कविता

उभा मी वाटेवरती

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
9 Feb 2021 - 9:17 am

तुझ्या डोळ्यांचे
काजळ मी आहे
मला जरासे तू
लावून घे ना
तीट म्हणूनी गालावरती

फुलबागेमधले
मी फूल सुगंधी
मला जरासे तू
माळून घे ना
तुझ्या तिमिरी केसांवरती

मी एक गाणे
युगल, प्रितीचे
मला जरासे तू
गाऊन घे ना
चांदणवर्षावातल्या राती

तुझा मी होईन
पदर भिरभिरता
मला जरासे तू
लपेटून घे ना
तुझ्या शहारत्या अंगाभोवती

काहीही होतो
तुझ्या आवडीचे
मला जरासे तू
सांगून बघ ना
उभा मी तुझ्याच वाटेवरती

- संदीप चांदणे

कविताकविता माझीप्रेम कवितामाझी कविता

मरण...

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जे न देखे रवी...
8 Feb 2021 - 5:45 pm

मरण...

रिपोर्ट वाचून झाल्यावर,
यमधर्म दिसे दारावर,
मग आली भानावर,
केलीच पाहिजे आवराआवर...

तशी होती ती गोलमटोल,
हळूहळू होत गेली अबोल,
चेहऱ्यावर दिसे हसरा भाव,
मनात सलत असे घाव...

कोणी म्हणत नव्हते सरक,
पण वागण्यात सर्वांच्या जाणवे फरक,
मावळली गालीची हसरी खळी,
आता आळीमिळी गुपचिळी...

आयुष्यभराच्या आठवणींचा,
कसा सोडवायचा गुंता,
सतावत सारखे हेच विचार,
अन् मनात दाटे चिंता...

कळलं नाही तिला शेवटी,
काय झाली चूक,
बदल दिसे शरीरावर,
मन झालं मूक...

कविताshabdchitre

कन्यादान एक शब्द चित्र

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
8 Feb 2021 - 9:16 am

शब्द तोकडे पडले
डोळ्या पाणी दाटले
भावनांची उंची मोठी
शब्द ओठीच थांबले

पसरली शांती चहूकडे
कोलाहल माजला
मना मनाच संवाद
मनाशीच ग थांबला

अशांत ही मने
फक्त डोळे बोलके
पाऊल झाले जड
पडे हलके हलके

लेक चालली सासुरी
शब्द तोकडे पडले
आई बापाच्या मनातले
बासुरीचे सुर
होते तिथेच थांबले
८-१२-२०

कविता

हाकामारी

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
7 Feb 2021 - 10:24 pm

गोष्ट लहानपणची

लहानपणी ऐकली होती एक गोष्ट
हाकामारी तीच नाव खुप होती दुष्ट
खुप घाबरलो होतो ऐकल्यावर
पण खरी होती कळले मोठे झाल्यावर

एक दिवशी आई म्हणाली
लवकर घरी ये हाकामारी येईल
रस्त्यावर दिसलास तर तुला उचलून नेईल

विचारल हाकामारी म्हणजे ग काय ?
कधीतरी येतो तीचा फेरा गावावर
आणी फुली मारते दारावर
हवेत येती ,मुलं धरती नसतात तीला पाय
आशी म्हणली होती तेव्हा माझी माय

कविता

हर दिन नया था हर

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
3 Feb 2021 - 9:00 am

हर दिन नया था हर साल चुनौती।
कभी जशन मनाया कभी लगी पनौती।
बाऱीश देखी सुखा देखा खुब लगी धूप।
जीदंगी के झमेले मे पापड भी बेले खुब।

किसी ने दिया साथ तो किसी ने बढने से रोका।
मीला किसीका आशिश तो किसीसे मीला। धोका।
खुब कमाया खुब लुटाया खाया मिल बाँट के ।
कभी किसीका रंज न किया जिंदगी गुजारी ठाठसे।

कभी किये फाँखे कभी खायी रस मलाई।
सारी माया प्रभूकी जीसने ऐश करायी।
पैसंठ गुजरे अब छासठ का युवा हूँ।
आप सबको धन्यवाद और
प्रभूसे स्वास्थ की दुआ करता हूँ।

कविता

कधीतरी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
2 Feb 2021 - 4:30 pm

उल्कापाताच्या आतषबाजीने
दिपून जातोय मी आज
पण कधीतरी
चंद्रमाधवीच्या अद्भुत प्रदेशात
अंतर्बाह्य उजळायचंय मला

शब्दांच्या समृद्ध अडगळीत
हरवून जातोय मी आज
पण कधीतरी
शब्दापल्याडच्या घनघोर निबिडात
निरुद्देश पोहोचायचंय मला

नीटनेटक्या रंगरेषा
रेखाटतोय मी आज
पण कधीतरी
अमूर्ताचं असीम अवकाश
अनवट रंगांनी भरायचंय मला

त्रिमितींच्या अभेद्य पिंजर्‍यात
घुसमटतोय मी आज
पण कधीतरी
स्थलकालाचं
वितान व्यापून
थोडं थोडं उरायचंय मला

कवितामुक्त कविता

माझ काय चुकलं

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
2 Feb 2021 - 1:21 pm

माझ काय चुकलं

भंडाऱ्यातल बाळ माझ्या स्वप्नात आलं
म्हणल आजोबा , मला देवानी नाही नेल

नऊ महिने तीच्या पोटात
खुप काही ऐकलं
बाहेर आल्यावर तीचं
तोंड सुद्धा नाही पाहिलं

निघाली होती आणायला
करून स्वागताची तयारी
हळूच घेऊन जा रे
आजी होती म्हणायली

अधीर झालो होतो भेटायला
बघुन साऱ्यांची स्वप्नं
म्हटलं होत मनाशीच
लवकरच येतो खेळायला

पळा पळा धावा धावा
चहूकडे गोंधळ माजला
अंधार झाला सगळीकडे
छतावरचा दिवा पण विझला

कविता

हाक आभाळाची येता

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
1 Feb 2021 - 5:07 pm

रूटीनाचे गंजलेले
यंत्र अखंड घुमते
जुन्या व्रणावर रोज
नवी जखम करते

अनावर भोवंडून
शिणलेल्या प्राणासाठी
वाटेवरच्या झाडाची
साथ वाटे मला मोठी

त्याचा मायाळू विस्तार
घाले हिरवी फुंकर
एक रंगीत पाखरू
झुले उंच फांदीवर

इवल्याश्या कंठातून
काढी तरल लकेरी
हाक आभाळाची येता
झेपावते दिगंतरी

कवितामुक्त कविता

संकल्प

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
22 Jan 2021 - 1:51 pm

समेटून सारे थागे
सुर्य अस्ताला निघाला
पुन्हा येण्याचा त्याने
संकल्प सोडला

झाली निवृत्ती
वेळ निवांत मीळाला
काय भोगल सोडल
याचा हिशेब कळाला
उरल सुरलं पुर्ण करावं म्हणतो
जायच्या आधी काही लिहावं म्हणतो

काय अन कीती लिहावं
याला काही अंत नाही
आवडेल कुणाला, कुणाला रुचेल
कुणी वाचेल कुणाला पटेल
याचा खेद किंवा खंत नाही

इथल सगळं इथेच सोडून
पुढल्या मुक्कामी निघावं
पाऊलखुणा मीटण्या आधी
म्हटलं जरा थोडंस लिहाव

कविता

काय आहे तुझ्या ...माझ्यात ???

प्रज्ञादीप's picture
प्रज्ञादीप in जे न देखे रवी...
19 Jan 2021 - 5:07 pm

काय आहे तुझ्या ....माझ्यात
मैत्री,आपुलकी की अजुन काही?

माझ्या जे मनात असतं ते तुझ्या बोलण्यातुन जाणवतं..
तुला जे करावसं वाटतं ते माझ्या कृृतीतून
झळकतं..

काहीतरी पुर्वजन्मीचं नातं असावं
आपल्यात ..
नाहीतर उगाच का इतकी ओढ आहे ....

तुला माझी अन् मला तुझी ...
खरचं .....ए....मागच्या जन्मी कोण असेल मी तुझी ??
सखी,सोबतीण की अजुन कोणी??

कविता