कविता

काय होते अंतरी...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
6 Jan 2023 - 9:15 am

पाहुनी हसताच तू काय होते अंतरी
बावरा हा जीव माझा भिरभिरे कोठेतरी.

चांदण्यांचे तेज गाली
या फुलांची ओठी लाली
तू बटांना कुरवाळता
बघ हवेची झुळूक आली
वादळे तू कुंतलाना सोडता वाऱ्यावरी.

चाहुलीनं या तुझ्या
बघ पान पान बहरतं
दव भिजले गवत
तव पावलानं बिलगतं
गंध लेवूनी तनूचा बघ फुले ही बावरी.

गाणेकविता

बँक आफ दरोडा !

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
2 Jan 2023 - 11:11 am

चोरांनी बॅंकेत बसूनच चर्चा केली अन् नंतर २० रुपयांचे लाखभर चिल्लर; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - https://maharashtratimes.com/maharashtra/raigad/a-robbery-took-place-at-...

दोन चोर बँकेत शिरले,
एक्झाॅस्ट फॅन काढून वरचा.
मग सोफ्यावर बसून
तासभर केली चर्चा.

समजू नका त्यांना एवढे थिल्लर
दोन लाखाची चोरली चिल्लर

बोईसर चे तारापूर रोड
डोईजड झाले चोरावर मोर

कविता

नववर्ष नवहर्ष

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
1 Jan 2023 - 12:01 am

नववर्ष
नवहर्ष
नवदर्श
मनी

नवा भास
नव आस
नवा श्वास
मनी

नव शब्द
नव लुब्ध
नवप्रारब्ध
मनी

नव वक्त
नव शक्त
नव मुक्त
मनी

नव दिसणं
नव असणं
नवा जश्न
मनी

नव पर्व
नव सर्व
नवा सूर्य
मनी

नव सव्य
नव भव्य
नव काव्य
मनी

नवा देश
नव आवेश
नव वेश
मनी

नव वारे
नव तारे
नव सारे
मनी

नव वर्ष
नव स्पर्श
नवआदर्श
मनी

कविता

नको ना रे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
31 Dec 2022 - 7:14 pm

नको रे नको

नको म्हटलं ना
नको

नक्को ना. नको.
अं हं

नको
न न
नको
नक्को ना रे
नको

अविश्वसनीयअव्यक्तआठवणीआयुष्यआशादायकइशाराप्रेम कविताभावकविताकविताप्रेमकाव्यविनोदआरोग्यपौष्टिक पदार्थमौजमजा

दिस सरतो असा...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
25 Dec 2022 - 8:48 pm

दिस सरतो असा, आठवांचा ठसा, मिटून चालला
दिस सरतो असा, पाखरांचा थवा, उडून चालला.

दिस मेघापरी झरुन चालले
दिस वाळूपरी सुटून चालले
दिस सरतो असा, स्वप्नांचा दिवा, विझून चालला.

दिस गंधापरी विरून चालले
दिस रंगापरी पुसून चालले
दिस सरतो असा, या फुलांचा पसा, लुटून चालला.

दिस आले कधी सोबती घेउनी
दिस गेले कधी एकटा सोडुनी
दिस सरतो असा, ओळखीचा जसा, निघून चालला.

दीपक पवार.

जीवनमाझी कविताकविता

कोलाहल !

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
25 Dec 2022 - 11:10 am

कोलाहल !

सायकलची बेल, दुचाकी चारचाकी चे हॉर्नस
ट्रक चे कर्कशः ब्रेक, वेगाचे आवाज
ट्रामच्या दाराची उघड झाक , हेलिकॉप्टरची झार झार
ट्रेन च्या प्लॅटफॉर्म वरची अनाउन्समेंट ,
मधेच ऍम्ब्युलन्स चा सायरन ,
सगळीकडे गडबड, धांदल, गोंगाट,किलबिलाट !

कविता

(झाली किती रात सजणी...)

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
24 Dec 2022 - 12:27 pm

मुळ कवी दिपक पवारांची क्षमा मागून....

(आली जरी रात सजणी...)

आली जरी रात सजणी

झाली किती रात सजणी, नावडे मजला "थांब जरा येते", सांगणे.

अधिरला जीव माझा, असे कसे तुझे हे वागणे.

खडबड, खडबड आवाजास, ताल देती तुझी काकणे.

बरे वाटते का असे, सारखे सारखे वाकून माझे पाहणे.

झोपले चंद्र तारे,निद्रिस्त झाल्या उषा निशा.

मोकळ्या झाल्या आता, कुजबूजण्यास दाही दिशा.

अनर्थशास्त्रउकळीकैच्याकैकविताविडम्बनकविताविडंबन

पुन्हा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
17 Dec 2022 - 2:36 pm

कालचक्र उलटे फिरले अन्
पुन्हा जन्मलो
जुन्या चुका विसरून नव्याने
करून बसलो
काचपात्र भंगले तरीही
जोडत बसलो
मुखवट्यांस समजलो चेहरे
तिथेच फसलो
अढळपदी उल्का बघताना
जरी कोसळलो
डोळे कितिदा आले भरूनी
तरीही हसलो
बेचिराख होता होता मग
पुनश्च रुजलो

कवितामुक्तक

दे दवांचे प्याले

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
14 Dec 2022 - 2:43 pm

कितीदा ओठांवरती अव्यक्त राहिलेले
शब्द ते तुझ्या मी, डोळ्यांत वाचलेले

जायचे कुठेशी, मी चाललोय कोठे?
तुझ्या रूपाने, रूपाली, मला भारलेले

माळून दे म्हणालीस, माला तारकांची
केशी तुझ्या टपोरे, चंद्रफूल माळलेले

भेटता तुला उराशी, श्वासात आग येते
क्षण तप्त, दग्ध, तरीही, भान गोठलेले

घनगर्द भावनांचा कल्लोळ माजतो ग
दे दवांचे प्याले, पाकळ्यांत साठलेले

- संदीप चांदणे

कविता माझीकविताप्रेमकाव्यसाहित्यिक

उडून गंध चालल्या...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
5 Dec 2022 - 1:58 pm

उडून गंध चालल्या फुलास वाटते
तसे कसे सुने - सुने उदास वाटते.

कधी वसंत येईल, बहरेन मी पुन्हा
झडून पान चालल्या तरुस वाटते.

पवन तुला करीत स्पर्श जातसे अता
दरवळला चहूकडे सुवास वाटते.

कशास जन्म हा जगून काढला इथे
उगाच का असे - तसे मनास वाटते.

निघून चाललीस तू इथून ज्या क्षणी
तिथेच संपला असे प्रवास वाटते.

दीपक पवार.

भावकवितामराठी गझलकविता