बॉण्ड चा जनक इयान फ्लेमिंगने बॉण्ड कसा असावा हे त्याच्या पहिल्याच ' कॅसिनो रॉयल' या कादंबारीत दिली होती. त्याचे डोळे नीळे असावे आणि केस मागे बांधलेले असावे असा बॉण्ड त्याने रंगवला होता. काळाप्रमाणे त्यातही बदल झालेत. तसं पाहयाला गेलं 'स्पेक्टर' ब्रिटिश अभिनेता' डॅनियल क्रेग' याचा चौथा चित्रपट पुढच्या चित्रपटात कोणी नवीनच बॉण्ड दाखवणार आहेत म्हणे, त्याबद्दल पुन्हा कधीतरी. बॉण्ड चित्रपट म्हणून स्पेक्टर हा ' कॅसिनो रॉयल' आणि 'स्कायफॉल' इतका खास नसला तरी या चित्रपटांचा पुढचा भाग म्हटले तरी चालेल. 'स्पेक्टर' ची सुरवात होते ती मेक्सिको सिटी मध्ये बॉण्ड थंड डोक्याने समोरच्याला मारत असलेल्या दृश्याने, त्यावेळी त्याच्या डोळ्यात असलेला थंडपणा अगदी पाहण्यासारखाच. अाधीच्या दोन खलनायकांच्या मानाने यावेळेस जेम्सच्या विरुद्ध असलेला शत्रु Blofeld (ख्रिस्तोफ वॉल्ट्झ) अत्यंत बलवान आणि शांत आहे. त्याचामुळे यावेळेस MI6 च भविष्य टांगणीला लागलेलं आहे. त्याच्याकडे अत्यंत प्रगत असे तंत्र आहे, त्याउलट बॉण्ड ची MI6 बरखास्त झाली असून त्याच्या कड़े फ़क्त पारंपारिक अशी हत्यार याशिवाय काहीच नाही. तरीही बॉण्ड नेहमीप्रमाणेच त्याच्याशी लढून MI6 आणि त्याची प्रेयसी दोघांनाही वाचवतो. या बॉण्डपटात गॅझेटची रेलचेल नसली तरी बॉण्ड स्पेशल असलेली Aston Martin DB10 आणि OMEGA Seamaster 300 दोन गॅझेटस् मन मोहवून टाकतात.
'स्पेक्टर' ची खासियत म्हणावे तर त्याचे संवाद जसे की…
Ralph Fiennes अर्थात नविन 'M' च्या तोंडी बॉण्डसाठी असलेला
"A license to kill is also a license not to kill."
क्लिनिक बार मधे :
James Bond: Vodka martini. Shaken, not stirred.
Clinic Barman: I'm sorry, we don't serve alcohol.
James Bond: I'm already starting to love this place...
(कितीतरी दिवसांनी हा बॉण्ड सिग्नेचर डायलॉग ऐकायला मिळाला आणि सोत्रींच्या रेसिपीची आठवण झाली ).
मोनिका बेलुची सोबतचा: ( ही चित्रपटात का होती हां अजूनही पडलेला प्रश्न आहे )
Lucia Sciarra: If you don't leave now, we'll die together.
James Bond: I can think of worse ways to go.
Lucia Sciarra: Then you're obviously crazy, Mr...
James Bond: Bond. James Bond.
रेल्वेमधला :
Madeleine Swann: You shouldn't stare.
James Bond: Well, you shouldn't look like that.
बॉण्डगर्ल म्हणून Madeleine Swann अर्थात Léa Seydoux. ( तीच मिशन इम्पॉसिबल- घोस्ट प्रोटोकॉल मधली नटी ) अत्यंत सुंदरपणे शोभली आहे, आह.....काय सुंदर दिसते ती महाराजा. विशेषतः तिचं रेल्वे मधलं पार्टी गाउन घालून चालण्याची अदा घायाळ करणारी आहे.
सरतेशेवटी तांत्रिकदृष्टया उच्च नसला तरी संवादानी सावरून 'स्पेक्टर' ला एका वेगळ्याच उंचीवार नेउन ठेवलय. 'डॅनियल क्रेग' वर अनेक लोकांनी हा बॉण्ड शोभत नाही वगैरे वगैरे टिका केली आहे. आधीचे 'रॉजर मुर', 'पिअर्स ब्रॉसनन' हे कसले भारी होते या बद्दल मी जास्त लिहिणार णार नाही, पण माझ्या जनरेशनला थोडासा थंड डोक्याने खून करणारा पण आपल्या प्रेयसीबद्दल हळवा झालेला निळ्या डोळ्यांचा बॉण्ड नक्कीच आवडतो. या बाबतीत तरी हा बॉण्ड म्हणून 'डॅनियल क्रेग' शोभतोच. माझ्या आवडत्या बॉण्डला सलाम.
प्रतिक्रिया
2 Dec 2015 - 3:45 pm | टवाळ कार्टा
कस्ला भारी डायलॉग ;)...लक्षात ठेवलाच पाहिजे असा ;)
2 Dec 2015 - 3:46 pm | जेपी
एक दुरुस्ती-
स्पेक्टर डॅनियल क्रेग चा 4 बॉन्डपट आहे.
याआधी casino royale ,कॉन्टंम ऑफ सॉलेस आणी स्कायफॉल..
बाकी लेख आवडला.
2 Dec 2015 - 3:52 pm | महासंग्राम
जेपी धन्यवाद चूक लक्षात आणून दिल्याबद्दल नीलकांत अथवा संमं कडून दुरुस्ती करून घेतो.
2 Dec 2015 - 3:54 pm | इस्पिक राजा
मला डॅनियल क्रेग अजिबात आवडत नाही. बाँड म्हणुन खुजा वाटतो. म्युनिक मध्ये पण तो नव्हता आवडला.
आवडता बाँड म्हणजे ओइयर्स ब्रॉस्नन आणि शॉन कॉनेरी
2 Dec 2015 - 4:09 pm | महासंग्राम
आवडता बाँड कोणता हा वाद त्याच्या जन्मापासून चालत आला असावा बहुतेक, प्रत्येक पिढीला त्यांचा बॉंड सरस आणि श्रेष्ठ वाटतो हे नक्की आणि त्याला तशी कारणं हि आहेत म्हणा. मागच्या ३ बॉंड पटांमध्ये तो थोडा माणसाळलेला दाखवला त्यामुळे बहुतेक जणांना क्रेग बॉंड म्हणून आवडत नाही.
2 Dec 2015 - 9:06 pm | रामदास
होता ना ?
3 Dec 2015 - 1:33 pm | मृत्युन्जय
म्युनिक मध्ये होता की क्रेग. बहुधा त्यांना आवडला नव्हता असे म्हणायचे असावे
2 Dec 2015 - 4:10 pm | संदीप डांगे
आधीचे बॉण्ड सुपरमॅन होते, डेनियल क्रेग स्पायडरमॅन आहे. सुपर पॉवर्स विथ इमोशनल कन्फ्लिक्ट्स!!!
2 Dec 2015 - 4:16 pm | महासंग्राम
क्या बात हे गाववाले अगदी जब्री प्रतिसाद… बादवे तुम्ही कोणाचे फ्यान ???
(क्रेग भक्त ) मंदार
2 Dec 2015 - 5:08 pm | संदीप डांगे
मुझे तो सब पुलिसवालोंकी सुरते एक जैसी लगती है...
जोक्स अपार्ट. एचबीओच्या कृपेने सगळे बॉण्डपट पाहिले. एक जण सोडला तर सगळे बॉन्ड आवडले. त्या त्या चित्रपटानुसार ते परफेक्ट होते. शॉन कॉनरी, ऱोजर मूर, पियर्स ब्रॉसनन, डॅनियेल क्रेग. सगळेच.
जेव्हा काही माहिती नव्हते, जास्त वाचन नव्हते त्या काळात ब्रॉसननचा टुमारो नेवर डायज हा चित्रपट आला होता, त्याचे तेव्हा फक्त पोस्टर्स पाहण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे बॉन्ड बॉन्ड म्हणतात तो हाच, अगदी परफेक्ट प्रतिमा अशी मनात होती. नंतर द वर्ल्ड इज नॉट इनफ आला. डाय अनदर डे आला. सगळ्यांचे फक्त पोस्टर्सच बघितले. तेव्हा चित्रपट बघण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यामुळे बॉन्ड म्हटले की पिअर्स ब्रॉसनन हाच आहे. त्याकाळातल्या अल्पज्ञानाप्रमाणे पिअर्स ब्रॉसनन हा खर्या आयुष्यातला बॉन्ड आहे अशी मान्यता होती. बॉन्डपटांबद्दल शून्य माहितीचा तो काळ.
नंतर बर्याच उशिरा कादंबर्या वाचल्या, चित्रपट पाहिले तेव्हा ब्रॉसननचा बॉन्ड हा कचकड्याची बाहुली होता असे जाणवले. निव्वळ शोबाजी. नो सिरिअसनेस. फक्त गॅजेट, पोरी आणि कायतरी अॅक्शन सिक्वेन्स. हे तर इतर चित्रपटांमधेही असायचे. बॉन्डचे जे गारुड गारुड म्हणतात ते ब्रॉसनन साहेबांनी, दिग्दर्शकांनी साफ घालवले. जेम्स बॉन्ड ही एक परफेक्ट डिश आहे. त्याचं भ्रष्ट वर्जन म्हणजे वरचे तिन्ही चित्रपट. नाही जमले.
शॉन कॉनरी सगळ्या बॉन्ड्स मधे एक नंबर, त्याची नजर, देहबोली, आब, चालणे, उत्तम ब्रिटिश अॅक्सेंटमधे बोलणे निव्वळ एकमेव. हेर म्हणून माहित नाही पण एक उच्चशिक्षित, अभिरुचिसंपन्न, वेलमॅनर्ड, अॅरिस्टोक्रॅटीक, धूर्त माणूस त्याने असा उभा केला की आपण अजून त्या प्रेमातून बाहेर आलेलो नाही. त्याचे चित्रपटात संवाद, अभिनय, दिग्दर्शन सगळेच एका उच्च दर्जाच्या हेरपटास आवश्यक असे. आजही कोणी विचारले कुठला बॉन्डपट बघायचा तर शॉन साहेबांना प्रथम प्राधान्य.
जॉर्ज लेझंबी (हाच उच्चर असावा): ह्याबद्दल जास्त माहित नाही. पण शोभून दिसणारा होता. थोडी ब्रॉसननची झाक आहे.
रॉजर मूरः जीवघेण्या कामगीरीवर शांतपणे सहज वावरणारा, खुशमिजाज, खुशालचेंडू गडी असा वाटणारा रॉजरमूर. चटकदार संवाद, आणि सहज अभिनयाच्या जीवावर ह्या बॉन्डने सगळे चित्रपट कन्विन्सिंग केलेत. ह्या जेम्स बॉन्डसोबत आपणही कामगीरीवर आहोत किंवा असलो पाहिजे असा फील यायचा. ही वॉज अ फ्रेंडली फिगर ऑन स्क्रीन.
ब्रॉसननबद्दल वरच लिहिले आहे. ब्रॉसननचे जे चित्रपट त्या काळात आले ते तत्कालिन साय-फाय लाटेचा फायदा घेऊ इच्छिणारे उथळ कथा असलेले होते. त्यात बॉन्डपटाचा, बॉन्ड ह्या व्यक्तिरेखेचा आत्मा नव्हता. कंटेम्पररी शैलीचा प्रभाव असणारे होते. त्यामुळे ते माझ्या लेखी तरी दहा सर्वोत्तम बॉन्डपटात येऊ शकणार नाहीत. ब्रॉसनन ह्या चित्रपटांमधे भारतीय व्याख्येतला 'हिरो' वाटतो. त्यामुळे तसा मनाला भिडत नाही. उसकी दुनिया हमारी दुनियासे बहोत अलग मालूम पडती है.
डॅनियेल क्रेग: पहिल्या छूट जेव्हा डॅनियेल क्रेग ला जेम्स बॉन्ड करणार आहेत हे कळले तेव्हा आक्शी डोक्यावर हात मारून घेतला होता. ह्याच्या थोबाडाकडे बघून हा एक मंद, मै कहा हूं, कौन हूं छाप हॉलिवूडी अमोल पालेकर वाटत होता. त्यामुळे अनेक वर्ष त्याचे कुठलेच चित्रपट बघितलेच नव्हते. पण क्वांटम ऑफ सोलास बघितला आणि निर्णयाचा पश्चाताप झाला. डोन्ट जज अ बुक बाय इट्स कवर चा प्रत्यय आला. तो जेव्हा कुणाला फाईट मारेल ती खरोखरच आहे हे जाणवतं, ही इज अ कन्विन्सिंग अॅक्टर. मग मागे जाऊन कसिनो रोयाल बघितला. व्वा मजा आली. स्कायफॉल तर उत्तम! स्पेक्टर अजून पाहिला नाही.
बदलत्या ट्रेंड नुसार चित्रपटांच्या कथांमधुन एक अंडरकरंट आपल्याला दिसतो. त्या त्या काळात काय संकल्पना जोरावर असतात तसे चित्रपट येत असतात. आताचे बॅटमॅन ट्रायोलॉजी, टोबीचा स्पायडरमॅन, सेविंग प्रायवेट रायन हे चित्रपट इमोशनल कन्फ्लिक्ट्स मांडत आहेत. डॅनियल क्रेगच्या तिन्ही चित्रपटांमधूनही हे दिसले. बहुतेक ह्याची सुरुवात द मॅट्रिक्सने केली. तुमच्याकडे 'जोडेन किंवा मोडेन'ची फुल्ल पॉवर असतांना तुमची सदसद्विवेकबुद्धी काय निर्णय घेईल हा प्रश्न ह्या चित्रपटांमधून मला दिसला. स्वत्त्वाचा शोध घ्यायला लावणे हा एक समान धागा या सर्वांतून दिसतो. जेम्स बॉन्ड ह्या व्यक्तिरेखेचे हे द्वंद्व पडद्यावर क्रेग उत्तमरित्या मांडतो.
एवढे मात्र खरे की जेम्स बॉन्डच्या पित्याच्या कल्पनेतला बॉन्ड चित्रपटांमधून दिसत नाही. तो कादंबर्यांमधे जास्त खुलून येतो.
अजून बरेच आहे लिहिण्यासारखे. बघू... नंतर कधी...
3 Dec 2015 - 9:12 am | महासंग्राम
शत प्रतिशत सच कहा आपने गुरु….
तुमच्या बॉंड वरच्या लिखाणाच्या प्रतीक्षेत
बॉंड भक्त --> मंदार
3 Dec 2015 - 2:01 pm | उगा काहितरीच
१००% सहमत !
3 Dec 2015 - 7:37 pm | संपत
डांगे साहेब.. कशाला उगीचच राजकारणावर लिहिता.. पिक्चर गीच्चर वर लिहित जा कि मस्त.. प्रतिसाद अतिशय आवडला..
3 Dec 2015 - 8:07 pm | संदीप डांगे
हे हे, ;-) धन्यवाद! जरूर लिहू.
2 Dec 2015 - 4:22 pm | विजुभाऊ
डॅनियल क्रेग हा बॉन्ड पेक्षा भाडोत्री सिरीयल किलर जास्त वाटतो
2 Dec 2015 - 4:24 pm | प्रसाद गोडबोले
नमस्कार विजु भाऊ , कसे आहात ? बरेच दिवसांनी दिसलात !
2 Dec 2015 - 5:10 pm | कोमल
हा बाँडपट फारसा नाही आवडला. चित्रपटाच्या लांबी ला लक्षात घेतल्यास अरे आठवणीत राहणारे संवादही फार कमी आहेत.
आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे तांत्रिकदृष्टया सुद्धा चित्रपट पार फसला आहे.
आपला तर पास..
2 Dec 2015 - 5:27 pm | जेपी
स्पेक्टर पाहिलाय,आवडला.
भुतकाळाच्या आठवणी,नॉस्टेलेजिया आणी भविष्यकाळाचा वेध याचा संगम आहे.
casino royale नंतर bond पट बदलत गेले छानछोकी सोडुन बॉंड भावनिक होत गेला.
यामुळेच डॅनियल क्रेग आवडला..
2 Dec 2015 - 6:20 pm | प्रसाद१९७१
क्रेग च्या प्रत्येक चित्रपटा बरोबर बाँड च्या कॅरेक्टर चा दर्जा घसरतो आहे. तो ह्या घसरत्या दर्जाला जबाबदार नाहीये, निर्माती जबाबदार आहे. बापानी जमवलेली पुण्याई धुळीस मिळवते आहे.
मला स्वताला मूर चा बाँड आवडतो. कॉनरीचा पण चांगला.
टीमोथी डाल्टन चा लिव्हिंग डेलाईट सिनेमा चांगला होता, पण तो बाँड म्हणुन खास नव्हता.
ब्रॉस्नन आला तेंव्हा मूळ निर्माता गेला होता, पण त्याच्या सावत्र मुलानी ( मायकल विल्सन ) नी बरेच चांगले
बाँडपट काढले. पण सख्या मुलीनी ( बार्बरा ) नी मात्र बापाच्या लेगसी ची वाट लावली.
3 Dec 2015 - 12:33 pm | महासंग्राम
क्रेग च्या प्रत्येक चित्रपटा बरोबर बाँड च्या कॅरेक्टर चा दर्जा घसरतो आहे
पण बाकीच्या मठ्ठ बॉंड पेक्षा क्रेग कधीही चांगला …
3 Dec 2015 - 1:29 pm | प्रसाद१९७१
पण मग तो बाँड रहात नाही. मी वर म्हणालोय तसे, क्रेग चा प्रॉब्लेम नाहीये, निर्मातीचा प्रॉब्लेम आहे.
तिला इतकीच हौस असेल तर वेगळे कॅरेक्टर तयार करुन त्याच्यावर सिनेमे काढावेत ना.
3 Dec 2015 - 11:14 am | अभ्या..
टायटल मध्ये आधी 'इन' लावले असते तर जरा तरी चालला असता.
3 Dec 2015 - 12:08 pm | पद्मावति
मस्तं परीक्षण. स्पेक्टर बघायचा आहेच.
मलाही डॅनिएल क्रेग सर्वात जास्त आवडतो. फार जेन्यूयिन वाटतो.
त्यानंतर ब्रॉस्नन. मुर्तिमन्त बॉंड! अती हॅण्डसम, फ्लर्ट आणि लार्जर दॅन लाइफ..
3 Dec 2015 - 1:51 pm | निनाद मुक्काम प...
सहमत
पण तो फिल्मी वाटायचा
मला क्रेग आवडला नाही विशेतः त्याच्या पाहिया सिनेमात केवळ एका अंतवस्त्रात समुद्रात त्याला पाहून तो गे आयकोन झाला
ते पाहून डोके फिरले. अभिनयात माठ असलेला क्रेग नुसता किलिंग मशीन वाटतो .मारण्यामध्ये मध्ये सुद्धा नजाकत असते हे आधीचे बॉंड पहिले की प्रकर्षाने जाणवते.
3 Dec 2015 - 3:10 pm | महासंग्राम
तुम्ही कॅसिनो रोयाल, स्कायफॉल, स्पेक्टर पाहिले नसावेत बहुतेक या तीनही मध्ये बॉंड केवळ किलिंग मशीन न राहता हळवा होत झालेला दाखवलेला आहे. कधी प्रेयसीसाठी तर कधी M साठी हो भावनिक झालेला आहे.
किलिंग मशीन भक्त मंदार
3 Dec 2015 - 3:16 pm | प्रसाद१९७१
हे जेम्स बाँड च्या कॅरेक्टर चे वर्णन आहे. हळवा होणारा आणि कॉलरलेस टीशर्ट वर कोट घालणारा बाँड असु शकत नाही.
He always runs while others walk,
He acts while other men just talk,
He looks at this world and wants it all,
So he strikes like Thunderball.
He knows the meaning of success,
His needs are more so he gives less,
They call him the winner who takes all,
And he strikes like Thunderball.
Any woman he wants he'll get
He will break any heart without regret.
His days of asking are all gone,
His fight goes on and on and on,
But he thinks that the fight is worth it all,
So he strikes like Thunderball.
3 Dec 2015 - 3:46 pm | इरसाल
असचं जर अशीन तर मंग माझा आवडता बॉण्ड येकच......टिमोथी डाल्टन.
4 Dec 2015 - 7:19 pm | स्वच्छंदी_मनोज
ब्रॉस्नन चा बाँड कितीही चकचकीत वाटला तरी मला स्वत:ला क्रेगचा बाँडच आवडतो. ब्रॉस्ननच्या बाँडने कुठल्याही भावभावनांना बळी न पडता दिलेले काम चोख केलेले दाखवले असले तरी क्रेगच्या बाँडपटात समोरच्या व्हिलनला पण बाँडला इमोशनली वाकवताना दाखवलेय, ते जबरी..
बाँड असला तरीसुद्धा तो शेवटी फिक्शनल कॅरॅक्टर न रहता सामान्य माणसांच्या भावना त्याला चिकटवून त्याच्या कॅरॅक्टरला अधीक रियलस्टीक केलेय असे माझे मत आहे.
8 Dec 2015 - 11:22 am | घाटावरचे भट
सगळ्यात चांगला बाँड - डॅनियल क्रेग. हे सगळे बाँडपट पाहिल्यावर बनलेलं मत आहे. बाकीचे सगळे बाँड गॅजेट्सच्या आहारी गेलेले दाखवलेले होते, ब्रॉस्ननचा तर फारच. बाँडला पुन्हा माणसात आणायचं काम क्रेगने केलं. तसं पाहिलं तर कुठल्याही गाजलेल्या काल्पनिक हीरोला स्वतःचं एक तत्वज्ञान देऊन पुन्हा सादर करायचं हे अनेक दिग्दर्शकांनी नजीकच्या भूतकाळात केलं आहे (आठवा: नोलनचा बॅटमॅन. त्या तुलनेत जुने बॅटमॅन (की बॅटमेन?) बेगडी वाटतात). त्याच माळेतला मानवी, स्खलनशील, भावनिक पण वेळ येताच थंड डोक्याने मारू शकणारा बाँड जास्त जवळचा वाटतो. बादवे क्रेगनंतर कॉनेरीचा बाँड सगळ्यात आवडतो.
नवीन बाँडसाठी इद्रिस एल्बाचाही विचार सुरु आहे असं म्हणतात. तसं झालं तर पहिल्यांदा कॄष्णवर्णी बाँड बघायला मिळेल.
8 Dec 2015 - 12:52 pm | महासंग्राम
डॅनियल क्रेगचा ५ बॉंडपटांसाठीचा करार आहे तेव्हा पुढच्या चित्रपटात सुद्धा क्रेग दिसणारच
8 Dec 2015 - 1:36 pm | स्वच्छंदी_मनोज
नवीन बाँडसाठी इद्रिस एल्बाचाही विचार सुरु आहे असं म्हणतात. तसं झालं तर पहिल्यांदा कॄष्णवर्णी बाँड बघायला मिळेल. >>>> असे झालेच तर बाँड्पटाचे आणी खुद्द बाँडचे एक वेगळेच डायमेंशन समोर येईल. पण कठीण वाटते आहे कारण गेल्या आठवड्यात स्वतः इद्रीस एल्बाने हे नाकारले आहे.
आणी तसेही बॉंडशी थोडीशी ब्रिटिश अस्मीता जोडली असल्या कारणाने लोकांना हे पसंत पडेल का ही पण एक शंकाच आहे. ह्याच मुळे गौरवर्णीय असूनही ऑस्ट्रेलीयन जॉर्ज लेझन्बायला प्रेक्षकांनी कुठे स्विकारले?
10 Dec 2015 - 10:33 pm | मदनबाण
काय सुंदर दिसते ती महाराजा. विशेषतः तिचं रेल्वे मधलं पार्टी गाउन घालून चालण्याची अदा घायाळ करणारी आहे.
ओह्ह... :) आम्हासनी बॉन्ड बरोबर "इलु इलु" करणार्या ललना देखील विशेष आवडतात ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-'Hegemony of Western media has to end' - Arnab Goswami at RT conference