कविता

एक आत्मशोध...

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
3 Apr 2024 - 10:49 am

https://www.esakal.com/global/swedish-national-in-nagpur-in-search-of-bi...
घ्या कविता...

कुणी आई देता का आई
पेट्रीसिया विचारत जाई.

स्विडन ते नागपूर
घेऊन डोळ्यात पूर

तपासल्या सर्व सरकारी नोंदी
तरी सुटेना कोडे, तिची कोंडी.

मला काहीच नको,
नाही काही तक्रार,
फक्त मला झोपू दे
शांत मांडीवर एकवार

तू टाकलेस आश्रमाबाहेर
सोडले वा-यावर
स्विडिश फरीश्त्यां नी
झेलले वरवरच्या वर

कविता

बग आली माझ्या कोडा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
26 Mar 2024 - 10:45 pm

धाव धाव टीम लिडरा
बग आली माझ्या कोडा

किती आता गुगलावे?
एआय मदतीला घ्यावे?

डेडालाईन मृत्यू भासे
चहा कॉफी नरडी डाचे

आता उद्धरण्या केवळ
तूच येई धावत सबळ

पाषाणाच्या चुकल्या कोडी
टेस्टर, क्यू.ए. इग्नोर करी

- पाभे
२६.०३.२०२४

अभंगकाहीच्या काही कविताभक्ति गीतकविता

बाँड आणि बांध

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
20 Mar 2024 - 12:58 am

विडंबन - 'बाँड'

बाँड हा वटण्यास थोडा समय आहे
आणि त्याला देणगीचे वलय आहे

बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
बातम्या मज वाचण्याची सवय आहे

सांग आता मी खरे बोलू कुणाशी
झूठ येथे बोलण्याला अभय आहे

'देश हा बदलून टाकू' ते म्हणाले
बोललो त्यांना 'कुठे हा विषय आहे?'

शासनाची का तमा मी बाळगावी?
आज झाले आत्मनिर्भर हृदय आहे

- 'सुमार' जावडेकर

माझीच मूळ गझल - 'बांध'

बांध हा फुटण्यास थोडा समय आहे
आणि मागे जीवनाचा प्रलय आहे

बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
चेहरे मज वाचण्याची सवय आहे

विडम्बनकवितागझल

जुनेरलं नातं...निरोपाची वेळं-दुसरी बाजू

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
7 Mar 2024 - 4:31 pm

तुझ्या कप्पाळीचे बिंब
भासे मध्यान्हीचा भानू
लल्लाटीच्या लाटा बघुनी
'उन्हाळी', लागते गं जानू

नाही गंधार कोमलं,
करपले मन नुस्ताच विषाद
नाच नाचता नाचता
आता धपापतो ऊर

जुनेरले नाते आपुले
आता कुठवरं पाळू
वयमान पाऊणशे अवघे,
आता तरी नको छळू

प्रारब्धाचा खेळं
विळ्या भोपळ्याचे नाते
दिनरात अशी साथ
कधी सरेल जन्मठेपेचा काळं?

आयुष्यआयुष्याच्या वाटेवरकविताविडंबन

जुनेरलं नातं...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
5 Mar 2024 - 4:56 pm

जुनेरल्या नात्यामध्ये
ऊब गोधडीची;
विरलेले धागे तरी
जर ओळखीची..
जुनेरल्या नात्यामध्ये
अबोल पाऊस;
भिजलेले मन तरी
डोळा ना टिप्पूस..
जुनेरल्या नात्यामध्ये
सल ही जुनीच;
गळाभेट नाही परी
सय नेहमीच..
जुनेरल्या नात्यामध्ये
शब्द हरवले..
जुनेरले नाते आता
मुके मुके झाले..
जुनेरले नाते सख्या
नशिबाचा खेळ..
पाय निघता निघेना
आली निरोपाची वेळ
....
आली निरोपाची वेळ.

कविता

जरांगे निघाले.,,,,

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
26 Feb 2024 - 12:42 am

वाढे माईक्स चा खणखणाट,
पूढे कॅमेरांचा लखलखाट,
गाड्यांच्या ताफ्याचा दणदणाट

तोंडात शब्द कडक,
जरांगे निघाले तडक...

कडकलक्ष्मीचा जसा चमत्कार,
शाब्दीक-चाबकांचा टणत्कार,
मिडीयाला रेडी साक्षात्कार,
आरक्षण-बुभूक्षूंचा नमस्कार !

मी तोडणार बामणी कावा,
जातीयवादी झालास भावा,
सिल्वर ओक चा का तू छावा,
इलेक्शन अन तापला तवा !
तुला काय एम पी तिकीट हावा?

थकले रे पोलीस,
नको धरु ओलीस,
विषय खूप खोलीस
राजकारणी टोळीस
जनतेस हा पोळीस
निवडणूक होळीस.

कविता

सांज

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
25 Feb 2024 - 7:41 pm

अता आर्त हळवी हवा सांज असते
स्मृती पाखरांचा थवा सांज असते

जरी रात्र असते तुझी दाट छाया
छटांचा तुझ्या कारवा सांज असते

दिशा क्षितिज संदिग्ध करती पुन्हा अन्
पुन्हा जीवनी नाखवा सांज असते

जुने तेच ते रंग लेवून परके
समारंभ अवघा नवा सांज असते

न तू आज येथे न मी आज तेथे
अता रोज ही मारवा सांज असते

- कुमार जावडेकर

gajhalgazalकवितागझल

फरार...

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
30 Jan 2024 - 8:49 am

सीएम हेमंत सोरन,
बातमी is on run !!

काय चक्क सीएम फरार?
पोलीस शोधती दारोदार

विनोदी आहे सापशिडी
भाजपा ने धाडली ED

करोडोंचा जमीन घोटाळा
आता पळा अन् अटक टाळा

काय हा अध्याय झारखंड
बघा नवे भ्रष्टाचार-कांड

भाजपाचे अब की बार
आपरेशन 'चारसो पार' !!

कविता

(अ)निती-श चे अभंग

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
29 Jan 2024 - 12:00 pm

नवव्यांदा बोहल्यावर।
लोकशाहीची भेळ।
सारा संख्येचा खेळ।
मुख्यमंत्री।।

विरोधकांना फोडा।
भाजपा टाकी गळ।
असो विरोधी गरळ।
मोठा मासा।।

नवल करीती लोक।
कधी शिवतो सूट?
शपथ घे ऊठसूट।
दर्जी म्हणे।

पाहोन ह्याचा रंगबदल।
लाजला तो सरडा।
लाल हिरवा करडा।
सोय जशी।।

महाराष्ट्री उध्वस्त 'यू-टर्न'।
आहे खातो मनी मांडे।
ताकाला जाऊनही भांडे।
लपवतो।।

कसली मूल्ये तत्वे?
झोक्यांचा सम्राट।
पुन्हा मांडी खाट।
भाजपाशी ।।

अभंगकविता

पीळ

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
11 Jan 2024 - 2:17 pm

कवितेच्या काही ओळी
जरी सहज सुचल्या
दोन चुकल्या मात्रेत
दोन वृत्तात गंडल्या

यतिभंग एकीमध्ये
एकीमध्ये रसभंग
दोष दूर करण्यास
पछाडिले जंग जंग

मात्रा, वृत्तांची बंधने
पाळताना दमछाक
झाली-आली कुठूनशी
मुक्तछंदाची झुळूक

मुक्तछंदाच्या स्पर्शाने
ओळ ओळ थरारली
कोष कोंदट फोडून
फुलपाखरे उडाली

खळखळा तुटताना
बेड्या आनंदे म्हणती
लघु, गुरू, मात्रा यांची
मुक्तछंदी ना गणती

वेध लागला मुक्तीचा
बंधी कोंडल्या ओळींना
सुंभ जळला-पण का
पीळ जळता जळेना ? :)

कविता