कविता

वेडा वेडा पाऊस..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
24 Sep 2022 - 8:07 am

वेडा वेडा पाऊस..

वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा पाऊस?
काळ वेळ नाही, नुसती पडायची हौस..

छत्री विसरून निघाले तुझ्याकडे यायला,
होतं असं चुकून, कळावं ना पावसाला?
वेडाच तो, आला धावत, धो धो बरसला.
म्हणून भिजले,
नको ना रे भलता अर्थ लावूस!

भिजून बिजून आलं असं तर चहा कुणी करतोच ना?
बिनसाखर असला तरी गोड आपण म्हणतोच ना?
घोट घोट पिता पिता गप्पा छाटत बसतोच ना?
म्हणून थांबले,
नको की रे भलता अर्थ लावूस!

पाऊसकविताप्रेमकाव्यमुक्तक

कण अमृताचे......

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
21 Sep 2022 - 12:05 pm

आयुष्याच्या सहाणेवर चंदन उगाळत नाही
भूतकाळा वरती, दोष मी उगाच मढत नाही

पांघरून भुतांच्या झुली ,वर्तमानात जगत नाही
उघडून चिंध्याचे गाठोडे, मी उगाच चिवडत नाही

करूनी पाटी कोरी, जुने हिशोब मांडत नाही
कर्जमुक्त मी आता, कुठलेही व्याज भरत नाही

झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही
मिळणाऱ्या अमृत कणांचे,आता विष मी बनवत नाही

आयुष्यमुक्त कविताकवितामुक्तक

अबोला..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
20 Sep 2022 - 4:02 pm

तुझ्या एका अबोल्यानं
उदासली फुलदाणी.
जीव झाला वेडापिसा
आणि काळजाचं पाणी..

तुझ्या एका अबोल्याची
कशी खुलावी रे कळी?
सुचेनासे होते काही
लोकं म्हणतात खुळी.

तुझ्या एका अबोल्यात
किती चंद्र गेले वाया..
अरे वेड्या, पाऊसही
आता आला नं संपाया!

तुझ्या एका अबोल्याशी
आता माझाही अबोला,
बघतेच किती वेळ
झुलतो हा खेळझुला!

कविता

पोलिस मिरवणूकीत नाचले !!

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
20 Sep 2022 - 10:44 am

पोलिसांना खाकी वर्दीत मिरवणुकांमध्ये नाचण्यास मनाई; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्देश

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-cops-wa...

उन्माद भाव मनात साचले
पोलिस मिरवणूकीत नाचले!!

आयुक्त कुलवंत सरंगळ
म्हणे हे सर्व आहे अमंगळ

कविता

सिंग वाज किंग

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
19 Sep 2022 - 1:15 pm

बातमी : कॅप्टन अमरिंदर सिंग आज भाजपात प्रवेश करणार

https://www.loksatta.com/desh-videsh/former-punjab-cm-captain-amrinder-s...

कॅप्टन अमरींदसिंग झाले अगवा
हाती धरणार आता भगवा

सिध्दूने लावली त्यांची वाट
स्वत: उबवतोय जेल ची खाट

सिद्धू ने भरले रागा चे कान
पंजाबमधे आले भगवंत मान

बलीष्ट कॅप्टनचा केला अपमान
फुकटचंबू जनतेने दिला 'आप' ला मान

वंशज त्यांचे राजघराणे पटियाला
राजकारण हास्यजत्रा शो झाला

कविता

बरसणाऱ्या सरी|

Bhakti's picture
Bhakti in जे न देखे रवी...
16 Sep 2022 - 6:36 pm

नभावरची साय
ऊतू ऊतू जाई,
गंधवेडी अवनी
बहरली रानो वनी||१||

फेसाळला नदीकाठ
ऋतू फुलांची गर्दी दाट
हिरव्या पदरावरती
दव मोती भरती ||२||

भिरभिरणाऱ्या अंगणात
फडफडती भिंगोरी पंखात
बरसणाऱ्या सरी धारा
काळजाचा गार निवारा||३||

-भक्ती

निसर्गभावकविताहिरवाईकविता

घाटरस्ता, निसर्ग आणि मी

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
14 Sep 2022 - 9:51 am

नुकत्याच होऊन गेलेल्या
वर्षावाला, निथळून टाकणारी
हिरव्याकंच कांतीची गर्द वनराई.
सकाळचे कोवळे ऊन पिऊन
तजेलदार झालेली नवी पालवी.
स्वच्छ धुऊन निघालेले,
लाल मातीच्या चिखलावर,
रेखीव छान वळणदार रांगोळीची
जणू निळीशार रेघच असलेले रस्ते.
त्यावरून वळणे घेत घेत मी
निवांतपणे,
आजूबाजूचा निसर्ग न्याहाळीत,
मजेत आवडीचे गाणे गुणगुणत,
घाटमाथ्यावर चढून जातो
आणि,
पुढे तसाच खाली उतरून जातो.
दिवसभर राबायला,
सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला.

परत येताना पुन्हा तेच सारं.

आठवणीकविता माझीकविता

जळण नसलेल्या तिरडीवर...

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
10 Sep 2022 - 3:27 pm

लेख केवळ मनोरंजन व स्वानंद हा उद्देश समोर ठेवून लिहीला आहे. खुप आधी लिहीला होता,अभद्र विषय असे लोकांचे म्हणणे. सणासुदीला कशाला अभद्र लिहायचे व आनंदावर विरजण टाकायचे म्हणून आता डकवत आहे. माझ्यापुरते म्हणाल तर,

काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ ll
-संत नामदेव

स्मायलींची बाराखडी शिकवल्या बद्दल @टर्मिनेटर भौं चे विषेश आभार.

😀😁
______________________________

कवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडाप्रकटनविरंगुळा

गजानन

सागरसाथी's picture
सागरसाथी in जे न देखे रवी...
31 Aug 2022 - 8:38 am

निसर्ग बरसला
सुखाचा पाऊस,
आनंदाचा कंद
घरी आला.

भक्तीचा उत्सव
आनंदले रोम
गणपतीचा सण
आला आला.

सुखकर्ता आला
विघ्नहर्ता आला,
आयुष्याचा कर्ता
घरी आला.

वर्षभर ज्याची
पाहतो मी वाट,
तो दु:खहर्ता
घरी आला.

फुलला पारिजात
उंचबळे सुवास,
सुगंधाचा दाता
घरी आला.

विद्येचा ईश्वर
ज्ञानाचा दाता
बुद्धीचा विधाता
घरी आला.

--- अभय बापट

festivalsकविता माझीभक्ति गीतकविता

अंतर !

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
30 Aug 2022 - 2:49 pm

अंतर !

आज तो परत तेच म्हणाला,

"तुझ्या आणि माझ्या विचारांमध्ये
बरंच अंतर आहे "
.
.
.
.
.
.
.

" हो , कदाचित ....

समजून घेणे ,
आणि
सहन करणे ,

यामधे जितकं अंतर .....मोजून तितकंच !"

डोळ्यांतल्या नीरओळीमध्ये मावेल
....एव्हढंच ती उत्तरली !

..................नेहमीसारखंच !

------------फिझा

अव्यक्तकविता