कधी तबल्या/डग्याचे बोल आणि घुंगूराचे आवाज पण ऐकायला येतात.आपण हिला थोडे दिवस नृत्य शिकायला नेऊया.”

कलालेख

गुलाम अली साहब

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
5 Dec 2015 - 12:36 pm

'चुपके चुपके रात दिन' आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली गझल, ती पण तुमच्या आवाजात आणि पाहता पाहता अशी रुतत गेली की बस्स्स.... आता तर ती जगण्याचा अविभाज्य घटक झालीय. हे सर्व झालं ते तुमच्या मुळे. जशी समज वाढायला लागली तसं तसं गुलाम अली काय चिज आहे हे एकेका गझले मधून उलगड़ायला लागलं. कोजागिरी च्या रात्री तिच्या सोबत ऐकलेल्या 'कल चौदहवी की रात थी' ने ती पुन्हा एकदा उलगडली. 'का करू सजनी आये ना बालम' या ठुमरीतुन ति भेटत नसल्याची जी व्याकुळता पेश केलित ती अगदी लाजवाब आहे.

संस्कृतीकलागझलविचारशुभेच्छा

सृजनत्व द्या

नितीनचंद्र's picture
नितीनचंद्र in जनातलं, मनातलं
4 Dec 2015 - 10:52 am

सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी व्यवसायात किंवा नोकरीत आवश्यक असे कौशल्य आहे. तुम्ही मिडीया मध्ये नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी याची आवश्यकता जरा जास्त असेल. जिथे इंजिनीयरिंग प्रॉडक्शन चालते तिथे याची आवश्यकता कमी असेल परंतु सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी शिवाय नोकरी किंवा व्यवसाय वाढणे, किंवा त्यात प्रगती होणे अशक्य मानावे लागेल.

कलानोकरीविचार

बॉन्ड जेम्स बॉन्ड -'स्पेक्टर'

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
2 Dec 2015 - 3:40 pm

बॉण्ड चा जनक इयान फ्लेमिंगने बॉण्ड कसा असावा हे त्याच्या पहिल्याच ' कॅसिनो रॉयल' या कादंबारीत दिली होती. त्याचे डोळे नीळे असावे आणि केस मागे बांधलेले असावे असा बॉण्ड त्याने रंगवला होता. काळाप्रमाणे त्यातही बदल झालेत. तसं पाहयाला गेलं 'स्पेक्टर' ब्रिटिश अभिनेता' डॅनियल क्रेग' याचा चौथा चित्रपट पुढच्या चित्रपटात कोणी नवीनच बॉण्ड दाखवणार आहेत म्हणे, त्याबद्दल पुन्हा कधीतरी. बॉण्ड चित्रपट म्हणून स्पेक्टर हा ' कॅसिनो रॉयल' आणि 'स्कायफॉल' इतका खास नसला तरी या चित्रपटांचा पुढचा भाग म्हटले तरी चालेल.

कलाकथाचित्रपटलेखअनुभवमत

'पावली' (विडंबन)

DEADPOOL's picture
DEADPOOL in जे न देखे रवी...
29 Nov 2015 - 12:36 pm

प्रेरणा- महाकाव्य!!!

१०० चा टाकटायम टाकला तवा ती पावली!
पाच भार साखळ घितली तवा ती पावली!

१५दिवस कालीजमधी मारल्या चकरा,
तवा ती पावली!
आवडून घेतला तिचा नकरा,
तवा ती पावली!

तिचा बा माराया धावला!
आपला पण जीव कावला!
पण बाची मुस्काटात घीतली!
तवा ती पावली!

लगीन कराया सांगितलं माझ्यासंगं,
तवा ती नाय पावली!
आनं तिच्यापाय माझ्याकड,
नाय रायली 'पावली'!

मांडणीकलावाङ्मयकविताप्रेमकाव्यविडंबन

करवाचौथ

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
28 Nov 2015 - 2:16 pm

आकाशगंगेत पसरलेल्या चांदण्यांच्या गराड्यात चाळणीतून चंद्र शोधणारी,
तू कशी दिसत होतीस गं ,
अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ???

डी.डी.एल.जे मधल्या काजोल सारखी तर नक्कीच नाही...

आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा.
कोकणकड्यावर बसुन नवलाइने डोळ्यात चंद्र सामावून घेणारा.

आतशा दोघांचेही चंद्र वेगवेगळे आहे म्हणा
फक्त तुझा उपवास 'करवाचौथ'चा असतो,
आणि
माझा 'संकष्टी चतुर्थी' चा.

जिप्सी

कविता माझीमुक्त कविताकलाकविता

पुणेरी कथालेखक - २

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
27 Nov 2015 - 10:31 pm

पुनश्च गजाननाच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने!

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानाट्यधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताविडंबनभाषाप्रतिशब्दवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनविनोदतंत्र